ऑस्ट्रेलियन ओपन टेनीस - २०११

Submitted by Adm on 8 January, 2011 - 10:03

यंदाच्या वर्षीची पहिली ग्रँडस्लॅम स्पर्धा, अर्थात ऑस्ट्रेलियन ओपन, १७ जानेवारी ते ३० जानेवरी दरम्यान खेळली जाणार आहे. यंदा भारताच्या सोमदेव बर्मनला पुरुष एकेरीत वाईल्ड कार्ड देण्यात आलं आहे.
पुरुष एकेरीत स्पेनच्या रफाएल नदालला तर महिला एकेरीत कॅरोलाईन वोझनियाकीला अग्रमानांकन मिळालं आहे. दुखापतीमुळे सेरेना विल्यम्स यंदाच्या स्पर्धेत उतरू शकणार नाहिये तर गेले जवळजवळ वर्षभर दुखापतीमुळे खेळू न शकलेला अर्जेंटिनाचा डेल पोट्रो यंदाच्या स्पर्धेद्वारे पुनरागमन करत आहे.

ह्या स्पर्धेसंबंधी चर्चा करण्यासाठी हा धागा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जोको आरामात जिन्कला, अलमाग्रो कडुन काहीच प्रतीकार नाही झाला.

फेडी पण छान खेळतो आहे, फोरहन्ड चे फटके अप्रतिम पडत आहेत आज. लय सापड्ली Happy
पहील्या सेट् मधे तरी स्वतःच्या सर्ववर एक पण पॉउन्ट दिला नाही.

दुसरा सेट घाण हरला फेडरर. साधारण प्रतिस्पर्धी आहे म्हणून कॅज्युअली घेतलं आणि हरला सेट (असं मला वाटलं)

काल ली हेशची शाब्दिक चकमक झाली आपल्या प्रतिस्पर्ध्यांबरोबर. ते दोघे लोपेझ्-मोनॅको (स्पॅनिश बोलणारे) पेसवर बॉडीलाइन मारा करत होते आणि ली-हेश एकमेकांना व्हामोस ( स्पॅनिश मध्ये कम ऑन ) असे ओरडून चीअर अप करत होते!
पुधल्या फेरीतही दोघे स्पॅनिश खेळाडूच आहेत ली-हेश विरुद्ध.

हो फेडरर २ रा सेट खुप वाईट्ट खेळला. खुप चुका केल्या फोरहन्ड च्या.
३ रा सेट घेतला आहे पण खेळ काही खास नाही झाला.
आता शेवटचा सेट कसा खेळतो ते पाहु.

विजय दृष्टिपथात आला की फेडररच्या खेळाला एकदम धार चढते. शेवटचा सेट सहज घेतला त्याने.
इथून पुढे आता फेडररच्या बाजूचा ड्रॉ अवघड आहे. तुलनेने नदालच्या बाजूचा एकदम सोपा आहे.

काल नदालचा सामना ऑस्ट्रेलियाचा नवोदित खेळाडू टॉमिक याच्याबरोबर झाला. टॉमिकने सामन्याच्या आधी पासूनच शाब्दिक चकमक सुरु केली होती, "नदालला कदाचित माझा खेळ आवडणार नाही" असे त्याने बोलले होते व प्रत्यक्ष सामन्यातही तसेच दिसले. नदालने हा सामना ६-२, ७-५, ६-३ असे जिंकला असेल पण टॉमिकने अफलातून खेळाचे प्रदर्शन केले, अगदी निवांत खेळत होता, फोरहँड मस्त आहे त्याचा. नदालला एवढ्या रागात खेळताना व नखशिखांत घामाघूम झालेलं फार कमी वेळा पाहिलयं. टॉमिकचे शॉट्स मस्त होते पण कोर्टवरची चपळाई तुलनेने कमी होती, कित्येक शॉट्स त्याने चेस न करता सोडून दिले. टॉमिकला 'लेटन ह्युएट'चा वारसदार म्हणतात, पण देव करो आणि ते खोट ठरो कारण सध्याचा ह्युएट गंडलेला आहे.

