आपल्यापैकी किती जणांचा भुता-खेतांवर विश्वास आहे?
मला मान्य आहे हा खूपच वादाचा मुद्दा आहे. काही जण याचे कट्टर समर्थक असतील तर काही विज्ञाननिष्ठ हे सगळे थोतांड म्हणून उडवून लावतील. मी स्वत:ही या जगात भुता-खेतांची वस्ती असेल असे मानत नाही. तरीदेखील मी हा विषय का आणतोय हे जाणण्यासाठी पुढील अनुभव वाचा.
प्रसंग १ - माझा ट्रेकींग-गुरू उमेशबरोबर आम्ही हरिश्चंद्रगडाचा बेत आखला. होय-नाही करता करता चौघेजण गाड्यांवरून निघालो. मंचर-आळेफाटा-खुबीफाटा मार्गे खिरेश्वरला पोचलो तेव्हा दिवस कलायला लागला होता. तेव्हा वेळ न घालवता पटकन चहा मारून चालायला सुरूवात केली. दाट जंगलातून वाट काढत जेव्हा टोलारखिंडीत पोहोचलो त्यावेळी चांगलाच अंधार पडला होता.
आजुबाजूचे वातावरण अन्य वेळी खूप छान वाटले असते, पण एकतर उमेश वगळता बाकी तिघे पहिल्यांदाच हरिश्चंद्रगडावर येत होतो. त्यातून या अशा अंधार्या रात्री (नंतर लक्षात आले त्या दिवशी अमावस्या होती), दाट जंगलात झाडांच्या अस्ताव्यस्त पसरलेल्या फांद्या, खिंडीच्या कोंदट जागेत भयाण वाटत होत्या.
मला वाचल्याचे आठवले की खिंडीमध्ये एक व्याघ्रशिल्प आहे. मी सहज त्याला विचारले "अरे खिंडीत एक व्याघ्रशिल्प आहे ना? कुठे आहे ते?"
त्याने मी जिथे बसलो होतो तिथे टॉर्चचा लाइट टाकला आणि म्हणाला "ते काय तुझ्या मागे"
मी मागे वळून पाहीले आणि एकदम दचकलो. माझ्या मागेच लालभडक शेंदूर फासलेले वाघोबा होते.
मनावर भितीचा अंमल बसत असतानाच आम्ही पुढे चालायला सुरूवात केली. रॉक्-पॅच ओलांडून वरती आलो. अमावस्या असल्यामुळे रात्र जास्तच अंधारी वाटत होती. त्यात कसा कोण जाणे उमेश वाट चुकला. फिर-फिरूनही वाट सापडेना तेव्हा थोडा वेळ थांबायचा निर्णय घेतला.
डिसेंबर असल्याने थंडी बर्यापैकी होती. एक मोकळी जागा पाहून बसलो. तोपर्यंत उमेशने पालापाचोळा गोळा करून शेकोटी पेटवली. जरी तो एकदम नॉर्मल असल्याचे दाखवत होता तरी त्याची अस्वस्थता आम्हा तिघांनाही जाणवली. त्याला विचारले तर त्याने उडवून लावले. शेवटी अगदी खनपटीलाच बसलो तेव्हा कुठे म्हणाला "मला या अशा ठिकाणी अजिबात रात्र काढायची नाहीये. फार वाईट अनुभव आहे" त्या ठिकाणी रात्र काढायची आमचीही अजिबात इच्छा नव्हती, तरीपण त्याला अनुभव काय आलाय हे ऐकण्याची जबरदस्त इच्छा झाली.
सगळ्यांनी अगदी आग्रह केल्यानंतर कुठे तो तयार झाला. आम्ही पुढे सरसावून बसलो, सगळे लक्ष त्याच्याकडे लागले. शेकोटीचा तांबडालाल उजेड त्याच्या चेहर्यावर पडत होता. आजुबाजूचा भयाण अंधार विसरायला झाला. त्याने जो अनुभव सांगीतला तो त्याच्याच शब्दात.................
साधारण तीन वर्षापूर्वी मी माझ्या काही मित्रांबरोबर या ट्रेकला आलो होतो. आमच्यामध्ये एक फडतरे म्हणून एक जण होता. तो पहिल्यांदाच ट्रेकला येत होता. आत्ता आपण आलो तसेच तेव्हाही संध्याकाळी उशीरा चालायला सुरूवात केली. पण फडतरेला चालवेना आणि तो खालीच बसला. आम्ही त्याला कसाबसा आणखी चालवला पण त्याचा स्टॅमिना अगदीच संपला होता. शेवटी असेच जंगलात थांबायचे ठरवले. सगळेजण ओळीत झोपलो, अर्थातच फडतरे मधे.
