Submitted by saavni on 21 July, 2008 - 02:20
तुम्हाला खास वाटलेल्या / न आवडलेल्या जाहिरातींबद्दल ईथे लिहा.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
तुम्हाला खास वाटलेल्या / न आवडलेल्या जाहिरातींबद्दल ईथे लिहा.
वोडफोन चे दोन मैत्रिणींची "आय
वोडफोन चे दोन मैत्रिणींची "आय लाईक टू सिट नेक्स्ट टू यु" अतिशय मस्त आहेत. त्यातील मुलींचा अभिनय इतका नेचरल आणि निरागस आहे की त्या अभिनय करत आहेत हे जाणवत ही नाही. विशेषतः सगळ्यांना एक आणि खास मैत्रिण म्हणून एकीला मूठभर चॉकलेट्स मिळाल्यावर तिने जे एक्सप्रेशंस दिलेत ते तर अगदी प्राईसलेस!
ती चहा पत्ती मागायला आलेल्या
ती चहा पत्ती मागायला आलेल्या शेजारणीला फेवीक्विकवर भाषण देऊन 'गर आपको इतनाभी नही मालूम तो आप बढिया चाय क्या बनायेंगी खाक' असे म्हणून धाडकन दरवाजा बन्द करणाराची ती अॅड मला खूपच आवडते. वेशेषतः दार बन्द केल्यावर लाम्बून पाठमोर्या दिसणार्या त्या बाइच्या चेहर्यावरचे भाम्बावलेले एक्सप्रेशन्स तिचा चेहरा दिसत नसतानाही स्पष्ट 'वाचता 'येतात
कोलगेटची लारा दत्ताची अॅड
कोलगेटची लारा दत्ताची अॅड एकदम भंगार आहे..विशेषतः ज्या वेगाने ती विग काढते आणि मुलाखत घेते ते अगदी हास्यास्पद आहे. जणू काही बकरं मिळेल म्हणून फिल्डिंग लावून बसल्यासारखी
काल एरियलची एक नवीन अॅड
काल एरियलची एक नवीन अॅड पाहिली, त्यात त्या शेफ असलेल्या मुलाचा रेस्टॉरन्टमधे वापरलेला एप्रन ती आई घरी का बरं धुतेय? वर शेवटी तो मुलगा आईला घेऊन अभिमानाने त्या रेस्टॉरन्टकडे पहाताना दाखवलाय. तो त्याचा मालक आहे का तिथे शेफ आहे?
एयरटेल ची नवीन अॅड मस्तच
एयरटेल ची नवीन अॅड मस्तच आहे. एक मुलगा आणि मुलगी एकमेकांना भेटतात आणि पुन्हा दूर जातात ...त्यांचे पुनःपुन्हा भेटणे खूप सही अॅड आहे.
हं.......मलाही ती एअरटेलची
हं.......मलाही ती एअरटेलची अॅड आवडली. नवीन कोकची अॅडही छान आहे. बोटांचा शॅडो प्ले करणारा मुलगा(जाने तू मधला हीरो..नाव नाही आठवत) आणि सावलीत मुलगा वाटणारी..पण प्रत्यक्षात मुलगी!
छान घेतली आहे ही अॅड!
कोकची नवी अॅड जबरी. 'आज की
कोकची नवी अॅड जबरी. 'आज की रात...कोई आने को है' सही वापरले आहे.
आरडीच्या जीवावर अजून किती लोक, किती दिवस जगणार आहेत देव जाणे. आजच्या पिढीला तर हे नविन काँपोझिशन वाटेल इतके फ्रेश वाटते.
ज्यांच्या नावातच देव आहे
ज्यांच्या नावातच देव आहे त्यांची काय बात आगाऊ!
अरे सध्या मध्यप्रदेशची
अरे सध्या मध्यप्रदेशची जाहिरात येते ती बघितली का कोणी? पूर्ण जाहिरात सावल्यांच्या खेळाच्या कॉन्सेप्टवर आहे. अप्रतिम झालिय...
"ये एम. पी. अजब है" - अस गाण आहे.
डव ची `सेवन डे टेस्ट' ;
डव ची `सेवन डे टेस्ट' ; लॉजिकच कळल नाही.
'आज की रात...कोई आने को है'
'आज की रात...कोई आने को है' सही वापरले आहे.
आगाऊ .......संपूर्णपणे अनुमोदन!
गेल्या काही दिवसातल्या अजिबात
गेल्या काही दिवसातल्या अजिबात न आवडलेल्या जाहिराती:
१. एलजी फ़ोनची तो माणूस त्या तरुणीबरोबर नाचताना डॊक्यूमेन्ट स्कॆन करून बॊसला पाठवतो ती
२. त्या पार्कातल्या व्यायाम करणाया तरुणीची जी तरूणाचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करत असते.
