गांधीजींची अहिंसा-उपयुक्तता आणि मर्यादा

Posted
16 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
16 वर्ष ago

There are many causes that I am prepared to die for but no causes that I am prepared to kill for."
महात्मा गांधी
"

केदार जोशीनी अहींसा म्हणजे काय असा प्रश्न विचारला त्यानंतर गांधीजींची अहिंसा म्हणजे काय याचा मी शोध घेतला.गांधीजी म्हणतात की त्यांना एकच मार्ग माहीत आहे आणि तो म्हणजे अहिंसेचा(passive resistance).गांधीजींनी अहिंसेची प्रेरणा कस्तुरबा गांधींकडुन घेतलेली होती.गांधीजींची एखादी गोष्ट कस्तुरबांना पटत नसली तर त्या गांधीजींनी दिलेल्या त्रासाला सहन करत पण विरोधही करत.यातुन गांधीजींचे मन बदलले आणि बायकोवर हुकुम चालवायची त्यांची विचारसरणि कशी चुक होती हे त्यांना कळुन चुकले.पुढे विविध प्रकारच्या परीस्थितींमधुन गेल्यानंतर गांधीजींनी अहिंसा हाच एकमेव मार्ग आहे हे पक्के केले.गांधीजींच्या मते अहिंसा हा मनुष्याचा स्थायीभाव आहे.जे देश आणि समाज अहिंसेच्या मार्गाचा अवलंब करतात त्यांनी आत्मसन्मान सोडुन बाकी सगळ्याचा त्याग करायला शिकायला हवे.त्यामुळेच अहिंसा हे कुठल्या भित्र्या माणसाचे नाही तर उलट धाडसी माणसाचे लक्षण आहे असे गांधीजी म्हणतात.शिवाय गांधीजींची अहिंसेची शिकवणुक सर्वांनाच पाळणे शक्य असते.त्यासाठी शरीरयष्टी,हत्यारे,साधनसामग्री यांची कशाचीच आवश्यकता नसते.त्यामूळे गांधीजींची ही अहिंसात्माक चळवळ भारतातील सामान्य जनतेत प्रचंड लोकप्रिय झाली.त्याचबरोबर गांधीजींनी सत्याला पण खुप महत्व दिले.ते म्हणतात की इतर सर्व गोष्टींपेक्षा माझे प्रेम अहिंसेच्या तत्वावर आहे.जर अहिंसेच्या तत्वाइतके कशावर माझे प्रेम असेल तर ते आहे सत्यावर.गांधीजी अहिंसा आणि सत्यामध्ये फ़रक बघत नसत.तर अहिंसा हे साधन आहे व सत्य हे साध्य आहे.त्यामुळे जर आपण साधनांची काळजी घेतली तर आपण साध्यापर्यंत पोहोचणारच यात काही शंका नाही असे गांधीजींचे मत होते.

gandhisalt.jpg

आता मुख्य प्रश्न असा आहे की गांधीजींना कुठल्या परीस्थितीमध्ये हिंसा मान्य होती?म्हणजे एखाद्या ठिकाणी अन्याय होत आहे तिथे जर हिंसेशिवाय अन्याय रोखताच येत नाही तर हिंसा केलेली ठिक आहे का?यावर गांधीजींचे उत्तर आहे की हिंसा कुठल्याच ठिकाणी बरोबर नाही.गांधीजी फ़क्त एकाच परीस्थितीत हिंसा ठिक आहे ते सांगतात.ती परीस्थिती म्हणजे जर भित्रटपणा किंवा हिंसेतील एकाची निवड करायची असल्यास.गांधीजी म्हणतात अहिंसा हे धैयवान माणसाच लक्षण आहे ,भित्र्या माणसाचे नाही.भित्रटपणापेक्षा हिंसा बरी.पण कुठल्याही इतर ठिकाणि हिंसा त्यांना मान्य नाही.गांधीजींचा विरोध करताना त्यांची हिंसा हिटलर,स्टॅलिन यांच्यासमोर चालणार नाही असे म्हणतात पण गांधीजी म्हणतात की त्याही ठिकाणी अहिंसा हाच मार्ग आहे.गांधीजींनी ज्यु लोकांचा नाझी नरसंहार करत होती तेंव्हा सांगितले होते की ज्युंनी पण अहिंसात्मक मार्गानेच प्रतिकार करावा.ज्युंनी जर्मनीला सोडुन जाण्यास नकार द्यावा आणि त्यांच्याविरुध्द होणाया अन्यायासही विरोध करावा.वेळ पडल्यास स्वत:चा जीवही त्यांना अर्पण करावा.त्यामुळे कुठल्याही परीस्थितीत हिंसा गांधीजींना मान्य नव्हती.'यंग इंडीया’ मधील एका प्रकाशनात गांधीजींनी गुरु गोविंद सिंग,शिवाजी महाराज,राणा प्रताप,रणजित सिंग,लेनिन,डे वालेरा,केमालपाशा या सर्वांना 'misguided patriot' म्हटले होते.गांधीजींची हीच विचारसरणी भगत सिंग व इतर क्रांतिकारकांबद्दल होती.ते म्हणत की "भगत सिंगने हिंसेचा मार्ग देशभक्तीतुन घेतला.त्याच्या शौयापुढे आपण हजार वेळा नतमस्तक व्हावे पण त्याचा मार्ग चुकीचा होता.आपल्या देशात लाखो लोक दुर्बल आहेत.अशा ठिकाणी जर आपण न्याय खुनाच्या तत्वावर करणार असु तर आपली परीस्थिती फ़ार भयानक होईल.हिंसेचा धर्म आपण बनवल्यास आपलेच लोक आपल्याच अन्यायाचे लक्ष्य होतील."गांधीजींचा क्रांतीकार्याला विरोध एका अजुन कारणाने होता जो म्हणजे आपल्या देशाची मानसिकता.गांधीजी म्हणत की आपला देश म्हणजे तुर्की,आयरलंड किंवा रशिया नाहीये.त्यामुळे तिथल्या परीस्थितीत आणि आपल्या परिस्थितीत खुप फ़रक आहे.शिवाय क्रांतिकार्याला मास बेस नव्हता त्यामुळे ही क्रांति मासेस साठी काय करु शकेल असाही गांधीजींचा प्रश्न होता. याबाबत विचार केल्यास असे कळते की गांधीजी आपल्या अहिंसेच्या तत्वाबद्दल प्रमाणिक होते.हल्ली गांधीजींच नाव घेउन चालणारी माणसे त्यांच्या विचारांबरोबर प्रामाणिक नसतात.पण गांधीजी आपल्या पुर्ण अहिंसेच्या तत्वाशी प्रामाणिक होते.त्यासाठी इतर ऐतिहासिक नायकांच्या तत्वांना विरोध करणे गांधीजींनी टाळले नाही.पंजाबमध्ये शिख समुदायामध्ये गांधीजींनी व्यक्त केलेल्या गुरु गोविंद सिंगांच्या मताबद्दल नाराजी होती.गांधीजींना शिखांनी किर्पाण धारण करणेही आवडत नसे.

गांधीजींच्या मते अहिंसा हा मनुष्याचा स्थायीभाव असल्याने त्याने प्रश्न सुटतात तर हिंसेने प्रश्न अधिक बिकट होत रहातात्.त्याचबरोबर अहिंसेने मनुष्यात बदल होतो,मनुष्याचा आजार बरा होतो व तो अन्याय करणे सोडतो.अहिंसा मनुष्यामनुष्यामधले परस्परप्रेमाचे नाते पक्के करते.त्यामुळे ब्रिटीशांविरुध्द लढतानाही गांधीजींचे ब्रिटीश जनतेवर तितकेच प्रेम होते जितके भारतीय जनतेवर होते.या दृष्टीने विचार केल्यास गांधीजींची अहिंसेची विचारसरणी संपुर्ण जगासाठी आदर्श ठरते.सध्याचे असणारे अनेक जागतिक बिकट प्रश्न परस्पर सहकार्याने व परस्पर प्रेमाने सुटु शकतील असे वाटते.शिवाय गांधीजींचा अहिंसात्मकरीत्या सत्याग्रह करण्याचा मार्ग त्या काळातील परीस्थितीनुसार भारतीय जनतेस रुचणारा होता.त्यामुळे गांधीजींनी स्वातंत्र्याची चळवळ सामान्य जनतेपर्यंत नेली व त्या चळवळीला उदंड प्रतिसाद मिळवुन दिला.सशस्त्र लढ्याचा मार्ग आपल्या भारतीय जनतेला रुचणारा नव्हता असे आपण म्हणु शकतो.कारण त्याला आवश्यक असणारी त्यागाची भावना त्या काळातील सर्वसामान्य भारतीय जनतेत नव्हती.सावरकर म्हणतात की मातॄभुमिसाठीची लढाई म्हणजे सतीचे वाण आहे.पण गांधीजींचा मार्ग सोपा होता.कायद्याला विरोध करत २-४ लाठ्या खाण आणि जेलमध्ये जाण त्या काळातील सामान्य जनतेला जास्त सोप होतं. गांधीजींच्या अहिंसेबद्दल अजुन एक महत्वाची गोष्ट अशी आहे की निर्बल आणि हतबल माणसाला त्या पध्दतीने अन्यायाचा प्रतिकार करण्याशिवाय दुसरा कुठला पर्यायच नाही.त्याचमुळे भगत सिंग्,स्वातंत्र्यवीर सावरकर व इतर क्रांतिकारकांनीही आपल्या तुरुंगवासात होणार्‍या अन्यायाविरुध्द अहिंसात्मक सत्याग्रहाचा व उपोषणाच्या मार्गाचा अवलंब केलेला दिसतो.म्हणजे गांधीजींच्या मार्गाचे जे कट्टर विरोधक होते तेसुध्दा दुसरा कुठला उपाय नसल्यावर त्याच गांधीजींच्या मार्गाचा अवलंब करतात.

