उरलेल प्रेम... भाग ४

Submitted by किश्या on 9 August, 2010 - 00:19

http://www.maayboli.com/node/18410 भाग १ साठी.
http://www.maayboli.com/node/18421 भाग २ साठी.
http://www.maayboli.com/node/18476 भाग ३ साठी.

दररोजच्या प्रमाणे रसीका माझ्या आधी उठली. मला उठवायला आली.
"उठा राजे. चहा करुन द्या मला."
"थोड थांब ना."
"नाही आधी उठ. मला गंगेला सुद्दा नेणार आहेस तु."
"ओके"
मी उठलो. लगेच ब्रश करुन तयार झालो. तीचा उत्साह तर पाहण्यासारखा होता. गंगेला गेलो तर आमची सगळी गॅंग आधीच तीथे होती. मला लगेच त्यांचे टोमणे सुरु झाले होते.

"कोणी तरी आज काल खेळायला येत नाही रे....." अभय.
"पाहुण्यांची बडदास्त ठेवण्यात वेळ जातो रे... काय करणार?" रघु

मी आपला त्यांच्या कडे लक्ष न देता उडी मारली. पटकन आवरुन वर झालो. तीच्या हातात एक पाण्याच भांड देउन टाकले.
"अरे विज्या आज खेळायला येणार आहेस का?"
"नाही रे, मला आज थोडं तालुक्याला जायच आहे तेव्हा लवकर आलो तर येईल. वाट पाहु नका."
मी तेथुन नीघण्याच्या घाईने बोललो. डोक न पुसताच लवकर तेथुन कल्टी मरली.
थोड पुढे आल्यावर रसीका म्हणाली.
"तु त्यांना खोट का बोललास? आणी ते टाँट कुणाला होते?"
"......."
"मी कुणाला तरी काहीतरी विचारत आहे. लक्ष नाही का?"
"अग सोड ग, त्यांना काय चीडवायला काही तरी लागत. आणी तु ही बोर होशिल ना घरी एकटी? म्हणुन..."
"बरं मला तुझ गाव कधी दाखवणार आहेस?"
"ह्म्म्म्म्म्म्म्म्म्म...... आज"
"ठीक आहे, घरी जावुन कहीतरी खाउ आणी लगेच नीघु."
"ओके, मॅम"

घरी गेलो तर माझी मावस बहीण श्रुती आणी काका आहे होते. बहीण तशी लहानच होती पण थोडीशी आगाउ होती. बाहेर जायच म्हणुन मी जरा फास्ट्च आवरल. थोड्यावेळाने ल़क्षात आले की आज जरा आपण आरश्या समोर जास्त वेळ उभे होतो. खास ठेवणीतला ड्रेस घातला, आणी वळुन बघतो तर रसीका माझ्या पाठीमागे उभी होती माझ्याकडे बघत... मी तीच्या कडे बघतच राहीलो. कारण आज तीने पीवळा पंजाबी ड्रेस घातला होता. केसांची छान वेणी घातली होती आणी त्यात एक जास्वंदाच फुल. डोळ्यात काजळ. आणी पेशव्यांच्या काळात चंद्र्कोर कुंकु लावत होते तशी टीकली. मी तसाच काही न बोलता जवळ गेलो.
अलगद तिच्या डोक्यवर हात नेला अनं एक छोटीशी बट काढुन तिच्या डाव्या गालावर घेतली.
"अशी छान दीसतेस."
"तुला बट काढलेली आवडते का?"
"हो"
"अरे आज काय बाहेर जाण्याचा plan आहे का?" आई मधेच आली.
"हो" मी.
"थोड्या वेळाने जा, पाणी सुटलय." आई घाईने नीघुन गेली.
"खल्लास. सगळा plan." मी वैतागुन म्हणालो.

खर तर त्या वेळेस आठ दिवसांनी एकदा पाणी यायच नळाला. काही पर्याय नव्हता.
"चला मॅम, पाणी भरू."
खरं तर तीचाही मुड ऑफ झाला होता.
"शी...."

एक तास पाणी भरण्यात गेला. आणी पाण्यामुळे आम्ही पार भीजुन गेलो होतो. आणी मुड ही गेला होता. पाणी भरणे झाले होते. आम्ही खुश. आम्ही परत आवरायला सुरवात करणार की लगेच आईचा आवाज आला.
"अरे, बगीचात झाडांना पाणी घालं, सुकुन गेलेत."
"काय आई, बाहेर जायच आहे ना."
"घाल रे,तेही बिचारे उन्हाचे तहानलेले असतात. तुला पाणी प्यायला मीळाले नाही तर?"
आईने emotional केले. मग काय, जावच लागल.
"चल."
परस बागेत गेल्यावर पाईप लावुन पाणी देणे सुरु केले. मी चाफ्याच्या झाडाला पाणी देत असताना, अचानक पाठीवर पाण्याचा ओघळ आला, मी मागे पाहे पर्यंत माझा र्शट ओला झाला होता, बघतो तर रसीका तांब्याने पाणी ओतत होती. मग काय माझ्याही अंगात लहान मुल शीरलं आणी काय मी तीच्या अंगावर पुर्ण पाईपच धरला.
"ये......नको.... नको...ये विज्या....काकु..... हा बघाना..."
"काय रे गोंधळ चालु आहे?" आई
"काही नाही आई. तीने माझ्या अंगावर आधी पाणी टाकले." मी
"नाही काकु, त्यानेच आधी टाकले." रसीका.

