ऐका विकटगडा हि तुला भेटायला आलेल्या ट्रेकर्सची कहाणी.
आटपाट मुंबई नगरीत पवई नामक मुलुखात एक आयटी कंपनी कार्यरत होती. तिथे मॅनेजमेंटपासुन प्रोडक्शनपर्यंत सगळेच गुण्यागोविंदाने नांदत होते (फक्त एक Appraisalचा काळ सोडला तर :फिदी:). ५ दिवस काम आणि शनिवार/रविवार सुट्टी असं सारं काहि आलबेल होतं. एक दिवशी अचानक HR चा इमेल आला. नेहमी नेहमी त्याच त्याच रूटिनला कंटाळलेल्या कर्मचार्यांसाठी Art & Craft Tribe, The Outdoors Tribe, The Foodies Tribe, The Helping Hands Tribe अशी छान छान नाव असलेली 4 Tribes आयोजित केली आहेत. ज्यांना ज्याची आवड आहे त्यांनी त्यात भाग घ्यावा.
अस्मादिकांच्या आयडीतच "जिप्सी" असल्याने अस्मादिकाने The Outdoors Tribe मध्ये नाव नोंदवले :-). धुमधडाक्यात या ट्राईबमध्ये पहिल्या ट्रेकची घोषणा झाली. ट्रेकचे ठिकाण ठरले माथेरानच्या डोंगरात वसलेला "मध्यम श्रेणीचा" विकटगड उर्फ पेबचा किल्ला. ठरल्याप्रमाणे १२ फेब्रुवारीला जाणे ठरले. तु येतोस? मी जातोय. मी नाही जात यार बोर होणार. तु येणार असशील तर मी जातोय, असं तु तू मी मी करत तब्बल ७०-७५ लोकांनी नाव नोंदवली. अस्मादिक आणि मित्रांनी नेमकं त्याच दिवशी "सरसगड" चा बेत केल्याने "पेब"ला जाणे रद्द होणार असेच दिसत होते आणि त्यामुळेच तेथे नाव नोंदवले नाही. पण........ काहि कारणांमुळे सरसगडचा बेत रद्द झाला आणि आमची वाट पेबला जायला मोकळी झाली. तब्बल ७० लोकांनी नावे नोंदवल्याने अस्मादिक आणि त्याचे १३ मित्र या गृपबरोबर जायला तयार नव्हते. एव्हढ्या ७० लोकांबरोबर जाणे म्हणजे फुकटचा टाईमपास होणार असा विचार १४ जणांच्या मनात आला आणि त्यांनी वेगळे जाणे पसंत केले. ठरल्याप्रमाणे सकाळी ५:५९ची कर्जत लोकल (विक्रोळीहुन) पकडुन ७:३० पर्यंत नेरळ आणि पुढे नाश्ता करून मार्गक्रमण असा साधा सरळ बेत होता. आमचे इतर लोकही त्याच ट्रेनमध्ये होतो. नेरळपर्यंत एकत्र गेलो आणि आरामात नाश्ता करत एका मित्राची वाट बघत तेथेच थांबलो. ७० चा ग्रुप पुढे गेला. "अरे, आरामात जाऊ रे, आपण त्यांना आरामात गाठू, बहुतेकजणांचा पहिला ट्रेक आहे, म्हणजे ते आरामातच जातील" इति आमचे मित्र. पण बहुतेक यांनी ससा कासवाची गोष्ट वाचली/ऐकली नसावी, कारण त्यांना आरामात गाठू या विश्वासाने रमत गमत गेलेलो आम्ही त्यांच्या खूपच मागेच राहिलो :फिदी:. इतर ट्रेकप्रमाणे वाटा चुकण्याच्या आमच्या मालिकेमध्ये गेल्या दोन ट्रेकदरम्यान