३. पर्क ग्लुकोज
४. वाईल्ड स्टोन टाल्कम पावडर
http://www.youtube.com/watch?
http://www.youtube.com/watch?v=CY0rOBqGV74&feature=related
ही टिचर असुन त्या मुलीला सांगते ३*३=३!!!!!!!!!!!!!!!!!
मुग्धा अनुमोदन....
मुग्धा अनुमोदन....
सावल्यांचा खेळ दाखवत केलेली एम पी ची जाहीरात अप्रतिम आहे. त्यांची आधीची जाहीरात ही सुरेख होती... एका बाईचे डोळे दिसायचे स्क्रिनवर त्यात....
रावी - ड्व्ह ७ डे टेस्ट म्हणजे. आधी रूक्ष असलेली त्वचा ७ दिवस सतत ड्व्ह वापरून मऊ करायची, पण रोज त्वचेत होत असलेले बदल आरशात पहायला परवानगी नाही. आरसा पहायचा तो ७ दिवसानंतरच.
अवांतर - डव्ह खरंच छान साबण आहे.
मी शाळेत असताना 'पान पसंद'
मी शाळेत असताना 'पान पसंद' गोळीची अॅड लागायची.... भारती आचरेकरांची...
प्रथम...जरा घुश्शात.... "देखो मुझे गुस्सा मत दिलाओ... अपनी बीवी पे हुकूम चलाते हो....(हातात लाटणं घेउन)
(मग हरिश भीमाणींचा आवाज ... पान का स्वाद... गजब की मिटास.....)
मग.... जरा लाडात.... "देखो मुझे गुस्सा मत दिलाओ हां... अपनी बीवी पे हुकूम चलाते हो....
भारती ताईंचे एक्स्प्रेशन्स ... केवळ लाजवाब.....
मध्यप्रदेशची जाहिरात, 'पान
मध्यप्रदेशची जाहिरात, 'पान पसंद' - १००% अनुमोदन!
पानपसंद... शादी और तुमसे
पानपसंद...
शादी और तुमसे हूंह! कभी नही... ते पण मस्त होतं... त्यात ती अर्चना जोगळेकर होती.. (मांजरीण)
कंबल पे कंबल.....
कंबल पे कंबल..... ठंडी.....
हिवाळ्यात नेहमी अजून एक यायची.... बेटा स्वेटर पहनलओ....
मायक्रोमॅक्स मोबाइलची
मायक्रोमॅक्स मोबाइलची मकरंदकुमार अक्षय देशपांडे असलेली जाहिरत पाहिली का कोणी? मला मायक्रोमॅक्सच्या जाहिराती अजिबात कळत नाहीत. त्यामुळे त्या सगळ्या टाकाऊ, सुमार इ.इ आहेत असं म्हटलं तर चालेल का?
कॅडबरी सिल्क ची जिन्यातली
कॅडबरी सिल्क ची जिन्यातली जाहिरात... डोक्यात जाते :रागः
>>कॅडबरी सिल्क ची जिन्यातली
>>कॅडबरी सिल्क ची जिन्यातली जाहिरात
अनुमोदन. त्या मुलाचे वेडगळ भाव पाहून एक खच्चून मारावीशी वाटते तोंडात. Future Generali च्या नव्या अॅड्स पाहिल्यात? तद्दन भिकारी.
D zire कारची अॅड. पापा मै
D zire कारची अॅड.
पापा मै स्कुल मे बोल दु, मै डेझर्ट भी देख के आया... झक्कास अॅड..
कॅडबरी सिल्कची जाहिरात
कॅडबरी सिल्कची जाहिरात किळसवाणी आहे. आपल्याकडे जर मुलगी एकटी जिन्यात बसून अशी तोंड बरबटवून चॉकलेट खात असेल तरी तंबी मिळेल. इथे तर ती एका गलिच्छ कार्ट्याबरोबर हसत खिदळत हात्-तोंड बरबटवून घेत चॉकलेट गिळतेय.
कॅडबरी सिल्कची जाहिरात<<<<<<
कॅडबरी सिल्कची जाहिरात<<<<<< बकवास
D zire कारची अॅड. पापा मै
D zire कारची अॅड.
पापा मै स्कुल मे बोल दु, मै डेझर्ट भी देख के आया... झक्कास अॅड..
>>>> अगदी.. मलाही खूप आवडते.
बकवास जाहीरात सध्या लेज (
बकवास जाहीरात सध्या लेज ( वर्ल्डकप स्पेशल ) नेपाळी फ्लेवर पण येणार आहे म्हणे.
