Submitted by रामकुमार on 7 March, 2011 - 13:15
ना चित्तरंजनाचा मी ध्यास घेतलेला
भवदु:खभंजनाचा मी ध्यास घेतलेला....१
जे दाखवील सृष्टी मिटवून पाकळ्या;त्या-
अभिजात अंजनाचा मी ध्यास घेतलेला....२
मज दाविशी असूरा, भेसूर दंतपंक्ती
रात्रीस मंजनाचा मी ध्यास घेतलेला....३
कोणी न या अभाग्या शक्तीविना विचारी
रामा,प्रभंजनाचा मी ध्यास घेतलेला....४ (प्रभंजन=हनुमान)
हे भाग्य!स्वार्थ माझा बनतो परोपकारी
व्याधीविभंजनाचा मी ध्यास घेतलेला....५ (काफियात अंतर्भूत झालेले स्वरचिन्ह-अ ऐवजी इ)
------------------------------------
संगीत ऐकतो ना शब्दात रम्य रमतो
भावार्थ गुंजनाचा मी ध्यास घेतलेला....६ (टीप:गुंजनाचा-कच्चा काफिया)
जात्याच राजसी अन् थोडा तमोगुणीही
सात्त्वीक सज्जनाचा मी ध्यास घेतलेला....७ (टीप:सज्जनाचा-कच्चा काफिया)
रामकुमार
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
सुटे मिसरे आवडले..
सुटे मिसरे आवडले..
प्रत्येक गझलेत प्रयोगशीलता हे
प्रत्येक गझलेत प्रयोगशीलता हे आपले वैशिष्ट्य दिसतेय
आवडली
आवडली
वेगळीच गझल.. छान आहे.
वेगळीच गझल.. छान आहे.
गझल, ध्यास दोन्ही खास .
गझल, ध्यास दोन्ही खास .
मज दाविशी असूरा, भेसूर
मज दाविशी असूरा, भेसूर दंतपंक्ती
रात्रीस मंजनाचा मी ध्यास घेतलेला....३
सुचलेला प्रत्येक शेर लिहून काढलाच पाहीजे असं नाही. काही काही शेअर्स बुडीत खात्यात काढता आले पाहीजेत, काही कविता गिळता आल्या पाहीजेत... त्यातून तुम्ही चांगले कवी म्हणून ओळखले जाऊ शकाल.
पुलेशु
सुचलेला प्रत्येक शेर लिहून
सुचलेला प्रत्येक शेर लिहून काढलाच पाहीजे असं नाही. काही काही शेअर्स बुडीत खात्यात काढता आले पाहीजेत, काही कविता गिळता आल्या पाहीजेत... त्यातून तुम्ही चांगले कवी म्हणून ओळखले जाऊ शकाल.
पुलेशु>>>
विचार करतोय
एवढा चांगला कवी मी आहे?
धन्यवाद!
छायाताई तुम्हालापण!
रात्री आत्मनिरिक्षण करताना स्वत:मधील विकार रूपी राक्षस त्रास देतात तेंव्हा त्यांच्याशी लढून त्यांचे भेसूरपण नष्ट करण्याचा प्रयत्न करण्याचा ध्यास
मला स्वत:ला अर्थ माहित असल्याने भावला होता
अर्थाची अभिव्यक्ती कमी पडली