घराच्या समोर सगळा चीखल झाला होता. आमचा गोंधळ चालुच होता तेव्हडयात आई बाहेर आली.
"बाई बाई बाई, अरे हे काय?.. काय लाहान राहीलात कारे तुम्ही दोघे, विज्या तुला अक्कल नाही का? घोड्या....."
"किती मोठा घोडा आहे, काकु तुमचा."
"गप गं घोडे."
ह्या गडबडीत पपा आलेले मी पहीलेच नाहीत. चुकुन त्यांच्या अंगावर पाणी गेले.
"अरे. मुर्खा.."
मी पाईप रसीकाच्या हतात देऊन मोकळा.
"मी नाही. रसीका"
मी जे धुम ठोकली ते तीथे थांबलोच नाही.

*****************************************************
"sorry, पपा बोलले का तुला?"
"तुला काय करायच आहे?" रसीका थोड्याश्या रागाने म्हणाली .
"sorry ना यार. चुक झाली. पण सकाळ मात्र मस्त गेली नाही? छान मजा आली."
"हो ना, पण फीरण्याचा बेत रद्द करावा लागला ना."
"सोड, आपन आत्ता थोड्यावेळाने जाऊ. तुला एक मस्त spot दाखवतो."
"कुठे?"
"आहे एक जवळच."
"किती ला जायच?"
"जाऊयात, ५ वाजता."
"ठीक आहे."
"पण आईला सांगु नकोस. आणी हो, तोच मघशीचा ड्रेस घालशील? ओके?"
"ओके"
जेवण झाल्यावर पडल्या पडल्या गप्पा मारत होतो. पण एक गोष्ट मला खटकत होती ती म्हणजे, माझी मावस बहीन आल्यापासुन माझ्या आणी रसीकावर लक्ष ठेऊन होती आणी आमच्यातल्या गोष्टी आईला
जाऊन सांगत होती.
४ चा चहा झाल्यावर मी रसीकाला आवरायला सांगीतले. श्रुती च्या लक्षात ही गोष्ट आली आन ती ही मागे लागली आमच्या.
"मावशी याला सांग ना मलाही घेउन जायला." श्रुती.
"हिला घेऊन जा रे."
"काय कटकट आहे." पण हे मनात.
इकडे रसीका गालातल्या गालात हसत होती अन मी मनातल्या मनात चीडत होतो.
मी फक्त एकच वीचार करत होतो की हीला कटवायच कसं ते.
पण ती कटली नाही तर तिच्या लक्षात आल की मी तिला कटवनार ते. शेवटी ती आमच्या सोबत आलीच.

आम्ही शेवटी तीला घेऊन गंगेला आलो. तीला वाळुवर खेळायला सोडुन गप्पा मारत बसलो.
"एक विचारु का?" मी.
"ह्म्म्म्म्म्म.. विचारणा त्यात काय?"
"तुला जोडीदार कसा पाहीजे?"
"म्हणजे?"
"म्हणजे, तुझ स्वप्न कसे आहे? तुझ्या life partner चे? म्हणजे तुला कसा पाहीजे." मी जरा चाचरतच विचारले.
"आधी तु सांग."
"ओके. मला ना एक अशी पत्नी पाहीजे जी की मला समजुन घेईल. आमच एक घर आसेल, त्यात ती आणी मी फक्त दोघच, मी जॉब ला असेल, sunday sat ला off असेल, sunday ला ती आधी उठलेली असेल, मी हळुच उठुन तीला पाहत किचन मधे जाईल ती काही तरी करत असल्यावर मी पठीमागुन जाउन तिला घाबरवेल... अस काहीस लहान मुला सारख असेल. आता तु सागं"

"सेम च असेल पण थोडा फरक असेल हाच की, मी sunday ला उशीरा उठणार अन तो मला चहा करुन देनार नंतर आम्ही तो एकत्र पीणार."

अशा काहीश्या गप्पा मारत आमची संध्याकाळ सरत होती. सुर्य शांत गतीने घरी जात होता.

क्रमश............................
*****************************************************
टीप :- माझी पहीलीच वेळ आहे कथा लिहण्याची. ही कथा थोडीशी काल्पणीक आसुन बरेच काही सत्य आहे. जर तुम्हाला ही कथा रटाळ वाटली किंवा भरकट आहे असं वाटल तर क्रपया आपल्या सुचनांच स्वागत आहे. अपेक्षा ठेवतो की तुम्ही मार्गदर्शन कराल.

गुलमोहर: 

निव्वळ अप्रतिम.......... पक्की बान्धणी आहे....... मस्त....
नोटः पुढचा भाग लवकर टाकत जा रे........ Happy
छान मान्डली आहेस ........................

भावा, १ च नबर,

पीवळा पंजाबी ड्रेस, केसांची वेणी, जास्वंदाच फुल, डोळ्यात काजळ आणी चंद्र्कोर कुंकु तशी टीकली

>>> आमचि वहिनि अगदि डोळ्या समोर उभि राहिलि. Happy