१ जानेवारी २००९: देवमाणूस

Posted
16 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
16 वर्ष ago

१ जानेवारी २००९ हा दिवस, ही नविन वर्षाची सुरुवात कायमची लक्षात राहील. पुढील अनेक वर्षे हा दिवस आम्हाला प्रेरणा देत राहील. अवती भोवती इतका कल्लोळ, अस्थिरता असताना, विशेषतः सरत्या २००८ च्या रक्तरंजीत पार्श्वभूमीवर, "तरिही सर्व काही सुरळीत होईल" हा दिलासा देणारे नविन वर्षाचे दोन दिवस मनाच्या वहीत कायमचे नोन्दून ठेवले आहेत, एखाद्या शिलालेखा सारखे.

शिलालेखच तो- काळ्या दगडांवर, मनांवर आपल्या ममत्वाचा, सेवेचा, त्यागाचा अन अविरत ध्यासाचा ठसा उमटवलेल्या डॉ. प्रकाश अन मन्दाकिनी आमटे यांचे हे दान!

निमित्त होते १ जानेवारीला आमटे जोडप्याचे २००८-मॅगसेसे पुरस्कारानिमित्त दुबई मधे गौरव, सत्कार, समारंभाचे.

या कार्यक्रमास खारीचा वाटा म्हणून इतर मदतीखेरीज कार्यक्रमाचे compering, किव्वा सूत्रसंचालनाची जबाबदारी माझ्यावर दिली गेली होती. आधी आठवडा, काम, अन घरी नऊ महिन्याची छकुली यातून वेळ मिळेल तसे डॉ. प्रकाश व मन्दाताई यान्च्या हेमलकसा येथील कार्याबद्दल माहिती मिळवत होतो. मायबोलिवरही इथे आधी त्यांच्या कार्याबद्दल एक दोघानी सुन्दर लिखाण केले आहे. पण लोक बिरादरी प्रकल्प ची साधारण १ तासाची cd पाहिल्यावर या विशाल कार्याची अन या डॉ. जोडप्याची थोडी कल्पना आली. किम्बहुना ते सर्व पाहिल्यावर, जवळून मुद्दामून त्यान्च्या कार्याबद्दल जाणून घेतल्यावर मन काही दिवस एका भलत्याच विश्वात अडकले होते.

प्रकाश दादा अन मन्दाताईंन्बद्दल काय बोलायचे, लिहायचे? काही शिल्लक आहे का..? त्यातूनही माझ्या सारख्या क्षुल्लक व्यक्तीने त्यावर काहिही भाष्य करणे म्हणजे आकाशगंगेला कंदील दाखवण्यागत आहे. त्यापेक्षा जवळून घेतलेला अनुभव लिहीणे पसंत करतो.

कार्यक्रमही भरगच्च होता- आमटे जोडप्या च्या सत्कार समारंभाखेरीज, अतुल कुलकर्णी, पद्मश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर, अन अजीत भुरे यान्चे एक तासाचा गप्पांचा कार्यक्रम, शेवटी तास दीड तास पद्मजाजींचे गाणे. साधारण चार, साडेचार तासाचा हा सर्व सोहळा.

सन्ध्याकाळी लोक येवून बसण्यापर्यंत एक वातावरण, उत्कंठा निर्माण व्हावी म्हणून पॉवरपॉईंट प्रेसेंटेशन बनवायचे होते. माझ्या बुध्धिला जमेल तसे हाती असलेल्या माहितीच्या आधारावार, काही छायाचित्र, mss website वापरून ते तयार केले. बाबा आमटे यान्च्या कार्यापसून ते प्रकाशजींच्या कार्यापर्यंत असे साधारण ८ मिनिटे असलेल्या त्या प्रेझेन्टेशन मधे पन्डीत हरिप्रसाद चौरसीयांची पहाडी धून (साथिला उस्ताद झाकीर हुसैन) background music म्हणून टाकली होती. अर्थात स्लाईड्स च्या कन्टेन्ट अन वेळेनुसार एडीट करून टाकली होती. मनाला पटले तरिही लोकांपेक्षाही खुद्द प्रकाशदादा अन मन्दाताई त्या स्लाईड्स पाहणार आहेत या कल्पनेने मनावर दडपण निश्चीत होते.

