आपल्यापैकी किती जणांचा भुता-खेतांवर विश्वास आहे?
मला मान्य आहे हा खूपच वादाचा मुद्दा आहे. काही जण याचे कट्टर समर्थक असतील तर काही विज्ञाननिष्ठ हे सगळे थोतांड म्हणून उडवून लावतील. मी स्वत:ही या जगात भुता-खेतांची वस्ती असेल असे मानत नाही. तरीदेखील मी हा विषय का आणतोय हे जाणण्यासाठी पुढील अनुभव वाचा.
प्रसंग १ - माझा ट्रेकींग-गुरू उमेशबरोबर आम्ही हरिश्चंद्रगडाचा बेत आखला. होय-नाही करता करता चौघेजण गाड्यांवरून निघालो. मंचर-आळेफाटा-खुबीफाटा मार्गे खिरेश्वरला पोचलो तेव्हा दिवस कलायला लागला होता. तेव्हा वेळ न घालवता पटकन चहा मारून चालायला सुरूवात केली. दाट जंगलातून वाट काढत जेव्हा टोलारखिंडीत पोहोचलो त्यावेळी चांगलाच अंधार पडला होता.
आजुबाजूचे वातावरण अन्य वेळी खूप छान वाटले असते, पण एकतर उमेश वगळता बाकी तिघे पहिल्यांदाच हरिश्चंद्रगडावर येत होतो. त्यातून या अशा अंधार्या रात्री (नंतर लक्षात आले त्या दिवशी अमावस्या होती), दाट जंगलात झाडांच्या अस्ताव्यस्त पसरलेल्या फांद्या, खिंडीच्या कोंदट जागेत भयाण वाटत होत्या.
मला वाचल्याचे आठवले की खिंडीमध्ये एक व्याघ्रशिल्प आहे. मी सहज त्याला विचारले "अरे खिंडीत एक व्याघ्रशिल्प आहे ना? कुठे आहे ते?"
त्याने मी जिथे बसलो होतो तिथे टॉर्चचा लाइट टाकला आणि म्हणाला "ते काय तुझ्या मागे"
मी मागे वळून पाहीले आणि एकदम दचकलो. माझ्या मागेच लालभडक शेंदूर फासलेले वाघोबा होते.
मनावर भितीचा अंमल बसत असतानाच आम्ही पुढे चालायला सुरूवात केली. रॉक्-पॅच ओलांडून वरती आलो. अमावस्या असल्यामुळे रात्र जास्तच अंधारी वाटत होती. त्यात कसा कोण जाणे उमेश वाट चुकला. फिर-फिरूनही वाट सापडेना तेव्हा थोडा वेळ थांबायचा निर्णय घेतला.
डिसेंबर असल्याने थंडी बर्यापैकी होती. एक मोकळी जागा पाहून बसलो. तोपर्यंत उमेशने पालापाचोळा गोळा करून शेकोटी पेटवली. जरी तो एकदम नॉर्मल असल्याचे दाखवत होता तरी त्याची अस्वस्थता आम्हा तिघांनाही जाणवली. त्याला विचारले तर त्याने उडवून लावले. शेवटी अगदी खनपटीलाच बसलो तेव्हा कुठे म्हणाला "मला या अशा ठिकाणी अजिबात रात्र काढायची नाहीये. फार वाईट अनुभव आहे" त्या ठिकाणी रात्र काढायची आमचीही अजिबात इच्छा नव्हती, तरीपण त्याला अनुभव काय आलाय हे ऐकण्याची जबरदस्त इच्छा झाली.
सगळ्यांनी अगदी आग्रह केल्यानंतर कुठे तो तयार झाला. आम्ही पुढे सरसावून बसलो, सगळे लक्ष त्याच्याकडे लागले. शेकोटीचा तांबडालाल उजेड त्याच्या चेहर्यावर पडत होता. आजुबाजूचा भयाण अंधार विसरायला झाला. त्याने जो अनुभव सांगीतला तो त्याच्याच शब्दात.................
