Submitted by saavni on 21 July, 2008 - 02:20
तुम्हाला खास वाटलेल्या / न आवडलेल्या जाहिरातींबद्दल ईथे लिहा.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
तुम्हाला खास वाटलेल्या / न आवडलेल्या जाहिरातींबद्दल ईथे लिहा.
http://www.youtube.com/watch?
http://www.youtube.com/watch?v=M_2EEuW4r-w&feature=related
अजुन एक अॅड...............कॉड्बरी.......ची
http://www.youtube.com/watch?
http://www.youtube.com/watch?v=XQcVllWpwGs&feature=related
अमेझिंग अॅड..........स्केटिंग करनारे लहान मुले..........सगळ्यां आवड् तील
जे. के. सुपर सीमेण्ट- बिकिनी-
जे. के. सुपर सीमेण्ट- बिकिनी- सरतेशेवटी जाहिरात कशी करू नये याचं उदाहरण घेतल्याशिवाय पूर्ण होणार नाही. निळ्याशार समुद्रातून जणू काही ‘आता पुरे झालं पोहणं’ असं म्हणत एक ललना कॅमेऱ्याच्या दिशेने येते. तिच्या लाल चुटुक बिकिनीवरचं पाणी अजून निथळत असतं. ती कॅमेऱ्याजवळ येऊन एक स्मितहास्य देते आणि अचानक उत्पादनाचा लोगो पडद्यावर येतो जे. के. सुपर सीमेण्ट! आणि घोषवाक्य- विश्वास है, इसमे कुछ खास है!! आता कुणावर आणि किती खासा विश्वास ठेवायचा ते तुम्हीच ठरवा! सीमेण्टचा, विश्वासाचा आणि लाडिक हसणाऱ्या बिकिनीवाल्या ललनेचा एकमेकांशी काय आणि कसा संबंध आहे, हे मला गेल्या वर्षभरात न सुटलेलं कोडं आहे. या जाहिरातींवर आय. पी. एल.च्या काळात अतोनात खर्च केला गेला. यात जाहिरातदारांची निर्बुद्धता आणि जाहिरात संस्थेची असहायता दिसते. हे नवीन वर्ष अशा प्रकारच्या जाहिरातींविरहित जावो हीच जाहिरातदारांकडे प्रार्थना!
उदय तुम्ही लिहिलेली शेवटची
उदय तुम्ही लिहिलेली शेवटची प्रतिक्रिया ही मी कालच लोकसत्ता पेपरातल्या एका जाहिरापर लेखात वाचली अगदी शब्द न शब्द सेम.. तुम्ही ती तिथुनच घेतली आहे का?
हो....................कारण
हो....................कारण त्या जाहिरातितले मला सुद्धा खटकलेले........कालच लोकसत्ता वाचला त्यात.......या जाहिरातिचा उल्लेख केलेला.........आणि तो इतका चांगला होता........कि मला माझे शब्द कमी वाटु लागले त्या समोर........म्हनुन जसाच्या तस्सा मी इथे लिहिला............
मी सुद्धा हा लेख वाचलाय
मी सुद्धा हा लेख वाचलाय लोकसत्ता मध्ये.
अशा जाहिरातींबाबत आपण तक्रार
अशा जाहिरातींबाबत आपण तक्रार करू शकता आणि अशा जाहिराती मागे घेतल्या जातात.
सलमान खान आणि रश्मी देसाई
सलमान खान आणि रश्मी देसाई यांची कुठल्यातरी वॉशिंग पावडरची अॅड लागते. त्यात बॅकग्राऊडला एक गाणे वाजते ते नक्की काय आहे? मला 'कांदा हे' किंवा 'कांता बाई' असे काहितरी ऐकायला येते.
असीनच्या मिरिंडाच्या सर्व जाहिराती फालतु असतात.