५.३० पासून १०.३० पर्यंत असा भरगच्च कार्यक्रम असताना मग त्यातील अनेक बारकावे एक सूत्रसंचालक म्हणून अचूकपणे माहित असणे, तयार ठेवणे भाग होते. यात क्रमाने हे सर्वच आलः दीप प्रज्वलन, गणेश वंदना, आमट्यांच्या कार्याची माहिती देणारी अर्धा तासाची फिल्म, प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते आमट्यांचा सत्कार, ईतर मान्यवरांचा सत्कार, चर्चासत्र, मध्यंतर, मग पदमजाजींच गाण अन शेवटी आभार प्रदर्शन. या खेरीज आलेल्या लोकांसमोर थोडक्यात कार्यक्रमाचे महत्व, आमट्यांचे कार्य, व्यक्तीमत्व, मॅगसेसे पुरस्काराबद्दल एक छोटे भाषण हेही भाग होते. अन गन्म्मत म्हणजे हा कार्यक्रम केवळ मराठीच नव्हे तर अखिल भारतीय व स्थानिक समाजास खुला असल्याने हे सार english मधून करायच होत. तेव्हडच काय ते मनाविरुध्ध, कारण मराठीतून करायची माझी इच्छा (कुवत) होती.

खर तर मी काही compering मधला फार अनुभवी, कुशल आहे असे नाही. त्यातही दुबई सारखे ठिकाण, लोक सारच नविन असल्याने प्रेक्षक, श्रोता काय अपेक्षा ठेवून आहे हेही माहीत नाही, अन या खेरीज, आमट्यांच्या एकन्दर व्यक्तीमत्व अन कार्याबद्दल एक चार दिवस वाचले, पाहिले त्यापेक्षा जास्ती मला माहीत नाही हे नम्रपणे नमूद करू इच्छीतो. आयोजकांन्नी आपलेपणाने दिलेली जबाबदारी प्रामाणीक पणे अन सर्व प्रयत्न करून पार पाडायची एव्हडा एकच विचार मनात होता. आजवर भारतात व अमेरीकेतील सूत्रसंचालनाचा जो थोडाफार अनुभव गाठीशी होता त्यावरच मि अवलंबून होतो. पुन्हा हा अनुभव लिहीणे म्हणजे कुठलिही प्रौढी वा बढाई करण्याचा हेतू नाही हेही नमूद करू इच्छीतो. जो आनंद आम्ही उपभोगला तो तुमच्यापर्यंत पोचवतो आहे इतकच!

तर सन्ध्याकाळी ५.३० वाजता सुरुवात झाली. powerpoint presentation चालू केले.. ते लूप मधे टाकले असल्याने ५.३० ते सहा या अर्ध्या तासात तीन चार वेळा होणार होते.. ६.०० वाजता मुख्ख्य कार्य्क्रम सुरू होणार होता. एकंदरीत येणारे लोक त्याकडे निव्वळ वेळ काढायचा भाग म्हणून न पाहता, एकाग्रपणे ते बघत होते हे पाहून खूप बरे वाटले. मग प्रमुख पाहुणे (Consul General of India) आले तेही स्लाईड्स बघण्यात मग्न झाले. अन शेवटी आमटे जोडपेही आले. आपल्या खुर्चीत अतीशय एकाग्रपणे ते सर्व presentation बघत होते, मधूनच आपसात त्याववर बोलत होते.. मि त्या दोघांन्ना पाया पडून नमस्कार केला, म्हटल, "प्रकाशजी, मिळेल त्या माहितीच्या आधारावर हे presentation बनवले आहे, काही कमी जास्त झाले असेल तर माफ करा".. त्यावर "अरे छान बनवले आहेस, कुठून मिळवलीस सर्व माहिती" अशी मला अनपेक्षित दाद मिळाली.

नेहेमीप्रमाणेच आयोजकांन्नी आयत्या वेळी कार्यक्रमाच्या क्रमात थोडेसे फेरफार केले अन "सूत्रसंचालनात सम्भाळून घे रे" म्हणत माझ्यावर अजून एक भलतेच ओझे टाकले.