साधारण तीन वर्षापूर्वी मी माझ्या काही मित्रांबरोबर या ट्रेकला आलो होतो. आमच्यामध्ये एक फडतरे म्हणून एक जण होता. तो पहिल्यांदाच ट्रेकला येत होता. आत्ता आपण आलो तसेच तेव्हाही संध्याकाळी उशीरा चालायला सुरूवात केली. पण फडतरेला चालवेना आणि तो खालीच बसला. आम्ही त्याला कसाबसा आणखी चालवला पण त्याचा स्टॅमिना अगदीच संपला होता. शेवटी असेच जंगलात थांबायचे ठरवले. सगळेजण ओळीत झोपलो, अर्थातच फडतरे मधे.
रात्री अचानक जाग आली ती फडतरेच्या आवाजामुळे. तो एकदम जोरजोराने ओरडत होता. मला पहिले काही समजेना. आधी वाटले त्याला साप - वगैरे चावला की काय. सगळेजण त्याभोवती गोळा झाले.
तो नुसताच ओरडत होता "नाही नाही ... नको नको"
त्याला शांत करायचा प्रयत्न केला पण तो काही ऐकेना. शेवटी एकजण पुढे झाला आणि त्याने खाण्णकरून त्याला मुस्कडले. त्याचा आवाज तर बंद झाला. तसाच मुसमुसत थोडा वेळ पडून राहीला. नंतर त्याने जे सांगितले ते असे -- त्याला म्हणे स्वप्नात दोघेजण दिसले. ते त्याला म्हणत होते की तु आमच्याबरोबर चल.
अर्थातच आम्ही हा सगळा प्रकार हसण्यावारी नेला. त्याची जाम टिंगल-टवाळी पण केली. या प्रकारानंतर झोप कोणालाच आली नाही. पहाटेपर्यंत इकडतिकडच्या गप्पा मारत बसलो.
सकाळी उठून गडावर गेलो. मंदीरापाशी पहातो तर ही गर्दी. गडावर काही उत्सव असल्याचे माहीत नव्हते. अजून पुढे गेलो तर दोन पोलिसही दिसले. आता आम्ही बुचकळ्यात पडलो. एवढ्या पहाटे पोलिस काय करतायत इथे?
एक गावकरी भेटला. त्याच्याकडून अशी माहीती मिळाली की काल गडावर एक ग्रुप आला होता. त्यातले काही जण पोहायला म्हणून पुष्करणी तळ्यात उतरले आणि बुडून मेले. त्यांच्या डेडबॉडीज काढायचे काम रात्रभर चालले होते. आत्त्ता कुठे त्या मिळाल्या.
अरेरे... का हे लोक असे करतात? असा विचार करत आम्ही आणखी पुढे गेलो. तोच फडतरे घाईघाईने माझ्या जवळ आला आणि म्हणाला "उम्या, आत्ताच्या आत्त्ता गड उतरायचा. काय वाट्टेल ते झाले तरी."
मला कळेना याला आता परत काय झाले.
त्याने मला हळूच बाजूला नेले आणि म्हणाला "अरे या दोन डेडबॉडीज दिसतायत ना? मला हेच दोघे काल रात्री न्यायला आले होते,"
अमानवीय...?
Submitted by आशुचँप on 27 November, 2009 - 09:06
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
घुबडाला लक्ष्मीचे वाहन मानतात
घुबडाला लक्ष्मीचे वाहन मानतात ना ?
पुर्वी कर्नाळ्याला होती घुबडं (पिंजर्यात).
आफ्रिकेतल्या हाऊसमेड्स, स्वस्तिक, कलश असल्या वस्तुंना खुप घाबरतात. ज्या खोलीत देवघर असेल, खास करुन जिथे गणपति, मारुती चे चित्र असेल, त्या खोलीत, अजिबात जाणार नाहीत.
पण तिथेहि काही अघोरी पंथ आहेत, असे ऐकून आहोत. नरबळी वगैरे प्रथा अजून आहेत. (त्यांच्या पूजेला मानवी चरबीचाच दिवा लागतो म्हणे. ) इथल्या पेपरमधे पण येते काहितरी.