खंड पडला होता तो या ट्रेकमध्ये पूर्वपदावर आला. मध्येच कुठेतरी वाट चुकलो आणि धबधब्याच्या वाटेने वर चढलो. (खरंतर पेबच्या वाटा या चुकवणार्याच आहे, प्रथम जाणार्यांनी गाईड नेणे मस्टच.) पुढे एका पाऊलवाटेला जाऊन मिळाल्यावर थोड्याच अंतरावर आमचा ७० चा गृप धापा टाकत चढताना दिसला. एव्हाना ऊन बरेच वर आले होते. तहानेने जीव कासावीस होत होता. थोडे थोडे पाणी पुरवून पुरवून पीत होतो. पुढे अस्मादिक आणि १३ मित्र त्या ७० च्या गृपमध्ये केंव्हा सामिल झाले ते शेवटपर्यंत समजलेच नाही. वाटेत एक ६-७ फुटांचा रॉकपॅच आहे तो मात्र सगळ्यांनी एकमेकांना मदत करत, बॅगा उचलत, मस्करी करत कसाबसा पार केला. रॉकपॅचच्या आधीच बर्याच जणांनी नांगी टाकली होती आणि "कुठुन या ट्रेकला आलो, विकएण्डला एखादा चित्रपट पाहत बसलो असतो", असे म्हणत मार्गक्रमण करत होते. त्यांची समजूत घालुन त्यांना सांभाळत आणायच्या कसरतीत आम्हीही केंव्हा सामील झालो ते कळलेच नाही. (आयटीच्या भाषेत म्हणायचे झाले तर "Team Work"चा उत्तम नमूना :फिदी:). सकाळी ९ वाजता चालावयाला सुरुवात केलेले बहुतेकजण १२:३० वाजता कसेबसे एकदाचे पेबच्या गुहेत पोहचले. गुहेच्या आजुबाजुला कुठेहि पाणी नव्हते, त्यामुळे पुढे कुठेतरी पाणी असेल या आशेपायी बहुतेकजणांनी जेवणाच्या ऐवजी नाश्ता करणेच पसंत केले (हाच निर्णय चुकीचा ठरला याचा प्रत्यय पुढे बहुतेक जणांना आला. :फिदी).
गुहेचा परिसर फिरल्यावर परतीच्या प्रवासात, मात्र आलो त्या वाटेऐवजी नेरळ-माथेरानच्या रेल्वेट्रॅकमार्गे जायचे ठरले. ती वाटही जवळपास ३/३.५ तासाची होती. सगळ्यांना वाटलो आलो त्या वाटेपेक्षा हि वाट नक्कीच सोप्पी असणार, पण थोडेच अंतर गेल्यावर हा गैरसमज दूर झाला. पुढे वर जाण्यासाठी एक लोखंडी शिडी पार करून सगळे आले आणि वरती दत्तगुरुंच्या पादुंका असलेल्या जागेवर जाता जाताच सर्वांची बरीच दमछाक झाली. एव्हाना बहुतेक लोकांकडचे पाणी संपत आले होते आणि आम्ही निम्मे अंतरही पार केले नव्हते. पुढे जाताच एक घरवजा मंदिर दिसले, काहि पाण्याची सोय होईल या आशेने तिकडे गेलो. पण काहि फायदा झाला नाही. तिकडेच एका झाडाखाली पुढे जाणार्या वाटेकडे पाहत निवांत बसलो. दूर डोंगरात एक बारीकशी दिसणारी पायवाट पाहून एकजण उद्गारला, "हायला, हि माणसांनी जायची वाट आहे कि मांजरांनी". पण त्याच वाटेने जाण्याशिवाय पर्याय नव्हता हे लवकरच त्यालाही उमजले. जवळपास ५०-६० फुट खाली उतरण्यासाठी