गांधीजींच्या मार्गाचा एक मुद्दा हा की जर सरकार अन्याय करत असेल ,सरकारकडे कितीही मोठी शस्त्र असु देत पण जर संपुर्ण जनतेनीच सविनय कायदेभंग केल्यास सरकारला अन्यायी राज्य करणे अशक्य आहे. हे म्हणजे सरकारची शक्तीच काढुन घेतल्यासारखे आहे.तुम्ही काहीही कायदे करा पण आम्ही ते अन्याय्य कायदे पाळणारच नाही पण आम्ही तुमच्यावर हल्लाही करणार नाही.अशा परीस्थितीत सरकार काय करेल?पण जेंव्हा समाजच आपापसात रक्तपात करायला उठतो तेंव्हा अहिंसेची चळवळ कितपत यशस्वी ठरु शकते हाही प्रश्नच आहे.दुसरी गोष्ट म्हणजे हिटलर्,स्टॅलिन,लादेन यांच्यासारख्या कृर राज्यकर्त्यांसमोर हा मार्ग फारसा प्रभावी ठरेल असे वाटत नाही.कारण हे आपल्या मार्गावर एका मोठ्या विचाराने आलेले असतात्.त्यांच्या हिंसेमध्ये त्यांना अन्यायाचा लवलेशही दिसत नसतो.शिवाय अहिंसेचा मार्ग एखाद्या व्यक्तीमध्ये परीवर्तन नक्कीच घडवु शकतो पण पुर्ण समुहात परीवर्तन घडवु शकतो काय्?मला वाटत एकाच वेळी नाही घडवु शकत्.मग दहशतवादासारखी समस्या यातुन सुटु शकते काय?याचेही उत्तर बर्‍यापैकी नकारात्मकच आहे.कारण तुम्ही एका कसाबला बदलाल तर दुसरा निर्माण होईल आणि तो रक्तपात घडवील्.त्याला बदलाल तर अजुन एक उभा राहील.म्हणजे ज्या समाजावर अन्याय होतोय त्याला सतत रक्तपातच सहन करावा लागेल्.शिवाय तुम्हाला तुमचा शत्रु माहीत असल्यास त्याचे मनपरीवर्तन तुम्ही करु शकता पण तुम्हाला तुमचा शत्रुच माहीत नाही तर तुम्ही काय कराल?

परीस्थितीच्या अनुसार हिंसा
आता आपण एखाद्या परीस्थितीमध्ये हिंसा बरोबर आहे का याचा विचार करु.स्वातंत्र्यवीर सावरकर याच्याबद्दल आग्रही आहेत्.ते म्हणतात की 'सापेक्ष अहिंसा हा सद्गुण आहे तर पुर्णपणे अहिंसा हा गुन्हा आहे'.सावरकरांचे मत स्पष्ट होते.तुम्ही जोपर्यंत हिंसा करता आहात तोपर्यंत आम्ही त्याचा प्रतिकार हिंसेनेच करणार.ते म्हणतात की सद्गुण अथवा दुर्गुण हे मुलतः फक्त गुण असतात्.परिस्थिती त्यांना सद्गुण अथवा दुर्गुण ठरवते.त्यामुळे परिस्थितीनुसार ठरवा.सगळ जग शस्त्र टाकुन परस्परप्रेमास तयार असेल तर आम्हीही आमची राष्ट्रभक्ती टाकुन देउ व त्यांना मिठी मारु.पण जर सगळे जग लढाईसाठी तयार होत असेल तर आम्हीही स्वतःची तयारी करु.आम्हीच अन्याय सहन का करावा?तो होउ नये म्हणुन आम्ही शस्त्रास्त्रांची नक्कीच मदत घेउ.ते जेंव्हा आक्रमक आहेत तेंव्हा आम्ही आक्रमक न बनल्यास ती आत्महत्या ठरेल असे सावरकरांचे मत होते.आततायी बळ हा अत्याचार आहे तर आततायांचा प्रतिकार करणारे बळ हा नक्कीच सदाचार आहे.आता पुढे विचार करताना आपण शिवाजी महाराजांचा विचार करु.शिवाजी महाराजांनीही सशस्त्र मार्गानेच स्वराज्य उभारले व जनतेवरचा अन्याय दुर केला.शिवाजी महाराजांनी तलवार उचलली नसती तर औरंगजेबाविरुध्द स्वराज्य निर्माण करता आले असते का?मला वाटते की ते शक्य नव्हते.शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण करुन एका आदर्श राज्याचे उदाहरण दिले.सामान्य जनतेचे जमिनदारीसारख्या अन्याय्य पध्दतीपासुन सुटका केली.परधर्माबद्दल आचार कसा असला पाहीजे,स्त्रीया,वृध्द्,धर्मपुरुष यांच्याशी आदर्श व्यवहार कसा असला पाहीजे हे ही दाखवले.मग अशा प्रकारचे स्वराज्य व सुराज्य निर्माण करण्यास शस्त्राची मदत घेतल्यास काय चुकले?माझ्यामते तो मार्ग बरोबरच होता.गुरु गोविंद सिंग पण परिस्थितीला अनुसरुन हिंसा करण्याचा पुरस्कार करतात.ते झफरनामामध्ये म्हणतात की 'जेंव्हा इतर सर्व मार्ग बंद होतात तेंव्हा शस्त्र हातात घेणे बरोबर आहे.'त्यामुळेच तलवारीलाच ते दुर्गा म्हणतात व तीच आपल्याला विजय प्राप्त करुन देईल असेही सांगतात्.

Guru_Gobind_Singh_Ji.jpg
गुरु गोविंद सिंग तलवारीचा वापर आक्रमणासाठी करायचा नाही तर स्वसंरक्षणासाठी करायचा असे सांगतात.किर्पाण जे शिखांचा पाच ककारांसाठी आहे ते अहिंसेचे साधन मानले गेलेले आहे.कारण हिंसा थांबवणे हे अहिंसेचे सुत्र शिख धर्म मानतो.त्यामुळे दुर्बलावर होणारी हिंसा रोखण्यासाठी जेंव्हा इतर सर्व मार्ग असफल होतात तेंव्हा किर्पाणचा वापर शस्त्र म्हणुन करणे हीच अहिंसा आहे असे शिख मानतात.त्यामुळे सत्य व तलवार हे एकत्र असल्यास ते न्याय्य आहे व ती अहींसाच आहे .अन्यायाविरुध्द लढण्यासाठी तलवार वापरणे फक्त बरोबरच नाही तर तेच न्याय्य आहे असे गुरु गोविंद सिंग सांगतात.कृर व्यक्तींच्या अन्यायापासुन निर्बल जनतेचे शस्त्राच्या सहाय्याने रक्षण न केल्यास हिंसा वाढण्याची शक्यता जास्त असते.त्यामुळे तेथे शस्त्र उचलणे आवश्यकच आहे असेही गुरु गोविंद सिंग सांगतात.

निष्कर्ष??
दोन्ही बाजुंचा वस्तुनिष्ठ विचार केल्यास नक्की बरोबर काय आहे हे ठरवणे अवघड होते.कारण गांधीजींचे "An eye for an eye makes the whole world blind."हे मतही बरोबर आहे.शिवाय कुठली हिंसा न्याय्य व कुठली अन्याय्य यातील सीमारेशा वास्तविक हिंसाचाराचा विचार करताना पुसट होतात्.शिवाय आपल्याबरोबर आता ते धर्मगुरुही नाहीत.त्याचबरोबर एकच गोष्ट वेगवेगळ्या लोकांना न्याय्य अथवा अन्याय्य वाटु शकते.आता अमेरीकेने इराकवर हल्ला केला हे अमेरीकन्सना न्याय्य वाटते तर इराक्यांना अन्याय्य वाटते.एका जनसमुहाचा क्रांतिकारक दुसर्‍या जनसमुहाचा दहशतवादी असतो.शिवाय आधुनिक संहारक शस्त्रास्त्रांचा विचार केल्यास शस्त्रांचा प्रयोग हा कुणाना कुणावर तरी अन्याय करतच असतो.कारण या शस्त्रास्त्रांमुळे होणारी मनुष्यहानी अनेकदा सामान्य्,निर्बल जनतेचेच जीव घेताना दिसते.त्यामुळे तो हिंसाचार आपोआपच अन्याय्य ठरतो.सर्वच राष्ट्रांचे सम्हारक शस्त्र एक दिवस संपुर्ण मनुष्यजातीलाच संपवतील का??का उलट ही संहारक शस्त्रे युध्द रोखण्यासाठी उपयोगी ठरतील्.उदा.भारत्-पाक युध्द व्हायची परिस्थिती बर्‍याचदा आली पण दोघांनीही अण्वस्त्र वापरली जातील म्हणुन युध्द टाळले.मग असे असेल तर अण्वस्त्रांमुळे अहिंसेला मदत झाली असे म्हणावे का??आणि जर जगातले सर्वच राष्ट्र युध्दाची तयारी करत असतील तर आपणच युध्दविरोधी भुमिका घेउन असे काय साध्य होणार आहे??याने हिंसा तर थांबणार नाहीच पण आपला तोटाही होईल्.जर असे असेल तर आपणच ही वाट का धरावी??ओशो म्हणतात की युध्द हा मनुष्याचा स्थायीभाव आहे.युध्द हे नेहमीच मनुष्याबरोबर राहिलेले आहे.त्यामुळे युध्द चुकीचे आहे म्हणनेच चुक आहे.त्यामुळे न्याय -अन्याय याचा फारसा विचार न करता आपण युध्दाकडे सकारात्मक दृष्ट्या पहावे का??मला वैयक्तिक दृष्ट्या सर्व गोष्टींचा विचार केल्यास सावरकरांचे प्रतिकार म्हणुन हिंसेचे तत्व योग्य वाटते.वाचकांनी या शेवटच्या परीच्छेदामधील प्रश्नांची त्यांची उत्तरे जरुर कळवावीत.

