Submitted by रामकुमार on 28 February, 2011 - 15:35
रापून घेतले मी भट्टीत वेदनांच्या
का चार शब्द लिहितो लाटेवरी क्षणांच्या?...१
वेदना=जाणीव (दु:खद आणि सुखद सुद्धा!)
(मूळ धातू-विद्)
मी राजहंस ठावे हे जन्मजात मजला
डबक्यात डुंबतो का संगे बदकजनांच्या?...२
सृजनात प्राण माझा जे सत्य तोच वाद !
का गुंतवू स्वत:ला वादात खंडनांच्या?...३
एकांत हाच छंद, गर्दीत सौख्यभंग !
का तोडतो तरीही पासून सज्जनांच्या?...४
कळते परी न वळते- जगणे मना, विकारी
मृत्यू, जराच अंती रसदार यौवनांच्या !...५
कसला असा उन्हाळा? दुनियाच तापलेली
हा स्नेहलेप ठरु दे हृदयावरी मनांच्या !...६
रामकुमार
गुलमोहर:
शेअर करा
एकांत हाच छंद, गर्दीत
एकांत हाच छंद, गर्दीत सौख्यभंग !
का तोडतो तरीही पासून सज्जनांच्या>> आवडला.. मस्त..
मतला आवडला... पुलेशु
मतला आवडला...
पुलेशु
दोघांचेही आभार! मुक्ता, सहसा
दोघांचेही आभार!
मुक्ता,
सहसा गझलेत शेवटचे लघू अक्षर दीर्घ करत नाहीत
पण या ठिकाणी आपोआप छन्द, भंग मधील द आणि ग चा उच्चार लांबतो
त्यामुळे ते दीर्घ केले आहे
आपल्याला आवडली यात समाधान!
मिलिंद,
मतला सर्वात आधी सुचला होता
त्यामुळे असेल
मला पण मतलाच आवडला सर्वात जास्त!
रामकुमार
मतला सुंदर. पुलेशू.
मतला सुंदर.
पुलेशू.
चांगला प्रयत्न आहे.
चांगला प्रयत्न आहे.
डबक्यात डुंबतो का संगे
डबक्यात डुंबतो का संगे बदकजनांच्या हे कुणाला विचारताय?
का चार शब्द लिहितो लाटेवर क्षणाच्या हे आवडले
धन्यवाद
धन्यवाद मुटेजी,अजयजी!
जर्देजी,
अरसिक, संवेदनाहीन बदक!
रामकुमार