लोखंडी शिड्या लावल्या होत्या. त्या उतरून आम्ही पुढे निघालो. अर्थात यावेळी आम्ही १४ जणच पुढे होतो. बाकी सगळा गृप केंव्हाच वेगवेगळा विभागला गेला होता. पुढे जाणारी पाऊलवाट निमुळती होत होती. दूपारचे तीन वाजत आले होते, सूर्य आग ओकत होता, माथेरानसारख्या थंड हवेच्या ठिकाणी बिलकुल हवा नव्हती. आम्हा सगळ्यांची हालत पाणी नसल्याने खराब होत चालली होती. तहानेने जीव कासावीस होणे, घशाला कोरड पडणे, अंगाची लाही होणे, डोळे फिरणे, प्राण कंठाशी येणे अशा सगळ्या वाक्यांचा अर्थ तेंव्हा उमगत होता. एका बाजुला खाली पाहिलं तरी डोळे गरगरतील अशी खोल दरी, जेमतेम दोन पाऊल मावेल अशी पाऊलवाट, दुसर्या बाजुला कातळ अशा वाटेने आम्ही चाललो होतो. वर कडक ऊन आणि तहानेने कासावीस अशा अवस्थेत अचानक एका वळणावर अचानक अस्मादिकांचा आत्मविश्वास गेला, अस्मादिक अक्षरश: ब्लँक झाले. काहीच सुचत नव्हते. नक्की काय होतंय तेही कळत नव्हत. त्यावेळेस थोडीशी जरी चूक झाली असती तर आज हा वृतांत लिहायला अस्मादिक नसते :फिदी:. इतक्या वेळा ट्रेक केले, यापेक्षाही कठिण वाटवरून गेलो पण असा अनुभव पहिल्यांदाच आला. ते वळण पार केल्यानंतर एका खडकावर १० मिनिटे शांतपणे बसून राहिलो. कुणाशी काहिच बोललो नाही मात्र थोड्याच वेळात पुन्हा पहिल्यासारखाच फ्रेश झालो आणि चालायला सुरुवात केली. :-). काहि अंतर चालुन गेल्यानंतर नेरळ-माथेरान टॉय ट्रेनचा आवाज आला व गणपती मंदिर दिसायला लागले आणि सगळ्यांना स्वर्ग दोन बोट उरला :फिदी:, "त्या वळणावर" काहि चूक झाली असती तर मला मात्र त्या दोन बोटांच्या पुढे जायला वेळ नसता लागला. .
रेल्वेट्रॅकवर आल्यानंतर सगळ्यांच्या जीवात जीव आला. पुढे १४५नंबर बोर्डजवळ पाण्याची टाक आहे तिथे प्यायच्या पाण्याची सोय होईल असे तेथुन जाण्यार्या दोन गावकर्यांनी सांगितले तेंव्हा आम्ही १५६नंबरच्या बोर्डजवळ होतो. वाटलं असेल जवळपासच, पण अंदाजे दिड-दोन किमी अंतरावर शेवटी एकदाचे पाण्याचे टाके सापडले आणि सगळे अक्षरशः तुटुन पडलो. मनसोक्त थंडगार पाणी प्यायल्यावर तेथेच
ट्रॅकच्या आसपास बसुन डब्बे काढले आणि मस्तपैकी हादडलो. पोटात पाणी आणि अन्न गेल्यावर सगळेच एकदम फ्रेश झालो आणि दंगामस्ती सुरु झाली. ट्रॅकवर मस्तपैकी फोटोसेशन केल्यावर परतीच्या मार्गावर
निघालो. थोड्याच वेळात रेल्वे लाईन पुढे जिथे रस्त्याला मिळते तेथे आलो आणि उभ्या असलेल्या टॅक्सीत बसुन नेरळ स्टेशनकडे प्रयाण केले.