चिन्मय कुलकर्णी

विषय: 
प्रकार: 

चिन्या, छान लेख लिहीला आहेस, सर्व बाजूंचा विचार करून. आवडला. लेख वाचता वाचताच सावरकरांचं मत पटतं. पूर्ण अहिंसा आणि हिंसा यामधलाच मार्ग - म्हणजे गरज लागली तरच संरक्षणाकरिता हिंसा- हेच पटते.

दिव्या, संपूर्ण पोस्ट अगदी विचारी. पटली.
------------------------------------------
Times change. Do people??

केदार्,माझ्या 'त्या' पोस्ट्समधे काही चुकीचे आहे असे मला वाटत नाही.कृष्ण करायचा तशी 'रास्-लीला' आपल्याला करायला परवानगी नाही.ती परवानगी का नाही याचे तुम्ही काय उत्तर द्याल??

दिव्या,प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद्.मी ते पटवुन द्यायचा प्रयत्न करण्याची इच्छा नाहीये.पण राम, कृष्ण यांचे भक्त असलेले गांधीजी हिंसेला विरोध कसा करु शकतात हा मुद्दाच मला मान्य नाही.शिवाय कृष्ण क्षत्रिय नव्हता.तो वैश्य होता.गंधीजी=अहिंसा अस समीकरण नाही पण गांधीजींनी दिलेली अहिंसा ही कुठल्याही परीस्थितीत अहिंसाच होती.सावरकर म्हणतात की जैन व बुध्दही अशा पुर्ण अहिंसेच्या विरुध्द आहेत.जैन धर्मही वेळ पडल्यास हिंसेला समर्थन देतो,त्याचप्रमाणे भगवान बुध्दही असे समर्थन देतात.शिवाय निरपराधचा अर्थही व्यक्तीसापेक्ष आहे.जिहादींच्या मते अल्ला वर विश्वास नसणे हा भयंकर अपराध आहे.आणि आजच्या काळात युध्दामध्ये निरपराध लोक मरतातच.

लिंब्या ,प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद्.तुझी ठळक लिहीलेली ओळ आवडली.बाकी जैनांच्या शाकाहाराच्या तत्वात मला तरी काही चुकीच वाटत नाही.शाकाहारी अन्न सात्विक असत.स्वामी विवेकानंद म्हणतात की तुम्ही जे अन्न खाल त्याच्यावर तुमची मनःस्थिती ठरते.उदा.म्हणुन स्वामीजी सिंह आणि हत्तीचे उदाहरण देतात्.ते म्हणतात की 'सिंहा पेक्षा हत्ती कितीतरी मोठा असतो पण दोघांच्या प्रकृतीत कितीतरी फरक आहे बघा.सिंहाची सतत चलबिचल चालु असते.तर हत्ती बहुतेक वेळा शांत असतो.' आध्यात्मिक दृष्ट्या शाकाहार नक्कीच उपयोगी ठरतो असा अनुभव अनेक लोकांना आलेला आहे.त्यानंतर तु लिहिलय की सांगणारा माणुसच होता ना?आमच उत्तर आहे नाही तो देव होता ज्यानी हे सांगितल.आता परत चर्चा येईल की देव नसतोच,माणुसच देव असतो वगैरे.

धन्यवाद psg
----------------------
यूँ खड़ा मौकतल में कातिल कह रहा है बार-बार,
क्या तमन्ना-ए-शहादत भी किसि के दिल में है.
दिल में तूफ़ानों कि टोली और नसों में इन्कलाब,
होश दुश्मन के उड़ा देंगे हमें रोको ना आज.
दूर रह पाये जो हमसे दम कहाँ मंज़िल में है,

>>>> बाकी जैनांच्या शाकाहाराच्या तत्वात मला तरी काही चुकीच वाटत नाही.
चिन्या, ते तत्व बरोबर की चूक असा मुद्दा मला अपेक्षीत नाही, तर "ज्या अहिन्सेच्या तत्वावर" आधारित जीवनप्रणाली अनुसरताना, वेळेस हवेतील जीवजन्तून्ची हत्या होऊ नये म्हणून नाकातोन्डाला फडके बान्धुन वावरणार्‍या टोकाच्या अहिन्सक समाजात, मग शाकाहारासच तरी कशी काय परवानगी??? कुठेतरी हा अहिन्सेचा मुद्दा अर्धवट पायावर आधारित नाही का? असा मुद्दा त्या बाईन्समोर, तुमच्यासमोर ठेवला हे! Happy

बाकी तू दिलेले विवेचन बरोबरे! आहार व अन्य अनेक शास्त्रानुसार शाकाहार हा सात्विकच मानला गेला हे! Happy
उदय, धन्यवाद (दोनदा वाचायचे कष्ट घेतल्याबद्दल रे भो! :P)
...;
आपला, लिम्बुटिम्बु

कुठेतरी हा अहिन्सेचा मुद्दा अर्धवट पायावर आधारित नाही का? असा मुद्दा त्या बाईन्समोर, तुमच्यासमोर ठेवला हे!
जैनांचे याला काय उत्तर आहे याचा अभ्यास करावा लागेल.

----------------------
यूँ खड़ा मौकतल में कातिल कह रहा है बार-बार,
क्या तमन्ना-ए-शहादत भी किसि के दिल में है.
दिल में तूफ़ानों कि टोली और नसों में इन्कलाब,
होश दुश्मन के उड़ा देंगे हमें रोको ना आज.
दूर रह पाये जो हमसे दम कहाँ मंज़िल में है,

जरुर कर अभ्यास अन इथेही सान्ग मुद्दे! Happy
बायदिवे, तुझ्या लेखाबद्दल मी मुद्दामहून लिहिले नाही कारण लेखाच्या शीर्षकाप्रमाणे तू उपयुक्तता व मर्यादा यान्ची तुला जाणवलेली सीमारेषा वेगवेगळ्या उदाहरणातून दाखवुन दिली आहेस, व नन्तर त्यावरच भाष्य करणे अपेक्षीत असल्याने तुझ्या लेखाचे वेगळे कौतुक करणे राहून गेले! Happy
चान्गले परिश्रम (इफोर्ट्स) घेतलेस! Happy
...;
आपला, लिम्बुटिम्बु

>>शिवाय कृष्ण क्षत्रिय नव्हता.तो वैश्य होता.

चिन्या, कृष्ण हा देवकी वसुदेवाचा पुत्र ना? देवकी- वसुदेव वैश्य होते का? मला वाटले की क्षत्रिय म्हणून... चूभूदेघे.

एकूण लेख व त्यावरील चर्चा, सर्वांची मते वाचायला छान वाटत आहे. केदार, लिही की, तुझीही मते कळूदेत.

लिंब्या,धन्स.

आयटी,वसुदेव गायी पाळणे,दुध वितरीत करणे हे काम करत्.त्यामुळे ते वैश्य होते.

----------------------
यूँ खड़ा मौकतल में कातिल कह रहा है बार-बार,
क्या तमन्ना-ए-शहादत भी किसि के दिल में है.
दिल में तूफ़ानों कि टोली और नसों में इन्कलाब,
होश दुश्मन के उड़ा देंगे हमें रोको ना आज.
दूर रह पाये जो हमसे दम कहाँ मंज़िल में है,

पण मनुष्य आणि प्राणी यांना जशी nervious system लाभली आहे ती झाडांना लाभली नाही आहे. त्यामुळे आपण जेंव्हा पालेभाज्या ग्रहण करतो तेंव्हा त्या पालेभाज्यांना कसलास त्रास होत नाही. झाडाची एक शुष्क बी पुन्हा रुजते. एक कलम.. एक फांदी पुन्हा अंकूर धरते. पण प्राण्यांचे तसे नाही. त्यांचा अवयव हा फक्त त्यांचाच असतो. तो परत चिकटविल्या जात नाही. प्राणी आक्रोश करतात. तडफडतात. कारण त्यांना ती हत्या नको असते. त्यांना भयंकर इजा होतात कारण त्यांना nervous system आहे म्हणून. झाडाची काटछाट केल्यावर झाडं परत पालवी धरते. मुळापासून उपटून काढलेली झाडे परत रोपटी वर आणतात. त्यामुळे तुम्ही शाकाहारी आणि मांसाहारी मधला भेद समजत नाही अहात. आपले शरीर, मानवाचे शरीर हे शाकाहारी अन्नासाठीच बनले आहे. आपली पचनसंस्था ही शाकाहारी अन्नाला जास्त लवकर चयन करते. बकरी, गाय, हत्ती, शेळी यांना तुम्ही मास दिले तरी ते खाणार नाहीत. वाघ, सिंह, चित्ता, कोल्हा हे गवत खाऊ शकत नाहीत. माणसाने मात्रा आपली सोय दोन्ही गोष्टीसाठी करुन ठेवली आहे. जिवो जिवस्य जिवनम चा चुकीचा आधार घेतात. जिथे शेती करणे अगदी शक्यच नाही तिथे मासाहार करा पण शेती करता येऊ शकते अशा ठिकाणी शाकाहारच अंगी बाणा. पृथ्वीवर जिथे जिथे जमीन आहे तिथे तिथे मनुष्य शेती करू शकतो आणि तो जमीनीवरच राहतो याचा अर्थ नक्कीच शेती त्याला करता येऊ शकते.

लिंब्या तुझे वरील पोष्ट्स नाही आवडले. निषेध!!!!!!

वसुदेव गायी पाळणे,दुध वितरीत करणे हे काम करत्.त्यामुळे ते वैश्य होते >>
चिन्या वसुदेव दुध वितरीत करत न्हवते तर नंद करत होता. वसुदेव हे क्षत्रिय होते, देवकी ही कंसाची बहिन त्यामुळे कॄष्णही क्षत्रियच.

शिवाय गोधन ज्याचा कडे तो व्यक्ती वा ते राज्य श्रिमंत ही प्रथाच होती. ( आठवा कौरवांची, विराटावर स्वारी, ती गोधन लाटन्यासाठीच होती). त्यामुळे गायी जास्त असला की तो गवळी आणि पर्यायाने वैश्य असे समिकरन होत नाही.

