३ वाट्या तांदुळ
१ वाटी उड्दाची डाळ
१ चमचा तुरीची डाळ
१ चमचा मेथी
तेल , मीठ
तांदुळ , उडदाची डाळ , तुरीची डाळ स्वच्छ धुवून घ्यावेत.
तांदुळ आणि उडदाची डाळ स्वतंत्र भीजत घालावी. भीजत घालताना दोन्हीपैकी कशातही तुरडाळ आणि मेथीचे दाणे घालावेत.
रात्रभर भीजवुन सकाळी मिक्समध्ये लागेल तसे पाणी घालुन ग्राइंड करावे.
एकत्र करुन फर्मेंट करायला ठेवावे.
भारतात ४/५ तासात पीठ चांगल फुगत. मीठ घालावे. लागल तर अजुन पाणी घालुन योग्य कन्सिस्टंन्सी करुन घ्यावी.
जाड बीडाचा तव्यावर , तवा तापला कि थोडे पाणी अगोदर शिंपडुन , नंतर तेल घालुन पातळ डोसे घालावेत.(घालताना वाटी आतुन बाहेर फिरवत आणावी.) बाजुला तेल/बटर सोडावे. खालुन लालसर झाला कि काढावा.
नॉन स्टिक वर केला तर डोसा थोडा जास्त वेळ गॅस वर ठेवावा.
डोसा क्रिस्पी नको असेल तर जाड घालता येईल. मला वाटत याच खर स्किल डोसा घालण्यावर आहे.
मी आईचच प्रमाण वापरुनही तिच्यासारखा अल्टिमेट होत नाही.
यात तुरीची डाळ घालतात का? असा
यात तुरीची डाळ घालतात का? असा दोसा कधी मी करून नाही बघीतला, पुढच्यावेळी करून बघता येईल.
हे मात्र खरं दोसा घालणे हे स्कील सरावानंतरच जमते. यासाठी प्रत्येकजण वेगवेगळी पद्धत वापरत असेल, मला गरम तव्यावर थंड पाणी मारले की मगच पातळ क्रिस्पी दोसे करता येतात.
नॉन स्टिक वर पण गरम तव्यावर
नॉन स्टिक वर पण गरम तव्यावर थंड पाण्याचा हबका मारायचा?
मी तरी मारते, याने तवा लवकर
मी तरी मारते,
याने तवा लवकर खराब होतो, खोलगट होतो असे ऐकले आहे तरीपण मी करते ३ वर्षाऐवजी तवा २ वर्षात टाकावा लागेल इतकच. दरवेळी दोसे तव्याला चिकटले, जाड झाले, तवा जास्त स्वच्छ करावा लागला या सगळ्या त्रासापेक्षा मला २ वर्षांनी तवा बदलणे जास्त सोपे वाटते.
हे पण खरंय. माझा तवा आता
हे पण खरंय. माझा तवा आता जवळजवळ साडेतीन वर्ष जुना आहे आणि तो मी पोळ्या, धिरडी, हाफ फ्राय असा सगळ्याला वापरते. अजून काहीच झालं नाही.
अजून एक अनोडाइज्ड, काळा तवा आहे तो जास्त योग्य होईल का डोश्यासाठी?
मी यावेळी भारतातून आणलाय
मी यावेळी भारतातून आणलाय फ्युचुराचा अनोडाइज्ड काळा तवा त्यावर चांगले होतात दोसे. माझ्यामते तवा कुठलाही असू दे त्यावर हात बसायला जरा वेळ लागतो आणि एकदा त्याचे तंत्र जमले की मग सगळे सोपे वाटायला लागते.
सॉरी सीमा तुझा धागा हायजॅक झाला.
मी नॉन स्टिक वर नुसता पेपर
मी नॉन स्टिक वर नुसता पेपर टॉवेल किंवा कापडाचा बोळा फिरवते. ते काम करत.
कोरडा की ओला?
कोरडा की ओला?
डोसे, उत्तप्पे, आप्पे तयार
डोसे, उत्तप्पे, आप्पे तयार करताना तवा / आप्पेपात्र 'तयार करणे' मह्त्वाचे असते. बीडाच्या तव्यावर केलेल्या डोश्याची चव अफलातून असते, जी नॉनस्टीक तव्यावर केलेल्या डोश्याला नसते. बीडाचा तवा असेल तर तवा तापवून आधी मीठाचं पाणी लावून घ्यायचं. पाणी evaporate झालं की तेल लावून चांगला धूर येईपर्यंत तापवायचा. मग गॅस कमी करून थोडया कमी तापमानाला आणून परत तेल लावायचं. मिडीयम गॅसवर डोसे घालायचे. ही तवा तयार करण्याची पध्दत प्रत्येकाची वेगवेगळी असू शकते.
आता सांबार सुद्ध्हा येऊ दे..