सलमान खान आणि रश्मी देसाई
सलमान खान आणि रश्मी देसाई यांची कुठल्यातरी वॉशिंग पावडरची अॅड लागते. << ती रश्मी देसाई नसून प्राची देसाई आहे.आणि ती अॅड व्हील ची आहे हाय हाय हाय असे शब्द आहेत ते
प्राची देसाईची नाही ग... उतरन
प्राची देसाईची नाही ग... उतरन सिरियलमध्ये तपस्याचं काम करते ना ती रश्मी देसाई... तिची आणि सलमानची एक अॅड येते ना.. ते दोघे नाचताना दाखवले आहेत. 'कांदा हे... झुमे झुमे... कांदा हे' असे काहितरी शब्द आहेत. प्राची देसाईची अॅड बंद होउन ही अॅड येते हल्ली. व्हीलचीच असावी.
हो का? मी नाही पाहिली ही
हो का? मी नाही पाहिली ही पहायलाच हवी ...
रिलायन्स नेटकनेक्ट प्लेन
रिलायन्स नेटकनेक्ट प्लेन लॅन्डींग च्या अॅडमधले प्रवासी किती मॅनर्सलेस दाखवलेत. काय ती विमानातुन उतरण्याची घाई , त्या पेक्षा आमची मुंबई-बेस्ट बरी, सगळे प्रवासी कसे लाईनीत चढतात, लाईनीत ऊभे रहातात.....
विश्वंभर हा मुलगा त्याच्या
विश्वंभर हा मुलगा त्याच्या बाबांकडे सिनेमासाठी पैसे मागायला जातो...
यातला विश्वंभर साठीच्यापुढचा आणि बाबा नव्वदीतले. भन्नाट जाहीरात आहे आयडीबीआय फेडरलच्या पेन्शन प्लॅनची !!
.
आयडियाच्या जाहीरातीत अभिषेक
आयडियाच्या जाहीरातीत अभिषेक बच्चन अतिशय फालतू वाटतो. बापाची सर नाही त्याला. जाहीरातीही टुकारच आहेत काही काही. अभिषेक ला कशाला कोण सरजी म्हणेल ? अभिनय आहे कि आवाज आहे कि तिकीटबारीवर वजन आहे ? ऐश्वर्याची लग्न आणि अमिताभच्या पोटी जन्म ही दोनच महान कामं त्याच्या नावावर आहेत.
ही आकाशवाणीवर ऐकलेली
ही आकाशवाणीवर ऐकलेली जाहिरात;
"सर, यह मेरा रेसिग्नेशन. यहां की ट्युबलाइटसे मुझे अॅलर्जी है|"
"सर , मैं भी रिझाइन कर रहां हूं| मेरा वजन १३० किलो से ११० किलो हो गया| मेरी माँ कहती है, की यहां के कँटिनका खाना मुझे लगता नही|"
(आणखी एक- हा स्त्रीचा आवाज):"सर यह मेरा रेसिग्नेशन|"
बॉसः "आरे यह क्या तुम एकसे एक बकवास रीझन देके रिझाइन कर रहे हो?"
स्त्री" सर आपने तो मोहित को एचायव्ही के कारण निकाला| क्या वो नही था बकवास रिझन?"
जापानी तेल.....
जापानी तेल.....
>>असीनच्या मिरिंडाच्या सर्व
>>असीनच्या मिरिंडाच्या सर्व जाहिराती फालतु असतात.
अनुमोदन
>>रिलायन्स नेटकनेक्ट प्लेन लॅन्डींग च्या अॅडमधले प्रवासी किती मॅनर्सलेस दाखवलेत
असंच करतात लोक. आजकाल मी बसून घेते माझ्या जागेवर. ज्यांना धक्काबुक्की करत उतरायचं आहे त्यांना उतरू देत. आणखी कशात नाही पण फक्त क्यूमध्ये पुढे जायची खुमखुमी असते लोकांना.
भरत, मीही ऐकली आहे ती अॅड. छान वाटते ऐकायला पण असं काही प्रत्यक्शात घडणं कठीण आहे.