मस्कतला, मत्राह भागात माझ्या घरासमोरच भुताटकीची इमारत होती. उदघाटनाच्या दिवशीच, सगळ्यांना विचित्र अनुभव आले म्हणून, तिथे कुणी रहात नसे. त्या दिवशी लावलेल्या, रंगीत दिव्यांच्या माळा पण काढायला कुणी धजावत नसे. इतकेच काय, त्या बिल्डींगच्या समोर कुणी गाडीही पार्क करत नसे. अशीच इमारत कोर्निश भागात पण होती.
अशीच इमारत कोर्निश भागात पण
अशीच इमारत कोर्निश भागात पण होती. >>हो दिनेशदा मी ही एकुन आहे.
दिनेशदा आफ्रिकेतल्या तुम्ही
दिनेशदा आफ्रिकेतल्या तुम्ही सांगितलेल्या गोष्टी मी अनुभवलेल्या आहेत , आम्ही त्यांना आरोग्यासाठी healing करतो त्यालाही ते जुजु म्हनुनच घाबरतात .
भारतीयांचा जूजू जास्त पावरबाज
भारतीयांचा जूजू जास्त पावरबाज असतो..>>दिनेशदा, हे काय समजल नाही...कशावरुन ते म्हणतात कि भारतीय जुजु पावरफुल्ल असतात तिथल्यापेक्षा?
घुबडात काहीही अशुभ नाहीय.
घुबडात काहीही अशुभ नाहीय. कृपया कोणाचे असे गैरसमज असतील तर ते दुर करा.
मला घुबड आजवर तिनचारदा दिसलेय. आणि त्यातल्या दोन वेळेस मला धनलाभ झाला
गुगु, मला घुबडाचं पिल्लू
गुगु, मला घुबडाचं पिल्लू मिळालं होतं....... थोडी शुश्रुषा केल्यावर दुसर्या दिवशी उडून गेलं.....
असं काही शुभ अशुभ नसतं प्राणी - पक्ष्यांच्या बाबतीत.
घुबडात काहीही अशुभ नाहीय.
घुबडात काहीही अशुभ नाहीय. कृपया कोणाचे असे गैरसमज असतील तर ते दुर करा.
मला घुबड आजवर तिनचारदा दिसलेय. आणि त्यातल्या दोन वेळेस मला धनलाभ झाला >>>>>
धनलाभ झाला हे फार छान साधना.... पण मग घुबड दिसणं शुभ असतं असा एक गैरसमज निर्माण होवू शकतो.......
तात्पर्य : शुभ अशुभ असं काही नसतं...
श्री. डॉ.कैलास गायकवाड यांस
श्री. डॉ.कैलास गायकवाड यांस अनुमोदन "तात्पर्य : शुभ अशुभ असं काही नसतं..." या विधानावर.
शुभ आहे अशी माझी अंधश्रअद्धा
शुभ आहे अशी माझी अंधश्रअद्धा झालीय.
पहिल्या वेळेस तर दोन दिवसात नोकरी बदलली 
मला काहीच झालं नव्हते
मला काहीच झालं नव्हते तेंव्हा. क्लदाचित ते पिल्लू होतं म्हणून की कॉय??
मोठं झाल्यावर त्याचा ईफेक्ट वाढतो का???? घुबड अख्ख एक दिवस घरात होतं माझ्या. काहीही झालं नाही..... कैच्याकै.
भुंग्या...तुझ्या सहवासाने
भुंग्या...तुझ्या सहवासाने त्या घुबडाचे काय झाले ते तपासलेस का:)
अवांतर प्रतिसादाबद्दल माफी...
अधिकाधिक लोकांना इथे येऊन आपापले अनुभव टाकावेत..
