अधुरं प्रेम.........

Submitted by rajnandini on 13 March, 2011 - 04:44

मी प्रथमच लिहित आहे.

तशी त्याची अन् तिचि खुप ओळख नव्हती. पण त्याला ती खुप आवडायची. तिलाही तो आवडत होता. असंच त्याच्या मित्रांबरोबर बोलता बोलता ओळख झाली. ती त्याला फोन करत असे. नाहितर त्याच्या घराच्या वरच्या मजल्यावर जाऊन बोलत असे.
असे खुप दिवस गेले. कामासाटी त्याला पुण सोडाव लागनार होत, तीला खुप रडू येत होत पण तीन ते दाखवील नाहि. तो आणि ती दोघेहि शांत होते. त्या दोघां मध्ये काही प्रेम नव्ह्तं तर होति ति फक्त मैत्रि. तो काही लांब जाणार नव्ह्ता तो फक्त १ वर्षासाटी चालला होता पण........
तो संध्याकाळी ९ वाजता गेला. पण तो दर गुरुवारी येणार होता तिच्यासाठी. असेच दिवसामागुन
दिवस चालले होते आणि तो आला ती त्याचि वाट पाहात होती. त्याने मी आलो आहे चा संकेत दिला, तिला खुप बर वाट्लं. ती त्या वेळी १० वी च्या परीक्षेचा अभ्यास करित होति, आणि त्या दिवशी आषाडी एकादस होति. तो आला त्याने तिला वहि मागीतलि तीनेहि दिलि.
त्या वहित त्याने प्रेमाची कविता लिहिलि होती फक्त फक्त तिच्यासाटी. तिने ति वाचलि अन् ते पान फाडून टाकल. पण ती रडत होती आणि तो ही.
पान तर तीने फाड्ले होते पण ते असे काहि स्पष्ट आणि dark लिहिल होत की ते मागिल ५ ते ६ पानावर दिसत होतं. ती खुप रडलि, 'मी नाहि असं करु शकत'.
थोड्याच वेळात खुप पाऊस आला जणू त्यालाहि दु:ख झालं होतं.फाडलेल्या पानाचे बारिक बारिक तुकडे पावसासोबत निघुन गेले. पण तो पुर्न खचला.
तो त्याच दिवशी तीला न सांगता निघुन गेला..
तो परत आला. मागे झालेल विसरुन ते परत बोलायला लागले. पण देवाच्या मनात वेगळ असत.
ते बोलत होते पहिल्यासारखेच.
पण न राहावून त्याने तिला परत विचारना केली. ती तीच्या उत्तरावर ठाम होती.
तो काहि नाहि बोलला. तो दिवस निघुन गेला आणि तो ही.
परत गुरुवारी तो आला. आता मात्र त्याने हद्द पार केली आणि अन तीने होकार दिला. तीने होकार द्यायला कारनच तस होत. कारण त्याने रक्तने पानावर तिच्यासाठी I LOVE U ****** अन् तिनेहि तीचा हात कापुन त्याच भाषेत उत्तर दिलं.
स्वारी खुपच खुश होती. पण ती थोडी नाराज होती. पण तरी तिला भीती वाट्तं होती...........
हा आपल्याला फसवनार तर नाहि ना.....
थोडे दिवस चांगले गेले. नंतर एक एक गोष्ट तीच्या समोर यायला लागलं. तीला धक्यावर धक्के बसु लागले,
तीला दिवसेन दिवस त्याचा तिला खुप राग येवु लागला आणि तीने त्याला टाळायला सुरुवात केली.
जो मित्र मदत करनार होता तोच हा मुलगा चांगला नाहि असे बोलुन तीला खुप खुप मोठा धक्का दिला.
तीने नंतर त्याला फोन करन टाळलं गेली. तो तीला भेटायचा प्रयत्न करु लागला. पण ती एकेल तर....
मग तो ही तीला भेटेनासा झाला. दोघेहि लांब गेले निघुन. तो गावाला निघुन गेला होता. कारण तो ते सहन करु शकत नव्ह्ता,पण तो तीचि वाट पाहतच होता.
तिला तर तो आजहि आवड्तो पण त्याने लग्न केले.
त्यातहि तीने आनंद मानला.
ती एका ठीकाणी काम करते, पगार पण छान.
पण सोबत एकटेपणा आहे. आणि नजर त्याच्या वाटेकडे आहे.....
------------------------------------------------------------------------------------
(माझा पहिला प्रयत्न आहे चुका असल्यास सांगव्यात)

गुलमोहर: 

टुकार ! असं काही नसतं की लिहायलाच हवं. लेखनाच्या चुका एकवेळ माफ, पण किती illogical आणि immature लिखाण आहे. थोडे दिवस वाचा, लिहायची सवय करा, मग लिहा ना.

