शिजवलेल्या मिरच्या

Submitted by लालू on 25 January, 2011 - 20:10
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१५-२० जाड, लांब मोठ्या हिरव्या मिरच्या
४ मोठे चमचे धणे
२ मोठे चमचे मेथ्या
१ छोटा चमचा बडीशेप
२ छोटे चमचे मोहरीची डाळ किंवा मोहरी
१ छोटा चमचा जीरे
अर्धी वाटी गूळ
अर्धी वाटी लिंबाचा रस
हळद
हिंग
मीठ
तेल

क्रमवार पाककृती: 

मिरच्यांचे देठ काढून मध्ये चीर द्यावी. मग आडव्या कापून चार तुकडे करावे.

धणे, मेथी, मोहरी, जीरे, बडीशेप थोड्या तेलावर भाजून घेऊन भरड पूड करावी.
यात गूळ आणि मीठे घालून हा मसाला मिरच्यांच्या तुकड्यांत भरावा.
पातेले किंवा कढईत दोन मोठे चमचे तेल घालून तापल्यावर त्यात थोडी मोहरी, हिंग, हळद घालावी.
त्यात मिरच्या टाकून परताव्यात.
मग लिंबाचा रस घालून झाकण ठेवून वाफ आणावी.
अधूनमधून परतावे.

मिरच्या अगदी मऊ शिजवू नयेत. रंग बदलता कामा नये.

थंड झाल्यावर काचेच्या कन्टेनरमध्ये घालून फ्रीजमध्ये ठेवाव्यात. १-२ आठवडे तरी टिकतील.

मुळात या मिरच्या तिखट नसतात, पुन्हा शिजवणे आणि गूळ इ मुळे हा पदार्थ झणझणीत नसतो.

mirachi1.jpg

वाढणी/प्रमाण: 
लोणच्याएवढे
अधिक टिपा: 

यासाठी एशियन दुकानांत मिळणार्‍या लांब हिरव्या मिरच्या घ्याव्यात. अश्या दिसतात.
http://www.bigstockphoto.com/image-10490210/stock-photo-fresh-long-green...

मसाला मिरच्यांत भरला नाही तरी चालेल. फोडणीवर टाकून मिरच्यांबरोबर नीट मिसळून घेतला तरी चालते.

यातच सुके खोबरे, तीळ भाजून घातल्यास भाजीसारखा प्रकार होईल. pablano, habanero मिरच्यांचा असा प्रकार चांगला लागतो.

माहितीचा स्रोत: 
व्हई.
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जबरीच. वरचा आडोचाच प्रश्न. कशाबरोबर खाता येईल? झणझणीत हवं असेल तर मसाल्यात तिखट घालूनही चालेल न?

हो.चपाती, भाकरी कश्याबरोबरही खा. दही भातावरही छान लागते.
सायो, तिखट हवे असेल तर मिरच्या तिखट वापर. चवीपुरता गूळ/साखर घाल.

लालू, तू रेसिपी टाकलीस आणि तेव्हाच मी उद्यासाठी काहीतरी चमचमीत करु म्हणुन शोधत होते. त्यामुळे लगेचच ह्या मिरच्या करुन पाहिल्या. पण माझा मसाल्याचा अंदाज थोडा चुकला. अगदी मिरच्यांमध्ये ठासुन भरण्याएवढा नाही झाला. कमी पडला जरासा. आता उद्या लंचला फ्लॉवरची रस्सा भाजी आणि तोंडीलावणं म्हणून ह्या मिरच्या.. खाऊन पाहिल्या नाही पण झणझणीत असणार कारण jalapeno वापरल्या आहेत.

mirchi.jpg

मस्त! हालपिनो पॉपरसाठी हालपिनो आणल्यात. आता हा प्रकारही करेन जोडेला तीळ आणि खोबरे घालुन.

सावनी, खार सुटला होता ना? नाहीतर लिंबाचा रसपण वाढव.
जरा अजून शिजवल्यातरी चालेल म्हणजे करकरीत रहाणार नाहीत. स्किन फारच जाड असेल तर.

छान रेसीपी. फोटो मस्त आलाय.
आम्ही पण ह्या मिरच्या करतो. आई करताना यात कोरट्याची पावडर टाकते.
मी इथे करताना थोडी ,फ्लॅक्स सीड पावडर मिळते ती टाकते. आणि थोडा चिंचेचा पल्प.
फोटो आहे. पण इतका काही चांगला नाही आहे. नंतर डीलीट करेन.
Optimized-DSC07497.JPG

आज केली होती ही भाजी. छान झाली होती.
मी ज्या मिरच्या आणल्या त्या झणझणीत होत्या, चिरतांना हाताची जळजळ होत होती म्हणून मग गुळाचे प्रमाण वाढवले आणि लिंबाऐवजी चिंचेचा कोळ घातला.