पेबच्या वाटेत फुललेला निसर्ग
अशा तर्हेने एक वेगळाच आणि कायमचा आठवणीत राहणारा एक ट्रेक "सफल" झाला. बहुतेकजण पहिल्यांदाच ट्रेकला आले होते त्यामुळे त्यांची हालत थोडी खराब होती. पण सरतेशेवटी सगळेजण सुखरूप परत आले. इंद्राने राजगड भ्रमंतीवेळी म्हटलेले लक्षात आले, " प्रत्येक ट्रेक कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे कायमचा लक्षात राहतो" आणि याच वाक्याचा पुरेपुर अनुभव या ट्रेकदरम्यान आला. कदाचित या ट्रेकची आमची वेळ/सीझन चुकला असावा आणि पाण्याचा पुरेसा साठा नसल्याने त्रासदायक झाला असावा. असा हा ट्रेक जसा आम्हास त्रासदायक ठरला तसा तो तुम्हास न होवो या सदिच्छेसहित, ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण!
या ट्रेकमधून अस्मादिक काय शिकले: सध्या उन्हाळ्याची चाहुल लागत असल्याने व्यवस्थित नियोजन करूनच ट्रेक करावा. :-). ट्रेकच्या वेळी कुठल्याही क्षणी आत्मविश्वास गेला तर काहि मिनिटे शांत बसून रहावे आणि थोड्या वेळाने परत मार्गक्रमण करावे.
आलेला अनुभव लक्षात घेता पावसाळा सुरु होईपर्यंत ट्रेक न करण्याचा निर्णय अस्मादिकांनी घेतला आहे.
पण . . . . .
("उतू नको मातू नको, घेतला (ट्रेकचा) वसा टाकू नको' याप्रमाणे वरील निर्णय किती दिवस टिकेल ते माहित नाही. :फिदी:).
/>
यावेळी अस्मादिकांबरोबर
यावेळी अस्मादिकांबरोबर त्यांचा कॅमेराही दमला आणि गुपचुप जाऊन सॅकमध्ये झोपला :फिदी:.
यातील काहि फोटो आमच्या मित्रांच्या कॅमेर्यातील आहेत.
आम्ही माथेरानच्या
आम्ही माथेरानच्या गाडितळापर्यंत कारने गेलेलो. तिथून ३ एक किमी चालत त्या ट्रेनट्रॅकवरून पेब केला.
जिप्सीने फायनली नाव सार्थ केले म्हणायचे!!!
जिप्स्या ... जबरी रे एकदम
जिप्स्या ... जबरी रे एकदम वर्णन तर सॉलिडच केलेस रे...
प्रचिसुद्धा मस्त...
आणी "उतू नको मातू नको, घेतला (ट्रेकचा) वसा टाकू नको " या म्हणीला जाग
थरारक अनुभव रे. अजून
थरारक अनुभव रे. अजून फेब्रुवारी नाही संपला तर पाण्याची हि परिस्थिती. मार्च. एप्रिल, मे कसे जाणार ?
बापरे.. पाण्याविना ट्रेक
बापरे.. पाण्याविना ट्रेक म्हंजे फारच त्रास झाला असेल..
थरारक अनुभव.. ते बिचारे कोण नवट्रेके.. तुझ्याकडे पाहूनच त्यांना थरार ये असेल
>>आलेला अनुभव लक्षात घेता
>>आलेला अनुभव लक्षात घेता पावसाळा सुरु होईपर्यंत ट्रेक न करण्याचा निर्णय अस्मादिकांनी घेतला आहे.
२ वर्शापासून उन्हाळ्यात आम्ही रात्रीच निघतो.. गडाच्या पायथ्याशी मुक्काम ठोकायचा आणी भल्या पहाटे चढायचे.. ह्यात एक रात्र जाते...झोप मिळत नाही...झोपायचे सामान घेऊन जावे लागते...पण ट्रेक होतो...आणी ते महत्वाचे... जर ४ चाकी आणली असेल तर सामान गाडीत ठेऊन जाता येते...