रात्री अचानक जाग आली ती फडतरेच्या आवाजामुळे. तो एकदम जोरजोराने ओरडत होता. मला पहिले काही समजेना. आधी वाटले त्याला साप - वगैरे चावला की काय. सगळेजण त्याभोवती गोळा झाले.
तो नुसताच ओरडत होता "नाही नाही ... नको नको"
त्याला शांत करायचा प्रयत्न केला पण तो काही ऐकेना. शेवटी एकजण पुढे झाला आणि त्याने खाण्णकरून त्याला मुस्कडले. त्याचा आवाज तर बंद झाला. तसाच मुसमुसत थोडा वेळ पडून राहीला. नंतर त्याने जे सांगितले ते असे -- त्याला म्हणे स्वप्नात दोघेजण दिसले. ते त्याला म्हणत होते की तु आमच्याबरोबर चल.
अर्थातच आम्ही हा सगळा प्रकार हसण्यावारी नेला. त्याची जाम टिंगल-टवाळी पण केली. या प्रकारानंतर झोप कोणालाच आली नाही. पहाटेपर्यंत इकडतिकडच्या गप्पा मारत बसलो.
सकाळी उठून गडावर गेलो. मंदीरापाशी पहातो तर ही गर्दी. गडावर काही उत्सव असल्याचे माहीत नव्हते. अजून पुढे गेलो तर दोन पोलिसही दिसले. आता आम्ही बुचकळ्यात पडलो. एवढ्या पहाटे पोलिस काय करतायत इथे?
एक गावकरी भेटला. त्याच्याकडून अशी माहीती मिळाली की काल गडावर एक ग्रुप आला होता. त्यातले काही जण पोहायला म्हणून पुष्करणी तळ्यात उतरले आणि बुडून मेले. त्यांच्या डेडबॉडीज काढायचे काम रात्रभर चालले होते. आत्त्ता कुठे त्या मिळाल्या.
अरेरे... का हे लोक असे करतात? असा विचार करत आम्ही आणखी पुढे गेलो. तोच फडतरे घाईघाईने माझ्या जवळ आला आणि म्हणाला "उम्या, आत्ताच्या आत्त्ता गड उतरायचा. काय वाट्टेल ते झाले तरी."
मला कळेना याला आता परत काय झाले.
त्याने मला हळूच बाजूला नेले आणि म्हणाला "अरे या दोन डेडबॉडीज दिसतायत ना? मला हेच दोघे काल रात्री न्यायला आले होते,"
अमानवीय...?
Submitted by आशुचँप on 27 November, 2009 - 09:06
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
.
.
काका एक्दा भा.न्दे घासुन
काका एक्दा भा.न्दे घासुन आल्यावर लादया पुस्त होता तेवा त्याने सग्ल्या फलोअर वर पानि ताकुन थेव्ल.न होत मि आप्ले पुस्त्क वाच्त बस्ले होते आत्ल्या खोलित काका एक्दम चेंग्त दिमलाइत मदे लादि पुस्तोय मग कय मि पानि प्यायला उतले अन पददा सारुन आले तर काका मागे बगतपरअय.न्त मि आत गे;ले माज्या पायाकालि प्लस्तिक बेग होति ति गास्लि जात होति आनि आवाज येत होता काकाने मला विचार्ल कस्ला आवाज येतोय मिमनाले नाय तो लादि घास्ता घास्ता पाय गस्रुन पद्ला आनि नेम्कि लाइत गेले मि दावत दाव्त गेले आनि बगित्ल.न कोन तर्फदल आनि काक्याला उचलायला गेले तर बोम्बालया लाग्ल माज्यानावान.न कुथे गेलि कुथे गेलि त्यला वातल.न कोन्तरि बोकांदि बसलय गाबर्ल बिचार तेवद्यात लाइत आलि आनि मलाच मन्तय कसं फस्वल् कसं फ्सव्ल् मि पन म्हन्तल् आता काय भुतं य्नेआरे लादि पुस्तायला
वरच लिखाण भलतच अमानवीय
वरच लिखाण भलतच अमानवीय आहे.