भरत ही अॅड दूरदर्शनच्या सर्व
भरत ही अॅड दूरदर्शनच्या सर्व चॅनल्सवर नियमाने रोज दाखवतात. पण कहर म्हणजे जरी कुणी असेलच एच आय. व्ही पोजिटिव्ह तरी डिक्लेर करेल थोडेच? आणि स्वप्ना म्हणते तसं कळल्यावर त्या अॅडमधल्या सारखे वागणे अवघडच नाही महाकठिण आहे. मग डायबिटीस /बी.पी./ हार्ट पेशंटसा पण दाखवा की सहानुभूती...या एच आय. व्ही पोजिटिव्ह वाल्यांना काय सोनं लागलय का त्यांनी मोठे तीर मारलेत?
डायबिटीस /बी.पी./ हार्ट
डायबिटीस /बी.पी./ हार्ट पेशंटसा पण दाखवा की सहानुभूती...या एच आय. व्ही पोजिटिव्ह वाल्यांना काय सोनं लागलय का त्यांनी मोठे तीर मारलेत<<<<<<<<<<<< डायबिटीस /बी.पी./ हार्ट पेशंटना एकवेळ सहानभुती मिळेल हो पण एच आय. व्ही पोजिटिव्ह व्यक्तीनां सहानभुती सोडा पण त्यांच्याकडे भुवया उंचावूनच बघितले जाते
एच आय व्ही पॉझीटीव्ह म्हणजे
एच आय व्ही पॉझीटीव्ह म्हणजे एडस असणारच आणि एडस हा नुसत्या स्पर्शानेसुध्दा पसरतो असा समज सार्वत्रिक आहे. सुशिक्षितांना कळलं तरी चटकन वळत नाही. दुसर्याचं कशाला, मला स्वत:ला माझा कोवर्कर एच आय व्ही पॉझीटीव्ह आहे असं कळलं तर मी त्याच्याशी किंवा तिच्याशी नॉर्मल वागू शकेन की नाही माझं मलाच नाही सांगता यायचं.खोटं का बोलू? म्हणून ह्या जाहिराती हव्यात. एखादी गोष्ट शंभर वेळा सांगितली की १०० तल्या एकाला तरी पटेल. आणि अश्या लोकांना discriminate करायची समाजप्रवृत्ती बदलली की कोणीही हे लपवून ठेवणार नाही. हे सगळ्यांसाठीच चांगले आहे.
डायबिटीस /बी.पी./ हार्ट प्रॉब्लेम्स सांसर्गिक नाहीत हे सर्वांनाच माहित आहे.आणि काही अंशी हे अनुवांशिक असले तरी बर्याचदा ज्याला आपण Incorrect Lifestyle म्हणतो त्यामुळे ओढवलेले असतात.त्यामुळे हे रोग स्वतःच्या करणीने उद्वभवू नयेत म्हणून काय काळजी घ्यावी ह्याविष्यी मात्र जनजागृती व्हायला हवी.
टीव्हीएसची नवी अॅड अत्यंत
टीव्हीएसची नवी अॅड अत्यंत अभिरुचीहीन आहे असं मला वाटतं तसंच करिना कपूरची ती एयरटेलची अॅड अगदी डोक्यात जाते. मारुती सुझुकीच्या अॅडमध्ये ती बाई आंघोळ करताना साबणाला सोप सेव्हर लावते आणि ती सोप सेव्हर लावलेली बाजू अंगाला घासत बसते. कोणी ही अॅड रिलिज करायच्या आधी चेक केलेली दिसत नाही. मला ती बोर्नव्हिटाची बूगीमॅनची अॅड फार आवडते. पोरगं कसलं क्यूट आहे. आणि कॉन्सेप्टही आवडला.
...या एच आय. व्ही पोजिटिव्ह
...या एच आय. व्ही पोजिटिव्ह वाल्यांना काय सोनं लागलय का त्यांनी मोठे तीर मारलेत?
>>
हे बोलणे फारच अनुदार आहे. एच आय व्ही संसर्ग अनैतिकतेबरोबर इतर कारणानीही पसरू शकतो.उदा 'ब्लड ट्रान्सफ्युजन' जखमातून संसर्ग , अनुवाशिकता इ. त्यामुळे त्यांचा तिरस्कार करण्याचेही कारण नाही. मायबोलीवरच या विचारसरणीचे लोक असतील तर त्या जाहिरातीची आवश्यकता अधिकच पटते...