पेब आम्ही असाच केला होता. रात्री ११:३० ला पुण्यावरून निघालो.. नेरळ ला गाडीतच झोपलो.. डासांमुळे झोप झाली नाही... भल्या पहाटे रेल्वे स्टेशन वर आवरले... आणी पेब करून माथेरान ला दुपारच्या जेवणाला गेलो...(१:३०)... ईथे त्याचा वृतांत आहे
तू जे प्रचि ६ दिले आहेस्...त्यात आतमध्ये गेल्यावर पाणी होते
ह्यावरून मला एक कल्पना आली आहे... जर आपण एकमेकांचे फोन शेअर केले तर अडकलो/पाणी, गुहा कुठे आहे असे प्रश्न ट्रेक वरूनच विचारता येतील... प्रत्येक वेळेला ठिकाण आणी रस्ता नाही सांगता येणार्...पण प्रयत्न करता येईल...
जीप्स्या मस्त प्रवास
जीप्स्या मस्त प्रवास वर्णन...
तू पवईला आहेस कामाला?
कुठे L and T ?
जिप्सी, काय लिहिलयस?
जिप्सी, काय लिहिलयस? मस्तच.
<<<तहानेने जीव कासावीस होणे, घशाला कोरड पडणे, अंगाची लाही होणे, डोळे फिरणे, प्राण कंठाशी येणे अशा सगळ्या वाक्यांचा अर्थ तेंव्हा उमगत होता>>> लई भारी.
<<त्या वळणावर" काहि चूक झाली असती तर मला मात्र त्या दोन बोटांच्या पुढे जायला वेळ नसता लागला.>>> छानच वर्णन आणि फोटो सुद्धा. .
आनंदयात्री, रोहित, दिनेशदा,
आनंदयात्री, रोहित, दिनेशदा, वर्षूदी, आनंद, प्रसन्न, शोभा प्रतिसादाबद्दल धन्स
जिप्सीने फायनली नाव सार्थ केले म्हणायचे!!! >>>>
आणी "उतू नको मातू नको, घेतला (ट्रेकचा) वसा टाकू नको " या म्हणीला जाग>>>>>>नक्की रे
अजून फेब्रुवारी नाही संपला तर पाण्याची हि परिस्थिती. मार्च. एप्रिल, मे कसे जाणार >>>>>
ते बिचारे कोण नवट्रेके.. तुझ्याकडे पाहूनच त्यांना थरार ये असेल >>>>>वर्षूदी :-), कसला थरार, मीच "थरथरलेलो"
२ वर्शापासून उन्हाळ्यात आम्ही रात्रीच निघतो..>>>>>हे बेश्टच
तू जे प्रचि ६ दिले आहेस्...त्यात आतमध्ये गेल्यावर पाणी होते>>>>धन्स आनंद, पण त्यातुन आत गेलो असता, साधारण ५-७ फूट खोली दिसली आणि आत वटवाघूळ, पण पाणी काय दिसलं नाय. :(. जास्त आत जाताना गुदमरायला होत होत, म्हणुन परत आलो.
ह्यावरून मला एक कल्पना आली आहे... जर आपण एकमेकांचे फोन शेअर केले तर अडकलो/पाणी, गुहा कुठे आहे असे प्रश्न ट्रेक वरूनच विचारता येतील... प्रत्येक वेळेला ठिकाण आणी रस्ता नाही सांगता येणार्...पण प्रयत्न करता येईल...>>>>>>>>>हि आयडिया खरंच चांगली आहे.
तू पवईला आहेस कामाला?>>>> हो रे
मस्तच वृ जिप्स्या आम्हाला
मस्तच वृ जिप्स्या
आम्हाला ह्या वृ ची आणि शुभेच्छांची नितांत गरज आहे, आम्ही उद्या जातोय तिथेच
आयडीयेची कल्पना आवडली
आयडीयेची कल्पना आवडली
धन्स कविता, बित्तु
धन्स कविता, बित्तु
शुभेच्छांची नितांत गरज आहे, आम्ही उद्या जातोय तिथेच >>>>>>:-) तुम्हा सगळ्यांना खुप खुप शुभेच्छा!!!!
भरपूर पाणी, Glucon D, Electrol Powder, संत्री इ. घेऊन जा. कॅप मस्टच.
