झकास पैकी हळवा-डींकाचे लाडू खाऊन,आणी बेबीला आईकडे सोपवून शांत झोप /डुलकी घ्यायची तिची ऐष लवकर्च संपली. तिचे आई वडील भारतात परत गेले.
आता घरात फक्त ती ,छोटया आणि छोट्या पेक्शा फार लहान नसलेलं बाळ्. बाबा चे ऑफीस,आणी परत पार्ट टाइम कॉलेज चाललेले.सगळा दिवस "थाम्ब माझ्या बाळाना आंघोळ घालते..थांब माझ्या बाळाना कपडे घालते..थाम्ब माझ्या बाळाना जेवू घालते...." सारख्या चिउताइसारखा भूर उडून जायचा.मोठ बाळ रडायचं..आता आई वेळ देत नाही म्हणून आणी छोट्याला रडायला काही कारण नसायचं..
बघता बघता दिड वर्ष गेलं.आणी एकदा भारतवारी झाली. ती अजूनी मुलांच्यातच्...तिच्याएवढ्या आया किंवा तिच्या मुलान्च्या वयाच्याच मुलांच्या आया ,मस्तपैकी मुलाना आजी आजोबांकडे पोचवून नोकरीवर गेलेल्या. सगळं कसं झकास चालू होतं भारतात...
थोडीशी लाज वाटली तिला आपली.!.शिवाय त्या बायकांचा हेवाहि वाटला.!!..थोड्या किव करणारया नजरा दिसल्या तर थोड्या आश्चर्य करणारया...आपण किति मागासलोय अस वाट्लं! मग भराभर विचार केला..आता पुरे हे ...!
परत आल्यावर झपाझप जॉब सर्च!:)
जॉब मिळाल्यावर तिला मस्त वाटलं--एकतर घरात राहून कंटाळलेल्या जिवाला बाहेर जायला मिळणार् होतं अन शिकलो आहोत्..ते आता फुकाचे जाणार नाही अस्ं वाटून तिची अस्मिता सुखावत होती. संसारातल्या आर्थिक गरजा आता कमी टोचतील म्हणुनही जिवाला बरं वाट्लं असेलच की!
-----------
दोघेही चिनु,मनु डे केअरला जाऊ लागली. पिल्लांना डे केअर मध्ये दोन वेगवेगळ्या वर्गात बसवलं जायचं..मग धाकटं पिल्लू रडायचं खूप! दिवसभर आई दिसायची नाही..आणी काचेतून दादा दिसतो पण त्याच्याकडे जाऊ देत नाहीत..म्हणून आणखी...मग त्याला टाईम आउट मिळायचे! हळू हळु सगळे सरावले किन्वा तत्सम!
------------------------------आता
आई सन्ध्याकाळी दमून आली की पहिल्यांदा पिलांना जवळ घेते...आणी जेवणाच्या टेबलवर जेवता जेवताच पिल्लं झोपून जातात...तिला वाईट वाईट वाटते...बाबाला तर घरी यायला रात्रच !... तिला कधी कधी वाटते...कशाला हा अट्टाहास? तो तर पुर्ण गड्बड्लेला..एकिकडे तिला धिर देतो ,मदत करतो,एकिकडे मुलाना आई मिळत नाही म्हणून हळहळतो पण..!
------------------------------------
ऑफीस मधून घरी यायला तिला उशीर होतोय्,घड्याळाचा काटा आणी तिचा अस्वस्थपणा पुढे पुढे..साडेसहाला डे केअर बन्द होतंय्...सगळि मुले सहाला निघून जातात्..उरतात फक्त ही दोघं..त्यात छोटा झोपतो..पण मोठं चार वर्षाचं पिल्लू
गजांना धरून आईची वाट पहात एकटंच उभं असतं..उशीर झाला पिक अप ला तर मिस कंटाळते..कधी तर सरळ वैतागतेही...
------------------------------------------
आज तर -----ओ,माय गॉड्...ट्रॅफिक..पार्कीन्ग लॉट झालंय...तिच्या डोळ्यासमोर फक्त पिल्लं...कन्टाळलेली..दमलेली..पेंगूळलेली...
तिची हिरकणी झालेली... पुढे ट्रॅफिकचा बुरुज्... अन्धारायला लागलेलं....आणी जिव खाऊन अमेरिकेतली हिरकणी बुरुज उतरायला लागलेली...!
छान प्रयत्न... नवीन काळातील
छान प्रयत्न... नवीन काळातील हिरकणी आवडली. पुलेशु.
आवडलं ... अन पटलही..
आवडलं ... अन पटलही..
छान. मुलं भराभरा मोठी
छान.
मुलं भराभरा मोठी होतात.
आपल्यापुढे आपण केलं ते बरोबर की चूक हे प्रश्न चिऊताईपुढे फेर धरु लागतात.
आवडले!
आवडले!
आवडली.
आवडली.
छान. आईच्या मनाची घालमेल
छान. आईच्या मनाची घालमेल प्रभावीपणे मांडलीये.
सुरेख मांडलीयेस आईच्या मनातली
सुरेख मांडलीयेस आईच्या मनातली घालमेल.. कथेचं टायटल ही छान आहे,अप्रोप्रिएट
धन्यवाद.
धन्यवाद.
खरच माझ्याच मनातल्या भावना
खरच माझ्याच मनातल्या भावना लिहिल्यास तू..
वाईट वाटतं खरंच यातल्या लहान
वाईट वाटतं खरंच यातल्या लहान मुलांचं.. अगदी डोळे भरून आले.. हे सगळे करणार्या हिरकणींना सलाम....
माझी गोष्ट अशीच होती काही महिन्यांपूर्वी ... पण आता स्वखुशीने घरी थांबलेय पिल्लुसाठी... त्यातच आनंद वाटतोय. असे वाटतेय हे आधीच केले असते तर.