मी असं बघते आहे कि तुम्ही जोरदार वाचत सुट्ला आहात ( भरपुर जुन्या कथा अचानक वर आल्या आहेत, तुमच्या प्रतिसादांमुळे, म्हणुन कळलं), हे खुपच छान. काही लोक इतकं सुंदर लिहितात ना ! ते वाचुन वाचुन ही तुमचं लिखाण सुधारेल.

तुम्ही काय, तो किश्या नावाचा id काय, उगाच कही तरी लिहुन स्वतःचं हसं का करुन घेतात. माबोवाले चांगले आहेत. कोणी काही लिहिलं की लगेच सुरु, 'मस्त, छानच, अप्रतिम, पुलेशु' . मी सांगते, नकाच लिहु.

मनिमाऊ, भाषा अंमळ कडकच वापरलीयेत Happy पण तुम्ही दिलेला सल्लाच मीही देणार होतो.

नंदिनी कदम,

हि कथा, कथा न वाटता, लिखाणासाठी काढलेले मुद्दे वाटताहेत. प्रसंग फुलवा, पात्रांची, आजुबाजूची वर्णनं येउद्या, वातावरण निर्मिती होउ द्यात, पात्रांचे स्वभाव तरी रंगवा. आणि हो, वाचताहात ही अतिशय चांगली गोष्ट आहे. जमेल तेव्हढ वाचा. जे आवडलं ते का आवडलं त्यावर विचार करा, जे नाही आवडलं ते का नाही आवडल ते जाणून घ्या. न आवडलेलं लिखाण तूम्ही कसं लिहिल असतंत ? ह्यावर थोडा वेळ घ्या.

माझं पहिलं लिखाण अतिशयच बेकार होतं. आता भरपूर प्रॅक्टिसने मी माझ्या पहिल्या लिखाणापेक्षाही दर्जेदाररीत्या दळभद्री लिहू शकतो. Wink

उम्म्म.... सॉरी ! खरंच जरा जास्तच कडक लिहिलं आहे मी. पण उगाच लोकांनी चढवलं की चिड्चिड होते. त्यात नेमकं 'वारी' नंतर हे वाचल्यामुळे अजुनच वैताग आला.

आणि 'असुदे' तुम्हाला फिशटॅन्कवर लिहिलं की फिशिन्ग ( i mean, fishing for praises) पण जमायला लागलं का? तुमचं लिखाण दळभद्री कधीपासुन? तुम्ही तर चांगलंच लिहिता. मी प्रतिक्रिया देत नसले तरी, सगळं वाचुन appreciate पण केलं आहे ( मनातल्या मनात). मी स्पष्ट प्रतिक्रिया देते हे तुम्हाला कळालंच आहे. मस्का लावणे नाही.

याला कथा का म्हणावी?? हे "मुद्द्यावरून गोष्ट सांगा" असा गृहपाठ वाटतो आहे.
असो.. पु ले शु.

तुम्ही मुद्दे चांगले काढले होते. पण खरच कथा फुलवण्याची गरज आहे. असुदे म्हणतात त्याप्रमाणे लिहायची सवय करा. तुम्ही नक्की चांगले लिहू शकता असे वाटत आहे.

लिखाण सुधारणेस बराच वाव आहे, वरील सगळ्यांशी सहमत.

एक उत्तम वाचक साधारण, व्यवस्थित लिखाण करु शकतो असं माझं वयक्तिक मत.

आणि त्या दिवशी आषाडी एकादस होति.>>

धक्यावर धक्के बसु लागले,
तीला दिवसेन दिवस त्याचा तिला खुप राग येवु लागला आणि तीने त्याला टाळायला सुरुवात केली.
जो मित्र मदत करनार होता तोच हा मुलगा चांगला नाहि असे बोलुन तीला खुप खुप मोठा धक्का दिला>>>>

दोघेहि लांब गेले निघुन. तो गावाला निघुन गेला होता. >>>

कारण तो ते सहन करु शकत नव्ह्ता,पण तो तीचि वाट पाहतच होता.>>>

तिला तर तो आजहि आवड्तो पण त्याने लग्न केले.>>

नंदिनी, इथे लिहिण्याचा पहिलाच प्रयत्नं आहे नं?
वर अनेकांनी म्हटलंय तसे ही कथा न वाटता तिचा सांगाडा वाटतोय. ह्यातली पात्रं, प्रसंग भरायला हवेत.
सुरसुरी आल्यावर गडबडीने इथेच लिहून लगेच प्रकाशित केलंय का?
अर्धवट लिहून अप्रकाशित अवस्थेत ठेवण्याची इथे सोय आहे. त्यावर मग र्‍हस्व दीर्घं, परिच्छेद, व्याकरणाच्या सहज टाळता येण्यासारख्या चुका सुधारता येतात.
दुसरा उपाय म्हणजे बरहा सारखं मोफत मिळणारं सॉफ्टवेअर वापरायचं. (www.baraha.com). तुमच्या कॉम्प्यूटरवर ते डाऊनलोड करता येतं. त्यात तब्येतीत लिहून अगदी मनासारखं उतरलं की मगच इथे द्यायचं.
खूप वाचा... आपल्या लेखनाचा दर्जा आपल्यालच सुधारलेला दिसायला लागतो.

