ते निर्घुणपणे खून करतात आमच्या प्रजासत्ताकचा ....

Submitted by प्रद्युम्न१६ on 26 January, 2011 - 08:40

संपादीतः प्रकाशचित्र काढून टाकले आहे.

ते निर्घुणपणे खून करतात आमच्या प्रजासत्ताकचा ,

आणि आम्ही उघड्या डोळ्यात गोठलेल्या रक्ताने वाचतो

आमच्याच देशात तिरंगा फडकावण्यावर बंदी घातल्याच्या बातम्या ...

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

आमच्याच देशात तिरंगा फडकावण्यावर बंदी घातल्याच्या बातम्या ...

आम्ही त्या वर चवी ने वाद करतो.

कारण..... आम्ही उघड्या डोळ्यात गोठलेल्या रक्ताने त्या वाचतो.........

धिक्कार आहे अशा लोकशाही वर.......जिथे नको त्या गोष्टी वर वाद करण्याची परवाणगी मिळते......पण झेंडा फडकवण्याची नाही..........

फोटो तुम्ही स्वतः काढलेला आहे का ? नसल्यास मूळ फोटोग्राफरची परवानगी घेतलीय का ? असे ग्राफिक फोटो सहसा वर्तमानपत्रात सुद्धा छापत नाहीत.

आणि आपणच नाकर्ते नागरीक जबाबदार आहोत, कशातही भाग घेत नाही. शाळेत असल्यापासुन शिकवण असते, कसल्याही "भानगडीत " पडू नका, अभ्यास करा....

मला हे वाटतं...
विलेक्शन
विलेक्शनच्या टायमाला
हुबा जोडुन हात
मत मागाया आलोय
म्हणाला, तुमिच मायबाप

काय अडचनी, कामं
करुन टाकु उद्या
येवडं बगा
अवंदा निवडुन द्या

मी म्हटलं, वाटलच
येनार तुमी दारात
हसुन, दात दाखवुन
मताचा जोगवा मागनार

गेली वरसा पाच
वाटलं विसरुन गेलात
जसा अवसेचा चांद
ना कुणा दिसत

जाले पान्याचे वांदे
स्वास कोंदला ह्या हवेत
समदच नासलय
तुमास्नी नाहीच दिसत?

मी सांगायला पायजेल का,
तुमी काय जमा केलत,
जन्ता जीतली थितच
आस्वासना वीरली हवेत

आता काय नवी
खुळी सपना दावनार बोला
पुन्यांदा वरसा पाच सरली
मंजी उगवनार का? बोला,

तो म्हनला, बोलतो की,
उगा रागवता भाऊ
खाल्ल्या घराचे वासे
मोजनारे, नाइ आमी, भाऊ

लेकाले एडमिशन
मिल्वुन देल्ली कि नाय भाऊ
चार पैसे खरचले,
पन, काम जाला ना, भाऊ?

आमी आमच्या व्यापात
नाही जमला भेटाया
माफ करुन सोडा, आन
मदत करा, निवडुन याया

मले नाय जमलं
माजी गलती जाली
आमाला वाट दावाया
तुमाला पन टाइम नाय खाली

मोहोल्यातल्या कंच्या समश्या
घेउन आल्ता का कंदी?
घरापल्याड काय सुचेना
बुडाला संसारामंदी

येका नान्याच्या
दोन बाजु, शेजारी
तुमी मायबाप जनता
आमी तुमचेच फुडारी!

फोटो काढून टाकण्यात आला आहे .
मृत्युमुखी पडलेले सैनिक हा प्रक्षोभक फोटो आहे का?
हे एक वास्तव आहे . काश्मीर खोऱ्यात अनेक सैनिक असाच पद्धतीने मारले जातात पाकिस्तान्याकडून आणि आम्ही त्यांच्या धमक्यांना घाबरून झेंडा फडकावण्यावर बंदी घालावी?

आम्हाला हा फोटो भयंकर वाटतो कारण आम्हाला कमी कपड्यातली नटी पाहायला आवडते मग अशे सैनिक किती का मरेना आणि कशे का मरेना आम्हाला काय त्याचे ?

धिक्कार असो आमच्या गेंडा कातडीचा !!

काल ते काश्मीरपर्यंत होते आज ते जर्मन बेकारीपर्यंत आलेत .
उद्या जेंव्हा “त्यांची” गोळी आमच्या छातीतून आरपार जाईल तेंव्हा आम्हाला जाणीव होईल पण तोपर्यंत बराच उशीर झालेला असेल .

...हे अनामवीरा तुझ्यापुढे मी नतमस्तक आहे .

सगळे आपपल्या घरी सुखी आहे............आणि फक्त दुसर्‍यांवर बोट दाखवन्यात समाधान मानतात......

इथे सगळे असेच आहे.....हो.......स्वतः तर जाणिव होणार नाही..........दुसर्‍यांना झाली ती चालत नाही.............

प्रद्युम्न, तुम्ही माझ्या शब्दाचा चुकीचा अर्थ काढला आहे. मी ह्या फोटोशी आणि तुमच्या भावनेशी पूर्ण सहमत आहे. मेधाने जे लिहिले, त्या दृष्टीनेच मी म्हणाले होते ते... प्रक्षोभक म्हणजे भावना भडकवणारा... एका सैनिकाचा रक्ताच्या थारोळ्यातला फोटो हा खचितच प्रक्षोभक असतो. पण अर्थात इथे तो शब्द चांगल्या अर्थाने वापरलाय... माझी आधीची कॉमेंट वाचलीत ना? असे फोटो बघून त्रास होतो, म्हणून ओपन फोरममधे शक्यतो ते छापत नाहीत...

सानी, जे फोटो खरे असुन आपण छापत नाही, ते किंवा तसेच खरे / खोटे फोटो दाखवुन अतिरेक्यांना प्रशिक्शण देतात. नक्श्लवादीपण असेच घडतात. आपण डोळे बंद केले तरी / पाहिले नाही तरी या गोष्टी घडतात / घडणार मग उघड पणे ते पाहुन त्यातुन मार्ग काढायचा विचार आपण का करत नाही? अगदी साधी क्रुती माणुस म्हणुन वागुया / माणुस म्हणुन वागवुया. सर्वानी हे केले तर ही माणसे वाईट मार्गाला जाताना विचार करतिल. त्यातुनही जे जातात ते बर्याच प्रमाणात पोटासाठी, पण त्याना वाईट मार्गाला नेणारे पॅशांसाठी. जाणार्यांपेक्शा नेणारे वाईट. कारण त्याची भुक कधीच सम्पत नाही. - फोटो मी पाहीला नाही. पण पहायला चालेल. कींबहुना पाहुन योग्य प्रकारे जगण्याची ईच्छा तिव्र होईल. विषयांतर झाले असे वाटत असेल तर माफी.