Submitted by Adm on 8 January, 2011 - 10:03
यंदाच्या वर्षीची पहिली ग्रँडस्लॅम स्पर्धा, अर्थात ऑस्ट्रेलियन ओपन, १७ जानेवारी ते ३० जानेवरी दरम्यान खेळली जाणार आहे. यंदा भारताच्या सोमदेव बर्मनला पुरुष एकेरीत वाईल्ड कार्ड देण्यात आलं आहे.
पुरुष एकेरीत स्पेनच्या रफाएल नदालला तर महिला एकेरीत कॅरोलाईन वोझनियाकीला अग्रमानांकन मिळालं आहे. दुखापतीमुळे सेरेना विल्यम्स यंदाच्या स्पर्धेत उतरू शकणार नाहिये तर गेले जवळजवळ वर्षभर दुखापतीमुळे खेळू न शकलेला अर्जेंटिनाचा डेल पोट्रो यंदाच्या स्पर्धेद्वारे पुनरागमन करत आहे.
ह्या स्पर्धेसंबंधी चर्चा करण्यासाठी हा धागा.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ग्रॅन्ड्स्लॅमच्या फायनलमध्ये
ग्रॅन्ड्स्लॅमच्या फायनलमध्ये जाणारी ती पहिली चीनी टेनिसपटू आहे >> पहिली चीनीच नव्हे तर पहिली एशिअन सुद्धा
हायलाइट्स पाहिले.
हायलाइट्स पाहिले. वोझ्नियाकीला तिच्या सर्व्हवर मॅच पॉईंट असताना, ली ना ने मॅच खेचून काढली.
फचिन, फेरे-मरे पैकी कोणीतरी
फचिन, फेरे-मरे पैकी कोणीतरी जिंकावे रे. त्यांना अजून एकदाही मिळाले नाही.

गो फेरे
गो मरे
लालू, तू 'गो' म्हटलं की लोक
लालू,
तू 'गो' म्हटलं की लोक स्पर्धेमधूनच बाहेर जातात. त्यामुळे आता हे वरचे दोघे हरतील आणि जोको जिंकेल ह्यावेळी.
फेडरर गेला आता जोकर
फेडरर गेला
आता जोकर जिन्कायला पाहिजे.
फचिन गो जोको!
फचिन
गो जोको!
यंदा मरे जि़ंकला तर ब्रिटन
यंदा मरे जि़ंकला तर ब्रिटन मध्ये मरेची हत्तीवरुन मिरवणुक काढतील.
माझे मत जोको ला. लालू, गो
माझे मत जोको ला.
लालू, गो जोको! आणि 'गेट द कप'
फरेर गेला ना!! आता मरे आणि
फरेर गेला ना!!
आता मरे आणि जोको.
ली ना आणि किम मधे बोली लावा
ली ना आणि किम मधे बोली लावा पब्लिक..
किमने तिच्या अनफोर्स्ड एरर्स वर ताबा ठेवला पाहिजे.
ली ना जिंकेल. ती फुल फॉर्म
ली ना जिंकेल. ती फुल फॉर्म मधे आहे.
ली ना आणि जोको
ली ना आणि जोको
किम आणि मरे. गो मरे
किम आणि मरे.
गो मरे
लालू, गो मरे म्हणजे खरा
लालू, गो मरे म्हणजे खरा पाठिंबा जोकोला नं
नाही, मी मरेकडून. सिरियसली.
नाही, मी मरेकडून. सिरियसली. बरा खेळतोय.
फेरर फायनलला जाईल याच्यावर
फेरर फायनलला जाईल याच्यावर त्याचाच विश्वास नव्हता. टाय ब्रेकर चे दोन्ही सेट महागात पडले.
आमचा माणूस जोको. (फ्रेडी नसल्यामुळे आणि मरे ब्रिटीश (स्कॉटीश) असल्याने).
खेळतो छान. नकला बी लै भारी करतो. यु ट्यूब बघा.