हे आजचं लिखाण - एका चांगल्या कथेचं बीज आहे.

लिहायला महिना लागला तरी चालेल, घाई नाही. इथे आलं की सगळे वाचतात आणि प्रतिसाद देतातच. स्वतःला वेळ द्या आणि निवांतपणे पुन्हा लिहा. Happy

तुम्ही काय, तो किश्या नावाचा id काय, उगाच कही तरी लिहुन स्वतःचं हसं का करुन घेतात. माबोवाले चांगले आहेत. कोणी काही लिहिलं की लगेच सुरु, 'मस्त, छानच, अप्रतिम, पुलेशु' . मी सांगते, नकाच लिहु.

मनिमाऊ, तुम्हाला लिखाणावर टीका करायची असल्यास जरूर करा.
माझ्या लिखाणावर मी जिथे लिहीले आहे तिथे टीका करावी, ती जरूर स्वीकारार्ह असेल.
पण कुणावरही वैयत्तिक टिप्पण्या नाही केल्यात तर ते अधिक परिपक्वपणाचे ठरेल.

अरे अरे, भांडूया नकोत
माबो सगळ्यांना सांभाळून घेणारं आहे
नव्या लेखक/ लेखिकांना वाव मिळायलाच हवा....

नंदिनी
नव काही सुचलं की कधी एकदा लिहून post करेन असा होतं खरं, पण वर सगळ्यांनी सांगितल्याप्रमाणे थोडासा संयम ठेवून आणि आपण लिहिलेलं पुन्हा पुन्हा वाचला नं, की आपल्यालाच आपल्या चुका समजतात....
एक मैत्रीण म्हणून सांगितलं बरं! आणि discourage होऊ नकोस अजिबात.... तुला सुचतं चांगलं, फक्त शब्द-बांधणी छान कर- प्रसंग फुलव... ..... all the Best

नंदिनी,
नव काही सुचलं की कधी एकदा लिहून post करेन असा होतं खरं, पण वर सगळ्यांनी सांगितल्याप्रमाणे थोडासा संयम ठेवून आणि आपण लिहिलेलं पुन्हा पुन्हा वाचला नं, की आपल्यालाच आपल्या चुका समजतात....
एक मैत्रीण म्हणून सांगितलं बरं! आणि discourage होऊ नकोस अजिबात.... तुला सुचतं चांगलं, फक्त शब्द-बांधणी छान कर- प्रसंग फुलव>>
याला अनुमोदन

कस आहे काही लोकांना स्वतः लिहता येत नाही म्हणुन असा राग काढण्याचा प्रयत्न करतात... म्हणुन ते दुसर्‍याच्या लिखानाला टुकार म्हणतात...
बाकी काही तरी लिहणे हिच मुळात चांगली गोष्ट आहे..
अजुन बरेच काही लीहु शकतेस. लिही पुढच्या लिखानाची वाट पाहत आहे.

कस आहे काही लोकांना स्वतः लिहता येत नाही म्हणुन असा राग काढण्याचा प्रयत्न करतात... म्हणुन ते दुसर्‍याच्या लिखानाला टुकार म्हणतात... >>>>>>>>>>>

किश्या,
मला लिखान नाही, पण लिखाण येतं, म्हणुन मी ऊठसुट लिहित सुटत नाही. मला दर्जेदार ले़खन वाचायला जास्त आवडतं. माझे १०वी मधले निबंध सुध्धा यापेक्षा खुप छान होते. (english medium असुनही). Wink

ईकडे टुकार लेखन वगैरे म्हणुन लेखकाचे moral कशाला डाऊन करताय.. ते कळाले नाही.. चुभुद्याघ्या...

ईथे दाद नी जो प्रतिसाद दिला आहे तो योग्य आहे असे वाटते..

