Submitted by मी अभिजीत on 21 February, 2011 - 02:49
वादात या कुणीही सहसा पडू नये
दुरुनी सुगंध घ्यावा कलिका खुडू नये
जपते किती उराशी घरटे तुला मला
फुटताच पंख पण का आम्ही उडू नये ?
आयुष्यभर झगडलो अडलो पदोपदी
माझ्याविना कुठेही दुनिया अडू नये
डोळ्यांतली सुरा ही प्राशून धुंद मी
कुठलाच नाद आता मजला जडू नये
तू घातली न केव्हा फुंकर कधी कुणा
धरली अताच खपली तू खरवडू नये
मोक्षाहुनी जिण्याची भलतीच ओढ ही
कोडे मलाच माझे, का उलगडू नये ?
-- अभिजीत दाते
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
डोळ्यांतली सुरा ही प्राशून
डोळ्यांतली सुरा ही प्राशून धुंद मी
कुठलाच नाद आता मजला जडू नये
मोक्षाहुनी जिण्याची भलतीच ओढ ही
कोडे मलाच माझे, का उलगडू नये ?
हे शेर आवडले
गझल आवडली.
गझल आवडली.
छान. आवडली गझल.
छान. आवडली गझल.
मोक्षाहुनी जिण्याची भलतीच ओढ
मोक्षाहुनी जिण्याची भलतीच ओढ ही
कोडे मलाच माझे, का उलगडू नये ?>>>>
खल्लास, जबरदस्त !
मस्त गझल....
मस्त गझल....
सही गझल! घरटे, दुनिया, खपली,
सही गझल! घरटे, दुनिया, खपली, मोक्ष उत्कृष्ट!
सुरेख!!
सुरेख!!
सुरेख
सुरेख
तू घातली न केव्हा फुंकर कधी
तू घातली न केव्हा फुंकर कधी कुणा
धरली अताच खपली तू खरवडू नये.
मोक्षाहुनी जिण्याची भलतीच ओढ ही
कोडे मलाच माझे, का उलगडू नये ?
......वाहवा.... मस्तच जमलीये गझल...
आयुष्यभर झगडलो अडलो
आयुष्यभर झगडलो अडलो पदोपदी
माझ्याविना कुठेही दुनिया अडू नये
डोळ्यांतली सुरा ही प्राशून धुंद मी
कुठलाच नाद आता मजला जडू नये
तू घातली न केव्हा फुंकर कधी कुणा
धरली अताच खपली तू खरवडू नये
मोक्षाहुनी जिण्याची भलतीच ओढ ही
कोडे मलाच माझे, का उलगडू नये ?
शेवट-लै भारी!
भव तृष्णा हीच असे का?
रामकुमार