काल दोन "वा" हरल्या.. शारापोव्हा आणि कुझनेत्सोवा.. कुझनेत्सोवाची मॅच टफ झाली खूप पण शारापोव्हा फारच किरकोळीत हरली.. अर्थात तिचा सुरुवातीच्या फेर्‍यांमधला खेळ बघता फार काही आश्चर्य वाटलं नाही.. तिची कोर्ट वरची हालचाल आणि कव्हरेज फारच गंडलय.. दुखापतीनंतर सर्व्हिसतर गंडलेली आहेच.. विंबल्डनाआधी काहितरी केलं पाहिजे..
ली ना जिंकली... ती खेळत बरी होती.. पण तिच्या खेळात अजिबात्च ग्रेस नाहिये.. त्यामुळे मॅच बघायला बर्‍यापैकी बोर होतं..

आज नदालचे मॅच आहे सिलिच विरुध्द, बहुतेक ३ सेट मध्येच संपवेल. काल रॉडिक हारला, आज सोड्या हारला.

स्वेतलाना कुत्झेन्सोवा आणि फ्रान्सिस्का सियाव्हेन यांच्यातले मॅच ४ तास ४४ मिनिटे चालली. महिलांची ग्रँड स्लॅम मध्ये झालेली ही सगळ्यात दीर्घ कालावधीची मॅच. सियाव्हेन सुधा सुपर मॉम आहे, किम क्लिस्टर्स प्रमाणे.

कालची ती मॅच जबरीच झाली.. शियाव्होन महान खेळली... पण अशी मॅच झाली की पुढच्या मॅच मध्ये फारच थकायला होतं आणि पुढची मॅच सहज हातातून जाते...

शारापोव्हाला त्या पेटकोव्हिकनी तुफान हरवलं.. आणि मॅच नंतरचा तिचा नाच पण जबरीच होता...

नदालनी सरळ सेट मध्ये चिलिचला हरवुन फेरर बरोबर मॅच फिक्स केलीये...

सोड्याच्या विरुद्ध जिंकलेला डोलगोपोलोव सोडल्यास उपांत्य पूर्व फेरीत सगळे सीडेड खेळाडू आहेत.. मजा येणार मॅचेस बघायला..

ली-हेश पण पुढच्या फेरीत पोहोचले. पण बोपण्णा कुरेशी अटीतटीच्या लढतीत हारले.. तीन सेट मधे पहिला सेट जिंकून पुढचे दोन टायब्रेक मध्ये हारले बिचारे..

किम जिंकली... पहिला सेट चुरशीचा झाला... दुसरा किमने सहज जिंकला..
आता क्वार्टर फायनलला राडावान्स्काशी मॅच...

सँटी.. बर्‍याचा "वा" हरलेल्या दिसतायत आता.. Proud

स्वेतलाना कुत्झेन्सोवा आणि फ्रान्सिस्का सियाव्हेन मॅच म्हणजे खरंच अटीतटीचा सामना! बापरे, कसली तुफान जुंपली होती. मजा आली.

>>डोलगोपोलोव सोडल्यास उपांत्य पूर्व फेरीत सगळे सीडेड खेळाडू आहेत
असेनात. डोल्गो डेंजर माणूस दिसतो. त्याने त्सोन्गाला पण हरवले होते. गो डोल्गो! (मला मरे आवडत नाही)

हो रे.. ५ 'वा' हरल्या एक दोन दिवसात. आता २ उरल्या आहेत. त्यांचीही एकमेकांबरोबर मॅच आहे. म्हणजे त्यातली एक कटणार.

<<फ्रान्सिस्का सियाव्हेन>> अरे स्किवोने आहे ते.. म्हणजे समालोचक तरी तसा उच्चार करतात. तिचं वय पुष्कळ आहे, त्यामुळे तिला सियाबेन म्हटलं तरी चाललं असतं. Proud

तो डोल्गोपोलोव एकदम तरूण आहे. बघू मरेबरोबर कसा खेळतो आता..

