६-७ मध्यम आकाराचे टोमॅटो (लहान असतील तर १०-१२ टोमॅटो) चांगले लालबुंद, कडक बघून घ्यावेत.
दिड ते दोन वाट्या मटार
१ मोठा कांदा (ऐच्छिक)
दोन टेबलस्पून पांढरे तीळ
दोन टेबलस्पून शेंगदाणे
चार टेबलस्पून किसलेलं सुकं खोबरं
चार टेबलस्पून बेसन
एक वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर
दोन टी-स्पून कच्छी दाबेली मसाला
मीठ, साखर, लाल तिखट, हळद चवीप्रमाणे
१. मटार वाफवून घ्या.
२. टोमॅटो मोठे असतील तर दोन तुकडे करून घ्या. लहान असतील तर फक्त देठाकडचा भाग कापून घ्या.
३. टोमॅटोमधला गर काढून बाजूल ठेवा. टोमेटो चांगले पोकळ झाले पाहिजेत.
४. सुकं खोबरं, दाणे, तीळ खरपूस भाजून घ्या. मिक्सरमधून बारीक पूड करून घ्या.
५. बेसन कोरडंच खमंग लालसर भाजून घ्या.
६. कांदा बारीक चिरून घेऊन टोमॅटोच्या गरात मिसळा. त्यात सुकं खोबरं-दाणे-तीळाचं कूट आणि बेसन मिसळून चांगलं कालवून घ्या.
७. वाफवलेले मटार त्यात घाला. दाबेली मसाला आणि चवीप्रमाणे मीठ, साखर, हळद आणि लाल तिखट घाला.
८. चिरलेल्या कोथिंबीरीपैकी पाऊण वाटी कोथिंबीर त्या सारणात मिसळा.
९. सारण चांगलं व्यवस्थित कालवून घेऊन टोमॅटोत दाबून भरा.
१०. भरलेले टोमॅटो मायक्रोवेव सेफ बोलमधे व्यवस्थित लावा. उरलेलं सारण टोमॅटोभोवती घालून टाका.
११. या भाजीला रस हवा असल्यास एक कपभर पाणी बोलमध्ये सगळीकडून घाला.
१२. आता हा बोल न झाकता मायक्रोवेवमधे हाय पॉवरवर आधी तीन मिनिटे ठेवा. मग बोल बाहेर काढून टोमॅटो किंचित हलवून पुन्हा हाय पॉवरवर दोन मिनिटासाठी ठेवा.
१३. भाजी बाहेर काढून उरलेली कोथिंबीर पेरून खायला घ्या.
१. ही भाजी बिनफोडणीची आहे. तीळ-दाणे-सुक्याखोबर्यातून पुरेसं तेल मिळतं.
२. वर दिलेल्या सारणाऐवजी उकडलेले बटाटे, वाफवलेले पिवळ्या मक्याचे दाणे, बारीक चिरलेली भोपळी मिरची, ओलं खोबरं इत्यादी घटक वापरून आपापल्या आवडीप्रमाणे सारण करता येईल.
३. वरून किसलेलं चीज घातलं तर या भाजीला अधिक बहार येते.
४. ही भाजी गॅसवर करायची असल्यास थोड्या तेलात फोडणी करून त्यात भरलेले टोमॅटो घालून वर झाकण ठेवून चांगली दणदणीत वाफ आणायची.
५. टोमॅटो पटकन शिजतात. जास्त वेळ मायक्रोवेव केले किंवा गॅसवर ठेवले तर भाजीचा गिचका होईल.
६. दाबेली मसाल्याऐवजी गरम मसाला, धने-जिर्याची पावडर वापरता येईल. पण दाबेली मसाल्याचा स्वाद एकदम निराळाच आणि छान लागतो.
अहाहा... पटकन एक तोंडात
अहाहा... पटकन एक तोंडात टाकावे वाटतय
मस्त!
मस्त!
खुप छान रेसिपि आहे.
खुप छान रेसिपि आहे.
मस्त रेसिपी अशाच पद्धतीने
मस्त रेसिपी
अशाच पद्धतीने केलेली स्टफ कॅप्सिकम पण छान लागते.
मंजु मस्तच ग. येत्या
मंजु मस्तच ग. येत्या गुरुवारी करते.
सही! मला टोमॅटो आवडत नसले,
सही! मला टोमॅटो आवडत नसले, तरी करणारच आहे. मंजूडे, टेम्प्टिंग फोटो.
मंजूडे एकदम सुगरण दिसतेयंस
मंजूडे एकदम सुगरण दिसतेयंस की...
खायला बोलव लवकर..
मस्त फोटो आणि रेसिपी. तोषा,
मस्त फोटो आणि रेसिपी.
तोषा, भोपळी मिरची मऊ होईल ना?
अश्वे, मिरची जास्त शिजवली तर
अश्वे, मिरची जास्त शिजवली तर लगदा होईल.
मस्त दिस्ताहेत.
मस्त दिस्ताहेत.
तोषा, भोपळी मिरची मऊ होईल
तोषा, भोपळी मिरची मऊ होईल ना?>>
केश्वे, भरली भोपळी मिरची करताना पाणी अजिबात घालायचं नाही. वाफेवरच ती होऊ द्यायची. गॅसवर करताना झाकण अजिबात ठेवायचं नाही. परतून परतून चांगली खरपूस भाजी करायची. आमच्याकडे भरल्या भोपळी मिरचीचं तोंडीलावणंच होतं. सगळे नुसतीच खातात, मग पोळीबरोबर दुसरं काहीतरी करावं लागतं.