पाण्यासाठी, उंबर, नाचणीची
पाण्यासाठी, उंबर, नाचणीची आंबील वगैरे मी सुचवले होतेच.
मला वाटतं सगळ्यांनी पाण्याचा शोध घेण्यापेक्षा एकानेच जाऊन पाण्याचा शोध घ्यावा, आणि मिळाल्यास बाकिच्यांना सांगावे. योगेशचे ब्लँक होणे हे डिहायड्रेट होत असल्याचे लक्षण आहे. आणि ते फार धोकादायक असते.
योगेशचे ब्लँक होणे हे
योगेशचे ब्लँक होणे हे डिहायड्रेट होत असल्याचे लक्षण आहे. आणि ते फार धोकादायक असते.>>>>>ह्म्म्म्म
दा, हा अनुभव पहिल्यांदाच आला होता. पण फक्त ५ मिनिटेच. काहिच कळत नव्हते नक्की काय होतंय. पायही उचलवत नव्हता. मी माझ्या पुढे जाणार्या मित्राला सांगितले कि तु फक्त माझ्यासमोर उभा रहा. मला हात देवू नकोस किंवा सांभाळूहि नकोस, पण फक्त नजरेसमोर रहा. नंतर दहा मिनिटे स्वस्थ, कुणाशीही न बोलता नुसताच बसून राहिलो आणि पूर्वीसारखाच चालु लागलो. आधी केलेल्या ट्रेकच्या मानाने हि वाट काहिच नव्हती. तरीपण काहिक्षण एक अनामिक भिती मनात येऊन गेली.
तेच योगेश. सारासार भान जाऊन
तेच योगेश. सारासार भान जाऊन निर्णय घ्यायची क्षमता कमी होते अशावेळी. अशा काळात भसकन पाणी पिऊनही चालत नाही. पण पाणी पिणे आवश्यक असते.
डिहायड्रेशन झाल्यास
डिहायड्रेशन झाल्यास इलेक्ट्रॉल किंवा ग्लुकॉन डी खावी.म्हणुन ट्रेकला मी नेहमी बाळगतो.चॉकलेट किंवा जेली चॉकलेट चघळल तरी बर वाटत.जिप्स्या पुढच्या वेळी लक्षात ठेव.
डिहायड्रेशन झाल्यास
डिहायड्रेशन झाल्यास इलेक्ट्रॉल किंवा ग्लुकॉन डी खावी.>>>>>>>रोहित, अरे इलेक्ट्रॉल किंवा ग्लुकॉन डी होते. पावडर खाल्ली, पण माहित नाही का झाले असे.
जिप्सी मस्तच झाला रे ट्रेक.
जिप्सी मस्तच झाला रे ट्रेक. प्रचि खुप आवडल्या.
या ट्रेकमधून अस्मादिक काय
या ट्रेकमधून अस्मादिक काय शिकले: >>> जल्ला कितीही शिकलं तरी कमीच... जि.खो.मे.जा.का? :p मात्र दोन बोटं सांभाळून रे... कॅमेर्यासकट स्वर्गात गेलास तर तिकडचे प्रची सुद्धा प्रकाशित कर इकडे
शक्यतो उन्हाळ्यात ट्रेकला जाण्याचे टाळा आणि घेतला वसा चालवायचाच असेल तर जलदुर्ग आणि भुईकोट किल्ले करा... पु.ट्रे.शु.
