दिसतात कुट्ट काळे म्हणतात 'लाल' आहे!

Submitted by ह.बा. on 24 January, 2011 - 06:17

ही काय टोळक्यांनी केली कमाल आहे
दिसतात कुट्ट काळे म्हणतात 'लाल' आहे

नाही म्हणीत तो तर बापास बाप त्याच्या
दाऊन सुर्य म्हणतो "माझी मशाल आहे!"

भात्याशिवाय पेटी, नादान अन तबलची
बेताल नाचण्याची मोठी धमाल आहे

बुध्दीस कोंभ आले, पुर्णत्वही मिळाले
भोंदू समिक्षकाचा, लंपट दलाल आहे!

आभाळ मोजणारी तुज वीत लाभली का?
शब्दाकडून त्याला इतका सवाल आहे!

-हबा

गुलमोहर: 

हबा..... 77.gif

मस्त ! शेवटचा शेर एकदम जबरी.
आनंदयात्रीसारखाच प्रश्न मलाही...ते तबलजी हवंय का ?