Submitted by रूनी पॉटर on 10 March, 2011 - 17:20
या अगोदरचा पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१ धागा.
पाककृती हवी आहे? इथे विचारा. पण त्या अगोदर
या ठिकाणी, या ठिकाणी आणि या ठिकाणी अगोदरच आहे का हे पाहिलत तर आपल्या सगळ्यांचा वेळ वाचू शकेल.
बर्याचदा पोळी-चपाती-फुलके-पराठे याबद्दल प्रश्न येतात, त्यासाठी आता इथे वेगळा धागा आहे.
तसेच वेगवेगळ्या पदार्थांच्या घटकांच्या नावाबद्दल वगैरे प्रश्न इथे विचारता येईल
इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककृती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्यास सोपे पडेल.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
चिन्नू बीट आणि गाजराचं सार
चिन्नू बीट आणि गाजराचं सार किंवा सुप ही खुप छान लागतं.
सावनी, दिनेशदा, मृण्मयी
सावनी, दिनेशदा, मृण्मयी ,तोषवी, स्वप्ना सगळ्यांना धन्यवाद.
स्वप्ना तुझ्या रेसीपी ची वाट बघते आहे
थँक्स रचु. स्वप्ना, रेसीपी
थँक्स रचु. स्वप्ना, रेसीपी टाक लवकर.
माझ्याकडे बरेच मेतकुट आहे.
माझ्याकडे बरेच मेतकुट आहे. भडंग आणि तुप-मेतकुट-भात या शिवाय काय करता येइल?
जुन्या मायबोलिवर हे एक सापडले.
http://www.maayboli.com/hitguj/messages/103383/93719.html?1140990038
अजुन काही मेतकुटाचे प्रकार सांगु शकाल का कुणी ?
कांदा, कोथिंबीर बारीक चिरुन
कांदा, कोथिंबीर बारीक चिरुन मेतकुटात घाला, मग मीठ, साखर, दही घालून कालवा. दह्याऐवजी चिंचेच्या कोळातही कालवता येते. चपाती, फुलक्याबरोबर चटणीसारखे खायचे.
दही , मेतकूट, बारीक चिरलेली
दही , मेतकूट, बारीक चिरलेली लसूण पात, हिरवी मिरची एकत्र करा. मोहरी , हिंग , हळद फोडणी द्या.
हिरव्या पातीचा कांदा बारीक
हिरव्या पातीचा कांदा बारीक चिरुन+मेतकुट+दही. हव असेल तर बारीक चिरुन हिरवी मिरची. मस्त लागत एकदम.
पीठ पेरुन भाज्या - कॅप्सिकम,
पीठ पेरुन भाज्या - कॅप्सिकम, कांद्याची पातं, पाले भाज्या - यात बेसन घालतो त्याबरोबर थोडे मेतकुट घालायचे, मस्त चव येते
पोळ्या ओव्हन मधे थोड्या कुरकुरीत होइपर्यंत गरम करायच्या. त्याचे बारीक तुकडे (अगदी चुरा नाही) करायचे. त्यात कांदा, मेतकुट आणि कोथिंबीर घालायचे वरुन फक्त मोहरी-हिंगाची फोडणी... मस्त लागेल असा चिवडा
वर्षा, वाळलेल्या तूरी
वर्षा, वाळलेल्या तूरी रस्साभाजीत (वांगी, बटाटा वगैरे ) वापरता येतात. नुसत्याही भिजवून उसळ करता येते.
रच्चु , चिन्नु, पा.कृ. इथे
रच्चु , चिन्नु, पा.कृ. इथे टाकली आहे.
http://www.maayboli.com/node/24390
उसळच पाहिल करुन.. धन्स
उसळच पाहिल करुन.. धन्स दिनेशदा
त्या वाळलेल्या तुरीला मोड
त्या वाळलेल्या तुरीला मोड आणले तर ?
माझ्याकडे पण आहे वाळवलेली तुर मी लावलेल्याच झाडाची. खुप आनंद होतो अस लिहीताना.
कोणाला चौकळशी पध्दतीचा मसाला
कोणाला चौकळशी पध्दतीचा मसाला कसा करतात ते माहित आहे का?
जागू, झाडावरच शेंग जून होऊन
जागू, झाडावरच शेंग जून होऊन वाळली असेल तर तूरीला मोड येतात.