मरे म्हणला की तो आणि जोको चांगले मित्र आहेत. या स्लॅमच्या तयारी साठी एकत्र प्रॅक्टिस करत होते. फ्रेडी आणि नादाल पण सद्ध्या चांगले मित्र आहेत.
टेनिसच काही खर नाही.
मर्या जिंकला. सकाळी शेवटचा
मर्या जिंकला. सकाळी शेवटचा सेट पहायला मिळाला मला. फेरर म्हणजे अगदी टिपिकल स्पॅनिश खेळाडू. नुसतंच धावधाव धावत होता कोर्टवर. मरेनी त्याला चांगलंच पळवलं आणि हरवलं.
फायनल जोको जिंकायला पाहिजे.
खेळतो छान. नकला बी लै भारी
खेळतो छान. नकला बी लै भारी करतो.>> एवढचं नाही तर टिशर्ट काढून डान्स पण करतो
कोणी बघतय की नाही फायनल? ली
कोणी बघतय की नाही फायनल?
ली ना ५-३ पुढे आहे पहिल्या सेट मधे..
http://sports.yahoo.com/tenni
http://sports.yahoo.com/tennis/blog/busted_racquet/post/Serena-and-Venus...
वन ऑल!!!!!! गो किम!!!
घेतला दुसरा किमने.. जबरी !
घेतला दुसरा किमने.. जबरी !
जिंकली किम क्लायस्टर्स. आता
जिंकली किम क्लायस्टर्स.
आता मेन्स डबल्स.
अभिनंदन किम!!! मस्त झाली
अभिनंदन किम!!!
मस्त झाली मॅच.
ली-हेश ची करिअर ग्रँड स्लॅम
ली-हेश ची करिअर ग्रँड स्लॅम अपूर्णच.
लीची जादू दिसली नाही. सर्व्हिस रिटर्नचा बॅकहँडेड ड्रॉप शॉट चालला नाही, सतत लाँग जायचा. बहुतेक विनर्स महेशने मारले.
भारी झाली लीना आणि किम मॅच..
भारी झाली लीना आणि किम मॅच.. जोरदार रॅलीज केल्या दोघींनी.. संपूर्ण मॅचमध्ये क्वचितच नेटजवळ आल्या असतील दोघी..
माझ्या मते ऑर्डिनरी झाली मॅच.
माझ्या मते ऑर्डिनरी झाली मॅच. पहिल्या सेटला काही अर्थ नाही, तो कुठल्याच मॅचमध्ये नसतो. (माझ्या मते) पुरुषांच्या तर अजिबातच नाही. दुसराही त्याच खेळाडूने घेतला तर गोष्ट थोडी वेगळी.
दुसर्या सेटमध्ये ली ढेपाळलीच एकदम. किरकिर काय करायला लागली. त्यात मठ्ठ चायनीज फॅन्स पॉइंट चालू असताना मध्येच ओरडत होते. त्याबद्दलही तक्रार केली तिने, मग फोटोग्राफर्सबद्दल पण. किम अनेकदा ग्रँड स्लॅम फायनलमधून गेली आहे, तिला अनुभवाचा उपयोग झाला.
>>संपूर्ण मॅचमध्ये क्वचितच नेटजवळ आल्या असतील दोघी
तशी होती थोडी व्हरायटी, नेहमीच बेसलाईनबाहेर नव्हत्या.
टण्या असली मॅच भारी नसते, बोरिन्ग असते.
गो मरे!
जोकोने पहिले दोन सेट जिंकले
जोकोने पहिले दोन सेट जिंकले आहेत.
जिंकला जोको.. गो मरे! >>
जिंकला जोको..
गो मरे! >> गेला
फडतूस. दारुण. मरे समर्थकांना
फडतूस. दारुण.
मरे समर्थकांना (कोणी असतील तर) माझी सहानुभूती.
जोकोने जिंकल्यावर शर्ट शूज सगळे काढून फेकायला सुरुवात केल्याने मी घाबरुन टीव्ही बन्द केला!
गो मरे! >> गेला >>> मी पण हेच
गो मरे! >> गेला >>> मी पण हेच लिहायला आलो..
जोको.... जोको................. !!!!!
Pages