आता सांबार सुद्ध्हा येऊ दे.. पेपर डोसा आणि सांबार ढोसा !
कोरडा की ओला?>> मी तरी कोरडा
कोरडा की ओला?>> मी तरी कोरडा पेपर टॉवेल फिरवते. माझी तमीळ शेजारीण कांद्याने पुसून घेते तवा.
कालच रात्री डोश्याचं पीठ वाटून ठेवलयं. पुढच्या आठवड्यात नक्की करून बघणार, सीमा.
सीमा, मी पण तुरीची डाळ न
सीमा, मी पण तुरीची डाळ न घालता डोसे करते. आता ह्या मेथडने करुन पाहिन.
मी मिठाचं पाणी पेपर टॉवेलच्या
मी मिठाचं पाणी पेपर टॉवेलच्या बोळ्याने फिरवते तव्यावर.
सीमा, धन्यवाद.
कांद्याचा टोकाचा भाग कापायचा.
कांद्याचा टोकाचा भाग कापायचा. त्यात काटाचमचा रुतवायचा. सपाट भाग खाली ठेवायचा. तो मग मिठाच्या पाण्यात बुडवुन तव्यावर फिरवायचा. मस्त डोसे होतात.
धन्यवाद सीमा.
धन्यवाद सीमा.
तुरीची डाळ घालून कधी केले
तुरीची डाळ घालून कधी केले नाहीत. नक्की करणार.
यात चण्याच्या डाळीचे पिठ
यात चण्याच्या डाळीचे पिठ घालून पण चांगले होतात. अर्थात तूरीच्या डाळीने जास्त कुरकुरीत होतील.
मुंबईच्या हॉटेल्स मधे मिळणारा पेपर डोसा, तीन फूट व्यासाचा असतो.
डोश्याच्या पिठात नंतर पाणी घालायची गरज पडू नये. घट्टसर असले तरी वाटीने नीट पसरवता येते.
ओपन किचन असणार्या एखाद्या हॉटेलात, निरिक्षण केले तर त्यांचे कौशल्य कळते.
मीही तुरीचीडाळ घालून कधी केले
मीही तुरीचीडाळ घालून कधी केले नाहीत. आता घालेन. थँक्स सीमा.
पदार्थ खायला नै तो नै.. फोटो
पदार्थ खायला नै तो नै..
फोटो पण नै? बहुत नाइन्साफी है..
तान्दुळ वाटताना छोटा बटाटा व
तान्दुळ वाटताना छोटा बटाटा व कान्दा किसून घातलातर दोसे खूप छान होतात.
परवा डाळ-तांदूळ भिजवून काल
परवा डाळ-तांदूळ भिजवून काल रात्री दोसा केला. प्रमाण सीमाचेच, फक्त मूठभर पोहे घातले. छान झाला होता. धन्यवाद सीमा.
मीही कधी तुरीची डाळ घातली
मीही कधी तुरीची डाळ घातली नाही, आता करुन पाहीन.
Hi Sucharita Thanks, Potato
Hi Sucharita
Thanks, Potato and onion did make a difference. Taste is also very nice.
सीमा,आज ह्या रेसिपीने डोसे
सीमा,आज ह्या रेसिपीने डोसे केले.एकदम बेस्ट झाले आहेत. तुझ्या आईला थँक्यू सांग
मस्त कुरकुरीत डोसे झाले.
मस्त कुरकुरीत डोसे झाले. प्रमाण अगदी अचूक आहे. आणि इथे उन्हाळा दणक्यात चालू झाल्याने पीठही चार तासातच मस्त आंबलं. धन्यवाद सीमा
करून बघणार नक्की. धन्यवाद.
करून बघणार नक्की. धन्यवाद.
तुरीची डाळ घालून कधी केले
तुरीची डाळ घालून कधी केले नाहीत. नक्की करणार. >> सिंडी बाय, तू तुरीची डाळ न घालताच कर पाहु, नाहीतर इथे पण जळका वास यायचा
च्च ! नाही येणार. ह्या कृतीत
च्च ! नाही येणार. ह्या कृतीत तांदळाचे प्रमाण कित्ती तरी जास्त आहे डाळीपेक्षा.
मी कधी तुरिची डाळ घालून
मी कधी तुरिची डाळ घालून दोसाकेला नव्हता.मी थोडे पोहे पण घालते. काल केला .पण खूपच छान झाला. तवा थंड करण्यासाठी तव्यावर पाणी शिंपडायचे. कारण तवा खूप गरम झाला की पीठ पसरत नाही.गोळा होते.
शनिवारी या पद्धतीने डोसे केले
शनिवारी या पद्धतीने डोसे केले होते. फार छान झाले. धन्यवाद सीमा!!
अरे वा..छान आहे रेसिपी..
अरे वा..छान आहे रेसिपी.. लवकरच ट्राय करीन..
दक्स!! मलापण फोटू मिसला!!!
Pages