देवाच्या कृपेने कार्यक्रम छान यथासांग पार पडला. सहाशेपेक्षा जास्त समुदाय जमला होता.. पहिल्याच रांगेत समोर प्रकाशजी, मन्दाताई, अतुल, पद्मजाजी, अजित भुरे, प्रमुख पाहुणे हे सर्व मान्यवर बसले होते. गम्मत म्हणजे सूत्रसंचालनाच्या या अनुभवात पहिल्यांदाच technically perfect असावे म्हणून मी script बनवून ठेवले होते पण एकंदरीत सूत्रसंचालनात बर्‍याच गोष्टी प्रसंगानुसार एकमेकाशी जोडत बोलावे लागत होते. लोकांच्या, मान्यवरांच्या उस्फूर्त प्रतिसादावरून सर्वाना आयोजन आवडले हे दिसत होते. इतक्या मोठ्या सभागृहास (उपस्थितांस) पाच एक तास काबूत नाही पण त्यांचा उत्साह, आवड, धीर शाबूत ठेवायचे हे काम यथोचित पार पडले म्हणून मी समाधानी होतो. मध्यंतरानंतर इंग्रजी बरोबर थोडे मायबोलीतही बोलून घेतले म्हणून अधिक समाधानी.

कार्यक्रम चालू असतानाच पद्म़जाताईन्नी सूत्रसंचालनाबद्दल छान दाद दिली.. पुन्हा नंतर आवर्जून म्हणाल्या " फार सुंदर बोलता तुम्ही, english खूपच छान बोलता, आवाज, शब्दफेक सर्वच झक्कास!"
अजित भुरे यांच्या सारख्या गुणी कलावंत, निर्माता, पत्रकार अन vocie over professional नेही मुद्दामून मनापासून दिलखुलास दाद दिली.. कार्यक्रमा नंतरही बरेच दुबईकर अभिनंदन करायला जमले होते पण खूप उशीर झाल्याने मला आता छकुलीची ओढ लागली होती अन मि शेवटचे पद्मजाजींचे वन्दे मातरम सम्पल्यावर लगेच घरी परत आलो.

दिलेली जबाबदारी पार पाडली, प्रकाश दादान्ना आवडल याच समाधान जास्ती होत.
"कसा झाल रे कार्यक्रम? घरी बायकोने विचारले.
"तो छानच झाला ग, पण खर सांगतो, आपण देव पाहिलेला नाही पण काल मि देवमाणूस पाहीला".. माझ्या या शब्दात मला वाटत तीने प्रकाशजी अन मन्दाताईबद्दल बरच काही वाचल.

माझ्या मात्र लक्षात राहिल ते प्रकाशदादांच व्यक्तीमत्व. किती साधा वेश, वागण्या बोलण्यात म्रुदुता, नम्रता, कसलाही आव नाही, सर्वांच्यात एक होवून राहण्याची सवय, मि वाकून पाया पडल्यावर त्यांच ते गांगरण.. त्यांच्या साध्या कुडत्यावर घातली गेलेली ती ऊन्ची शाल देखिल कदाचित स्वता बावरली असेल्..एखाद्या मन्दीरात मूर्तीवर चढवलेली शाल, किव्वा सन्याशाच्या तेजाला झाकू पाहणारी कफनी असते तसेच.. प्रकाश दादा अन मन्दाताईन्वर कुठलाही मुखवटा नाही, स्फटीकासारखे आतून बाहेर स्वच्छ व्यक्तीमत्व, स्वताच्या बाबान्ना (बाबा आमटे) दिलेला शब्द असा जन्मभर वनवासात (गडचिरोलितील हेमलकसा हा एक वनवासच आहे) आनंदाने पाळणारे हे जणू आधुनिक राम-सीता... अविरत मानवाचीच नव्हे तर प्राण्यांची सेवा करणारा हा विरक्त, सन्यस्त कर्मयोगी... हे सार पुन्हा एकदा एखाद्या चित्रफितीसारख समोरून सरकत होत.

पद्मजाजीन्नी "दिवे लागले रे दिवे लागले".. हे गीत या राम्-सीतेसाठी म्हटल तेव्हा सार्‍या सभागृहाला भरून आल होत.

आमटे कुटुंबीयांच हे चार पिढीच कार्य, कळकळ बघून आपण निशःब्द होतो. हिमशिखरा समोर उभे राहिल्यावर किव्वा जलसागराच्या किनार्‍याशी उभे राहिल्यावर होवू तसेच. पण आत मनात कुठेतरी खोलवर एक प्रचंड खळबळ सुरू रहाते.. एकीकडे आपल्या लेखी कस्पटाएव्हडीही किम्मत नसणारे मादिया गोंड आदिवासी, अन दुसरीकडे झगमगाटात बेभान हरवलेले आपण.. ही एव्हडी विषमता दूर करण्याच शिव धनुष्य उचलणे हा आधुनि़क रामच करू जाणे.. मला वाटत मॅगसेसे काय किव्वा पद्मश्री सारखे इतर पुरस्कार काय, बाबा, प्रकाशजी अन मन्दाताई यान्ना मिळाल्यावर हे पुरस्कार मोठे झाले.