खूप रोमांचकारी अनुभव आहेत एकेकाचे
भुंग्या...तुझ्या सहवासाने
भुंग्या...तुझ्या सहवासाने त्या घुबडाचे काय झाले ते तपासलेस का:)
>>>
अरे आशु त्याला दिवसा दिसू लागले. कालांतराने त्याचे लग्न झाले, पोरंबाळं झाली. आपल्या ढोलीत त्याने माझा फोटो लावलाय. रोज माझा जप करतो १०८ वेळा. जय भुंगेश...!!!!
घुबड जमातीत "भुंगोजी महाराज" असा एक "भारतीय कल्ट" निर्माण झालाय आणि लवकरच विजय कुलकर्णींच्या लेखात त्या कल्टचा उल्लेख होईल......

एक डाव भुताचा या (अशोक सराफ,
एक डाव भुताचा या (अशोक सराफ, दिलीप प्रभावळकर, इ.) पिक्चरचे शुटींग सासवड (ता. पुरंदर, जि. पुणे) ईथे झालेलं होत. त्यात जो जुना पडका वाडा दाखवला आहे त्यात वाड्याच्या मालकाच भुत आहे म्हणतात. शुटींग अर्थातच वाड्याच्या बाहेरच्या भागात झालंय पण आतल्या खोल्यात अजुनही ते भुत आहे असं म्हणतात. त्या भुताची फेवरेट सवय म्हणाजे ते घराच्या तुळईवर बसलेल असत उलटं...
अरे मित्रांनो, भुताखेतांवर
अरे मित्रांनो, भुताखेतांवर बोला रे. घुबड काय?
मंदार, मीही हेच म्हणणार
मंदार,
मीही हेच म्हणणार होतो.. घुबड पुराण बस झाले ..:)
भुतांबद्दल वाचायला मजा येते. अजुन येउ द्या.
गौतम, आपल्याकडचे हिंदी सिनेमे
गौतम,
आपल्याकडचे हिंदी सिनेमे आलम आफ्रिकेत खुपच पापिलर आहेत. नागिन वगैरे सारखे सिनेमे बघून त्यांना सगळे खरेच वाटते. गणपति, मारुती यांचे फोटो बघून त्यांना खुप भिती वाटते.
त्यांनी कुणा भारतीयाला विचारले, कि हे सगळे खरे असते का ? तर कुणी नाही, असे थोडीच म्हणणार आहे ?
चातक, ती कोर्निशची इमारत पाडून तिथे मग हॉटेल बांधले होते. पण तेही नाही चालले. त्या मोठ्या कारंज्याच्या जलाशयाच्या मागेच होती ती.
मीही हेच म्हणणार होतो.. घुबड
मीही हेच म्हणणार होतो.. घुबड पुराण बस झाले ..स्मित
भुतांबद्दल वाचायला मजा येते. अजुन येउ द्या.
<<< असं कसं.. घुबड, काळ्या मांजरी, वटवाघुळं , रातकिडे, रातकोल्हे, रडणारी कुत्री हे सगळे भूतांचे सगेसोयरेच नाही का !

श्र च्या हडळकथांची (अतृप्त आत्म्यांच्या डायरींची) जाम आठवण आली
त्यांनी कुणा भारतीयाला
त्यांनी कुणा भारतीयाला विचारले, कि हे सगळे खरे असते का ? तर कुणी नाही, असे थोडीच म्हणणार आहे ? >> हाहाहा, नाही न म्हणता अजुन थोडा मीठ-मसाला लावुन सांगितल असल त्यांना.
माझा एक मित्र म्हणायचा, जसं भुताला प्रत्यक्षात पाहुन फाटत असेल तशी देवही प्रत्यक्ष रुपात समोर आला तरी फाटत असेल
श्र च्या हडळकथांची (अतृप्त
श्र च्या हडळकथांची (अतृप्त आत्म्यांच्या डायरींची) जाम आठवण आली स्मित
-----------------------------------------------------------------------------------
कृपया लिंक असेल तर टाकाल का?
जय
जय भुंगेश!..................................... मस्त! घुबड जमातीत "भुंगोजी महाराज" असा एक "भारतीय कल्ट" निर्माण झालाय....................................................अप्रतिम!