वृत्तांत आणि प्रची सरस
योगेशचे ब्लँक होणे हे डिहायड्रेट होत असल्याचे लक्षण आहे. >>> अगदी अगदी... मी पण तोच अनुभव घेतला होता तोरणा-राजगडच्या ट्रेक मधे
कॅमेर्यासकट स्वर्गात गेलास
कॅमेर्यासकट स्वर्गात गेलास तर तिकडचे प्रची सुद्धा प्रकाशित कर इकडे >>
हो आणि गंधर्वांची गाणी पण
योगेशचे ब्लँक होणे हे
योगेशचे ब्लँक होणे हे डिहायड्रेट होत असल्याचे लक्षण आहे. >>> अगदी अगदी... एकदा रात्री लोकल मध्ये एवढी गर्दी होती कि माझी लॅपटोप बॅग माझ्या छातीवर अर्धातास दाबली गेली,हळू हळू माझ्या छातीतून कळ यायला लागली , श्वास घेता येत नव्हता , डोळ्यांसमोर अंधारी यायला लागली, शर्ट घामाने भिजला
पोट ढवळून निघालं, मी बाजूच्यांना सांगत होतो कि मला बरं वाटत नाहीये, पण कोणालाच काही पडली नव्हती, त्याही परिस्थितीत मी ठाण्याला उतरलो, पण हाय, पुलावर चढताना त्याहून गर्दीत सापडलो, शेवटी पुलावर वर तैनात असलेल्या एका पोलिसाने मला बाजूला नेऊन पाणी वगेरे दिले .
लोकल चा प्रवास म्हणजे कुठल्याही ट्रेकिंग पेक्षा वेगळा नाहीये
इंद्रा, माधव
इंद्रा, माधव
जिप्सी.. तुला ओरडणार
जिप्सी.. तुला ओरडणार होते,फारच काळजी वाटली म्हणून...... पण आता दिनेश दा आनी इतरांनी सुचवलेल्या प्रिकॉशन्स घे बरं आधी..ट्रेकिंग चा आधी.. काळजी घे..
धन्स वर्षूदी, यापुढे मी
धन्स वर्षूदी,
यापुढे मी नक्कीच काळजी घेईन
सहज सूचवावेसे वाटले. तुंम्ही
सहज सूचवावेसे वाटले. तुंम्ही मंडळी, एखाद्या नदीच्या काठाने जाऊन, तिच्या उगमापर्यंत जायचा का प्रयत्न करत नाहीत. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न नाही. बहुतेक मानवी वस्ती जवळपास असणार.
मी करतो ना असा प्रवास खूप वेळा......... गूगल अर्थ वर.
मी करतो ना असा प्रवास खूप
मी करतो ना असा प्रवास खूप वेळा......... गूगल अर्थ वर.>>>>>>दिनेशदा
योगी.. मस्तच लिहीले आहेस..
योगी.. मस्तच लिहीले आहेस.. फोटोज तर नेहमीप्रमाणे फर्स्टक्लास.. !!
म्हणून सांगतो आमच्याबरोबर ट्रेक कर कधीतरी..
कधीतरी आत्मविश्वासात होते रे गडबड.. मलाही माहुलीसारख्या सोप्या ट्रेकमध्ये असा अनुभव आला होता.. अशावेळी शांतपणे डोळे बंद करुन सावलीत पडून रहायचे.. पाण्याचा एखाद दुसरा घोट घ्यायचा नि मग मार्गाक्रमण करायची.. घाई करू नये..
बापरे, वाचूनच धास्तावले. काय
बापरे, वाचूनच धास्तावले. काय अनुभव ना?
म्हणून सांगतो आमच्याबरोबर
म्हणून सांगतो आमच्याबरोबर ट्रेक कर कधीतरी..>>>>हो रे इच्छा तर खूपच आहे. बघू कधी योग येतोय ते
काय अनुभव ना?>>>>>मामी, असा अनुभव पहिल्यांदाच आला.
>>>डिहायड्रेशन झाल्यास
>>>डिहायड्रेशन झाल्यास इलेक्ट्रॉल किंवा ग्लुकॉन डी खावी.>>>>>>>रोहित, अरे इलेक्ट्रॉल किंवा ग्लुकॉन डी होते. पावडर खाल्ली, पण माहित नाही का झाले असे
मी असे वाचले आहे की नुसती पावडर खाल्ली तर डिहायड्रेट होते.. कारण ती पावडर स्नायू मधील पाणी शोषून घेते... घशालाही कोरड पडते... त्याचे कारण तेच आहे...
Pages