आयटी माझे विचार मी पहिल्याच पोस्ट मध्ये मांडले, स्वसंरक्षण म्हणजे हिंसा असे मला वाटत नाही. पण मी ते पुढे लिहीले कारण चिन्या राम, कृष्ण व इतर देव त्यामुळे त्यांचा मार्ग आपण अवलंबु नये असे जे म्हणत आहे ते मला मान्य नाही.

लादेन काकांना पण काही लोक देवच मानत आहेत. मग त्यांचा विरोध मी सामान्य माणूस आहे म्हणुन करु नये का? कदाचीत लादेन काका पण अल्लाचा दुसरा अवतार असतील, आपण सामान्यांना काय माहित अशी भुमीका मी घ्यावी का?

म्हणून जिथे अन्याय, तिथे प्रतिकार. मग काहीजण गांधीसारखे ग्रेट असतात ते अहिंसेनी करु शकतात कारण त्यांचात प्रचंड विल पावर होती, पण काही जन सावरकरांसारखे हिंसेचा प्रतिकार परत हिंसेनी करायला तयार असतात. अहिंसक आणि शांतताप्रिय व्यक्ती ह्या दोन्हीत पण फरक आहेच. आम्ही शांतताप्रिय व्यक्ती आहोत व ती प्रस्थापित करन्यासाठी जरुर ती हिंसा मान्य.

शिवाजी महाराज, राणा प्रताप, चंद्रगुप्त, गौतमीपुत्र सातकर्णी, बाजीराव हे मग देव होते काय? कारण त्यांनीही हिंसा केलीच. गांधीना जरी शिवाजीचा मार्ग आवडला नाही तरी शिवाजी महाराजांचे कार्य कमी होणार आहे का?

देवानंतर कोणाची व्यक्तीपुजा झाली तर गांधीची. ह्या अहिंसेचा वादात उगीच देवांना आणू नये असे माझे प्रामानिक मत आहे.

जीवो जीवस्य जीवनम हेच खरे आहे. गांधीनी ते नाकारले. एकीकडे सत्याचा पाठपुरावा करायचा आणी दुसरीकडे ते नाकारायचे हे मला कळत नाही.

आता हा आमच्या घरच्यांचा अनुभव लिहीतो.

विनोबा भाव्यांना त्यांनी सैन्य नको अशी भुमीका घेतल्यावर चिडुन जाऊन आमच्या आजोबांनी एक पत्र पाठविले होते. त्यांनी त्यात विचारले की, " विनोबाजी आपण रझाकारीत कुठे होतात? जरा आमच्या कडे येउन येथील हिंदु बांधवाना आपल्या सत्याग्रही अहिंसेनी आणि उपोशनाने वाचवायचे असते" त्याचे उत्तर आले नाही. सैन्य नको, अहिंसा ह्या मोठ्या गप्पा मारनार्‍या विनोबांना रझाकारीत मराठवाड्यातल्या हिंदुंवरचे अत्याचार थांबविता आले नाहीत उलट एका गांधीवाद्यांने ३५ दिवसाचे उपोशन केले ते त्यांनी सोडावयाला सांगीतले. मग विनोबा व इतर गांधी वादी लोकांनी स्वतंत्र भारतात १९४८ साली सत्याग्रह करायचा, व रझाकार लोकांच्या गोळ्या स्वतःच झेलायच्या की. आमच्या गांधीवादी सत्याग्रही आजोबांनी गावच्या तरुण लोकांना एकत्र केले व सशस्त्र प्रतिकार केला. कारण त्यांना शांतता व अहिंसेचे डोसे वरुन मिळत होते पण ते डोस रझाकारांना कोणी देउ धजत न्हवते. ह्यात आजोबांचा भाउ वारला. त्यांनाही नंतर स्वातंत्रसैनीक ही "पदवी" मिळालीच.

(वरिल वाक्यात कुठेही विनोबा भावांन्या कमी लेखने नाही. त्यांनी जे भुदान चळवळीत कार्य केले आहे ते कोणीही करु शकत नाही पण अहिंसावादी व सैन्य नको असे म्हणनारे ते होते त्यामुळे हा रेफ).

स्वांतत्र्य मिळाल्यावर व मिळन्याआधी जिकडे तिकडे हिंसाच होती. ह्याचा विसर इतरांना पडला असेल मला नाही. १९४२ ते १९४९ पुर्वाध. ह्या काळात जितके सामान्य जिव मारले गेले तितके इतर कुठल्याही काळात नाही. आणी त्याची सुरुवात बंगाल मध्ये झाली व शेवट मराठवाड्यात. जिकडे तिकडे बलात्कार, हत्या, जाळपोळ आणि सामुहीक कत्तल. मग गांधीच्या तत्वांना माणनारे हेच लोक होते ना? की वेगळे होते?
ह्या शांतताप्रिय, अहिंसक, सत्याग्रही लोकांनी अचानक हिंसा का चालु केली हा प्रश्न विचारला जावा व त्यावर उहापोह व्हावा.

केदार, माझ्या मतेही श्रीकृष्ण क्षत्रियच होता, पण म्हटले अजून काही माहिती मिळवू याबाबत.

चिन्या, 'गांधी म्हणतात' नंतरचे सगळे गांधींनीच म्हंटले आहे ना? मी कुठे म्हंटले तुम्ही म्हणता?
आता हे तत्वज्ञान तुम्हास कळत नसेल तर तुमचे दुर्दैव्.

मी इतके दिवस कृष्णाचे तत्वज्ञान असे समजत होतो, की माणसाने आपले कर्तव्य करताना हातून हिंसा घडली तरी त्याचे पाप लागत नाही.

गांधींचे मत तसे नाही. त्यांच्या मते केवळ अहिंसाच, नि हिंसा नेहेमीच वर्ज्य. अगदी स्वसंरक्षणासाठी सुद्धा.

हे मी बरोबर समजलो आहे का?

पूर्वी एकच सनातन धर्म होता. पुढे बुद्ध, महावीर, जीझस ख्राइस्ट, महम्मद पैगंबर इ. नी हि आपले आपले तत्वज्ञान सांगितले. ते ज्यांना पटले ते बुद्ध जैन, ख्रिश्चन, नि मुस्लिम झाले. ज्यांना नाही पटले ते हिंदूच राहिले.

तसेच गांधींनी पण स्वतःचे तत्वज्ञान सांगितले. ते ज्यांना पटेल त्यांनी ते मानावे.

उगाच कृष्ण बरोबर का गांधी? की महम्मद का बुद्ध? हे असले वाद निर्णायक होऊ शकत नाहीत. नाहीतर सगळे एकाच कुठल्यातरी धर्माचे झाले असते.

मला काही गांधींचे तत्वज्ञान (केवळ अहिंसा) हे मान्य नाही. म्हणून मी गीता वाचत राहीन, नि त्यातले जे समजेल त्याप्रमाणे वागत राहीन.

इथे मुळात दोन विषय चालु आहेत आणि त्यात गल्लत होत आहे.विषय पहीला असा की सामान्य माणसाने केलेली हिंसा हिंदु धर्माला मान्य आहे का नाही. आणि विषय दुसरा -देवांचे अनुकरण करावे का??
१)माझे उत्तर -पहिल्याला माझे उत्तर आहे हो.मान्य आहे. आणि दुसर्‍याला माझे उत्तर आहे नाही.अनुकरण करु नये.
२)गांधीजींसाठी पहिल्याचे उत्तर आहे -नाही हींसा हिंदु धर्माला मान्य नाही आणि दुसर्‍याचे उत्तर आहे-नाही अनुकरण करु नये.
३)तुमच्यापैकी काहीण्साठी-पहिल्याचे उत्तर आहे हो.मान्य आहे.आणि दुसर्‍याचे उत्तर आहे -हो.अनुकरण करावे.

यापैकी ३ नंबरमधील दुसरे उत्तर जे देतात त्यांनी विष प्राशन करुन तरी दाखवावे अथवा गोवर्धन पर्वत तरी उचलुन दाखवावा.आणि नंतरच राम ,कृष्ण यांनी हिंसा केली म्हणुन आम्ही पण करणार असे सांगावे.

नंद तर गायींशी संबंधितच होते त्यामुळे ते तरी वैश्यच असावेत पण बहुतेक वसुदेवही तसेच होते.पण गीतेमध्ये गुणकर्मानुसार वर्ण ठरतो असे स्वतः भगवान कृष्ण सांगतात्.त्यामुळे मग ते वैश्य ठरतात असे मला वाटते.शिवाय श्रीमण्त म्हणजे क्षत्रिय नाहीच्.मुळात वैश्यच श्रीमण्त असतात

लादेन काकांना पण काही लोक देवच मानत आहेत.
लादेन काकांना कोणीही देव मानत नाही.कोणी मानत असेल तर तो हिंदुच असेल्.मुस्लिम लादेनला देव मानुच शकत नाही.कारण त्याचा धर्म अशा मानण्याचा साफ विरोधी आहे.

शिवाजी महाराज, राणा प्रताप, चंद्रगुप्त, गौतमीपुत्र सातकर्णी, बाजीराव हे मग देव होते काय?
मी हिंसा करायचा विरोधी नाहीये.मी फक्त देवांची नक्कल करायचा विरोधी आहे हिंदु धर्म सामान्य माणसाला गरज पडल्यास हिंसा करायची परवानगी देतो.त्यामुळे शिवाजी महाराज्,राणा प्रताप यांची हिंसा हिंदु धर्माप्रमाणे ते देव नसुनही बरोबर ठरते.पण गांधीजींना ती हिंसा बरोबर वाटत नव्हती म्हणुनच त्यांनी या सर्वांना मिसगाईडेड पॅट्रीऑट्स म्हटले.

झक्की आजोबा, 'कृष्ण ,राम यांना मनुष्य मानुन त्यांची नक्कल करण्याला माझा सक्त विरोध आहे.'
हे वाक्य माझे आहे गांधीजींचे नाही.