गुजराथी बायका, ही झाडे लावणारच. अगदी केनया / नायजेरियात पण लावलीत त्यांनी हि झाडे.
आम्ही भाजी करताना, अगदी मुठभर जरी घरचे दाणे मिळाले, तर काय आनंद होतो आम्हाला !
लालू , मेधा , सिमा, लाजो
लालू , मेधा , सिमा, लाजो सर्वांना धन्यवाद.
कोणाला चित्रान्न कसे करतात हे
कोणाला चित्रान्न कसे करतात हे महिती आहे का?
दिनेशदा मी कालच तुरीच्या
दिनेशदा मी कालच तुरीच्या दाण्यांची भाजी केली. खुप छान झाली. थोडी मोड आणायला पण ठेवली आले आहेत आज मोड त्याला. आता त्याची आमटी करणार.
कैरीचे चित्रान्न : नेहमीसारखा
कैरीचे चित्रान्न : नेहमीसारखा भात मोकळा करून घेऊन त्यावर हिरवी मिरची, कढीलिंब, हरभरा डाळ, उडीद डाळ, हळद घालून फोडणी करतात. त्यात शेंगदाणेही घालतात. ही फोडणी भातावर घालून त्यावर कैरीचा कीस पसरवतात. मीठ, साखर घालून कालवून सव्र्ह करतात. शोभेसाठी खोबरं, कोथिंबीरही घालतात.
ह्या लिंकवर चित्रान्नाचे बरेच प्रकार वाचायला मिळतील.
आपण नेहमी जेवणात जो गरम
आपण नेहमी जेवणात जो गरम मसाल्याची पावडर वापरतो त्याचे योग्य प्रमाण सांगाल का?
जुई, मागच्या पानावर पहा.
जुई, मागच्या पानावर पहा.
खट्टा ढोकळ्यासाठी
खट्टा ढोकळ्यासाठी डाळ्-तांदुळाचे काय प्रमाण घ्यायचे?माहित असल्यास पुर्ण रेसिपीच सांगा.(विपुत चिकटवलित तरी चालेल)
मी देसाइंकडे पांढरा ढोकळा
मी देसाइंकडे पांढरा ढोकळा पाहिला.. मधे चटणी असलेला. कुणाला माहित आहे का रेसिपी ?
अमि मी ते बघितले ग.. पण मला
अमि मी ते बघितले ग.. पण मला प्रमाण पाहिजे, किंवा कुठले पदार्थ कमी जास्त घ्यावे हे तरी सांगा.
वर्षा, त्याला सँडविच ढोकळा
वर्षा, त्याला सँडविच ढोकळा म्हणतात. पांढरा ढोकळा करुन मध्ये चटणी.
पांढरा ढोकळा इथे आहे- (IE मध्ये पहा)
http://www.maayboli.com/hitguj/messages/103383/120335.html?1166059843
धन्स ग लालू ते "तांदळाचे
धन्स ग लालू
( बेसिकमधेच राडाअ असलेली बाहुली )
ते "तांदळाचे जाडसर पिठ घ्याव" म्हणजे आपला इडली रवा ना
प्राजक्ता, खट्टा ढोकळा म्हणजे
प्राजक्ता, खट्टा ढोकळा म्हणजे काय ? इथे मी डाळ-तांदूळ ढोकळ्याची रेसिपी दिली आहे. ह्याच प्रमाणात खट्टा ढोकळा करत असतील तर माहिती नाही.
सिंडे! खट्टा ढोकळा म्हणजे
सिंडे! खट्टा ढोकळा म्हणजे पांढरा ढोकळा असतो. बर्यापैकी आंबट असतो चविला!, मागे एकदा म्रुणने त्याची इंप्रोव्हाईज रेसिपि दिलेली पण, त्यात तिने गिट्स चे मिक्स वापरेलेले...( ते वापरुन मीही केलेला.).
मला फ्रॉम स्क्रॅच करुन बघायचा होता.
तु दिलेली लिंक बघते.
ती वर लालूने दिलेली लिंक बघ
ती वर लालूने दिलेली लिंक बघ मग.
धन्यवाद अरुंधती.. :)
धन्यवाद अरुंधती..

मला व्हेज बनाना केक ची
मला व्हेज बनाना केक ची पाककृती हवी आहे...
Pages