वाचवा हो वाचवा.....

Submitted by पुरंदरे शशांक on 28 March, 2011 - 03:33

वाचवा हो वाचवा.....

अनेकजण वाहवा करत होते म्हणूनच खरं तर
धजावलो त्या अथांग कवितेच्या डोहात उडी मारायला..
उडी मारली मात्र...
कुठंय ते सगळे वर्णन करत होते ते - अनुपम सौंदर्य, वगैरे....
इथे नाकातोंडात शब्द जाऊन जीव गुदमरलाय नुसता !

शिवाय काय आशयघन का काय म्हणत होते ?
मला तर केवढे टेंगूळ आलंय त्या अर्थाला धडका मारुन..

अन् अंगही सोलपटून गेलंय पार .....
त्या अणकुचीदार, टोकदार उपमा, अलंकारांनी !

वाचवा हो वाचवा मला कुणीतरी
या अथांग, अगम्य कवितांपासून.....

हेहेहेहे. कवितेपासून वाचशील रे. पण डू आयडी कवींपासून कोण वाचवणार तुला? आता बघच तुझ्या पुढच्या कवितेवर!

शशांक, कवितेच्या प्रवाहात पडल्यावर त्यातून बाहेर पडणं कठीणच.
(फक्त प्रवाहपतित न होणं आपल्या हातात असतं.)

सर्वांचे आभार....
भिडेकाका - सरसकट कवितांबद्दल नाही पण अगम्य, अचाट, अर्थहीन, शब्दबंबाळ कवितांबद्दल म्हणतोय मी...

शशांक,
मज्जा आली कविता वाचतांना
<सरसकट कवितांबद्दल नाही पण अगम्य, अचाट, अर्थहीन, शब्दबंबाळ कवितांबद्दल म्हणतोय मी...>
मला पण म्हणावं वाट्लं "वाचवा हो वाचवा....."

भारी.. Happy
सरसकट कवितांबद्दल नाही पण अगम्य, अचाट, अर्थहीन, शब्दबंबाळ कवितांबद्दल म्हणतोय मी... >>>
हे आवडलं.. Proud

अलीकडे अश्या कवितांचा सुकाळच आलाय...... आणि त्यावरील प्रतिसाद सुद्धा तेच ते असतात..... अर्थाच्या नावाने बोंब्,शब्दबंबाळता अश्या या कवितांवर तुम्ही चांगले ताशेरे ओढले आहेत.

पण हा रतीब कुठे कमी होईल असं वाटंत नाही. Sad