Submitted by मनिषा लिमये on 8 February, 2011 - 01:26
काल माझ्या फोनवर एका वेगळ्याच नंबरवरुन कॉल आला. ९२ पासुन सुरु होणारा नंबर होता तो. मला मिसकॉल दिसल्यावर मी त्यावर फोन केला . तर पलिकडचा माणुस तुम्हाला लॉटरी लागली आहे आणि बरच काही बोलायला लागला. मी फोन ठेऊन दिला. नंतर नवर्याशी बोलताना तो ९२ म्हणजे पाकिस्तानी नंबर असावा अशी चर्चा झाली आणि आज नवर्याच्या फोनवरही अशाच ९२ ने सुरु होणार्या नम्बरवरुन कॉल आला. मग नेटवर शोधाशोध केली असता हे सापडले
http://cribb.in/airtel-customers-getting-fraud-calls-from-pakistan.htm
http://www.consumercomplaints.in/complaints/355670/page/4
http://www.google.co.in/search?hl=en&source=hp&q=airtel+nos+getting+call...
तेव्हा अशा नंबरचे कॉल्स घेऊ नका
मला आलेला नंबर९२३४७९०२७७०१
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
Please take care IF SOME ONE
Please take care
IF SOME ONE ASKS YOU TO DIAL #09 or #90,Please Do Not Dial This When Asked,
Please circulate URGENTLY.
New Trick of Jehadi Muslim Terrorists to Frame Innocent People!!
If you receive a phone call on your Mobile from any person saying that they are checking your mobile line, and you have to press #90 or #09 or any other number. End this call immediately without pressing any numbers. Team
there is a fraud company using a device that once you press #90 or #09 they can access your SIM card and make calls at your expense. Forward this message to as many friends as u can, to stop it. This information has been confirmed by both Motorola and Nokia.
There are over 3 million affected mobile phones. You can check this news at CNN web site also.
http://www.chennai.bsnl.co.in/News/MobileDosNDonts.htm
हो गं... मला आलेल्या एका पत्रातली ही माहितीही महत्वाची वाटली या संदर्भात म्हणून चिकटवतेय इथे.
०८८८८८८८८८८ आणि ४४ या
०८८८८८८८८८८ आणि ४४ या नम्बरवरूनही कॉल येतात ते कुठून येतात?
आम्हास सावध केल्याबद्दल
आम्हास सावध केल्याबद्दल त्रिवार धन्यवाद. मला अजून असे कॉल्स आले नाहीत....पण आता आले तर मी सज्ज असेन,..
हो घरी मो. वर आले होते पण मला
हो घरी मो. वर आले होते
पण मला तो नबर माहीत होता मित्रानी सांगीतले होते.
धन्यवाद !
धन्यवाद !
पाकिस्तानमधून येणारे सर्वच
पाकिस्तानमधून येणारे सर्वच फोन कॉल्स मॉनिटर केले जातात, असा आपला माझा समज होता.
आता परिस्थिती काय आहे कल्पना नाही, पण खूपदा परदेशातून आलेल्या कॉलचा
नंबरच डिस्प्ले वर येत नाही. कधी कधी ते आपले जेन्यूईन कॉल असतात.
सावध केल्याबद्दल धन्यवाद. घरी आईला सांगायला पाहिजे.
मनिषा, धन्स !
मनिषा,

धन्स !
पण खूपदा परदेशातून आलेल्या
पण खूपदा परदेशातून आलेल्या कॉलचा
नंबरच डिस्प्ले वर येत नाही. कधी कधी ते आपले जेन्यूईन कॉल असतात.>>>>>>>अनुमोदन.
मलाही असे काहि Unknown Number चे कॉल आलेले, पण मी ते नाही उचलले. नंतर कळले कि ते माझ्या फिनलंडच्या मित्राचे होते.
(इमेलने कळवले).
मलाहि असे Unknown Number चे
मलाहि असे Unknown Number चे कॉल येतात. उचल्यावर कोणीच बोलत नाहि. ते पण पाकिस्तानवरुन येणारे असतात का?
बापरे! खुप उपयुक्त माहिती
बापरे!
खुप उपयुक्त माहिती आहे....धन्स मनिषा आणि सर्वांनाच...
योगेश, मी केलेले उचलत जा रे.
योगेश, मी केलेले उचलत जा रे. मी फोन करणार आहे ते आधी फोन करुन कळवेनच !!
