नव्या यमांची नवीन भाषा
मला कळाली पुन्हा नव्याने, नव्या पिकांची नवीन भाषा
कठीण मातीत रूजणार्या, नव्या बियांची नवीन भाषा
पुन्हा नव्याने नवीन फुटली, अबोलतेला नवीन वाचा
नवीन दृष्टी, नवे इरादे, निरक्षरांची नवीन भाषा
नभात झेपावण्यास देती, ढगांस टक्कर, विजेस चटके
नवीन किलबिल, नवीन कुजबुज, नव्या पिलांची नवीन भाषा
नशीब आहे विचित्र मोठे, कुणास रुजण्यास खडक-धोंडे
कठोर पाषाण भेदणार्या, नव्या मुळांची नवीन भाषा
अता मुखातून शोषितांच्या, ज्वलंत हुंकार बोलताहे
नवीन शस्त्रे, नव्या मशाली, अहिंसकांची नवीन भाषा
कुणास बाहूत घेत मृत्यू, विभागतो देह चिंधड्यांनी
यमास थोडी दया न उरली, नव्या यमांची नवीन भाषा
श्रमास मातीत गाडण्याला, नव्या दमाचा विरोध आहे
नवीन शाई, नवे मनसुबे, अभय जनांची नवीन भाषा
गंगाधर मुटे
.........................................................................
अता मुखातून शोषितांच्या,
अता मुखातून शोषितांच्या, ज्वलंत हुंकार बोलताहे
नवीन शस्त्रे, नव्या मशाली, अहिंसकांची नवीन भाषा
कुणास बाहूत घेत मृत्यू, विभागतो देह चिंधड्यांनी
यमास थोडी दया न उरली, नव्या यमांची नवीन भाषा (*)
श्रमास मातीत गाडण्याला, नव्या दमाचा विरोध आहे
नवीन शाई, नवे मनसुबे, अभय जनांची नवीन भाषा>>
चांगले प्रवाही शेर! मृत्यूच्या शेरातील दुसर्या ओळीत काही फेरफार आवश्यक वाटले. हे वैयक्तीक मत! रदीफ फारच वेगळी आहे. अनेक ठिकाणी कृत्रिम रीत्य निभावली गेल्यासारखी वाटली. तसेच खालील शेर!
पुन्हा नव्याने नवीन फुटली, अबोलतेला नवीन वाचा
नवीन दृष्टी, नवे इरादे, निरक्षरांची नवीन भाषा
यातील पहिल्या ओळीतील दोन वेळा आलेला नवीन भरतीचा वाटला. मात्र ही सर्व माझी मते आहेत व स्पष्टपणे लिहीली यासाठी क्षमस्व! गझल उच्चारायला मजा येत आहे कारण ती प्रवाही झाली आहे.
(*) = ही ओळ काही आवडली नाही.
चुभुद्याघ्या
-'बेफिकीर'!
धन्यवाद बेफिकीरजी. यातील
धन्यवाद बेफिकीरजी.
यातील पहिल्या ओळीतील दोन वेळा आलेला नवीन भरतीचा वाटला.
तुम्ही चूक दाखविल्यावर आता मलाही तसेच वाटत आहे. बदलायचा प्रयत्न करतोय.
मृत्यूच्या शेरातील दुसर्या ओळीत काही फेरफार आवश्यक
सहमत. हा शेर मला हवा तसा रचता आला नाही.
लयदार गझल , वेगळी रदीफ...
लयदार गझल :), वेगळी रदीफ... अभिनंदन!!
मला कळाली पुन्हा नव्याने, नव्या पिकांची नवीन भाषा
कठीण मातीत रूजणार्या, नव्या बियांची नवीन भाषा
अता मुखातून शोषितांच्या, ज्वलंत हुंकार बोलताहे
नवीन शस्त्रे, नव्या मशाली, अहिंसकांची नवीन भाषा
श्रमास मातीत गाडण्याला, नव्या दमाचा विरोध आहे
नवीन शाई, नवे मनसुबे, अभय जनांची नवीन भाषा
हे तीन शेर खूप आवडले
मुटेजी, मस्त गझल आवडली.
मुटेजी,
मस्त गझल आवडली.
छान. सुंदर.
छान. सुंदर.
(No subject)
अता मुखातून शोषितांच्या,
अता मुखातून शोषितांच्या, ज्वलंत हुंकार बोलताहे
नवीन शस्त्रे, नव्या मशाली, अहिंसकांची नवीन भाषा>>>व्वा.
कुणास बाहूत घेत मृत्यू, विभागतो देह चिंधड्यांनी
यमास थोडी दया न उरली, नव्या यमांची नवीन भाषा>>>छान.
वाह मुटेजी..... सुंदर
वाह मुटेजी..... सुंदर गझल.
अता मुखातून शोषितांच्या, ज्वलंत हुंकार बोलताहे
नवीन शस्त्रे, नव्या मशाली, अहिंसकांची नवीन भाषा
हासिल-ए-गझल शेर.:)
पुन्हा नव्याने नवीन फुटली,
पुन्हा नव्याने नवीन फुटली, अबोलतेला नवीन वाचा
नवीन दृष्टी, नवे इरादे, निरक्षरांची नवीन भाषा>>>
हे खूप आवडले!
पुन्हा नव्याने नवीन फुटली,
पुन्हा नव्याने नवीन फुटली, अबोलतेला नवीन वाचा
नवीन दृष्टी, नवे इरादे, निरक्षरांची नवीन भाषा
मुटेजी,
वाह ! तुमची ही 'नविन' गझलही आवडली !
प्रतिसादाबद्दल धन्यवाद
प्रतिसादाबद्दल धन्यवाद सर्वांचे.
सुंदर आहे. आवडली
सुंदर आहे. आवडली
मस्त.. आवडली..
मस्त.. आवडली..
खूपच वेगळी आणि एकदम प्रवाही
खूपच वेगळी आणि एकदम प्रवाही गझल आहे..
वाचताना एकदम मस्त वाटले.
शेरसुद्धा खूप वेगळे आहेत.. अभिनंदन!!
छान गझल
छान गझल
प्रतिसादाबद्दल धन्यवाद
प्रतिसादाबद्दल धन्यवाद सर्वांचे.
आवडली
आवडली
अ प्र ति म..!!!
अ प्र ति म..!!!
अल्टी रे गंग्या.... मस्त
अल्टी रे गंग्या.... मस्त जमलिये!!!
छान! आवडली! रामकुमार
छान!
आवडली!
रामकुमार
खूप छान. खूप भावली.
खूप छान. खूप भावली.
प्रतिसादाबद्दल धन्यवाद
प्रतिसादाबद्दल धन्यवाद सर्वांचे.
हो. हो. मुटेसाहेब, श्रमास
हो. हो. मुटेसाहेब,
श्रमास मातीत गाडण्याला, नव्या दमाचा विरोध आहे
नवीन शाई, नवे मनसुबे, अभय जनांची नवीन भाषा >>>>> हेच नव्या युगाचे नवे तत्त्व आहे.
कविता आवडली.
मस्त ,ओघवती गझल .फार फार
मस्त ,ओघवती गझल .फार फार आवडली .