असो.

या कार्यक्रमाला येता आल नाही तरी छकुली अन बायकोला एक वेगळीच भेट दुसरे दिवशी मिळाली. दुसरे दिवशी सन्ध्याकाळी आयोजकान्नी सर्व मान्यवरांबरोबर एक छोटेखानी भेट्-जेवण असा कार्यक्रम ठेवला होता. निदान त्यावेळी तरी बायको ला प्रकाशजीन्ना भेटता येईल म्हणून तीघेही गेलो होतो.

प्रकाशजी अन मन्दाताई यान्च्याशी कुटुंबाची ओळख करून दिली..

प्रकाशजी कार्यक्रमाला आले तितकेच साधे, सहज आजही आले, भेटले. आम्ही दोघान्नी वाकून नमस्कार करताच पुन्हा एकदा थोडे गांगरले.. छकुलीला कडेवर घेवून अगदी आपल्या नातवासारखे खेळवत बसले.. क्षणभर आम्ही अन इतर सर्व सारे विसरून तो सोहळा पाहण्यात मग्न होतो. ते क्षण तो आनंद वेगळाच.. एक निष्पाप, गोन्डस रूप, ज्याला आपण देवाचे स्वरूप मानतो ते एका थेट जिवंत देवमाणसाशी आपल्या भाषेत छान संवाद साधत होते. मला वाटत आपल्या भौतिक जगाचा लवलेश न लागलेल्या त्या दोघान्ना ती भाषा उमगत होती, आम्ही सर्व फक्त बघू शकत होतो.

तरिही आमची छकुली- "दीया" च्या नवव्या महीन्याच्या वाढ-दिवशी तिला प्रकाश दादांच मिळालेले प्रेम अन आशीर्वाद हे तीच्या अन आमच्याही उर्वरीत आयुष्यातील एक चिरतन आनंदाचा अमूल्य ठेवा आहे. मला वाटत तिचे भाग्य थोर! तो क्षण कॅमेरा मधे बन्दीस्त केला आहे.
diya_amte1.jpg

एव्हडे कमी म्हणून की काय, प्रकाशदादा म्हणले "काल छान बोललात अन संचालन केलत. आम्हा दोघाना ते presentation खूप आवडल, cd बनवून द्याल का? मला उपयोग होईल".
माझा तेव्हाही विश्वास बसला नाही अजूनही विश्वात बसत नाही.. ही माझ्या छोट्याश्या प्रयत्नान्ना मिळालेली पावती किव्वा या महान व्यक्तीमत्वाचे तितकेच मोठे मन... काहिही असेल, देवमाणसाची ती विनंती, आज्ञा, कशी टाळू?

लगेच काल सन्ध्याकाळी cd बनवून दिली.. एका छोट्याश्या पत्रासकट.. त्याचा मजकूर देत नाही पण आशय इतकाचः

"तुमाच्या भेटीचा प्रसंग पुढील अनेक वर्षे आम्हाला प्रेरणा देत राहील.. आजही सर्व काही सुरळीत चालतय याची जाणीव देत राहील".

"जे" भेटल्यावर आपण नम्र होतो, समाधान मिळते, आनंद होतो, प्रेरणा मिळते, एखाद्या कर्मयोग्याची विरक्ती भावना अनुभवास येते, मन सुरक्षित होत... "ते " देव वा देवमाणूस नाही तर आणखिन दुसरे काय?
------------------------------------------------------------------------------------

(त.टी: त्याच दिवशी एकत्र जेवण घेत अतुल कुलकर्णी या गुणी कलावंताची खास मायबोलीकरांकरता एक थेट, "रोख ठोख" मुलाखत घ्यायला मिळाली. अतुलची चित्रपट वाटचाल, त्याचे त्याबद्दल विचार अन सद्य राजकीय, सामाजिक परिस्थिती वरील त्यांचे मनमोकळे विचार (हे खास त्यांच्या आग्रहाखातर), अन मायबोलीकरांकरता नववर्षाचा संदेश असे या एक तास चाललेल्या मुलाखतीचे स्वरूप आहे. मा.बो. वरील संचालकांची यथायोग्य परवानगी अन सन्धी मिळताच ती मुलाखत "संवाद" सदरात देता येईल असा विचार आहे.)