मी इतके दिवस कृष्णाचे तत्वज्ञान असे समजत होतो, की माणसाने आपले कर्तव्य करताना हातून हिंसा घडली तरी त्याचे पाप लागत नाही.
हे बरोबर आहे.कर्तव्य म्हणुन हिंसा करावीच.पण कृष्णाने केली म्हणुन नाही तर कृष्णानी करायला सांगितली म्हणुन ती बरोबर आहे.दोन्हीमधे खुप मोठा फरक आहे.

गांधींचे मत तसे नाही. त्यांच्या मते केवळ अहिंसाच, नि हिंसा नेहेमीच वर्ज्य. अगदी स्वसंरक्षणासाठी सुद्धा.
हे तुम्ही बरोबर समजलात्.गांधीजींचे हे मत का आहे कारण त्यांच्यासाठी गीतेतील कुरुक्षेत्र हे एक ठिकाण नव्हते तर ते स्वतःचे शरीर होते आणि पांडव गांधीजींसाठी पंडुचे पुत्र नव्हते तर पाच इंद्रिये होती.(थोडक्यात म्हणजे गांधीजींनी गीता कशी fabricate केली हे मी तुम्हाला सांगितले)
----------------------
यूँ खड़ा मौकतल में कातिल कह रहा है बार-बार,
क्या तमन्ना-ए-शहादत भी किसि के दिल में है.
दिल में तूफ़ानों कि टोली और नसों में इन्कलाब,
होश दुश्मन के उड़ा देंगे हमें रोको ना आज.
दूर रह पाये जो हमसे दम कहाँ मंज़िल में है,

थोडक्यात तु असे मांडु इच्छीतोस की स्वसंरक्षनासाठी केलेली हिंसा योग्य. अरे ह्यात कोणी (अजुनतरी) वाद घालतच नाहीये.

देवांनी केले म्हणून त्यांचे अनुकरन करु नका हे जे तु म्हणत आहे ते अर्धसत्य आहे.

रामाचे चारित्र्य चांगले होते मग त्याचे अनुकरन निदान मी तरी करत आहेच की. रास क्रिडा पैसे असल्यावर आजही करता येते फक्त मला स्वतला ते आवडत नाही म्हणून मी करनार नाही. राम म्हणतो सत्य बोला मी ट्राय करतोच की. Happy म्हणजे राम देव होता म्हणूनच सत्य बोलायचा व आपन ते बोलु नये असा निष्कर्ष निदान मी तरी काढत नाही.
अनुकरनीय गोष्टी आहेत त्या नक्की आचरनात आणाव्यात. पण विष पिता येत नाही, तसेच गोवधर्न पर्वत उचलता येत नाही म्हणून कुठल्याच बाबतीत देवाचे अनुकरन करायचे नाही का? म्हणजेच काय लिमीटेड देवपणा (चांगली वर्तनुक वैगरे) आपण आचरनात आणू शकतो तसेच गितेतला उपदेशही.

इद्रं देखील देवच होता आणी त्याने फसवनुकीने अहिल्येचा उपभोग घेतला, पण त्याचे अनुकरन करु नयेच नाही का?

ह्या उलट कृष्ण आहे. नरकासुराचा वध त्याने सत्यभामेला मध्ये घेउन केला. त्या उदाहरणापासुनही शिकन्यासारखे आहे. अश्यातच कूठेतरी वाचले की महाभारतातून आपण भिमाचे उदा डोळ्यासमोर ठेवायच्या ऐवजी युधीष्ठिराचे ठेवले त्यामुळे गल्लत होत आहे. मला तरी हे मान्य. भिम काही हिंसक न्हवता. पण प्रत्युत्तर देणारा होता.
देवांनी अहिंसेचे पालन केले असते तर पुराणातिल अनेक युध्दे झालीच नसती. तिथे दानवांची सत्याग्रहाने वा उपोशनाने बोळवन झाली नसती का? म्हणून म्हणतो देवाला अहिंसेत आणू नका. त्याची गरज नाही.

इथे कोणी देवाची तुलना स्वतःशी करत नाहीय. विषय थोडा भरकटला आहे.

गांधीजींचे हे मत का आहे कारण त्यांच्यासाठी गीतेतील कुरुक्षेत्र हे एक ठिकाण नव्हते तर ते स्वतःचे शरीर होते आणि पांडव गांधीजींसाठी पंडुचे पुत्र नव्हते तर पाच इंद्रिये होती.(थोडक्यात म्हणजे गांधीजींनी गीता कशी fabricate केली हे मी तुम्हाला सांगितले)
---- (मी हे सर्व प्रथमच वाचतो आहे म्हणुन ?) मग त्यांच्या मते कौरव होते कां? असतील तर कोण होते?

आज २००९ मधे अहिंसा हे तत्वज्ञान कितपत उपयुक्त वा मर्यादीत ठरु शकेल यावर उहापोह व्हावा. माझ्या मते स्व-रक्षणा साठी केलेली हिंसा ही हिंसा नाहीच. मी प्रथम प्राधान्य प्रेमाने विनवणी करण्यासच देणार, तुम्ही याला अहिंसा म्हणा हवा तर. ३-५ वेळा सांगुनही समजत नसेल तर तो त्या प्रेमाने सांगण्याच्या पात्रतेचा नाही आहे अशी मी समजुत करेल. आता त्या नंतर मी माझ्या यथाशक्ती प्रमाणे विरोध करेल. पण मला इजा पोहोचवण्याला मी कडाडून विरोध करेल. या मधे सर्व मार्गांचा अवलंब करण्यास मी मोकळा आहे, जे माझ्या मते पुर्ण पणे नैसर्गीक आहे. डास तुम्हाला चावायला बसला तर तुमच्या अगदी नकळत तुमचा हात त्याला मारण्यासाठी जातो अथवा त्याला हाकलण्याचा प्रयत्न करतोच. बहुतेक सर्व प्रसंगात तो काही तुम्हाला प्राण घातकही नसतो, पण तरी तुम्ही त्याचा बहु मुल्य असा प्राण घेता.

केवळ आदर्श जगात गांधींना अभिप्रेत असलेली अहिंसा खुप खिळुन दिसेल. पण दुर्देवाने हे जग आदर्श नाही आहे.

केदार - लादेन काका? $ पैशांवर डोळा आहे कां? Happy

>An eye for an eye makes the whole world blind हे मत निव्वळ पळवाद ( ) आहे.
--- ह्यात सर्व जगच डोळस आहे हा भ्रम (!) आहे असे माबो वरच एकाने फार समर्पकपणे म्हटले आहे
अरे, ते मि माझ्या रंगीबेरंगी वर "बदला का बदल" एका राष्ट्राची कैफीयत, या लेखात शेवटी लिहीले होते.. पण त्यची शेवटची ओळ अशी आहे:
An eye for an eye makes the world blind.. बापू तुमचे हे उद्गार अगदी खरे आहेत पण त्यात सर्वांना दृष्टि आहे हे गृहीत धरल गेलय.. इथे वैचारीक अन तात्विक दृष्ट्या अंधळे आहेत त्यांच्याशी मुकाबला आहे, हे जग आधीच आन्धळ आहे.

चिन्या, उत्कृष्ट लेख!
पण (गान्धीजींचा) अहिंसा एके अहिंसा हा(च) विचार vacuum मधे केला आहे असे मि म्हणेन. हिंसा आहे म्हणून अहिंसा आहे. सावरकरांन्नी मला वाटत नेमके हेच मर्म भेदले आहे. हिंसा हे "साधन" सदासर्वदा वापरण्याचा हट्ट धरून मला वाटत महात्माजिन्नी एका मोठ्या वर्गाला, पिढीला वैचारीक दृष्ट्या पंगू केले आहे. गम्मत बघा, अगदी मुंगी सुध्धा तीच्यावर पाय पडला तरी डसते! स्वसंरक्षण हे जिथे अगदी कीडा मुंगीलाही "कळते" अन "वळते" (घरी २४ तास animal planet चालू असण्याने मानवापेक्षा प्राणी जगताबद्दल माझे आजकाल क्लासेस चालू आहेतः) तिथे प्रगत मानवाने त्यात गल्लत करावी हे पचायला अवघड जाते. हिंसा, किव्वा अहिंसा ही प्रवृत्ती आहे, गुण आहे, त्याचा "मार्ग", "साधन" म्हणून उल्लेख करणे प्रथम थाम्बवले पाहीजे. कारण गुण हे साधनांच्या आधीन नसतात. आणि देवाने (राम, कृष्ण- हे देव? काहीही काय, पुराणात यान्ना अवतारी युगपुरूष मानले, संबोधले आहे! ते अवतार कार्य करायला माणसांच्यात मनुष्य जन्म घेवून अवतरले ते का मग?) निर्माण केले म्हणून नष्ट करायचा अधिकार त्याचा आहे हे फार "सोयिस्कर" तत्वज्ञान झाले. अर्जुनाइतका कृष्णभक्त "योध्धा" दुसरा नाही. पण म्हणून कुरूक्षेत्रात तो काही, "केशवा तूच निर्माण केले आहेस, आता तूच निस्तर" म्हणून भजन करत बसला नाही. तेव्हा या सोयिस्कर तत्वज्ञानाच्या आड आपली वैचारीक गफलत कुरवाळत बसणे, पक्षी त्याचे समर्थन करणे, हेच मोठे "असत्त्य" म्हणावे लागेल. आणि खुद्द शिवरायांन्ना समर्थ गुरू-श्री रामदास यान्नी मार्गदर्शन केले होते. त्यामूळे त्यान्ना "misguided patriot" म्हणणार्‍यांन्नी आपल्या वैचारीक पोकळीतून आधी बाहेर यायला हवे. एक नक्की आहे की ब्रिटीशांविरुध्ध जी एक व्यापक मानसिकता अन चळवळ गांधिन्नी उभी केली त्यास इतीहासात तोड नाही. ते कर्तुत्व मोठेच होते हे मानावेच लागेल, तेव्हा गांधीन्ना लहान करून इतरांन्ना महापुरूष बनविण्याचेही कारण नाही, सर्वजण आपापल्या जागी उचित आहेत. त्यामूळे मि आधी म्हटल तसे आपण "context" ध्यानात ठेवून त्यांन्च्या तत्वप्रणालिकडे पहाणे गरजेचे आहे, प्रत्त्येकाकडे एकंगीपणाने पहाणे हे vacuum मधे विचार करण्या सारखेच आहे.