नारायण धारपांच्या कथेतील अशोक समर्थ हे पात्र वास्तवात सादाशिव पेठेतील एका व्यक्तीवर बेतलेल आहे. बहुदा त्यांच नाव केतकर
कुणाला याबाबत अधिक माहीती असल्यास सांगा
वरच लिखाण भलतच अमानवीय
वरच लिखाण भलतच अमानवीय आहे...........मनापासुन अनुमोदन, अगदी भयंकर
आशु अमानवियवर आलेल्या छोट्या
आशु अमानवियवर आलेल्या छोट्या छोट्या कथातुन एखाद पुस्तक काढ
मुकु कल्पना चांगली आहे. पण
मुकु कल्पना चांगली आहे. पण एकतर बाकीच्यांच्या गोष्टीं मी त्यांना विचारल्याशिवाय छापू शकत नाही. आणि मायबोलीचे या संदर्भातले नियम काय आहेत ते सुद्धा माहिती नाही.
आणि असले पुस्तक छापायचे म्हणल्यावर उद्या अनिस चे लोक्स माझ्या दारात उभे राहतील ते वेगळेच.
आशु, अनिस गेलं खड्ड्यात.
आशु, अनिस गेलं खड्ड्यात. त्यांना फक्त हिंदूंच्याच अंधःश्रद्धा दिसतात. बाकीचे कापतील सरळ ना!!
आशु, अनिस गेलं खड्ड्यात.
आशु, अनिस गेलं खड्ड्यात. त्यांना फक्त हिंदूंच्याच अंधःश्रद्धा दिसतात. बाकीचे कापतील सरळ ना!!
>> मंदार असं नाहिये.. मी स्वतः नरेंद्र दाभोळकरांचा बोहरी मुसलमानांच्या बद्दलचा लेख वाचलाय
आपल्या समाजात बहुसंख्य हिंदू असतील - हिंदू "बाबा" असतील तर त्यावरच जास्त लिहिलं जाणार ना!
बोहरींचा समाजच वेगळा आहे
बोहरींचा समाजच वेगळा आहे मुळात कुणाच्या अध्यात ना मध्यात.
आशुचँप तुला पुस्तक छापायचंच असेल तर अमानविय या सदराखाली तु लिहू शकतोस. इंग्रजीमधे अशी कितीतरी पुस्तकं , मासिकं आहेत. महाराष्ट्र किंवा भारतातील बाबांविषयी बोलायचं झालं तर आपणच मोठं करतो यांना कारण दृष्टी असूनही भावनेच्या किंवा लालचेपोटी आपण सर्रास आंधळे होतो आणि त्याचा फायद्या घ्यायला मग कोणितरी एक बाबा जन्माला येतो किंवा घातला जातो. वरचे बरेच अनुभव हे वैचारीक अस्थिरता, मानसिक छळ या सगळ्यातून आलेले आहेत असे मला वाटते आणि काही अनुभव हे फक्त जुन्या कथांना महत्व देऊन तसेच घडले किंवा घडेल असे जेव्हा बोलले जाते तेव्हा प्रत्येक घडणारी गोष्ट आपण फक्त त्याच विशिष्ट अँगलने पहायला जातो जे घडलंच नाही ते बिघडलं बिघडलं म्हणून ओरडत सुटतो आणि त्यावर विश्वास ठेवणार्यांची रांग वाढत जाते.
>>महाराष्ट्र किंवा भारतातील
>>महाराष्ट्र किंवा भारतातील बाबांविषयी बोलायचं झालं तर आपणच मोठं करतो यांना कारण दृष्टी असूनही भावनेच्या किंवा लालचेपोटी आपण सर्रास आंधळे होतो आणि त्याचा फायद्या घ्यायला मग कोणितरी एक बाबा जन्माला येतो किंवा घातला जातो.
प्रचंड अनुमोदन.
.
.
नानबा, तसं असेल तर माझे शब्द
नानबा, तसं असेल तर माझे शब्द मागे. पण तरीही अनिसच्या कार्यपद्धती आणि हेतू हे कधीच शुद्ध नव्हते.
असो. अवांतर चर्चे बद्दल क्षमस्व.
वरच लिखाण भलतच अमानवीय आहे.>>
वरच लिखाण भलतच अमानवीय आहे.>>
हसून हसून मुरकुंडी वळली.... बापरे!!! भयाण आहे!!!