मला ती dairy milk ची जुनी
मला ती dairy milk ची जुनी नाचत मैदानावर येणार्या मुलीची जहिरात फार आवडते. तिच्या नाचातुन तिचा आनंद, त्याच्या चेहर्यावरचे ते लाजरे पण कौतुकाचे भाव ( आणि हो, तिचा तो वर चर्चिला गेलेला फुलाफुलांचा फ्रॉक, सगळंच इतकं cute आहे ना. आणि background ला ते भारी गाणं - कुछ खास है हम सभी में, कुछ खास है जिंदगी में................."
त्यांचीच दुसरी ad आहे, ती मुलगी प्रेग्नंट असते, आणि नवर्याला ती पोटावर हात ठेवुन दाखवते कि मला नाही, ह्या/हिला हवे आहे चॉकोलेट. त्या दोघांचे expressions इतके सही आहेत ना. मागे गाणं तेच, कुछ खास है जिंदगी में.............."
I hate the ad of Amul Macho. किळसवाणी आहे अगदी. आणि त्या बाईने जे काही expressions दिले आहेत, त्याने तर ती जहिरात अजुन किळसवाणी केली आहे.
एक खुप सुंदर जहिरात आहे Asian Paints ची - दिवाळीला सगळं कुटुंब सैनिकाची वाट बघत असतं आणि तो येउ शकणार नसतो अशी काही तरी. सगळे देवासमोर डोळे मिटुन हात जोडुन उभे असताना तो अचानक येतो आणि डोळे मिटुन उभ्या असलेल्या त्याच्या मुलाने हात जोड्लेले असतात त्यावरुन स्वतःचे हात जोड्तो. खुप खुप मस्त ad होती. नीट आठवत नाही आता.
तशा तर Asian Paints च्या सगळ्याच जहिराती छान आहेत. मला तर ती सध्याची सैफची पण आवड्ते. तीच ती,ज्या मधे तो चिंताक्रांत host असतो पार्टीचा, जो त्याचे गेस्ट किती वेगवेगळ्या प्रकारे भिंत खराब करत असतात, पण रंग खराब होत नाही, ती वाली ad.
suzuki samurai ची ती 'no problem' वाली ad पण झकास होती.
दुसरी ती बजाज स्कुटरवाली - 'चुन्नु-मुन्नु दी गाडी' - ज्या वर दोन सरदारजीची पिल्लं असतात - हमारा बजाज - बुलंद भारत कि बुलंद तस्वीर - एकदम मस्त !
जहिरात आवडत नाही ती सध्याची Mac D ची - क्या हम गर्ल्फ्रेन्ड-बॉयफ्रेन्ड है? - इतक्या लहान मुलांना असली जहिरात का करायला लावायची? पण त्या मुलाने मस्त expressions दिले आहेत. छान actor होईल हा मोठेपणी.
अर्चना जोगळेकरची - पान पसंद - शादी और तुम से कभी नही - ही पण मस्त होती.
अरे हा रे, मी ती विसरले कि - Fevicol - ती आई आपल्या चुळबुळ्या मुलाला सारखी सारखी उचलुन आणते आणि स्वतः जवळ आणुन ठेवते, पण ते परत परत डुगडुगत लांब चालत जातं. मग ती आणुन त्याला रिकाम्या Fevicol च्या डब्यावर बसवते, मग ते जागेवरुन उठत नाही, कारण Fevicol चा पक्का जोड. खुप छोटीशी पण effective होती ती. बाळ पण एकदम फ्रिलचं टोपडं घातलेलं cute होतं.
अजुन खुप आठवताहेत, ज्या एकदम मस्त मस्त आहेत. पण किती लिहु आणि किती नाही. थोड्क्यात, आपल्या बहुतेक सगळ्याच जहिराती छान असतात. क्रिएटिव्ह आणि हुश्शार लोकांनी बनवलेल्या. काही थोड्या चिप आणि बोअर असतात, पण चलता है.
मेन्टोस ची गाढवाने मेन्टॉस
मेन्टोस ची गाढवाने मेन्टॉस नाकारण्याची फारच सुन्दर आहे..
लेमन मोबाईल. पापा आणि त्या
लेमन मोबाईल. पापा आणि त्या पांढर्या साडीतल्या ललना... खूप आवडली.
http://www.youtube.com/watch?
http://www.youtube.com/watch?v=NolRVtrkrl8
सर्वात सुन्दर आणि अप्रतिम अॅड...........कॉड्बरी.................बहुतेकानी उल्खेखलेली..........
Pages