Submitted by nikhilmkhaire on 28 November, 2008 - 07:16
नको दाखवू मज रम्य आकाश
पाहिली मी आजच मुडद्यांची रास
तमाच्या गर्भात फुटला अशूभ प्रकाश
मुडद्याच्या मुर्तीला माशांची आरास
भयभीत पायांत काळाचे बा बळ
तुडवीत जाती जै जिते हाड-मास
आक्रोश कल्लोळ तरी हीन गात्र
उरला उरात न एकही श्वास
सर्वत्र भिती, भिती सर्व बाजू
माणूसच भिती; त्याचा सर्वत्र वास
झाले का गा देवा तुझे समाधान?
"माणसावर (वा तुझ्यावर) न आता माझा विश्वास!
मुंबईमध्ये झालेल्या दुर्दैवी घटनेनं अनेकांचा बळी घेतलाच पण मागे राहिलेल्यांसाठी ठेवलं आहे अनिश्चित, गहिरं भविष्य!
--
निखिल.
गुलमोहर:
शेअर करा
!!!
!!!
....
....