पहिला भाग इथे आहे. http://www.maayboli.com/node/22893
ऑकलंडला माझे वास्तव्य, नॉर्थ शोअर भागात असे. तिथे ताकापूना नावाचे एक छोटे उपनगर आहे.
बस बदलायला वगैरे आम्हाला तिथे जावे लागे. तिथे एक समुद्रकिनारा आहे, आणि त्या किना-या
समोर एक पसरट डोंगर आहे. सगळीकडून हा डोंगर दिसत राहतो.
त्या ताकापूना गावात छान फूलबागा आहेत. मी त्यातल्या प्रत्येक फूलाचे फोटो काढले, हे वेगळे
सांगायला नकोच. माझ्या सकाळच्या फेरफटक्यातही, काही अनोखी फूले दिसत असत. पण ते
सगळे फोटो इथे द्यायचा मोह आवरुन काही मोजकेच देतोय.
लेकीच्या आग्रहावरुन आम्ही दोघे, मिशन बे भागात फिरायला गेलो होतो. तिथे जाण्यासाठी त्यांच्या
बंदर भागातून बस घ्यावी लागते. तिथे एक जूनी इमारत दिमाखात उभी आहे.
या वाटेवर मधे एक मस्यालय आहे. अगदी समुद्रकिनार्याच्या पातळीवर ते बांधलेत, आत वेगवेगळे
मासे ठेवले आहेत. शार्क, खेकडे, स्क्विड, ऑक्टोपस अशी सगळीच मंडळी आहेत. सिंगापूरमधल्या अशा
मस्यालयापेक्षा ते बरेच लहान असले तरी ते छान आहे. अनेक समुद्री जीव (यात कोरल्स पण आले)
इथे जिवंत रुपात बघायला मिळतात.
एका विभागात दक्षिण ध्रुवावरचे पेन्ग्विन्स ठेवले आहेत. ध्रूवीय प्रदेशातील मोहिमांवर वापरलेली साधने
इथे मूळ रुपात ठेवली आहेत.
हे पक्षी ज्या तपमानात वावरतात, त्या तपमानाचे पाणी बाहेर नमून्यादाखल ठेवले आहे. त्यात आपण
पाच दहा सेकंदही हात ठेवू शकत नाही. या तपमानात आपल्याला वावरणे अशक्य. पण त्या भागाची
सैर करण्यासाठी खास वाहन आहे. हे पक्षी वर्षातून एकदा सर्व पिसे त्यागून नवी धारण करतात, हे
मला तिथेच कळले. या काळात ते पाण्यात शिरु शकत नाहीत. पण ते प्रत्यक्ष वावरताना बघणे, यात
खरी मजा होती. त्या भागात फ्लॅश वापरता येत असल्याने, फ़ोटो मात्र काढता आले नाहीत.
तिथून पुढे आम्ही मिशन बे या त्यांच्या चौपाटीवर गेलो. पण कडक उन्हामूळे तिथे फ़ार रेंगाळता आले
नाही.
मग पुढची सहल, बटरफ्लाय क्रीक ला होती. हा भाग विमानतळाजवळच आहे. अनेक जातींची
फूलपाखरे तिथे मुक्तपणे वावरत असतात. त्यांना सोसेल असे तपमान आणि आवडतील अशी फूले
तिथे जोपासली आहेत. तिथेही मला मनासारखे फोटो काढता आले नाहीत, कारण ती पाखरे प्रचंड
भिरभिरी होती. एका जागी बसतच नव्हती. हाहई भाग तसा छोटाच आहे. तिथेच दोन प्रचंड मोठ्या
मगरी, सरडे ठेवलेले आहेत. पाळीव प्राण्यांपैकी बकर्या, ससे, पक्षी भरपूर आहेत. त्यांना हाताळायची
मुभा आहे.
तर हे ताकापुना बीच, बटरफ्लाय क्रीक वगैरे भागातले फोटो.
३.
४.
५. हे आहे फिजिओआ नावाचे फळ. इथे दिसतेय ते कच्चे आहे. मला अजूनही हे फळ चाखायला मिळाले नाही. पण याचे चॉकलेट, पेय वगैरे प्यायलोय.
६.
७.
९.
१०.
११.
१२.
१३.
१४.
१५.
१६.
१७.
१८.
१९.
२०.
२१.
२२.
२३.
२४.
२५.
२६.
२७.
२८.
२९.
३०.
३१.
बोटॅनिकल गार्डनमधे मी एक पूर्ण दिवस काढला. तिथले फोटोही असेच हप्त्या हप्त्याने देतो.
मस्त फोटो.. २९ आणि ३० म्हणजे
मस्त फोटो.. २९ आणि ३० म्हणजे निसर्गाची कमाल आहे. एक ओबडघोबड दगड दिसणारा मासा तर दुसरा सतरंगी रंगाच चमचमणारा बांधेसुद मासा..
३१ पाहुन मादागास्कर मुवीतला लबाड पेंग्विन आठवला. हा इतर दोघे कुठे गेलेत या चिंतेत दिसतोय.
फुलपाखरे आणि कमळही आवडले.
प्रचि ३ मधले फुल कुठले? हल्ली नमुमध्ये एका प्रसिद्ध राजकारणी कुटुंबाची खुप जाहिरात चाललीय. त्यात सेम हीच पाच पाकळ्याची फुले वापरलीत. मी जाहिरात पाहताना ही फुले कुठली हाच विचार करत होते, मला तरी आधी कुठे दिसली नव्हती.
प्रचि २९ मध्ये कसला दगडी मासा
प्रचि २९ मध्ये कसला दगडी मासा आहे...
साधना, तिथे फूलांच्या
साधना, तिथे फूलांच्या नावाच्या फंदात पडलोच नाही. एकदम विरक्तीच आली. नावं ठेवणारा माणूस कोण ? काय अर्थ आहे त्या नावाला ? वगैरे विचार मनात यायला लागले !!!
त्या पिल्लाला, अगदी जवळ घ्यावेसे वाटत होते. तिथे त्यांचे पाण्याखालचे वावरणे पण बघता येते. तिथे दिवसाला ३ टन बर्फ तयार करतात.
हीम, हा फसवाफसवीचा प्रकार. जवळ भक्ष्य येताच, क्षणार्धात जबडा उघडून पकडतो.
६ मधला मासा, पण त्या झाडाचे विष अंगाला फासून घेतोय.
सगळेच प्रचि झकास. खास
सगळेच प्रचि झकास. खास उल्लेखनीय (म्हणजे मला आवडले म्हणून) निमो आणि त्याचा डॅडी, बॅगेवरच्या फुलांकडे आकर्षित झालेलं फुलपाखरू, पेंग्विनबाळ आणि तो सप्तरंगी मासा. बीच तर केवळ अप्रतिम. किती शांत दिसतोय.
मस्त फोटोज.
मस्त फोटोज.
मस्त फोटोज.
मस्त फोटोज.
मस्त फोटोज.
मस्त फोटोज.
मस्त फोटो.
मस्त फोटो.
फुलपाखरांचे फोटो जास्त आवडले
फुलपाखरांचे फोटो जास्त आवडले
तो अवाढव्य मासा कोणता हो?
जबरी एकदम !!
जबरी एकदम !!
जबरदस्त!!! मस्त फोटो
जबरदस्त!!!
मस्त फोटो
धन्य.
धन्य.
मस्त ! मला पण तो बांधेसूद
मस्त ! मला पण तो बांधेसूद मासा फार आवडला. नीमोतर आवडतोच.
दगडी मासा तर एकदम डेंजरडॉन आहे ( हा लेकाचा लाडका शब्द. त्याला दाखवते आता हे फोटो. खुष होईल....आणि नंतर प्रश्न विचारून भंडावून सोडेल !)
सगळी फुलपाखरं गोडु दिसतायेत. प्रचि नं १२ पेंटींग केल्यासारखा दिसतोय.
<<तिथे फूलांच्या नावाच्या फंदात पडलोच नाही. एकदम विरक्तीच आली. नावं ठेवणारा माणूस कोण ? काय अर्थ आहे त्या नावाला ? वगैरे विचार मनात यायला लागले !!!>> खूप प्रामाणिक लिहिलंय हे दिनेशदा.
सलाम दिनेशदा! प्र चि ३० मधला
सलाम दिनेशदा!
प्र चि ३० मधला मासा किति सुंदर आहे ना?
दिनेशदा, मस्तच आलेत फोटो.
दिनेशदा, मस्तच आलेत फोटो. किती विविध प्रकारचे मासे, फुलपाखरे, फुले.
हे जग किती विविधतेने भरलेले आहे. आणि तुमच्यामुळे आम्हालाहि ते पाहायला मिळतेय. धन्यवाद.
रुणूझूण, तूमच्याकडे तर
रुणूझूण, तूमच्याकडे तर किनार्यावर पण रंगीबेरंगी मासे दिसतात की.
थंड. त्या निळ्या माश्यावर फ्लॅश पडलाय. दिसतोय त्यापेक्षा तो निळा होता.
शोभा, मला वाटतं, यापेक्षा आपल्याकडे फूलपाखरांची विविधता आहे. मुंबईचा नॅशनल पार्क, आंबोली, गोवा इथे मी बघितली आहेत. पण ती अशी एका जागी बंदीस्त नाही.
तसं तिथे त्यांना आवडतील अशी फूले, नासकी फळे असतात. पण ती तशी बंदीवानच आहेत. त्यांचे काय ते मोजक्या दिवसांचे आयूष्य ते तिथेच जगतात. त्यांच्या अळ्या आणि कोष पण तिथेच जोपासले जातात.
दिनेशदा, दंडवत !
दिनेशदा, दंडवत !
दिनेशदा, लई भारी फोटो !
दिनेशदा,
लई भारी फोटो !
हो दिनेशदा, आमच्याकडे दिसतात
हो दिनेशदा, आमच्याकडे दिसतात बरेच रंगीबेरंगी मासे किनार्यावरच. फोटो काढायचे खूपदा प्रयत्न केले, पण ते इतके चुळचुळ करतात की फोटोत घेताच येत नाहीत.
तुम्ही मस्तच काढलेत फोटो माशांचे.
खूपच सुंदर फोटो तो २९ नं. चा
खूपच सुंदर फोटो
तो २९ नं. चा ओबडधोबड मासा तर Gr8