पुन्हा खुद्द देवानेच म्हटले आहे की प्रत्त्येक चराचरात, माझा अंश आहे, मग त्या अर्थी आपण सर्वही देवच की. अंगी गुण आहे पण तो प्रकट होत नाही तोवर त्याला मान्यता नसते इतकच. अशक्यप्राय, अतर्क्य, आचंबीत करणारे असे काहीतरी करून दाखवा (गोवर्धन उचलणे, विष प्राशन करणे- हे तरी कॉमन आहे Happy म्हणजे मग तुम्ही "त्या" अर्थाने देव अशी मागणि करणार्‍यांन्नी आपल्या भोवताली किती देवस्वरूप आहेत ते जरा डोळसपणे पहावे. कारण त्या आधारावार- कारगील मधे -३० डीगरी मधे शेवटच्या रक्ताच्या थेम्बापर्यंत लढणारे सैनीक मला देव वाटतात, कारण मि आणि सर्वसामान्य ते नाही करू शकणार. कसाब च्या हातातील ak47 स्वताच्या पोटात रिकामी होत असताना त्याला पकडून ठेवणारे स्व. तुकाराम ओंबळे मला देव वाटतात. स्वताचे सुख, दु:ख विसरून कायम दुसर्‍याच्या कल्याणासाठी झटणारे सर्वच मला देव वाटतात.. तेव्हा तोही मुद्दा बाजूला ठेवुया का?

आणि अहिंसा वगैरेचा आहाराशी काय संबंध राव? मला तरी ही वैज्ञानिक अन जैवीक अप्रगल्भता वाटते. आदी-मानव हा जंगलात शिकार करूनच जगत होता.. कंदमुळे खाणारे ऋशीमुनी देखील वेळेप्रसंगी मांस्भक्षण करत होते (आशी अनेक उदाहरणे आहेत). हा, मानवाची सर्वसामान्य जैवीक, रासायनिक रचना ही शाकाहारासाठी मूळ बनलेली आहे हे विज्ञान मान्य करते. पण म्हणून मि स्वतः सुध्ध शाकाहारी असलो म्हणजे मि अहिंसेचा पुरस्कर्ता आहे (असे जैन धर्माचे उलट अनुमान/ corollary आहे का..?) हे म्हणणे चूक आहे. तेव्हा ते तसले मुद्दे इथे नकोत. चिन्याचा मूळ लेख अन त्याची (लेखाची) अपेक्षा या भोंगळ उदाहरणांच्या पलिकडली आहे हे मान्य करूया का..?

आता चिन्याच्या शेवटच्या परिच्छेद्/प्रश्णांवर लिहायचे तर असे म्हणेन की: युध्ध हे तत्वांशी असावे, आहे, मग हातात साधन म्हणून अणुबाँब घ्या किव्वा लाठ्या घ्या. ज्याचे तंत्र, विज्ञान सर्वात जास्त विकसीत त्याचा अशा युध्धात विजय होणार हे साधे स्पष्ट आहे. त्यामूळे nuclear weapons लाही फार अर्थ उरत नाही. त्यामूळे इथे हा प्रश्ण उपस्थित करून, वैयक्तीक जीवन अन राष्ट्र जीवन, सुरक्षा यात आपण गल्लत करत आहोत. राष्ट्र टिकले तर आपण टीकू, मग घरात चोवीस तास देव देव पूजा पाठ करणारा असो वा घराचा सशत्र बंकर बनवून राहणारा असो.. युद्ध हा (कायमचा) उपाय नाहीच हे गेले पाच हजार वर्षाचा इतीहास सांगतो पण म्हणून अस्तित्वाचा, सत्त्याचा, धर्माचा प्रश्ण येतो तिथे हातात साधन (शस्त्र) हे घ्यावेच लागते. तिथे हिंसा, अहिंसा या गुणभेदांचा वाद उरतच नाही. "साध्य" काय आहे याला तिथे महत्व आहे.

मूळ मुद्दा एव्हडाच आहे की वैयक्तीक आचार विचार सदाचरण याचे सामुहीक, राष्ट्रीय स्केल वर परिणाम व्हायला, दिसायला काही पिढ्यांचा कालावधी लागतो, पण त्याचे फायदे-परिणाम चिरकालीन (अनेक शतके म्हणूया) तग धरून राहतात. युध्धातून लगेच फायदे (जे काही) मिळतात पण ते फार थोडा काळ टिकतात.
यातला कुठला मार्ग कधी अवलंबायचा किव्वा सतत त्याचा पुरस्कार करायचा हे ठरवणे हेच अवघड आहे, पण ज्याला ते जमले त्याला सत्त्य, साधन अन साध्य हे तीनही कळले, वळले असे म्हणता येईल.
तूर्तास तरी सत्त्य(म) कटू(च) आहे!

रास क्रिडा पैसे असल्यावर आजही करता येते फक्त मला स्वतला ते आवडत नाही म्हणून मी करनार नाही.
बापरे !!रासक्रिडा करणे धार्मिक दृष्ट्या बरोबर आहे असे तुझे मत आहे???अगदी भरपुर ज्ञान असलेला लोकांमध्येही कसे गैरसमज असतात हे इथे कळुन येतेय.

राम म्हणतो सत्य बोला मी ट्राय करतोच की.
हिच तर गोची आहे ना!!राम तुम्हाला सांगतो सत्य बोला म्हणुन सत्य बोलणे चुक नाहीच्.मी असे कुठेच लिहिले नाही.मी म्हणतोय की देवांची नक्कल करु नका तर देवांनी दिलेल्या उपदेशाचे पालन करा.या दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत.

लिमीटेड देवपणा (चांगली वर्तनुक वैगरे) आपण आचरनात आणू शकतो तसेच गितेतला उपदेशही.
गीतेत केलेला उपदेश आहे त्यामुळे त्याचे पालन करणे योग्यच आहे.

मग त्यांच्या मते कौरव होते कां? असतील तर कोण होते?
वाचुन सांगतो.पण मी लिहिलेले बरोबर आहे.प्रभुपादांनी त्यांच्यावर अशा फॅब्रिकेशनमुळे टिका केली होती.ओशो पण आपल्या एका व्याख्यानात याचा उल्लेख करतात.

धन्यवाद योग!!!
हिंसा आहे म्हणून अहिंसा आहे.
हे अगदी बरोबर आहे.

राम, कृष्ण- हे देव? काहीही काय, पुराणात यान्ना अवतारी युगपुरूष मानले
आं????भागवत पुराण 'कृष्णस्तु भगवान स्वयम' सांगते आणि आम्ही तर भागवत पुराणातील जवळपास प्रत्येक श्लोकात 'कृष्णा तुच भगवान आहेस' असे वाचतो आहोत्.गीतेतही कृष्ण अर्जुनाला हाच संदेश देतात.

"त्या" अर्थाने देव अशी मागणि करणार्‍यांन्नी आपल्या भोवताली किती देवस्वरूप आहेत ते जरा डोळसपणे पहावे.
अहो तुम्ही देव आहात ना मग तुम्ही तसे करुन दाखवा की!!!या मागणीत चुक ती काय्??परत म्हणनार आम्ही काय जादुगर नाही.अरे वा रे वा!!तुम्ही देव आहात याचे काहीतरी प्रमाण द्यावेच लागेल.

स्वताचे सुख, दु:ख विसरून कायम दुसर्‍याच्या कल्याणासाठी झटणारे सर्वच मला देव वाटतात..
त्यांच्याबद्दल कमालीच आदर आहे पण त्यांना देवत्व बहाल करण साफ चुक आहे.आणि मग हे व्यक्तिसापेक्ष आहे.मला दिवसभर पलंगावर लोळत पडणारे आणि फक्त मजा करणारे देव वाटता असे कोणी म्हणेल्.कुणाला दारुडे,चोर देव वाटतील्.आणि मग माणुसच देव असेल तर सगळे धर्मग्रंथ जाळुन टाका.उगाच कशाला डोक्याला ताप्???देवाचा अंश प्रत्येकात आहे म्हणजे प्रत्येक जण देव आहे हे चुक आहे.पेसमेकर नावाचे यंत्र हृदयात बसवतात्.शरीराचा तो एक भागच होतो म्हणा.याचा अर्थ शरीर हे यंत्र झाले का??शरीराचा एक अंश यंत्र आहे पण पुर्ण शरीर नाही

ज्याचे तंत्र, विज्ञान सर्वात जास्त विकसीत त्याचा अशा युध्धात विजय होणार हे साधे स्पष्ट आहे.
हे अगदी बरोबर आहे.म्हणुनच सावरकरांनी लष्करीकरणाला सर्वात जास्त प्राधान्य दिले होते.

यातला कुठला मार्ग कधी अवलंबायचा किव्वा सतत त्याचा पुरस्कार करायचा हे ठरवणे हेच अवघड आहे, पण ज्याला ते जमले त्याला सत्त्य, साधन अन साध्य हे तीनही कळले, वळले असे म्हणता येईल.
हे अगदी बरोबर आहे.
----------------------
यूँ खड़ा मौकतल में कातिल कह रहा है बार-बार,
क्या तमन्ना-ए-शहादत भी किसि के दिल में है.
दिल में तूफ़ानों कि टोली और नसों में इन्कलाब,
होश दुश्मन के उड़ा देंगे हमें रोको ना आज.
दूर रह पाये जो हमसे दम कहाँ मंज़िल में है,

अरे चिन्या तु माझे व झक्कींचे प्रतिसाद निट वाच. त्यात कुठे कोणी असे लिहीले आहे की आम्ही म्हणजेच देव. हा निष्कर्ष तू काढलास. स्वतःच. मग विष पिउन दाखवा वैगरे लिहीलेस.