छातीवर किंवा पाठीवर कोणीतरी
छातीवर किंवा पाठीवर कोणीतरी बसलं असल्याचा अनुभव बर्याच लोकांना येतो त्याला Sleep Paralysis असं म्हणतात. काही लोकांना ह्यामुळे खोलीत कोणीतरी आहे असंसुध्दा वाटू शकतं म्हणे. पहा - http://en.wikipedia.org/wiki/Sleep_paralysis
वरच लिखाण भलतच अमानवीय आहे.>>
वरच लिखाण भलतच अमानवीय आहे.>> हसून हसून मुरकुंडी वळली.... बापरे!!! भयाण आहे!!!.......
मला वाचता वाचता फेफरे यायला लागलेत, ते अजुनही थांबायला तयार नाहीये, प्रतिसाद ही मी फेफरे येत असतांनाही देतोय
>>जायच्या आधी डोळ्याचा
>>जायच्या आधी डोळ्याचा रंग/त्यातले भाव बदलतात असं मला वाटतं.. ह्याला शास्त्रिय कारणंही असू शकतात.
असेलही. माझी आजी म्हणजे माझ्या वडिलांची आई जायच्या आधी काही दिवस आईला सारखी म्हणायची की घरात कपाटाकडे एक माणूस उभा आहे, त्याला जायला सांग. पण आईला कोणीही दिसायचं नाही.
वरच लिखाण भलतच अमानवीय आहे
वरच लिखाण भलतच अमानवीय आहे
गुगु
<<कोकणकड्यावरून आत्महत्या
<<कोकणकड्यावरून आत्महत्या केलेला बर्वे होता >>
बरोबर. त्याचे नाव अरविन्द बर्वे.
तो आमच्या सोसायटीत आमच्या समोरच्या फ्लट मधे रहात होता.
माझ्या आठ्वणी प्रमाणे १९८५ च्या फेब्रुवारीत त्यानी आत्महत्या केली.
(No subject)
.
.
ठोसेघरच्या धबधब्याजवळ एक जागा
ठोसेघरच्या धबधब्याजवळ एक जागा आहे, जिथे आपण प्रवाहाच्या नव्हे तर धबधब्याचाही खुप जवळ जातो. >> दिनेशदा, नक्की कोणत्या, कारण तिथे २ धबधबे आहेत. मागील जो छोटा आहे त्याजवळ बरीच मोकळी जागा आहे. ह्या छोट्या धबधब्याजवळ ठराविक रेंजच्या आत पोहतात लोकं. पण ह्याचे जे पात्र पुढे जाते ते डायरेक्ट ५०० फुट मोठ्या धबधब्यात जाते, तिथेच जास्त लोकं मेले आहेत. पावसाळ्यात तिथे बर्याच जणांना अंदाज येत नाहि मी.२५/५०मी. अंतरावर किती धोका आहे. म्हणुन ठोसेघरला सर्वात जास्त रीस्क पावसाळ्यात असते.
रच्याकने धबधब्यांचा विषय निघाला म्हणुन, तुम्ही कधी व्हिक्टोरीया फॉल्सला गेलाय का, याच्या नैसर्गिक रचनेमुळ याला डेव्हिल्स स्विमींग पुल असही म्हणतात. मला कधीतरी इथलापण अनुभव घ्यायचाय
http://en.wikipedia.org/wiki/Victoria_Falls
चातका.. आता का लपलायस रे
चातका.. आता का लपलायस रे सोफ्यामागं??? तेरी विविध कवटियोंका क्या हुआ???
एका आठवड्याची कसर भरून निघाली.. सर्व नवीन किस्से एका दमात वाचले..
संपले नाहीत ना हे किस्से?????
निलतै हे किस्से संपाणार
निलतै हे किस्से संपाणार नाहीत. (तुझ्या 'विपु'त एक 'कवट्या महाकाळ' सप्रेम भेट :फिदी:)
त्या "अमानविय" भयानक किस्स्यांचीच वाट पाहतो आहे.
आता पुढे सुरु होईल "अमानविय सत्र"
वाचत रहा
.
.
कृपया विषय भरकटु देउ नका.
कृपया विषय भरकटु देउ नका. ज्यांचा भुताखेतांवर विश्वास नाही त्यानी अंनिस जॉइन करुन दुसरा बाफ उघडा.
आमची भुतांवरच्या अंधश्रद्धेवर अपार श्रद्धा आहे. प्लीज "अमानवीय" किस्से थांबवु नका.
mansmi18 ला अनुमोदन.
mansmi18 ला अनुमोदन.