फेडरर जिंकला. मस्त खेळला. तो वॉवरिंका पण चांगला वाटला खेळाडू. बॅकहॅन्ड आणि फोरहॅन्ड चांगले ताकदवान मारतो. चुका त्याच्या जास्त झाल्या म्हणून हरला असं वाटलं.

>>तो वॉवरिंका पण चांगला वाटला खेळाडू.
तो फेडररचा डबल्सचा पार्ट्नर आहे (डेविस कप मधे). त्याने रॉडिकला सरळ सेट मधे घेतला ४ राउन्ड मधे.
तो चांगला खेळाडू आहे, पण फेडरर ..काय बोलणार...आज खुप छान खेळला. नाही ते experiments नाही केले.
फायनलची तयारी चान्गली चालली आहे.

फेडरर ह्या वर्षी नदाल ला हारवणार Happy

तो वॉवरिंका पण चांगला वाटला खेळाडू....>> वॉवरिंका रॉडीकविरुध्द खूपच छान खेळला होता.. मला वाटलं होतं की तो फेडीला चांगली लढत देईल.

ती चीनी खेळाडु ली ना फार छान खेळतेय.. तिला ही स्पर्धा जिंकण्याची चांगली संधी आहे.

फेडरर ह्या वर्षी नदाल ला हारवणार...>>> आमेन Happy

सुमंगल, हेश ली बद्दल पोस्टी आल्यात की वर.
अँडी मरे खरेच खूप चांगला खेळतोय की त्याचा प्रतिस्पर्धी कच्चा होता?की दोन्ही?

फेडी विरुद्ध आत्ता जोकोविक किंवा बर्डीच येइल. बहुतेक नदाल वि फेडरर असाच अंतिम सामना होइल असे वाटते.

अवांतर : फेसबुकवर 'आवरा' मध्ये एक रजनी विनोद आला होता..
फेडी रजनीकांतला : मला टेनीसमधले सगळे येते, काय पण विचार...
.
..
.
.
.
.
.
..
.
.

रजनी एक भिवई वर करत...."सांग नेट मध्ये किती भोकं असतात.????" Happy

>>अँडी मरे खरेच खूप चांगला खेळतोय की
अँडी मरे सेमीज पर्यन्त खुप चांगला खेळतो, सेमीज/फायनल मधे जातो.

काल त्या वावारिंकाने बँकहँड्स अप्रतिम मारले !!!
काही काही व्हॉलीज पण जबरा झाल्या... फेडरर हल्ली पायांमधून फटका जनरल मारतो.. Happy

काल वोझनीयाकी जिंकली.. ती स्किवोनी परवा इतकी मोठी मॅच खेळूनही काल पूर्ण ताकदीने खेळत होती..
जोको सरळ सेटमध्ये जिंकला.. आता जोको वि. फेडरर..
बर्डीच टफ देईल असं वाटलं होतं खरं..

मरे.. ह्म्म्म्म !

रंगासेठ.. तो जोक वाचला होता .. Happy

बर्डीचला एक सेट सोडल्यास खाऊन टाकला डोको नी.. दुसरा सेट बर्डीच जिंकेल असे वाटत असतानाच हारला.. मिळालेला ब्रेक वाया घालवला आणि मॅच हारलाच मग.. तो सेट बर्डीच नी जिंकला असता तर कदाचित वेगळा निकाल लागला असता..

मर्‍या डोल्गोला हरवेल असं मला वाटतं. पण पुढे जाऊन नदालकडून हरेल. आता फेडररची जोकोशी आहे मॅच. चांगला टफ देणार तो जोको. निकालाचं काही सांगता येत नाही.

भरतजी आभार. हेश म्हणजे महेश हे लक्षातच आले नाही. मी महेश भुपती ला कॉफी विथ करण मधे बघितले म्हणुन उत्छुक होते.

Pages