Submitted by मंदार-जोशी on 15 March, 2011 - 04:57
मी_आर्या यांच्या या कवितेवरून सुचलेली ही का.का.क.
आयचाघोरस हे अमित. यांनी बहाल केलेलं नाव आहे
- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -
तुला ल सा वि चा अर्थ समजत नसताना
तू माझा म सा वि(कायला) काढलास
लाज वाटत नाही? त्रिज्या मेली तुझी
कोन वाकला आणि वर्गमुळ खपलं
चौकोनात फिरणार्या तुला
वर्तुळात त्रिकोण काढून
नव्वद अंशातून बगितलं हळूच
टँजंट का मारलास मला?
मी भेदतच होतो परिघ
शेवटी षटकोनातून बाहेर पडलास तू
पोटरूपी वर्तुळावर "पाय" (२२/७) देऊन काय साधलंस?
शेवटी कितीही वेगात फिरली
तरी अक्ष तोच राहतो, अक्ष तोच राहतो
अक्ष तोच राहतो (हे एको होतंय असं समजावं)
गुलमोहर:
शेअर करा
झकास आहे हे... मघाशीच वाचलं
झकास आहे हे... मघाशीच वाचलं पण तोवर उडालं होतं...
(No subject)
पोटरूपी वर्तुळावर "पाय"
पोटरूपी वर्तुळावर "पाय" (२२/७) देऊन काय साधलंस?
>>>>
हे वाचून मला लिमयांची एक मला आवडलेली कविता आठवली. "कल्चर" का काहीतरी नाव होतं त्याचं.
त्या कवितेची आठवण करून दिल्याबद्दल मंडळ आपलें आभारी आहे जोशीकाका...
"घन"चक्कर..! एक अक्षय्य
"घन"चक्कर..!
एक अक्षय्य कविता.
वाचली रे मी मघाशीच
वाचली रे मी मघाशीच
विनाकारण एका गणितज्ज्ञाच्या
विनाकारण एका गणितज्ज्ञाच्या नावाशी अर्वाच्य शिवीचा प्रास जुळवून काहीतरी लिहिल्याचा निषेध! मायबोलीसारखा संकेतस्थळाच्या मर्यादांचं पालन न केल्याबद्दलही निषेध!!
आयचो घोsss
आयचो घोsss
(No subject)
मंदार...सही रे... कैच्याकै
मंदार...सही रे...
कैच्याकै मध्ये एकदम फिट्ट...
आता येतीलच निषेधाचे खलिते तुला...
आणखी काही निषेध फलके झळकवण्या
आणखी काही निषेध फलके झळकवण्या आधी, हे "मेधा"स दिलेले स्पष्टीकरण ग्रहण करावे.
<<विनाकारण एका गणितज्ज्ञाच्या नावाशी अर्वाच्य शिवीचा प्रास जुळवून काहीतरी लिहिल्याचा निषेध! >>
विनाकारण एका !>>>मेधा "याला कारण अर्याची मुळ कविता आहे".
गणितज्ज्ञाच्या नावाशी >>> या नावाचे गणितज्ञ आपले "जोशिकाका" आहेत. ( आज तरी यांचे नाव हेच आहे. तसंच त्या नावाचा गणितज्ञ अस्तित्वात होता नव्हता यांच्या ध्यानातही नसेल. )
अर्वाच्य शिवीचा प्रास जुळवून >>> ही एक आर्वाच्य शिवी नसुन "अ स्पष्ट" मराठीत याचा अर्थ "आई चे वडील" असा होतो.
काहीतरी लिहिल्याचा निषेध>>> हे काहीतरी नसुन "विडंबन" असा 'प्रेमळ' प्रकार आहे, तरी आपल्या या निषेधास काही अर्थ लागत नाही.
धन्यवाद!
अरे चातका, मी पण शाळेत गेलोय
अरे चातका, मी पण शाळेत गेलोय रे....मला पायथागोरस कोण ते माहीत आहे
बाकी तुझ्याशी सहमत.
पोटरूपी वर्तुळावर "पाय"
पोटरूपी वर्तुळावर "पाय" (२२/७) देऊन काय साधलंस?>>> जबरी सह्ह्ह्ही विडंबन लिहिलंस रे मंदार....
चातक>>> एकदम झक्कास स्पष्टीकरण आहे.... विडंबनाइतकंच आवडलं तेही
.
.
हे थोडसं नळावरील भौमितिक
हे थोडसं नळावरील भौमितिक भांडणासारखं वाटतंय.
(No subject)
चातक कैच्याकै कविते स सार्थ
चातक
कैच्याकै कविते स सार्थ ठरणारी कविता.
सर्वांना धन्यवाद
सर्वांना धन्यवाद
असु दे रे
असु दे रे मंद्या....!
"आईन्स्टाईन" आठवतो का..?
सद्ध्या इथल्या प्रभावामुळे
सद्ध्या इथल्या प्रभावामुळे वाईनस्टाईन आठवतोय
(No subject)
सुधर बे सुधर आता वाईनस्टाईन
सुधर बे सुधर
आता वाईनस्टाईन वर एखादे महाकाव्य लिहायला घे म्हणे
आयड्या चांगली ए मैदानात
आयड्या चांगली ए मैदानात पुन्हा उतरण्यासाठी.... नाहीतरी आमाच्या डोक्याच्या सुपीक जमीनीवर कोणी नांगर चालवल्या शिवाय कल्पनेच पिक येत नाहीच म्हणा तिथे.... त्यामुळे आयचाघोरस राव धन्यवाद...
बाकी कैच्याकैच हा
मंदार ....... विशाल >>>>
मंदार .......
विशाल >>>> आता वाईनस्टाईन वर एखादे महाकाव्य लिहायला घे म्हणे >>>>>
'पायथा' गोरस ला यापेक्षा
'पायथा' गोरस ला यापेक्षा दुर्दैवी 'कळस' दिसला असेल काय? कळसावरून आत्महत्या केली तरी बिचारा 'पायथ्या'शीच पडणार. देव त्यांच भलं करो.
रच्याकने मंदार, 'आयचाघोरस' हा
रच्याकने मंदार, 'आयचाघोरस' हा 'पायथॅगोरस' चा डु आयडी आहे काय?
क्या दिमाग है!!!
क्या दिमाग है!!! काबिलेतारीफ!!!
(No subject)
ए भा प्र ... भुमितीत ल.सा.वि
ए भा प्र ... भुमितीत ल.सा.वि / म. सा. वि कुठून टपकला
कै च्या कै चा कडेलोट
"आई चे वडील" असा होतो. >>
"आई चे वडील" असा होतो. >> आयचा घो म्हणजे आईचे वडील??? देवा...... ही मात्र मोठी शिवी आहे ह्याला को़कणी फकाणे किंवा गजालीवर पाठवा...
पुलं च्या भाषेत तुम्ही मस्तर आहात वाटतं, कारण येवढी चुकीची माहीती येवढ्या आत्मविश्वासाने आणि कोण देणार? हा.... हा....
भुमितीत ल.सा.वि / म. सा. वि
भुमितीत ल.सा.वि / म. सा. वि कुठून टपकला>>> रश्मे, भूमितीत वर्गमूळ तरी कुठेय?
चातक आयचा घो म्हणजे आईचा नवरा रे बाबा!!!
Pages