Submitted by रामकुमार on 5 March, 2011 - 23:39
दिसता चुका कुणाच्या मी पांघरीत गेलो
अपराध जीवनाचे चित्ती पुरीत गेलो!....१
'बाजारहाट इथला सर्वांस फायद्याचा'_
मानून रोज फसवे सौदे करीत गेलो!....२
साधीच चाल त्यांची ते बाण साफ होते
पण मी मऊपणाने वांदे करीत गेलो!....३
कुंभात व्यर्थ फुटक्या माया भरीत गेलो
मी फोल पौरुषाची नाती स्मरीत गेलो!....४
हैराण रंगवेडा व्याकूळला वसंत
रक्ताळ काळजाचे पाणी करीत गेलो!....५
========================
जाणीव इंगळीची होण्या उशीर झाला
वेडात वैद्यकांचे पत्ते पुसीत गेलो!....६
रामकुमार
गुलमोहर:
शेअर करा
ओढीत 'री' स गेलो मतल्यातला
ओढीत 'री' स गेलो
मतल्यातला 'री' इंगळीच्या शेरात इंगळीच्या दंशाने गेला का? ती 'री' ओढायलाच लागणार!
दिवा घ्या!
वसंत मधला त लांबलाय.
अपराध जीवनाचे चित्ती पुरीत गेलो
मस्त!
पांघरीत, पुरीत आल्यावर पुढचा
पांघरीत, पुरीत आल्यावर पुढचा पुसीत हा काफिया कसा चालेल?
छान मतला..
छान मतला..
पुसीत सदोष आहे, वसंत मधला त
पुसीत सदोष आहे, वसंत मधला त लांबत आहे
याची जाणीव आहे.
वसंत'च' नको असे वाटले
मुक्ता धन्स!
रामकुमार
ता.क.शेरांचा क्रम बदलला आहे
गझल आवडली.
गझल आवडली.
मस्त .
मस्त .
मस्त..
मस्त..
मस्तच
मस्तच