रेडिओवर आणखी एक जाहिरात ऐकली.
रेडिओवर आणखी एक जाहिरात ऐकली. कुठल्यातरी होम शॉपिंग चॅनेलची. त्यात सासू सुनेला त्या चॅनेलचं नाव घेऊन तिथे शॉपिंग करू यात म्हणते आणि सून तिला ते काय आहे असं विचारते. ह्यावर सासू "करमजली, कलमुई, तुझे तेरी मांने ये सिखाया नही?" असं म्हणून तिच्या आईचा उद्धार करते. असली जाहिरात काढणार्या माणसाला चौकात उभं करून फटकावलं पाहिजे.
एक जाहिरात येते होम शॉप १८
एक जाहिरात येते होम शॉप १८ ची.... ज्यात किरण खेरची सून होम शॉप मधून मायक्रोवेव्ह घेते, म्हणून ती रडत असते.... त्यातले संवाद इतके मुर्खासारखे आहेत.
स्वप्ना_राज एचायव्ही बद्दल
स्वप्ना_राज एचायव्ही बद्दल अनुमोदन. वेल सेड.
<<विश्वंभर हा मुलगा त्याच्या
<<विश्वंभर हा मुलगा त्याच्या बाबांकडे सिनेमासाठी पैसे मागायला जातो...
यातला विश्वंभर साठीच्यापुढचा आणि बाबा नव्वदीतले. भन्नाट जाहीरात आहे आयडीबीआय फेडरलच्या पेन्शन प्लॅनची !!<<
१००% अनुमोदन! लई भारी जाहिरात! त्यात त्या दोघं वृद्धांचे एक्स्प्रेशन्स मस्तच!!
.
वर्जीन मोबाइल्स ची सगळेच अॅड
वर्जीन मोबाइल्स ची सगळेच अॅड मस्त आहेत.....
डोक्यालिटी आहे त्यात
लावा मोबाईलची जाहिरातही आगाऊ
लावा मोबाईलची जाहिरातही आगाऊ आहे. काऊन्तरवरची सेल्स गर्ल अगोदर परत द्यायला सुटे पैसे नसल्याने सुट्ट्या पैशाऐवजी चॉकलेट्स की गोळ्या परत देते. एक तरुन जो लावा मोबाईल वापरतो त्याला मात्र कॉन्डोमची पाकिटे सुट्या पैशा ऐवजी परत देते. का तर म्हणे 'लाव्हा मोबाईल' सेपरेट्स मेन फ्रॉम अ बॉइज. काहीही...
टाटा फोटॉन ची जाहीरात मस्त
टाटा फोटॉन ची जाहीरात मस्त आहे. गेट स्पीड, गेट टाईम..
ऑफिसात काम करणारी बाई, टेबलावर चढून कसलं तरी झापड उघडतेय हे पाहून माझी उत्सुकता जाम ताणली, तर चक्क ती एका बागेत पोहोचते, जिथे तिची आई झाडांना पाणी घालत असते.. फार मस्त वाटली मला ती अॅड.
शिवाय भारत सरकार ची चाईल्ड अॅब्यूज रोखण्यासाठीची अॅड पण खूप आवडली. पण त्यांच्या अॅड्स फार फास्ट असतात त्यामुळे लहान मुलांनी त्या पाहणं गरजेचं असूनही मुलं त्या पहात नसावीत बहुधा.. लहान मुलांचं लक्ष वेधून घेणं ही कला खरंतर विविध प्रॉडक्ट कंपन्यांना जास्ती अवगत आहे. भारत सरकार ने यात लक्ष घालायला हवं..
टाटा कॅपिटलची अॅड प्रॉडक्टला
टाटा कॅपिटलची अॅड प्रॉडक्टला पूर्णपणे सूट होणारी नसली तरी छान आहे. तो छोटा सरदार क्यूट आहे एकदम
Pages