हे अमानवीय नाहीये पण जरा
हे अमानवीय नाहीये पण जरा विचित्र वाटते हे खरं...
पहाटेच्या वेळी (साधारण ३-४ वाजता) गावाकडच्या भागात पिंगळ्या नावाची व्यक्ती/जमात गाणी म्हणत (देवाची गाणी/जागरण) फिरते, पुण्या-मुंबईच माहित नाही. असं म्हणतात कि ह्या पिंगळ्याच्या जवळ बाळंतीणीचे हाड असते, किंवा नसले तर तो शोधात असतो. तसंच ज्या घरात गरोदर बाई असते ते घर याला कळते...व तिथे हा फिरतो पहाटेच्या वेळी फिरणे चालु करतो. पण एकदा का प्रसुती ठीकठाक झाली कि हा फिरकत नाही...
.
.
बरोबर दिनेशदा, हा छोटा धबधबा
बरोबर दिनेशदा, हा छोटा धबधबा आहे...२०० मी. वगैरे हेच पात्र सरळ पुढे जाउन मोठ्या धबधब्यात कन्व्हर्ट होते. हा छोटा जिथे कोसळतो तिथपर्यंत लोक पोहु शकतात. जेंव्हा पाणी कमी असते तेंव्हा त्याच्यामागे जी गुहा आहे त्यातही जाउ शकतो.
डेंजर अनुभव आहेत एकेक वर
डेंजर अनुभव आहेत एकेक
वर दुसर्याच्या वस्तू वापरल्यावर येणार्या अनुभवांचा विषय निघाला म्हणून मला एक घटना आठवली.
४-५ वर्षांपूर्वी मी एका ट्रेनिंगसाठी पुण्याहून मुंबईला निघाले होते.वोल्वो बसने एकटीच प्रवास करणार होते.सकाळी बाबा मला बसपर्यंत सोडायला आले होते.बसमध्ये मी माझ्या विंडो सीटवर बसले.बाबा खाली उभे होते.खिडकीतून आमच्या गप्पा चालू होत्या तेवढ्यात माझ्या लक्षात आले कि माझ्या सीटवर एक पैशाचे पाकिट आहे.कोणाचे पाकिट आहे म्हणून मी उघडून पाहिले.एका मुलीचे कंपनीचे कार्ड आणि थोडेफार पैसे होते.ते पाकिट बाबांकडे देऊन त्या मुलीला सुपूर्द करण्यास सांगितले.इकडे मला सोडून आल्यावर बाबांनी त्या मुलीला फोन करुन तिचे पाकिट सुरक्षित असल्याचे कळवले आणि पाकिट घेऊन जाण्यास सांगितले.ही घटना घडली तेव्हा सकाळचे ८-८.३० वाजले असतील.ती मुलगी साधारण १२ च्या सुमारास येऊन तिचे पाकिट घेऊन गेली.त्या मधल्या वेळात माझ्या बाबांचे अतोनात पोट दुखले.पोटदुखीचे तसे काही कारण समजले नाही पण ती मुलगी पाकिट घेऊन गेल्यावरच बाबांना आराम पडला.
अजून घटना.ह्यात वापरलेल्या वस्तूचा तसा काही संबंध नाही.
४ वर्षांपूर्वी आम्ही पुण्यात 'संस्कॄती' नावाच्या हॉटेलमध्ये गेलो होतो.त्या ठिकाणी पपेट शो,कुंभार्,मेंदी काढणारी बाई, ज्योतिषी असे प्रकार आहेत.गंमत म्हणून तिथल्या ज्योतिषाला मी हात दाखवला.त्याने भविष्याबद्दलच्या ३-४ गोष्टी सांगितल्या.तसेच चांगल्या घटना घडाव्यात म्हणून एक पंचधातूची अंगठी दिली.बाकी माझा कशावर विश्वास नाही पण अंगठ्या मला खूप आवडतात त्यामुळे ती अंगठी मी घालायला सुरुवात केली.जे कधी घडत असं घडलं.दुसर्याच दिवशी माझं ऑफिसमधल्या सहकार्याशी अतिशय मोठं भांडण झालं.त्या अंगठीचा तो परिणाम आहे/नाही मला माहित नाही पण त्यानंतर ती अंगठी घालायची मला इच्छा झाली नाही.
Pages