माझ्या प्रतिसादात मी असे लिहीले आहे की, "रास क्रिडा पैसे असल्यावर आजही करता येते फक्त मला स्वतला ते आवडत नाही म्हणून मी करनार नाही." तर तु लिहीतोस, "रासक्रिडा करणे धार्मिक दृष्ट्या बरोबर आहे असे तुझे मत आहे???अगदी भरपुर ज्ञान असलेला लोकांमध्येही कसे गैरसमज असतात हे इथे कळुन येतेय."

आता मला सांग मित्रा, मी कुठे लिहीले धार्मीक दुष्ट्या हे बरोबर आहे आणी हा माझा धार्मिक समज आहे? माझ्या त्या वाक्यातुनच तुच परत निष्कर्षाप्रत जात आहेस.

योग यांनी तसे लिहिलेय की कारगिलचे सैनिक वगैरे तसेच तु ही लादेनला देव मानणारे लोक आहेत वगैरे लिहिलय्.बाकी रासलीला बद्दल म्हणायच तर ती बरोबर का चुक याबद्दल काय उत्तर आहे???माझ म्हणनय की कृष्णाने केलेली ती बरोबर आणि आपण केलेली ती चुक.मुळात आपण ती करुच शकत नाही.शिवाय पैसे देउन केलेली गोष्ट रासलीला ठरत नाहीच्.वासना आणि रासलीलेत जमिन आस्मानाचा फरक आहे.कृष्ण एकाच वेळी हजारो गोपिकांबरोबर असु शकतो पण आपण तसे करु शकत नाही. विष पिउन दाखवा हे मी देवाचे अनुकरण करु नका हे स्पष्ट करण्यास लिहिलय्.तुम्हाला जरी वाटल की मी देवाच अनुकरण करु शकतो तरी ते शक्य नाही .त्यामुळे देवाने सांगितलेल्या मार्गावर चाला,त्याची नक्कल करु नका असेच मी पहिल्या पोस्टपासुन म्हणतोय.

----------------------
यूँ खड़ा मौकतल में कातिल कह रहा है बार-बार,
क्या तमन्ना-ए-शहादत भी किसि के दिल में है.
दिल में तूफ़ानों कि टोली और नसों में इन्कलाब,
होश दुश्मन के उड़ा देंगे हमें रोको ना आज.
दूर रह पाये जो हमसे दम कहाँ मंज़िल में है,

माझ्या लेखनाने केदार अथवा झक्की आजोबा दुखावले गेले असल्यास क्षमस्व!!!!
----------------------
यूँ खड़ा मौकतल में कातिल कह रहा है बार-बार,
क्या तमन्ना-ए-शहादत भी किसि के दिल में है.
दिल में तूफ़ानों कि टोली और नसों में इन्कलाब,
होश दुश्मन के उड़ा देंगे हमें रोको ना आज.
दूर रह पाये जो हमसे दम कहाँ मंज़िल में है,

माझ्या लेखनाने केदार अथवा झक्की आजोबा दुखावले गेले असल्यास क्षमस्व!!!!
---- तुम्ही केवळ केदार, झाक्की यांना(च) कां वेगळे काढलेत? भावना फक्त ह्या दोघांनाच आहेत कां? दुखावला Sad तर मी पण गेलो आहे. नको, आता माझी नका क्षमा मागू.

खरे दुखावले गेले आहेत ते अमर झालेले बापू.... त्यांना काय म्हणायचे होते ते माझ्या सारख्या पामरांना नाही समजत.

सॉरी उदय!!!!
----------------------
यूँ खड़ा मौकतल में कातिल कह रहा है बार-बार,
क्या तमन्ना-ए-शहादत भी किसि के दिल में है.
दिल में तूफ़ानों कि टोली और नसों में इन्कलाब,
होश दुश्मन के उड़ा देंगे हमें रोको ना आज.
दूर रह पाये जो हमसे दम कहाँ मंज़िल में है,

सॉरी उदय!!!!
---- हे अपेक्षीत नव्हते, त्याची अवशक्ता नाही. मी गमतीने लिहिले आहे.

माणूस हा शाकाहारी प्राणी आहे हे शाकाहारवाद्यांनी पसरवलेले थोतांड आहे.जीवशास्त्र,उत्क्रांतीवाद आणि मानववंशशस्त्र यामधे असा कुठलाही पुरावा नाही.एखाद्या प्राण्याच्या क्रुर असण्याशी त्याच्या अन्नाचा काहीही संबंध नाही.सर्व प्राणी केवळ प्रसंगोचित वर्तन करीत असतात.एखादा सिंह जेंव्हा शिकार करतो तेंव्हा ती नीट होणे त्याच्याही जीवन-मरणाचा प्रश्न असतो,तिथे राग,क्रुरता असल्या भावना आणून तो हातची शिकार गमावत नाही.केवळ मजेसाठी शिकार करणारा माणूस हाच प्राणी आहेत.आणी अशी शिकार ही नक्कीच निंदनीय आहे.
अहींसा हा अत्यंत वैयक्तिक आणी पराकोटीची आत्मीक कसोटी पाहणारा मार्ग आहे.माझ्या मते अशी ताकद असणारा माणूस आपला राजकीय नेता झाल्याने सॉलीड गोंधळ झाला आहे.इंग्रजांच्या अफाट सत्तेला हरवण्यासाठी हा मार्ग व असे नेतृत्वं अतीशय उपयोगी पडले हे खरेच.पण गांधी स्वत:च म्हणतात त्याप्रमाणे हे सर्व त्यांचे वैयक्तिक प्रयोग होते,त्यात स्वातंत्र्य मिळाले हा केवळ एक भाग झाला.ते असेही म्हणतात की माझी वृत्ती शास्त्रञाची आहे,हे प्रयोग यशस्वी झाले नाहीत तर त्यांचा त्याग करुन मी नव्याने सुरुवात करेन.आता राजकीय नेत्याला अशा प्रकारचे 'प्रयोग' करण्याची मुभा असावी का हा प्रश्न आहे.
वैयक्तिक जीवनातील शारिरीक वा वैचारिक हिंसा आपण टाळू शकलो तरच आपल्याला सामाजीक पातळीवरच्या आचरणात काही फरक दिसू शकेल.हे व्हायला कित्येक पिढ्या जाव्या लागतील.अहींसेच्या आत्मीक,नैतीक बळावर दहशतवादाचा मुकाबला करणे तात्वीकदृष्ट्या शक्य असेल,कदाचीत त्याने 'दहशतवादी बनणे' ही प्रक्रिया थांबू शकेल. मात्र प्रत्यक्षात जेंव्हा एखादा दहशतवादी गोळ्या घालत असेल तेंव्हा मात्र सशस्त्र प्रतिकार हाच मार्ग उरतो.
********************************
द मोअर यु राईट पर्सनल, द मोअर इट बिकम्स युनिवर्सल

आगाउ,बर्‍यापैकी पटले.
----------------------
यूँ खड़ा मौकतल में कातिल कह रहा है बार-बार,
क्या तमन्ना-ए-शहादत भी किसि के दिल में है.
दिल में तूफ़ानों कि टोली और नसों में इन्कलाब,
होश दुश्मन के उड़ा देंगे हमें रोको ना आज.
दूर रह पाये जो हमसे दम कहाँ मंज़िल में है,

माझ्या लेखनाने केदार अथवा झक्की आजोबा दुखावले गेले असल्यास क्षमस्व
मला राग आला नाही. रागवण्यासारखे काहीच नाही.
पण एकतर माझ्या मते गांधी काय म्हणत होते ते मला कळले, पण मी त्यांच्याशी सहमत नाही. व दुसरे म्हणजे माझा संगणकच मोडला, त्यामुळे मला वारंवार मायबोलीवर येणे जमत नाही.

मला वाटत सत्य व अहिंसा ही व्रत आहेत .याच आचरण कराव की न कराव हा ज्याचा त्याचा वैयक्तिक
प्रश्न आहे .या व्रताच्या आचरणाने लाभ नक्कीच आहेत .त्यामुळे जितक शक्य असेल तितक याच पालन व्हाव.सत्य व अहिंसा यांच पालन न करणार्‍याकडून जर समाज अहित होत असेल तर तिथे प्रतिकार

झालाच पाहिजे .

बरोबर आहे छाया!!!!!!!
----------------------
यूँ खड़ा मौकतल में कातिल कह रहा है बार-बार,
क्या तमन्ना-ए-शहादत भी किसि के दिल में है.
दिल में तूफ़ानों कि टोली और नसों में इन्कलाब,
होश दुश्मन के उड़ा देंगे हमें रोको ना आज.
दूर रह पाये जो हमसे दम कहाँ मंज़िल में है,

चिन्या फार सुंदर लेख. फारच अभ्यास करुन लिहिल आहेस ते आवडल. लेखातले मुद्दे फार छान मांडले आहेस पण प्रतिक्रियांना उत्तरे देताना तू बराच गोंधळलेला दिसतोस किंवा तुला जे पटल आहे ते दुसर्‍यांना पटवुन देण्यात आलेली असमर्थता आणि त्यामुळे तू केलेली काही विधाने न पटण्या सारखी आहेत. पण तुझे मुद्दे योग्य आहेत.

तुझे आणि केदार, बी, योग, आगाउ, satino, दिव्या, झक्की ह्यांचे मुद्दे विचारात घेता नक्की एक परीपुर्ण संदेश मिळतो.