विषय: 
प्रकार: 

योग,
मस्त वृत्तांत. Happy

***
अजनबी सा, दोस्त सा, दुश्मन सा ये बहरूपिया
मेरे अंदर कोई बतलाए खुदा-रा कौन है?

खरंच! अपूर्व अनुभव मिळाला तुम्हाला. आणि आम्हालाही त्याची जिवंत अनुभूती दिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद!
----------------------
I'm sure..I'm not the Best, still I'm happy.. I'm not like the Rest..!! Happy

मी खूप काही मिस केले.
या कार्यक्रमाची आम्ही तिकिटे खूप आधीच काढली होती. ऐन वेळी बहरीनला जाणे ठरले त्यामुळे कार्यक्रमाला येता आले नाही.
तुमच्या वर्णनामुळे थोडेतरी समाधान मिळाले. तुम्ही, विशेषत: तुमची छकुली खूप भाग्यवान.
बघू या देवमाणसाचे दर्शन आम्हाला कधी घडेल.
त्यांच्याशी झालेल्या संवाद वाचण्यास मिळेल याची वाट पहात आहे.
-अनिता

झकास, अफलातून सन्धी, मस्तच रे योग्या! Happy सार्थकी लागलि तुझी नववर्षाची सुरवात! Happy
लेका, हेवा वाटतो तुझा! Happy
ते प्रेझेन्टेशन इथे देता आल तर बघ की! Happy
मुलीचा श्री प्रकाश आमटेंबरोबरचा फोटो अप्रतिम! Happy
सूत्रसन्चालनाच्या गमती लिही अजुन! तेवढेच नवशिक्यान्ना मार्गदर्शन!
...;
आपला, लिम्बुटिम्बु

छान लिहिलय, खूप आवडलं. Happy
छोटुलीचा श्री. प्रकाश आमट्यांबरोबरचा फोटो पण खूप छान आलाय!

छान वृत्तांत. खूप आवडलं.

सुन्दर लिहीलय. छकुली- "दीया" नशीबवान आहे.

सागर आढाव

व्रुत्तात वाचुनच भारावायला होतय तर प्रत्यक्श अनुभुति घेतल्यावर कस वाटत असेल ना.... खुप भाग्यवान आहात

खुप छान श्ब्दबद्ध केला आहे अनुभव ... अभिनंदन योग.

छान भेट घडवलीत प्रकाश आमटेंची.. Happy
अतुल कुलकर्णींचाही संवाद ऐकायची इच्छा आहे.

--
जरा विसावू, या वळणावर.. Happy

वा ! कार्यक्रम जोरात झालेला दिसतो. अतुल कुलकर्णीच्या मुलाखतीची वाट बघतो.

    ***
    The geek shall inherit the earth (BILL 24:7)

    योग , खूप छान शब्दबद्ध केलायस तुझा अनुभव Happy
    अन तुझी छकुली खूप गोड आहे Happy
    ~~~~~~~~~~~~~~~~
    फिटे अंधाराचे जाळे .....
    ~~~~~~~~~~~~~~~~

    योग, खरच भाग्यवान आहात, अशा लोकांना प्रत्यक्ष भेटता आल.

    छकुली पण गोड आहे. Happy

    क्या बात है!
    दीया गोड आहे एकदम

    लकी आहात. सुंदर अनुभव......
    छकुली खूप गोड आहे. Happy

    छानच. छकुलीचा फोटो पण मस्त.

    छकुली गोड तर आहेच! पण तेव्हढीच नशीबवान आहे... मी फक्त इमॅजिन केलं, की असं मी लहान असताना एखाद्या अशा देवमाणसाशी ओळख झाली असती , मुक संवादातून का होईना... काटा आला एक मिनिट.. ! तीला मोठे पणी, समजायला लागेल तेव्हा जरूर सांगा ती किती नशिबवान आहे !

    बाकी तुम्हीही कमी नशिबवान नाही दिसत.. प्रकाश आमटे सारख्या माणसाला तुम्हाला , भेटता येते, त्यांच्यावर निवेदन करता येते, गप्पा होतात, दाद मिळते ... अजुन काय सोनेरी क्षण हवा असतो आपल्याला!?!?

    फार भारी वाटलं वाचताना..
    अतुल कुलकर्णीची मुलाखत येऊच दे.. !