बाकी
@नंदिनी सुरवातीचा प्रयत्न चांगला आहे.. अगदीच सुमार लेख आहे असे अजिबात वाटत नाही..
पु.ले.शु.
@ किश्या : - लै टेंशन घेतोय रे.. हलकेच घे Happy तु माजलगावचा असला तरी माजल्यासारखे लिहीत नाहीस ना Wink

सॉरी ! खरं तर इतकं काही कडक लिहायचं नव्हतं, पण महिनो न महिने तेच तेच गोड गोड अगदी सोज्वळ मराठी सिनेमा मधले ' दादा, ताई' टाईप प्रतिसाद वाचुन वैताग आला. नाही छान तर म्हणा ना तसं. पण नाही, घोळुन घोळुन तेच मस्के मारणं. मस्त आहे, अप्रतिम आहे, पुलेशु, पहिलाच प्रयत्न पण छान आहे वगैरे वगैरे वाचुन खुsssssssssssssssssप कंटाळा आला. मग तडका टाकणे, थोडेसे evil बनणे भाग पडले.

आता तुम्हीच बघाना.

@नंदिनी सुरवातीचा प्रयत्न चांगला आहे.. अगदीच सुमार लेख आहे असे अजिबात वाटत नाही..
पु.ले.शु.>>>>> हे लेखन सुमार नाही? असं तर म्हणायचं नाही कि अतिसुमार आहे. तुमच्या प्रतिद्सादाला काही म्हणायचं तर फक्त .......... मी शब्द गिळुन टाकते.

किश्या,
मला लिखान नाही, पण लिखाण येतं, म्हणुन मी ऊठसुट लिहित सुटत नाही. मला दर्जेदार ले़खन वाचायला जास्त आवडतं. माझे १०वी मधले निबंध सुध्धा यापेक्षा खुप छान होते. (english medium असुनही>>>
खर आहे तुमचं. शेवटी तुम्हीही मराठीच आहात.... खेकड्याची वृती जाईल कशी...
आनि जर तुम्ही खरं प्रेम कुणावर केलं असेल तरच कळेलं ना तुम्हाला (करता येत असेल तर)....
नाहीतर गाढवापुढे वाचली गीता कालचा गोंधळ बरा होता अशी गत व्हायची तुमची Wink

अरे अरे... भांडताय काय??? Happy लिहू नका असं कोण म्हणतंय... लिहा ना... लिहीण्यावाचण्यासाठीच तर हे सांकेतिक स्थळ आहे... पण लिहीण्याआधी वाचन चिंतन मनन अशा पायर्‍या असतात... हे आपलं आपणच आधी केलं की चुका आधीच समजतात. दुरूस्त करायला सोपं जातं. नाही समजलं तर मग वाचक सांगतात. या प्रातिनिधिक प्रतिक्रिया आहेत. काही फक्त गुडीगुडी, काही चूका नीट विश्लेषण करून सांगणार्‍या तर काही स्पष्ट आणि परखड! आता कुठल्या प्रतिसादांना मनावर घ्यायचं हे पण स्कीलच आहे ना... आणि म्हणतात ना... निंदकाचे घर असावे शेजारी त्याशिवाय आपण सुधारणार कसे???

असो... मला वाटतेय नंदिनी ने दाद आणि असूदे यांच्या प्रतिक्रियेवरून काय तो निष्कर्ष काढला आहेच! नंदिनी चूक कबूल करण्याएवढा प्रांजळपणा तुमच्याकडे आहे, आणि परखड प्रतिक्रियेनेही तुम्ही हतबल पण झाल्या नाहीत आणि चिडल्याही नाहीत. यात तुमच्यातील लेखिकीचच नुकसान आहे हे तुम्हाला कळलं असावं. हे मला खूप आवडलं.... तुम्ही नक्कीच नव्या उमेदीने नव्या कथेवर जोरदार मेहनत घेत असणार निसंशय!

असो... नंदिनी तुमच्याकडून एखाद्या छानशा कथेची अपेक्षा आहे... विषय तर सुचलाच आहे तुम्हाला... थोडं खुलवा, फुलवा... छान वर्णनात्मक प्रसंग टाका... तिचं त्याचं वर्णन टाका... कुठे भेटले कसे भेटले.. काय वाटलं भेटीच्या वेळी? मग सगळं सुरळीत चालू असताना त्याला असं काय झालं की त्याने वेगळा रस्ता पकडला.. तिची कशी घालमेल झाली.. वगैरे वगैरे... बघा प्रयत्न करा... अजून चांगला प्रयत्न करू शकाल.
वाट बघतेय! Happy

नंदिनी, लिखाण थोडं अपरिपक्व वाटत.

आधी सुचलेले विचार कच्च लिखाण स्वरुपात लिहायचे....मग डायरीत, मग बराह मध्ये या सगळ्या
पाय-यांमध्ये मग आपल्या चुका स्वतःलाच समजायला लागतात.... मी हे तुला सांगतेय म्हणजे मी कुणी मोठी लेखिका आहे असे नाही तर माझे अनुभव तुझ्याबरोबर शेअर करतेय.

Back to top