पाठीत वाकली आजी, बसते खिडकीच्यापाशी
आठवीत असते काही, ती बडबडते स्वतःशी ।
चेहर्यावर सुरकुतलेल्या, असतात गूढसे भाव,
बडबडीत आणिक येतो, हमखास कुणितरी देव ।
अस्तित्व तिचे कोणाला, फारसे जाणवत नाही
ती 'आहे' इतके पुरते, बाकीचे.... म्हणवत नाही ।
गेलेच जवळ जर कोणी, ती अतिशय प्रेमळ हसते,
पण बोलत नाही काही, नुसतीच एकटक बघते ।
----------------------------------------
परवाच्या सुट्टीमध्ये, भेटलो तिला वर्षाने,
तो थकलेला चेहराही, उजळला नव्या हर्षाने ।
भेटून घरी सगळ्यांना, मी बसलो तिच्या पुढ्यात,
गालांवरुनी फिरले अन, थरथरते प्रेमळ हात ।
मायेने मोडून बोटे, आजीने पुसले डोळे,
त्या ओलाव्याने तेव्हा, माझेही भरले डोळे।
----------------------------------------
संपली शेवटी सुट्टी... मन झाले पुन्हा उदास,
घर सोडुन पुन्हा निघालो, परतीची घेउन आस ।
वाकलो नमस्काराला, आजीच्या पुढती जेव्हा,
फिरले थरथरते हात, माझ्या पाठीवर तेव्हा ।
'सांभाळून जा' हे, आजी बोलली तिच्या हातांनी,
'ये लवकर परतून आता' बोलली तिच्या डोळ्यांनी ।
----------------------------------------
इकडे मी गुंतून असतो, कामात रोज ठरलेल्या,
परतीची स्वप्ने बघतो, वेळात रोज उरलेल्या ।
----------------------------------------
अजुनीही आजी बसते, एकटीच, खिडकीपाशी...
आठवीत असते काही, ती बडबडते स्वतःशी...
....... चैतन्य
वा,मस्त लिहिलित आजीवरती
वा,मस्त लिहिलित आजीवरती कविता.आवडली.
अस्तित्व तिचे कोणाला, फारसे
अस्तित्व तिचे कोणाला, फारसे जाणवत नाही
ती 'आहे' इतके पुरते, बाकीचे.... म्हणवत नाही ।
सही! फार सुरेख आहे कविता. डोळ्यांत पाणी उभं करणारी!
छानच आहे
छानच आहे![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सुंदर ही माझी
सुंदर![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
ही माझी आजी
http://www.maayboli.com/node/10868
छान जमलेय कविता. 'सांभाळून
छान जमलेय कविता.
'सांभाळून जा' हे, आजी बोलली तिच्या हातांनी,
'ये लवकर परतून आता' बोलली तिच्या डोळ्यांनी ।
हे जास्त आवडलं
सुंदर चैतन्या, भावस्पर्शी
सुंदर चैतन्या,
भावस्पर्शी शब्दचित्र!!
सुरेख..
सुरेख..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
खरच डोळ्यात पाणी आलं.. खुप
खरच डोळ्यात पाणी आलं.. खुप छान लिहिली आहेस.
छान चित्रण.
छान चित्रण.
प्रतिसादाबद्दल सर्वांचे
प्रतिसादाबद्दल सर्वांचे मनापासून आभार!
(No subject)
फार सुरेख!!! काहीच उरले
फार सुरेख!!!
काहीच उरले नाही.. फक्त आठवणी गोळा झाल्या सरसर..
(No subject)
चैतन्य, सुंदर रचली आहे
चैतन्य, सुंदर रचली आहे कविता..मनापासुन आवड्ली.
फारच छान. टचिंग.
फारच छान. टचिंग.
आवडली.
सुरेखच !
सुरेखच !
जबरदस्त!!!!!!!!!!!!!! प्रचंड
जबरदस्त!!!!!!!!!!!!!! प्रचंड आवडली....![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)