    प्रकाश आमटे सारख्या माणसाला तुम्हाला , भेटता येते, त्यांच्यावर निवेदन करता येते, गप्पा होतात, दाद मिळते ... अजुन काय सोनेरी क्षण हवा असतो आपल्याला!?!? >>

    भाग्यश्रीला अनुमोदन. ती फाईल इथे ही अपलोड कर.

    लोक्स,
    धन्यवाद !
    वैयक्तीक अनुभवाखेरीज, आयोजकान्ना चांगलाच प्रतिसाद मिळाला असे म्हणता येईल. कार्यक्रमाच्या दिवशी पाच लाख रुपये मदत निधी गोळा झाला....अजूनही लोक देत आहेत, विचारत आहेत, मदतीचा ओघ सुरू आहे...
    आमट्यांच्या कार्याला कितीही दिल तरी थोड आहे, इतक त्याच स्वरूप अन व्याप्ती आहे. मला वाटत ज्यांन्नी आपल सर्वस्व शब्दशः आदिवासींसाठी दिल त्यांन्ना मदत म्हणून जे काही थोड फार देता येईल तेच आपल मोठ भाग्य.

    ज्या दुबईकराना काही कारणास्तव येता आले नाही, त्यांच्यासाठी कार्यक्रमाची cd उपलब्ध होईलच पण fm 95.6 or 96.5 radio channel वर आमट्यांची मुलाखत लवकरच broadcast करणार आहेत.

    योग छान लिहिल आहेस. अगदी ह्याच भावना त्या दोघांना न्यूयॉर्कच्या अधिवेशनाच्यावेळी जेंव्हा भेटले तेंव्हा अनुभवल्या. तुला त्या शब्दात व्यक्त करता आल्या.

    एकंदर तुझं संचालन मस्तच झालेल दिसतं आहे. त्याबद्दल अभिनंदन.

    योग,
    खुपच छान लिहिल आहेस!
    अशी देवमाणसं भेटायला भाग्य लागते!!!

    योग, धन्य रे!
    वृत्तांत तर छानच आणि त्यातूनच तुझ्या सूत्रसंचलनाची झलक दिसतेय... कार्यक्रम बघायला मिळाला असता तर काय बहार होती!
    तुझ्या "दिया" ने केलेली तेजाची आरती... बहोत खूब! नाव सार्थ केलय लेकीने!
    फारच गोड आहे हे काम, बाबा. दृष्ट काढून टाकायला सांग बायकोला Happy
    तुझं किती खरं... आजही सारं सुरळीत चाललय आणि चालेल ह्याची खात्री होण्यासाठी अशी देवमाणसं असावी लागतात आजूबाजूला.....
    परत एकदा... सुंदर लेख आणि धन्यवाद!

    तेथे कर माझे जुळती... योग - वृतांत येथे टाकल्याबद्दल धन्यवाद.

    >फारच गोड आहे हे काम, बाबा. दृष्ट काढून टाकायला सांग बायकोला
    छकुली तीच्या बाबांवर गेली आहे अस लोक म्हणतात.. मग कोणाची दृष्ट काढायला सांगू..?;)

    मस्तच. छान वाटले वाचून.

    बाब आता मोठा झालाय ना मग तुम्ही छकुलीचीच दृष्ट काढा Wink

    मी आज वाचला हा लेख !!
    मस्त लिहिलय.. आमटे दांपत्य, अतुल कुलकर्णी तसेत पद्मजा फेणाणी ह्यांच्या बरोबर झालेली बातचित पण लिही... Happy

    स हि आहे, थ्न्क्स आमच्याशि हे सग्ल शेअर केल्या बद्द्ल....

    छान वृत्तांत
    ----------------------
    यूँ खड़ा मौकतल में कातिल कह रहा है बार-बार,
    क्या तमन्ना-ए-शहादत भी किसि के दिल में है.
    दिल में तूफ़ानों कि टोली और नसों में इन्कलाब,
    होश दुश्मन के उड़ा देंगे हमें रोको ना आज.
    दूर रह पाये जो हमसे दम कहाँ मंज़िल में है,

    योग, नशीबवान आहेस मित्रा आणि तुझ्यापेक्षाही नशीबवान तुझी गोड छकुली, अरे एवढ्या लहान वयात परिसस्पर्ष झालाय.

    सस्नेह...

    विशाल.
    ____________________________________________

    http://maagevalunpahataana.blogspot.com

    Pages