चातक, ती कोर्निशची इमारत
चातक, ती कोर्निशची इमारत पाडून तिथे मग हॉटेल बांधले होते. पण तेही नाही चालले. त्या मोठ्या कारंज्याच्या जलाशयाच्या मागेच होती ती >>>>
दिनेशदा / चातक,
अजूनही कॉर्निशच्या 'त्या' बिल्डिंगला भाडेकरु वा गिर्हाईक नाही. असं म्हणतात की कोणी तिथं राहायला आलं की रात्री झोप-बिप छान लागते, पण सकाळी उठल्यावर जाणवतं की आपण रात्री घरी झोपलो होतो.... पण आता जाग आली तेव्हा कॉर्निशच्या फुटपाथवर आहोत. आजही म्हणे घरमालक बाजारभावाच्या १०% किमतीलाही भाड्याने द्यायची तयारी दाखवत असला तरी कोणालाच त्यात रस नाहीये. (ख.खो.दे.जा.)
तिकडून जाताना मात्र अनपेक्षितपणे त्या बिल्डिंगकडे नजर जाते आणि मग उगाचच imagination सुरु होतं की मी भाडेकरू म्हणून राहायला गेलोय आणि दुसर्या दिवशी सकाळी रस्त्यावरची माणसं माझ्याकडे हा असा रस्त्यावर का झोपलाय अश्या नजरेनं बघतायत
मित दुबई मधल्या "सबखा रोड"
मित
दुबई मधल्या "सबखा रोड" या भागात दहावर्षा पुर्वि रोजच कोणत्याही वेळी एकाहुन जास्त "बायकांच्या किंचाळ्या" एकु यायच्या, असे एकुन आहे. कालांतराने त्या बंद झाल्या. जसजसा या भागाचा विकास होत गेला, वस्ती वाढत गेली तो आवाज, त्या कींचाळ्याही नष्ट झाल्या.
असे डोळ्यांच्या कार्यप्रणाली
असे डोळ्यांच्या कार्यप्रणाली मध्ये झालेलेल्या अनियमितते मुळे होते. हा त्रास काही व्यक्तिं बाबतच पहावयास मिळतो. जेव्हा ही व्यकि खुप थकलेली, प्रचंड तहानेने व्याकुळ, अत्यंत विचार मग्न कींवा मानसिक तनावा खाली वावरत असते. त्या वेळेस द्रुष्य दिसण्याची वेळ, आणि त्याची माहीती "मेंदु" पर्यंत पोहचण्याची वेळ यात तफावत होते >>>>>>
नाहीनाही! हे उलट असते... मुळात डोळ्यांना असे दिसत नसून मेन्दूचे पर्सेप्शन तसे असते. हा प्रकार मेन्दूतल्या गडबडीमुळे होतो. माझ्या बाबतीतला प्रकार म्हणजे मायग्रेन मुळे डोकेदुखी होत असते तसेच कधीतरी डोके न दुखता तो परीणाम मेन्दूच्या दृष्टीक्षेत्रावर होतो.
मायग्रेनच्या वेळात कोणत्याही प्रकारचा वास,तीव्र उजेड,मोठा आवाज यांचा अतिभयानक त्रास होतो. कारण मुळात या संवेदनाक्षेत्रांना त्यावेळेस 'केमिकल लोच्या'मुळे आधीच त्रास होत असतो त्यात ज्ञानेंद्रियांनी अजून संदेशांची भर घातली की अगदी नकोसे वाटते.
हे उदाहरण द्यायचे कारण म्हणजे खूपदा आपल्याला 'इल्युजन' ,ह्याल्युसिनेशन वगैरे होत असतात आणि आपण आपल्या मनाच्या तळाशी साठलेल्या भीतीच्या आधारे त्याचा संबंध भूताखेताशी लावत असतो.
>>गणपति, मारुती यांचे फोटो
>>गणपति, मारुती यांचे फोटो बघून त्यांना खुप भिती वाटते.