काही गोष्टी ह्या ideal असतात तर काही प्रॅक्टीकल असतात. कोणतेही तत्वज्ञान हे पुर्णतः प्रॅक्टिकल असु शकते असे मला वाटत नाही आणि ते तंतोतंत आचरणात येउ शकते असेही मला वाटत नाही. बरेच वेळा तत्वज्ञानी माणसे आपले तत्वज्ञान लोकांना पटवुन देण्यास असमर्थ ठरतात आणि असंधर्भ विधाने करतात.
अंहीसा, शाकाहार, धर्म, पुण्य ही सगळी तत्वज्ञानेच आहेत आणि म्हणुनच ती शद्बश: आचरणात आणता येत नाहीत. तत्वज्ञानात दोन विरोधाभासी विधानांचे एकाच वेळी समर्थनही करता येत नाही आणि तस झालच तर ते तत्वज्ञान होत नाही. मग ते होत दोन्ही बाजुने वाजणार ढोलकं आणि मग काही लोक ते ढोलक म्हणुनच बडवायला घेतात.
आता एका नाण्याच्या दोन बाजुंना दोघांना उभ करुन, हा वाद घालायला लावला की कुठल्या बाजुला खरी किंमत आहे आणि कुठल्या बाजुला नाही तर काय होईल? जो तो आपली बाजु म्हणेल. अरे पण खरी किंमत आहे ती त्या नाण्याला. कुणी असही म्हणेल खरतर त्या नाण्याला सुद्धा काही किंमत नाही. तेही बरोबरच आहे. इथे चुक कुणीच नाही सगळे बरोबर आहेत पण प्रत्येक मुद्याला काही prerequisites आहेत, काही assumptions आहेत ती आधी नाकारायची आणि मग मुद्दाही नाकारायचा याला काही अर्थ नाही.

एका माणसा साठी असलेला धर्म दुसर्‍या माणसा साठी अधर्म असुच कसा शकेल? आणि अस होत असेल तर नक्कीच काहीतरी चुकत आहे आणि झक्कींनी म्हटल्या प्रमाणे ह्याच एकच कारण आहे ते म्हणजे अज्ञान.
माझ्या मते अज्ञानाची दोनच कारण असु शकतात एकतर बौधिक असमर्थता कींवा बौधिक आडमुठेपणा. बौधिक असमर्थता असणार्‍याला खरच काही कळत नसत आणि बौधिक आडमुठेपणा असणार्‍याला समोरच्याच म्हणण समजुन न घेता ते खोडाव कस हे कळत असत. हेकेखोरपणे माझच म्हणण योग्य ह्याला काही अर्थ आहे का?
"तुम्ही आधी हे बोललात, आता हे बोलताय? चुलीत घाला तुमच तत्वज्ञान!!!" अरे पण त्या विधानांना मागचा पुढचा संदर्भ होता त्याच काय? समजुन घ्यायच म्हटल तर सगळ समजत, पटवुन घ्यायच म्हंटल तर सगळ पटत आणि ते सगळ पटल तरी प्रत्येक वेळी त्याच अनुकरण करता येतच का? तर नाही. काही गोष्टी मार्गदर्शक असतात पण त्याच अंधानुकण करु नये. guidelines आणि procedure मध्ये जो फरक आहे तो आपण समजुन घ्यायला हवा. देव म्हणजे काय आणि धर्म म्हणजे काय? मी देव मानतो म्हणुन मला बसल्या जागी खायला मिळेल तर तुझा देव खरा नाही तर खोटा असे सांगणारे महाभागही खुप भेटले. अर्थात मी ही देव मानुनही नास्तिक होत वाद खुप घातले आणि देव आहे म्हणुनही वाद खुप घातले आणि लक्षात आल की तत्वज्ञांनवर वाद घालण्यात काही अर्थ नसतो. देव म्हणजे काय आणि धर्म म्हणजे काय?
१६ वर्ष पादरी म्हणुन जगभर फिरलेल्या एका आयरिश सज्जनांना मी विचारल होत की तुम्ही येवढ्या वर्ष पादरी म्हणुन काम केलत तर सांगाना देव म्हणजे काय आणि धर्म म्हणजे काय? ते म्हणाले 'देव वगैरे काही नसत" देव मानणार्‍या मला हा मोठा धक्का होता. मी त्यांना तेंव्हा सांगितल होत.

मला विचाराल तर धर्म म्हणजे ती कृती जी सर्वांच हित साधते आणि देव म्हणजे ती अदृश्य शक्ती जी मी चांगल काम करताना माला पाठ्बळ देते आणि वाईट काम करताना मला पाठी ओढते.
"खोटं बोलू नकोस नाही तर देवबप्पा तुझा कान कापेल" ह्या एका वाक्यात नकळात्या वयात देव म्हणजे काय
हे समजल. त्यानंतर मी कितीदा खोट बोललो पण त्यानी कधीच कान कापला नाही तरी पण तो आहे आणि तो सगळ बघतो आहे. कधीतरी तो खरच कान कापेल ही भीती अजुनही मनाला भासते आणि अनेक संभाव्य चुका हातुन टळतात. प्रत्येक कृती पुर्वी ती चुक किंवा बरोबर ह्याचा विचार करायला लावणारी ती शक्ती म्हणजे देव. मला माणसात राहुन मला माणसां सारखा वागायला लावणारा तो देव. विजेचा झटका हा ईलेक्टॉनसच्या प्रवाहा मुळे बसतो हे जर मी आणि आपण सगळे मान्य करतो तर आजुबाजुचे हे चालतं बोलतं चराचर हे एका अद्रुश्य शक्ती मुळे चालत हे मानण्यात कसला आला आहे मुर्खपणा आणि अज्ञानीपणा.
एखाद्या खुळ्या(?) समजुतिने मला चांगला माणुस म्हणुन जगण्याची प्रेरणा मिळत आसेल आणि माझ्या तर्कशुद्ध बुद्धीला न उलघडलेल्या प्रष्णांना उत्तर मिळत असतिल तर ती समजुतच माझ्या साठी प्रमाण आहे. आणि ती समजुतच माझ्यासाठी देव आहे.

सांगायच काय तर सगळ्यांचे मुद्दे बरोबर आहेत ते समजुन ह्या लेखाचा आणि ह्या चर्चेचा निर्माता म्हणुन तूच एका विचारपुर्वक असा निष्कर्श काढावास म्हणजे सगळ भरुन पावल.

आणि बौधिक आडमुठेपणा असणार्‍याला समोरच्याच म्हणण समजुन न घेता ते खोडाव कस हे कळत असत. हेकेखोरपणे माझच म्हणण योग्य ह्याला काही अर्थ आहे का?
"तुम्ही आधी हे बोललात, आता हे बोलताय? चुलीत घाला तुमच तत्वज्ञान!!!" अरे पण त्या विधानांना मागचा पुढचा संदर्भ होता त्याच काय?

अगदी खरे. मुख्य म्हणजे आजकाल कुठल्याहि मुद्द्याच्या एका बाजूने बोलणारे काही लोक असतात नि काही त्याविरुद्ध बोलणारे. मग विचारपूर्वक खरे काय खोटे काय असा विचार न होता, केवळ अमुक एकजण असे म्हणतो म्हणून ते खरेच किंवा खोटेच असले पाहिजे, असे मानणारे लोक. हाहि बौद्धिक आडमुठेपणाच.

प्रचंड पूर्वग्रह. भारतातले लोक येडपटच आहेत! म्हणजे करकरे, साळस्कर गेले ते वाईट झाले म्हणण्यापूर्वीच, 'ते वेडे होते! असे का करतात्?'असे म्हणायचे, आणि माझी खात्री आहे की असे जो माझा मित्र छातिठोकपणे ओरडून सांगत होता, त्याला मुंबईत प्रत्यक्ष काय घडले, करकरे कोण होते, त्यांचे कर्तव्य काय होते, ते कसे करतात याबद्दल तिळभरहि ज्ञान नाही. पण आपले बोलायचे!

दुसर्‍या एका वेळी मी सांगत होतो की भारतीयांनी स्वतःच्या ज्ञानाने, हिंमतीने अण्वस्त्रे बनवली, चंद्राकडे यान पाठवले, तर लगेच दुसरा म्हणतो, "छे: छे:, इस्रो नि सगळे अमेरिकेकडून चोरले. मी म्हंटले तुला काय माहित? तो म्हणाला, भारतीयांना हे शक्यच नाही!!!!
त्याचप्रमाणे, 'तुम्ही शंकर, कृष्ण यांना मानता ना? मग उचला गोवर्धन पर्वत किंवा प्या विष! ' अशी अतिरेकी विधाने करणे.

'तुम्ही शंकर, कृष्ण यांना मानता ना? मग उचला गोवर्धन पर्वत किंवा प्या विष! '
झक्की आजोबा,तुम्ही वर जे लिहिलय त्याचप्रमाणे अजुन एक आडमुठेपणाच आहे म्हणजे 'दुसर्‍याचे म्हणने फॅब्रिकेट करणे आणि मग त्याला टोमणे मारणे '. मी 'शंकर्,कृष्नाला मानता' असे लिहिले नव्हते तर 'शंकर्,कृष्णाचे अनुकरण करु शकत असाल तर' असे लिहिले होते.उगाच माझ्या तोंडी काहीतरी घुसडु नका.

सत्यजीत्,तुमचे मुद्दे आवडले.सगळे पटले नाहीत्,पण ते नक्कीच चिंतनीय आहेत.येथे निष्कर्ष गांधीजींबद्दल काढता येउ शकतो.पण देवाबद्दल नाही .कारण् प्रत्येक जण देवाबद्दल नवी थिअरी आणु शकतो.त्यामुळे निष्कर्ष काढायचाच असल्यास तुम्ही अथवा इतर कोणीतरी काढावा.
----------------------
यूँ खड़ा मौकतल में कातिल कह रहा है बार-बार,
क्या तमन्ना-ए-शहादत भी किसि के दिल में है.
दिल में तूफ़ानों कि टोली और नसों में इन्कलाब,
होश दुश्मन के उड़ा देंगे हमें रोको ना आज.
दूर रह पाये जो हमसे दम कहाँ मंज़िल में है,

Pages