दिसण्यावरी कुणाच्या

Submitted by रामकुमार on 18 February, 2011 - 16:20

भाळू नकोस पोरी दिसण्यावरी कुणाच्या
ते प्रश्नचिन्ह असते असण्यावरी कुणाच्या! .....१

माझ्याच वेदनेचा उपहास होत आहे
मी स्मीत फक्त करतो हसण्यावरी कुणाच्या! .....२

ही माळ उत्तरांची माझी तयार आहे
भित्रीच बंधने पण पुसण्यावरी कुणाच्या! .....३

या भारती धरेचा संकोच होत आहे
का बोलते कुणी ना घुसण्यावरी कुणाच्या? .....४

नाही कधीच इथला श्रमयज्ञ थांबलेला
उपकार हेच; ऐते बसण्यावरी कुणाच्या! .....५

सर्वत्र सांडलेला घळ-ओघ वासनांचा
कोणी उगा न खुलते रुसण्यावरी कुणाच्या! .....६

मधल्या तमोयुगाचे झाले शिथील अवघे
गावातले नियमही वसण्यावरी कुणाच्या! .....७

शब्देंच संत-विभुती जनमानसात उरती
जाऊ नकात कोणी नसण्यावरी कुणाच्या!.....८

रामकुमार

गुलमोहर: 

वृत्त बर्‍याच ठिकाणी चुकलं आहे.

उदा.
हा प्रेमवीर हठयोगी की पारधी म्हणावे

इथे हठ जादाचा आहे.नुसता योगी बरोबर.

जणु बगळा अडून बसला फसण्यावरी कुणाच्या!
इथे जणू जादाचा आहे.

पुढील लेखनासाठी शुभेच्छा.

(घळ ओघ म्हणजे ओघळ का? Sad Sad )

धन्यू साती,
अतिआत्मविश्वास नडला होता.
आता ठीक करून लिहिले आहे.
प्रतिसादाच्या प्रतिक्षेत!
रामकुमार.

मी आज तुमच्या ब-याचशा रचना पाहील्या. कारण त्या पहिल्याच पानावर (माझ्या) होत्या.

मला वाटतं तुम्ही रचना पोस्ट करण्याआधी त्यावर शेवटचं संस्करण करत नसणार. पोस्ट करायची घाई आढळली.