अशाच इमेल्स नी पण वैताग आणलाय. तूमच्या इमेलला बक्षीस लागलय. अमका तमका इस्टेट मागे ठेवून मेला वगैरे वगैरे. बर्याच इमेल्स स्पॅम मधे टाकल्यावर आता तो त्रास कमी झालाय.
मी टिव्ही बघत नाही पण अमूक एक नंबर भूताचा. अमूक नंबरावरुन कॉल आला कि स्फोट होतो, असे पण स्पेशल रिपोर्ट्स ओझरते बघितले.
फोनने जितकी सोय झालीय आणि जेवढे तंत्र सुधारले, तेवढेच त्याचा गैरवापर करणारे पण निर्माण झालेत.
मी फोन करणार आहे ते आधी फोन
मी फोन करणार आहे ते आधी फोन करुन कळवेनच !!>>>>>:)
दा, तुमचा फोन पहिल्यांदा आल्यावर नंबर डिस्प्ले झाला होता तेंव्हाच सेव्ह करून ठेवलाय.
जे नंबर डिस्प्ले होत नाहीत ते
जे नंबर डिस्प्ले होत नाहीत ते हमाखास आंतर्जालावरुन 'वॉईप' वापरुन केलेले कॉल्स असतात, ज्यात नो नंबर, अननोन, किंवा आलेच तर ३-४ आकडेच डिस्प्ले होतात.
हे कॉल्स कोणत्याही देशातुन अलेले असु शकतात, अगदी तुमच्या राहत्या घराशेजारुन सुध्दा.
चातक, खूपदा कॉल १, असाच
चातक, खूपदा कॉल १, असाच डिस्प्ले येतो. शिवाय आफ्रिकेत काहि ठिकाणी, नेटकॉल सुविधा असते. या देशांत ते पूर्ण कायदेशीर आहे. आणि तिथून कॉल केला तर खूपच स्वस्त पडतो. अशा ठिकाणाहून कॉल केल्यास. भारतातल्या फोनवर तो नंबर येत नाहि, किंवा दूसराच कुठलातरी नंबर येऊ शकतो.
थोडक्यात काय, फोनवर दिसत असलेल्या नंबरवरुन तसा नेमका अंदाज करता येत नाही.
अवांतरः अरे पाकिस्तानात पण
अवांतरः

अरे पाकिस्तानात पण "ड्युआयडी" सोकावलेत की कॉय....
भारतातल्या फोनवर तो नंबर येत
भारतातल्या फोनवर तो नंबर येत नाहि, किंवा दूसराच कुठलातरी नंबर येऊ शकतो.
थोडक्यात काय, फोनवर दिसत असलेल्या नंबरवरुन तसा नेमका अंदाज करता येत नाही.>>> बरोबर दिनेशदा, हे एक प्रकारचे "डायलर सॉफ्टवेअर" असते जे रेचार्ज करता येते बहुदा डॉलर किंवा युरो चलनात. उदा. एक्शन वॉइप, मोबाईल डायलर, ईझि टॉल्क. ईत्यादी.
उपयुक्त माहिती मनिषा.
उपयुक्त माहिती मनिषा.
यासंदर्भात (पाकिस्तानातून फोन येणे) माझा एक मजेदार अनुभव आहे. लिहीते वेळ झाला की.
ओ धन्स मनिषा
ओ धन्स मनिषा
मुळात ९१ सोडून इतर कुठल्याही
मुळात ९१ सोडून इतर कुठल्याही आकड्यांपासून सुरू होणारा अनोळखी नंबर दिसला तर सावधच रहायला हवे.
त्यामुळे त्या नंबरवरून फोन आला तरी रिंग वाजायची नाही, डिस्टर्ब व्हायचं नाही. असं २-३ महीने सुरू राहिलं आणि आता त्या नंबरवरून फोन येणं पण बंद झालंय.
मला मध्यंतरी असाच एक कॉल सतत यायचा. ७९ ने सुरूवात होणारा नंबर होता. अर्थात मी कधीच उचलला नाही. पण ५-६ वेळा आल्यावर शोधाशोध केली तर तो नेपाळचा कोड होता असं कळलं. फोन कं.ला कॉल करून नंबर ब्लॉक करता येतो का विचारलं. पण ती त्यांची पेड सर्व्हिस होती. मग माझ्या मुलानं एक भन्नाट आयडिया केली. तो फोन नंबर 'अनवॉन्टेड' म्हणून सेव्ह केला. फोनच्या साऊंड रेकॉर्डरवर शांतता रेकॉर्ड केली (!!) आणि ती कुठलाच आवाज नसलेली ऑडियो क्लिप त्या नंबरला रिंगटोन म्हणून असाईन केली.