दिनेशदा, हे प्रकरण काही कळलं नाही. ह्या देवतांची त्यांना का भीती वाटते?? मारुतीचं रूप उग्र वाटू शकतं पण गणपतीबाप्पा का बरं भीतीदायक वाटावेत? मग शंकराच्या फोटोबाबत काय प्रतिक्रिया येईल?
टीव्हीवर Ghost Hunters International, Ghost Stories वगैरे प्रोग्राम्स घरच्यांची चेष्टा सहन करूनही मी पहात असते. त्यातल्या एका प्रोग्राममधे असं सांगितलं की एखाद्या खोलीत हाय इले़क्ट्रोमॅग्नेटिक फिल्ड असेल (ह्यात अमानवी असं काही नाही, कधीकधी ओव्हरहेड वायर्स असू शकतात) तर तिथे लोकांना अस्वस्थ वाटू शकतं. आपल्याकडे कोणीतरी पहातंय किंवा खोलीत कोणीतरी आहे असे भास होऊ शकतात. "व्यक्ती तितक्या प्रकृती" ह्यानुसार व्यक्तिव्यक्तीप्रमाणे हा त्रास कमी-जास्त होऊ शकतो.
माझ्या आईचे वडील फॉरेस्ट खात्यात होते. त्यांना आलेले २-३ अनुभव आईकडून अनेक वर्षांपासून आम्ही ऐकलेत. तसंच मला स्वतःला परदेशात असताना एक अनुभव आहे. ह्या सार्यांवर घरी खूप खल करून झाला आहे. पण निराळं असं काही हाती लागलेलं नाही. त्याबाबत काही वेगळं वैज्ञानिक स्पष्टीकरण मिळेल का म्हणून मायबोलीवर एक लेख टाकायचा मी विचार करत होते. आता वेगळा लेख न टाकता ते अनुभव इथेच टाकू का?
स्वप्ना, नेकी और पुछ पुछ??
स्वप्ना, नेकी और पुछ पुछ??
'केमिकल लोच्या'मुळे >> खूपदा
'केमिकल लोच्या'मुळे >>
खूपदा आपल्याला 'इल्युजन' ,ह्याल्युसिनेशन वगैरे होत असतात आणि आपण आपल्या मनाच्या तळाशी साठलेल्या भीतीच्या आधारे त्याचा संबंध भूताखेताशी लावत असतो.>>> सहमत.
हो असेल तो योगायोगच . अरे खरच
हो असेल तो योगायोगच .
अरे खरच की मी हा विचारच केला नाही की त्या घुबडाची प्रतिक्रिया काय असे... 'मला वाटत अरे गुगु दिसला आणि ....' अशी काहीतरी कथा सिंहगड परीसरातल्या घुबडांमधे प्रसिद्ध असेल.
असो आपण घुबडाला दोष नको द्यायला पण जे झाल ते इत॑क अचानक आणि अगम्य होत. इतक सगळ छान चाललेल कामात कौतुक होत मी जवळ रहायला आल्यामुळे मामा मामी खुष होते आणि....
याच कारण मी शोधलच... मी ज्या 2BHK मधे एकटा रहायचो ते शापित होत. In fact ती सगळी बिल्डींगच ...
लिहीतो त्याबद्दल सविस्तर तो वर तुमच येऊ दे
याच कारण मी शोधलच... मी ज्या
याच कारण मी शोधलच... मी ज्या 2BHK मधे एकटा रहायचो ते शापित होत. In fact ती सगळी बिल्डींगच ...![8_1_229[1].gif](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u31794/8_1_229%5B1%5D.gif)
दिनेशदा "आपल्याकडचे हिंदी
दिनेशदा
"आपल्याकडचे हिंदी सिनेमे आलम आफ्रिकेत खुपच पापिलर आहेत"
आपणाशी सहमत आहे. मी बरेच हिंदी सिनेमाना फ्रेंच सबटायल्स दिल्यात अफ्रिकन मार्केटसाठी. असो त्याबद्दल इतर कुठेतरी बोलू
आफ्रिकेतच काय नरबळीचे प्रकार आपल्याकडेही आहेत अमरकंटकला...
