Submitted by poojas on 24 December, 2007 - 05:33
उदास वाटा , उदास वळणे;
वळणावरती उगाच वळणे..
आठवणींच्या उंबरठ्याशी..
पुन्हा पुन्हा माझे घुटमळंणे..
सरेल का ही पायपीट;
अन सुन्या सावल्यांपाठी पळणे..
निवांत मृत्यूशय्येवरती..
निपचित लाकूड होऊन जळणे..?
जमेल का मज कठोर होऊन
निर्जीव पाषाणासम जगणे..
त्रयस्थ दृष्टी ठेवून माझ्या
तटस्थ आयुष्याला बघणे..?
जमेल सारे .. जमेल तेव्हा..
सरेल अवघे माझे मीपण..
उरेन माझी मीच एकटी..
अन..
विवंचनांचे विशाल अंगण !!! ?
गुलमोहर:
शेअर करा
सुरेख
सुरेख. आत्मवेदना भिडली.
छान कविता
छान कविता आहे.
वा !
वा ! आवडेश कविता !!
परागकण
सही कविता
सही कविता आहे
जमेल सारे .. जमेल तेव्हा..
सरेल अवघे माझे मीपण..
उरेन माझी मीच एकटी..
अन..
विवंचनांचे विशाल अंगण !
हया ओळी खासच......!
निवांत
निवांत मृत्यूशय्येवरती..
निपचित लाकूड होऊन जळणे..?
जमेल का मज कठोर होऊन
निर्जीव पाषाणासम जगणे..
छानचं गं..............
छान आहे
छान आहे कविता पूजा. पण मला एक अर्थ बहुतेक नीट कळला नाहिये म्हणुन ही शंका आहे -
"त्रयस्थ दृष्टी ठेवून माझ्या
तटस्थ आयुष्याला बघणे..?
जमेल सारे .. जमेल तेव्हा..
सरेल अवघे माझे मीपण..
उरेन माझी मीच एकटी..
अन..
विवंचनांचे विशाल अंगण "
जेव्हा दृष्टी त्रयस्थपणे आयुष्याला बघेल, मीपण (ह्याचा अर्थ मी सेल्फ ईगो असा घेतला) रहाणारच नाही. कुठल्या गोष्टीची इच्छा उरणार नाही, अटेचमेंट उरणार नाही. खरंतर एका दृष्टीनी पाहता ही अवस्था अशी ही असेल की ज्यात आयुष्य संपेपर्यंत कवी काम करत राहील पण त्याच्या सुख-दु:खाची त्याला परवा नसेल. ज्याला स्थितप्रज्ञत्व आलं असेल. अशावेळी मग विवंचना कशा उरतील मनात? त्यांच्या पलिकडे गेलं असेल मन. नाही का?
व्वा!
पूजा, ब-याच दिवसानी ?, खूप छान कविता, आवडली ग!
फारच छान
सरेल का ही पायपीट;
अन सुन्या सावल्यांपाठी पळणे..
या मध्ये मिटर जमविण्यासाठी एक बदल सुचवू का ?
सरेल का ही व्यर्थ पायपीट;
अन सुन्या सावल्यांपाठी पळणे..
किंवा
सरेल का ही पायपीट अन;
सुन्या सावल्यांपाठी पळणे..
बाकी कल्पना , आशय , मुख्य म्हणजे कवितेतला जर्म व्वा वा !!!
अरूण
कविता
कविता छानच. अरुण कवितेतला जर्म कि मर्म?
अगदी आवडली
पूजा, सुरेख कविता...
जमेल सारे .. जमेल तेव्हा..
सरेल अवघे माझे मीपण..
व्वा!
(विवंचनांच्या अंगणाबद्दल तुझे विचार जाणून घ्यायला आवडतिल)
पुजा... छान कविता... पण अमेय
पुजा...
छान कविता... पण अमेय आणि दादप्रमाणे मलाही हा प्रश्न पडलाय की अवघे मी पण सरल्यावर विवंचना कशाला उरतील?
खूप छान.......
खूप छान.......