यम्मी!!! मी पण करते असेच
यम्मी!!! मी पण करते असेच टॉमेटो आणि कॅप्सिकम पण
मी मटार नाही घात्ले कधी पण भात किंवा ब्रेड घातलाय थोडा घट्ट्पणा येण्यासाठी. आणि शेवटी वरतुन किसलेले चीज घालते... गरम असतानाच... मस्त मेल्ट झालेले चीज... यम्म्म्म्म्म्म्म्म.....
मस्त तोंपासु दिसतेय रेसिपी
मस्त तोंपासु दिसतेय रेसिपी एकदम
मस्त दिसत आहेत भरले टमॅटो.
मस्त दिसत आहेत भरले टमॅटो. पार्टीत हिट जातील नक्की
मंजु, मेहषी नामक अरेबिक
मंजु, मेहषी नामक अरेबिक रेसिपीमध्ये भोपळी मिरची आधी थोडी वाफवून घेतात,त्यात किंचित शिजलेला मसालेभात भरुन पुन्हा ती मिरची वाफेवर शिजवतात. भात व्यवस्थित शिजला की मेहषी तयार!!!!!
हो मंजू, मी कोरडी भरली भोमिच
हो मंजू, मी कोरडी भरली भोमिच पाहिलीय आणि खाल्ली आहे. आतलं सारण सुद्धा कोरडंच असतं.
अरेबिक पदार्थांमध्ये मसालेभात पण?
मंजुडे, जबरी आहे रेसिपी. फोटो
मंजुडे, जबरी आहे रेसिपी. फोटो पण मस्त आलाय. आता छोटू टोमॅटो आणले की करुन बघेन.
छान पाकृ!
छान पाकृ!
अहाहा!!! काय रेसिपी आहे! मी
अहाहा!!! काय रेसिपी आहे! मी उद्याच करेन! दाबेली मसाल्याला पर्यायी मसाले सांगितले, हे बरं झालं...
यम्म यम्म....मस्त!
यम्म यम्म....मस्त!
हा फोटो भाजी तयार झाल्यानंतर
हा फोटो भाजी तयार झाल्यानंतर काढलाय की आधी ?
रेसिपी भारीये. मला मृ ने एक बाकर भाजीची दिली होती. ती साधारण अशीच आहे (का गं मृ ?)
भारिये रेसिपी, मी पनीरच सारण
भारिये रेसिपी, मी पनीरच सारण भरलेले टोमेटॉ खाल्लेत...हेही मस्त लागत असणार
छान आहे हा प्रकार.
छान आहे हा प्रकार. कोल्हापूरच्या गोकूळ हॉटेलमधे बघितल्यासारखा वाटतोय. त्याला शोला का असेच काहितरी नाव ठेवलेय. टेबलावर नेताना, एक टोमॅटो कोरून त्यात छोटी मेणबत्ती लावून नेत असत.
मंजू छान रेसिपी. फोटो पण खूप
मंजू छान रेसिपी. फोटो पण खूप छान!! भरली भोपळी मिरची केली आहे टोमॅटो पण करून बघीन. मी उकडलेला बटाटा, कच्चा कांदा, किसलेलं पनीर, असल्यास डाळिंबाचे दाणे, धणे जिरे पूड आणी चाट मसाला, मीठ,तिखट असं सारण वापरते.वरून चीज घालायचं. वेगवेगळ्या रंगाच्या भो.मि. वापरल्या तर दिसायला पण छान दिसतं. दाबेली मसाल्याचा वापर करायची कल्पना पण चांगली आहे.
मस्त पाकृ. दाबेली मसाल्याला
मस्त पाकृ. दाबेली मसाल्याला पर्याय लिहिल्यामुळे लवकरच करून बघता येईल.
सिंडे, बाकरभाजी जरा वेगळी. एकतर ती कोरडी असते. हिरवे टोमॅटो वापरतात. टोमॅटोचा गर वापरत नाहीत. बाकरात भरपूर कोथिंबीर, खसखस- ओलं/सुकं खोबरं-तीळ-शेंगदाण्याचा कूट, तिखट, मीठ, आमचूरपावडर, आलं लसणाचं वाटण आणि लवंग-दालचिनी पूड असं एकत्रं करून टामाट्यांच्या वाट्यांमधे भरून अंमळ जास्त तेलात खरपूस शिजवून काढतात.
मग यो जा कृ टा की
मग यो जा कृ टा की
छान रेसिपी मंजू. नक्की करून
छान रेसिपी मंजू. नक्की करून बघणार. फोटो एकदम तोंपासु.
छान आहे. करुन बघणार. इथे
छान आहे. करुन बघणार.
इथे मांसाच्या फळावर माझी एक कृती आहे, ग्रिल करुन-
http://www.maayboli.com/node/18686
मांसाहारी लोक खिमा भरु शकतात.
मंजुडी आजच केली होती
मंजुडी आजच केली होती संध्याकाळी ही भाजी. अप्रतीम !! थोडासा चेंज केला. तो म्हणजे ग्रेव्ही साठी उरलेल्या स्टफिंग मधेच थोडसं पाणी घालून पॅन मधे गरम केलं. उकळल्यावर थोडं दही घोटून घातलं आणी उतरवलं. बेसनामुळे छान मिळून आली ग्रेव्ही. पार्टीसाठी हिट्ट आयटम.ईतक्या छान रेसिपी बद्दल धन्यवाद !!
मी पण साधारण अशीच करते पण
मी पण साधारण अशीच करते पण ओव्हनमधे करते. मस्त लागते एकदम. फोटो अत्यंत टेंप्टीग आहे
Pages