खरतर मला दुषित वास्तु कळते पण कबुल करतो की मला मोह पडला त्यामुळे दुर्लक्ष केल.
हॉल अंधारा होता पण इतर दोन बेडरूम्स लख्ख उजेडाच्या आणि हवेच्या...
पाणी खराब होत म्हनून तापवताना विचार केला की तुरटी हवी. आणि रीकाम्या फ्रीज मधे फक्त एक तुरटी होती.
तो मालक माझ्या मित्राचा पार्टनर होता ज्याच्याशी eventually मैत्री झाली.
त्याची बहीण तिथे रहात होती. पण आता ती घरी परतलेली.
त्यांचे देव होते आणि विषेश म्हणजे ग्रामदेवताही... आता कोणी पुजता देव्हारा असाच टाकून का जाईल??
इथेच चुकचुकल ...
आमच्या एक ज्योतिषी बाई म्हणाल्या बघ काही चुकीच्या कारणाने तर घर सोडून गेलेले नाहीत ना...
एका वास्तु वगैरे करणा-या मित्राने सांगितलेल की तुला काही त्रास नाही पण त्या फॅमिलीत प्रॉब्लेम्स आहेत.
आता नुकतीच मैत्री झालेल्याला हे कस विचारणार
बर त्याची बहीण नोकरीसाठी मुंबईत परत आली आणि आता लंडनला असते एव्हढच कळलेल म्हण्जे वाईट कारणासाठी तर नक्कीच घर सोडल नव्हत.
तो मित्र म्हणाला की पहा योगायोग इथे रहायचे त्यांच आडनाव कल्याणकर आणि आता तू कल्याणचा
नुसता फ्रीजच नाही तर पोळपाट लाटण पासून सगळी भांडी कुंडी पाण्याचे प्रॉब्लेम्स म्हणून मोठी टाकी वॉशिंग मशिन.... फक्त टीव्ही सोडून सगळ होत.
शिवाय विजेच बिलही कोणीतरी advance भरलेल बहुदा कल्याणकरांनीच
कोणीही मोह पडावा अस होत सगळ...
मग काही दिवसानी मी एक गणपती आणाला आणि आईने ते सगळे देव पुजुन एका डब्यात घालून ठेवले.
आता मला अस वाटतय की ते त्या मित्राचेही नसावेत कारण तो ढिम्म काही बोलायला तयार नव्हता.
पुढे आमच्या घरात वाद हो ऊ लागले. मामा मामीचही भांडण लागल अगदी क्षुल्लक कारणावरून आणि ते सगळ किती विचित्र होत हे आता जाणवत.
आता तर वाटतय की नोकरी जाण हे blessing in disguise होत. नाहीतर मी काही तिथून बाहेर पडलो नसतो.
नुकतच मला एक पुण्यातला मित्र म्हणाला की मला तुझ्या त्या घरात खुप दडपण यायच.
स्वप्ना, आपल्याकदचे हत्ती आणि
स्वप्ना, आपल्याकदचे हत्ती आणि आफ्रिकन हत्ती यात खूप फरक आहे. इकडचे हत्ती खुपच मोठे असतात आणि ते सहसा माणसाळत नाहीत. आपल्याला लहानपणापासून, मंगलमुर्तीच्या दर्शनाची सवय असते. आपल्याला तो आपला बाप्पा वाटतो, आपल्या मनात हत्तीचा विचार येत नाही आणि आला तरी आपल्याकडचे हत्ती, तसे प्रेमळ असतात.
पण हे लोक गणेश प्रतिमेची तूलना, इथल्या हत्तीशी करतात. आणि अर्थातच भितात.
तसेच इथल्या माकडांबद्दलही.
मित, त्या कोर्निश परिसरात ती एकच इमारत होती. मत्राह ची तर ऐन रस्त्यावर होती. मला काही विचित्र अनुभव नाही आले तिथे. मी रात्री तिथे भटकत असे.
Pages