ऑस्ट्रेलियन ओपन टेनीस - २०११

Submitted by Adm on 8 January, 2011 - 10:03

यंदाच्या वर्षीची पहिली ग्रँडस्लॅम स्पर्धा, अर्थात ऑस्ट्रेलियन ओपन, १७ जानेवारी ते ३० जानेवरी दरम्यान खेळली जाणार आहे. यंदा भारताच्या सोमदेव बर्मनला पुरुष एकेरीत वाईल्ड कार्ड देण्यात आलं आहे.
पुरुष एकेरीत स्पेनच्या रफाएल नदालला तर महिला एकेरीत कॅरोलाईन वोझनियाकीला अग्रमानांकन मिळालं आहे. दुखापतीमुळे सेरेना विल्यम्स यंदाच्या स्पर्धेत उतरू शकणार नाहिये तर गेले जवळजवळ वर्षभर दुखापतीमुळे खेळू न शकलेला अर्जेंटिनाचा डेल पोट्रो यंदाच्या स्पर्धेद्वारे पुनरागमन करत आहे.

ह्या स्पर्धेसंबंधी चर्चा करण्यासाठी हा धागा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हायलाइट्स पाहिले. वोझ्नियाकीला तिच्या सर्व्हवर मॅच पॉईंट असताना, ली ना ने मॅच खेचून काढली.

लालू,
तू 'गो' म्हटलं की लोक स्पर्धेमधूनच बाहेर जातात. त्यामुळे आता हे वरचे दोघे हरतील आणि जोको जिंकेल ह्यावेळी. Proud

फेरर फायनलला जाईल याच्यावर त्याचाच विश्वास नव्हता. टाय ब्रेकर चे दोन्ही सेट महागात पडले.
आमचा माणूस जोको. (फ्रेडी नसल्यामुळे आणि मरे ब्रिटीश (स्कॉटीश) असल्याने).
खेळतो छान. नकला बी लै भारी करतो. यु ट्यूब बघा.
मरे म्हणला की तो आणि जोको चांगले मित्र आहेत. या स्लॅमच्या तयारी साठी एकत्र प्रॅक्टिस करत होते. फ्रेडी आणि नादाल पण सद्ध्या चांगले मित्र आहेत.
टेनिसच काही खर नाही.

मर्‍या जिंकला. सकाळी शेवटचा सेट पहायला मिळाला मला. फेरर म्हणजे अगदी टिपिकल स्पॅनिश खेळाडू. नुसतंच धावधाव धावत होता कोर्टवर. मरेनी त्याला चांगलंच पळवलं आणि हरवलं.

फायनल जोको जिंकायला पाहिजे. Happy

ली-हेश ची करिअर ग्रँड स्लॅम अपूर्णच.
लीची जादू दिसली नाही. सर्व्हिस रिटर्नचा बॅकहँडेड ड्रॉप शॉट चालला नाही, सतत लाँग जायचा. बहुतेक विनर्स महेशने मारले.

भारी झाली लीना आणि किम मॅच.. जोरदार रॅलीज केल्या दोघींनी.. संपूर्ण मॅचमध्ये क्वचितच नेटजवळ आल्या असतील दोघी..

माझ्या मते ऑर्डिनरी झाली मॅच. पहिल्या सेटला काही अर्थ नाही, तो कुठल्याच मॅचमध्ये नसतो. (माझ्या मते) पुरुषांच्या तर अजिबातच नाही. दुसराही त्याच खेळाडूने घेतला तर गोष्ट थोडी वेगळी.

दुसर्‍या सेटमध्ये ली ढेपाळलीच एकदम. किरकिर काय करायला लागली. त्यात मठ्ठ चायनीज फॅन्स पॉइंट चालू असताना मध्येच ओरडत होते. त्याबद्दलही तक्रार केली तिने, मग फोटोग्राफर्सबद्दल पण. किम अनेकदा ग्रँड स्लॅम फायनलमधून गेली आहे, तिला अनुभवाचा उपयोग झाला.

>>संपूर्ण मॅचमध्ये क्वचितच नेटजवळ आल्या असतील दोघी
टण्या असली मॅच भारी नसते, बोरिन्ग असते. Proud तशी होती थोडी व्हरायटी, नेहमीच बेसलाईनबाहेर नव्हत्या.

गो मरे!

फडतूस. दारुण.

मरे समर्थकांना (कोणी असतील तर) माझी सहानुभूती. Proud

जोकोने जिंकल्यावर शर्ट शूज सगळे काढून फेकायला सुरुवात केल्याने मी घाबरुन टीव्ही बन्द केला!

Pages