तेव्हा लोकहो, हा सोप्पा उपाय करा.
अरे मला पण येताहेतत हे ९२
अरे मला पण येताहेतत हे ९२ कोडवाले कॉल्स. +९२३४७६६६२४९० यावरून. मी अर्थातच घेतले नाहीत, घेत नाही.
मागे चाळला होता हा बाफ. आता
मागे चाळला होता हा बाफ. आता बरीच शोधाशोध केली तेव्हां सापडला. भयंकर आहे हे सगळं.
<<मुळात ९१ सोडून इतर
<<मुळात ९१ सोडून इतर कुठल्याही आकड्यांपासून सुरू होणारा अनोळखी नंबर दिसला तर सावधच रहायला हवे.
मला मध्यंतरी असाच एक कॉल सतत यायचा. ७९ ने सुरूवात होणारा नंबर होता. अर्थात मी कधीच उचलला नाही. पण ५-६ वेळा आल्यावर शोधाशोध केली तर तो नेपाळचा कोड होता असं कळलं. फोन कं.ला कॉल करून नंबर ब्लॉक करता येतो का विचारलं. पण ती त्यांची पेड सर्व्हिस होती. मग माझ्या मुलानं एक भन्नाट आयडिया केली. तो फोन नंबर 'अनवॉन्टेड' म्हणून सेव्ह केला. फोनच्या साऊंड रेकॉर्डरवर शांतता रेकॉर्ड केली (!!) आणि ती कुठलाच आवाज नसलेली ऑडियो क्लिप त्या नंबरला रिंगटोन म्हणून असाईन केली. हाहा त्यामुळे त्या नंबरवरून फोन आला तरी रिंग वाजायची नाही, डिस्टर्ब व्हायचं नाही. असं २-३ महीने सुरू राहिलं आणि आता त्या नंबरवरून फोन येणं पण बंद झालंय.>>
मी याच गोष्टीच्या शोधात होतो. सगळ्या 'पर्सनल लोन' आणि 'इन्शुरन्स' वाल्या पोरींना हे करणे जरूरीचे आहे. कित्ती वेळ वाया जातो!
मनिषा धन्स!!
आयला शरद्जी तुमच्या मुलाची
आयला शरद्जी
तुमच्या मुलाची आयडिया खरंच भन्नाटच की!!:दिवा:
ही 'जुगाडू' आयडिया खूप खूप आवडली! त्याला थांकू कळवाल कां?
paravaach dhaakaTii
paravaach dhaakaTii karavaadun sangat hotii, ek miss call alaa mhaNun tine parat call kelaa, tar tichaa balance sagaLaa sampunach gelaa. 17 rupaye sampale ekaa jhaTakyaat. mag tilaa saangitale kii koNatyaahii miss call laa uttar dyaayache naahiich. he 91 che paN punhaa saangitale paahije.
माहितीचा नंबर नसेल तर मिस्ड
माहितीचा नंबर नसेल तर मिस्ड कॉल मी सहसा डायल करत नाही. समस पाठवून विचारते की तुम्ही कोण? माझ्याकडे दुर्दैवाने तुमचा नंबर स्टोअर केला नाहीये.. जे खरंच व्यावसायिक्/वैयक्तिक कामाचे असतात त्यांचं उत्तर येतंच. बाकीचे सोडून देते
तुमच्या मुलाची आयडिया खरंच
तुमच्या मुलाची आयडिया खरंच भन्नाटच की!!......+१
.
.
बीएसेनेल ला हे कॉल येत नाहीत,
बीएसेनेल ला हे कॉल येत नाहीत, असं आमचा फोन डीलर मित्र सांगत होता आजच. किती तथ्य आहे ते ठाऊक नाही, पण मला असे कॉल कधीच आलेले नाहीत हेदेखिल खरे आहे.
इब्लिस, शक्य आहे. आमच्या घरी
इब्लिस, शक्य आहे. आमच्या घरी सगळ्यांची बीएसेनेलची कनेक्शन्स आहेत. कधीच असे फोन आलेले नाहीत.
तेव्हा लोकहो, हा सोप्पा उपाय
तेव्हा लोकहो, हा सोप्पा उपाय करा. ... व्होडाफोनलाही असे कॉल आले नाहीत.कॉलरट्यूनसाठी नेहमी येणार्या कॉलला हा उपाय केला आहे. पाहू आता.
Pages