Submitted by मी अभिजीत on 28 February, 2011 - 10:29
करेन वादग्रस्तसे विधान एकदा तरी
ठरेन या जगात मी महान एकदा तरी
सदैव भालदार चोपदार का रहायचे
बनेन नाटकात या प्रधान एकदा तरी
तुला बघून रोज काव्य पाडले नि धाडले
बघायचेस कागदी विमान एकदा तरी
हजार अल्टरेशने, कितीक बेल्ट घातले
मला बसेल का तुझी तुमान एकदा तरी
किती भकार अन किती फुल्या फुल्या लिहायच्या
जपून वापरायची जबान एकदा तरी
चुना,लवंग, कात टाकुनी तयार जाहले
खुशाल पिंक मार खाच पान एकदा तरी
कशास नेहमीच बाँड, बॅटमॅन पाहिजे
बघायचा उगीच शक्तिमान एकदा तरी
अजून सांग मी किती बूटास खायचे तिच्या
क्युपीड, रोख तिजवरी कमान एकदा तरी
-- अभिजीत दाते
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
वा वा .. अफलातून रचना. सदैव
वा वा .. अफलातून रचना.
सदैव भालदार चोपदार का रहायचे
बनेन नाटकात या प्रधान एकदा तरी
चुना,लवंग कात टाकुनी तयार जाहले
खुशाल पिंक मार खाच पान एकदा तरी
कशास नेहमीच बाँड, बॅटमॅन पाहिजे
बघायचा उगीच शक्तिमान एकदा तरी
उमटवून मी किती बूटास घ्यायचे तिच्या
क्युपीड, रोख तिजवरी कमान एकदा तरी
हे शेर लैच आवडले.
हाहाहा!! मस्तच!!!
हाहाहा!! मस्तच!!!
अभिजित, छान हझल. बर्याच
अभिजित,
छान हझल.
बर्याच दिवसांनी पाहिली. आता गझलही येऊ देत.
वा वा!
वा वा!
हझल खूप आवडली सर्वच शेर छान
हझल खूप आवडली
सर्वच शेर छान जमलेत!
धन्यवाद
रामकुमार
अभिजितजी धन्यवाद.
अभिजितजी धन्यवाद.
अतिसुंदर!!
अतिसुंदर!!
व्वा... लै लै भारी.. सहीच
व्वा... लै लै भारी.. सहीच जमलिये. १ नं. रचना.. मस्तच.
(No subject)
मस्त.
मस्त.
एकसे बढकर एक शेर अभिजीत! खूपच
एकसे बढकर एक शेर अभिजीत! खूपच भन्नाट झालीय हझल!