अशीच एक सायंकाळ,उन्हाने होती करपलेली
चढण होती डोळ्यासमोर, कड्यातून मुडपलेली
उंचीने कातळाच्या, छाती त्याची दडपली
मूर्तिमंत भीतीने, त्याची नस शहारली.
पार करून चढ,गाठता येईल पायवाट
तुडवीत जाता पायवाट,समोर येईल पठार,
मागे टाकता पठार,पुन्हा भेटेल खिंडार
पार करता खिंडार,पुढे लागेल ओढा
ओढ्याच्या ओढीने विसावू वाटेवर
आपली भूक भागवू वाहत्या धारेवर
गाठता येईल मुक्काम आता, मग कशाला रस्ता सोडा.
पकडून रस्ता चालता पुढे,मनी त्याच्या आला विचार
गाठून मुक्काम सापडेल झोपडे
आणि कवाड त्याचे,असेल उघडे
उघड्या कवाडी आतुरतेने असेल तिला केले खडे
कडेवर तिच्या बसले असेल,आपलेच पोर नागडे.
असा कसा संपवू रस्ता कलली उन्हे सरला घाट,
आली जरी पायाखालची ओळखीची पायवाट
कसा जावू रिकाम्या हाती, कशी तुडवू वहिवाट
बायडीचे लागले असतील डोळे माझ्या वाटेकडे
आज पुन्हा ठेवू कसे तुम्हा उपाशी,सुटत नाही कोडे
रस्ता काही संपत नाही, नुसतेच झिजतात जोडे
रोजचे हाल पाहवत नाहीत,कुणाला सांगण्याची ताकद नाही,
आताशा माझा आवाज देखील माझ्याच पलीकडे जात नाही,
असे म्हणत त्याने,नजर लावली वरती,अन हाक दिली आकाशी
अन गुपचुपपणे तो जावून झोपला,थेट मागल्या दरीशी
डोळ्यात पाणी आले किंकर!
डोळ्यात पाणी आले किंकर!
रोजचे हाल पाहवत नाहीत,कुणाला
रोजचे हाल पाहवत नाहीत,कुणाला सांगण्याची ताकद नाही,
आताशा माझा आवाज देखील माझ्याच पलीकडे जात नाही,>> अप्रतिम..
झक्कास....... फोडतय........
चांगलीय.
चांगलीय.
(No subject)
विदारक सत्य. चांगलं उतरवलय.
विदारक सत्य. चांगलं उतरवलय.
छानच,कड्यातुन मुडपलेलि...
छानच,कड्यातुन मुडपलेलि... आवडले
सुन्न!
सुन्न!
वास्तव चित्रण.
वास्तव चित्रण.
डोळ्यात पाणी आलं...........
डोळ्यात पाणी आलं...........
जळजळीत सत्य! मन हेलावून गेले.
जळजळीत सत्य! मन हेलावून गेले.
फार सुंदर रे फारच सुंदर....
फार सुंदर रे फारच सुंदर....