मी ध्यास घेतलेला
Submitted by रामकुमार on 7 March, 2011 - 13:15
ना चित्तरंजनाचा मी ध्यास घेतलेला
भवदु:खभंजनाचा मी ध्यास घेतलेला....१
जे दाखवील सृष्टी मिटवून पाकळ्या;त्या-
अभिजात अंजनाचा मी ध्यास घेतलेला....२
मज दाविशी असूरा, भेसूर दंतपंक्ती
रात्रीस मंजनाचा मी ध्यास घेतलेला....३
कोणी न या अभाग्या शक्तीविना विचारी
रामा,प्रभंजनाचा मी ध्यास घेतलेला....४ (प्रभंजन=हनुमान)
हे भाग्य!स्वार्थ माझा बनतो परोपकारी
व्याधीविभंजनाचा मी ध्यास घेतलेला....५ (काफियात अंतर्भूत झालेले स्वरचिन्ह-अ ऐवजी इ)
------------------------------------
संगीत ऐकतो ना शब्दात रम्य रमतो
भावार्थ गुंजनाचा मी ध्यास घेतलेला....६ (टीप:गुंजनाचा-कच्चा काफिया)
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा