नदीकांठ- २

Submitted by भाऊ नमसकर on 27 January, 2011 - 10:05

कोंकणात रात्री नदीकांठी जाऊन निवांत बसणे याचा आनंदच आगळा. ते वातावरण चित्रित करण्याचा प्रयत्न करावा असं खूप वाटायचं पण धीर होत नव्हता. मायबोलीवरच्या प्रतिसादाने तो धीर आला पण ते वातावरण चित्रात कितपत आलं याबद्दल मींच साशंक आहे. तांत्रिक बाजूची बोंब तर आहेच ! [ हेंही "पेंट"मधेच माऊस वापरून केले आहे ]
night2.JPG

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

वा!

जब्बर्दस्त !! तुमच्या पेंट मधील चित्रांचा फॅन झालोय.. मला वाटते रात्र चित्रित करणे नक्केच अवघड असावे..

भाऊ जबरी! सुंदर डिटेल्स.

वल्डकपला रोज एक व्यंगचित्र हवं. Happy

भाऊ, मला वडीलांबरोबर लहानपणी समुद्रावर काढलेल्या रात्री आठवल्या (तिथे नदी नव्हती) पण असेच गूढ तरी ओढ लावणारे वातावरण असायचे.
आणि खरं सांगतो, मला तर विस्वास ठेवणं कठीण जातय, कि हे डिजीटल आर्ट आहे !

अप्रतिम्...आणि तेही पेंट मध्ये फक्त उन्दराच्या मदतीने ...विश्वासच बसत नही आहे...मी या आधीचे तुमचे सगळे चित्र बघितले...पण...हे तर अव्वल्...ग्रेट क्रिएटीवीटी...

सर्वांस मनःपूर्वक धन्यवाद.
<<असेच गूढ तरी ओढ लावणारे वातावरण असायचे.>> दिनेशदा, रात्री नदीकांठी बसल्यावर "अद्वैताची झुळूक मनाच्या साशंकतेवर हंळूवार फुंकर मारून जाते" अशी एक ओळ माझ्या मुंबईकर मित्रांवर इंप्रेशन मारायला मी तरूणपणी फेकत असे ! Wink
<<वल्डकपला रोज एक व्यंगचित्र हवं>> केदारजी, माझ्या "एक्सपर्ट" कॉमेंटसचा विनोद कमी पडतोय कीं काय ? Wink

भाऊ, किती सुंदर!!!
घर, झाडं, नदी, गवत, घरापाठी असणारी लाकडं, गडगा आणि या सार्‍यांना दृश्यमान करणारा चंद्राचा पांढराशूभ्र प्रकाश..
झक्कास डिटेलींग भाऊ.. !

भाऊ.. काय मस्त इफेक्ट इलोहा.. खराच.. नि काय ते बारकावे एकदम बरोबर पकडलात.. मस्तच.. माझा ह्या तुमच्या चित्रांपैंकी सर्वात आवडता चित्र..

भाऊ, क्या बात है? सलाम
दिवसाची चित्रे सगळेच काढतात पण आपल्या कलाम नी तर एकदम कमालच केली.

महान !

Pages