इंगळी
Submitted by रामकुमार on 5 March, 2011 - 23:39
दिसता चुका कुणाच्या मी पांघरीत गेलो
अपराध जीवनाचे चित्ती पुरीत गेलो!....१
'बाजारहाट इथला सर्वांस फायद्याचा'_
मानून रोज फसवे सौदे करीत गेलो!....२
साधीच चाल त्यांची ते बाण साफ होते
पण मी मऊपणाने वांदे करीत गेलो!....३
कुंभात व्यर्थ फुटक्या माया भरीत गेलो
मी फोल पौरुषाची नाती स्मरीत गेलो!....४
हैराण रंगवेडा व्याकूळला वसंत
रक्ताळ काळजाचे पाणी करीत गेलो!....५
========================
जाणीव इंगळीची होण्या उशीर झाला
वेडात वैद्यकांचे पत्ते पुसीत गेलो!....६
रामकुमार
गुलमोहर:
शेअर करा