मी लहान असताना माझी आई अपडाऊन
मी लहान असताना माझी आई अपडाऊन करायची (वाई-सातारा )
तेव्हा गाड्याही(एस टी) फारशा नव्हत्या आणि फ्रिक्वेन्सीही फार वाईट होती.. आणि गाड्या पोचायला वेळही खूप लागायचा.
त्यामुळे मिळेल ती गाडी, कितीही गर्दी असली तरी, वेळप्रसंगी मिळतील त्या गाड्या बदलून, शेवटच्या पायरीवर उभी राहून आई रात्री ७:३०/७:४५/ ८ ला घरी पोचायची. यायची तेव्हा ह्या सगळ्या दगदगीनं दमलेली असायची.. पण ताई/मी वाट बघत बसलेल्या असायचो. मग घरातली कामं, आम्हाला जेवायला घालणं, हे सगळं करताना आमच्याशी गप्पा, आमची भांडणं सोडवणं वगैरे चालू असायचं.. गोष्टी सांगितल्याशिवाय मी जेवायचेच नाही - मग दररोज गोष्टींचा कार्यक्रम - त्या सगळ्या गोष्टींमधे (जवळपास दररोज) हिरकणीची गोष्ट असायलाच लागायची मला आणि त्याचं शेवटंच वाक्य "आणि जशी हिरकणी तिच्या बाळासाठी बुरुज उतरून आली, तशीच आई (माझं आणी ताईचं नाव) साठी सातारवरून आली.." हे वाक्य आलंच पाहिजे
त्यामुळे खूप आत स्पर्श करणार्या गोष्टींपैकी एक हिरकणीची गोष्ट आहे माझ्यासाठी..
हिरकण्या खरच.... काही बुरुज
हिरकण्या खरच....
काही बुरुज परिस्थितीनं बांधलेले.... काही आपणच. तरीही उतरायला प्रत्येक लागतोच....
छान जमलाय लेख, नोरा.
छान लिहिलं आहे. नावपण आवडलं.
छान लिहिलं आहे. नावपण आवडलं. अगदी यथार्थ.
छान लिहिलय !
छान लिहिलय !
छान आहे
छान आहे
वा मस्त टीपल्यात मानसिक भावना
वा मस्त टीपल्यात मानसिक भावना व चढउतार.
छान!! आईची आठवण आली....
छान!! आईची आठवण आली....
हम्म्म.. पण खर्र खर्र सांगू,
हम्म्म.. पण खर्र खर्र सांगू, -
ती जेव्हा जॉब करत होती तेव्हा सारखं वाटायचं, घरी असतो तर आत्ता पिल्लूसाठी हे केलं असतं, हे खाऊ घातलं असतं, हे खेळलो असतो, तिथे नेलं असतं. आणि मग तो विचार पिच्छा सोडायचा नाही. मग त्या 'न केलेल्या' १० गोष्टींची भरपाई म्हणून २ गोष्टी तरी पिल्लूला रोज मिळायच्याच. मग पिल्लू जाम खूष व्हायचं अन ती पण. दोघी मिळून रात्री झोपताना १५ मिनीट तरी त्यांचं खूसूखुसू असायचं. रोज इंटरनेट वर त्या त्या वयोगटासाठीचे खेळ, खेळणी बघायचे, घरी जाऊन मग त्याच्याशी जवळीक साधणारे खेळ घरीच असलेल्या वस्तूंमधून तयार करणं, किंवा वेळ मिळेल तसं दुकानात जाऊन त्या त्या गोष्टी/पुस्तकं आणणं. सोमवारपासून वेळ मिळणार नाही म्हणून लगेच उघडून समजावून सांगणं / खेळणं असं सगळं करायची ती. मैत्रिणींशी बोलून पण नवीन्-नवीन जागा माहीत करुन घ्यायची. तिथे पिल्लूला नेऊन कधी क्ले-मॉडेलिंग, कधी काही आर्ट असे सगळे करायची. ऑफीसातून येताना भाजी घ्यायला पण पिल्लू असायचंच तर उत्साहाने पिल्लूला सगळं दाखवायची, भाज्या, त्यांचे रंग, त्यांचं टेक्स्चर, फळं, हातगाड्या. पिल्लूला पण मग सगळ्या भाज्या/फळं आवडायला लागली होती. पिल्लूला डे-केअर ला सोडताना गाडीत तिची गाणी दोघी मोठ्यांदा म्हणायच्या, सिग्नलला गाडी उभी राहीली की आजूबाजूच्या दुकानांची-जाहीरातींची नावं पिल्लूला पाठ होती. शिवाय कधी कधी गाडीत एफ्-एम वर गाणी लावून म्युझिक वरुन गाणी ओळखायचं काम पिल्लू करायचं, ओम्-शांती-ओम ची गाणी पिल्लूला फार आवडायची. शिवाय पिल्लूला मराठी मित्र्-मैत्रिणी असावे म्हणून रोज संध्याकाळी बागेत न्यायची जिथे तिला पण मराठी मैत्रीणी, पुण्याच्या सख्या भेटायच्या अन मन हलकं व्हायचं. रोज पिल्लूला घाई-घाईत आंघोळ करावी लागते म्हणून विकेंडला भरपूर पाणी/ट्ब्/खेळणी/पुस्तके घेउन पिल्लू मजा करायचं.
आठवडा सुरू झाला की जमणार नाही म्हणून खूप गोष्टी शनिवार-रविवार करायची, अन दिवसभर जमत नाही म्हणून सकाळी अन संध्याकाळी पण खूप काही करायची. आपण नोकरी करतो याचा फटका त्या पिल्लाला बसायला नको हेच सतत डोक्यात असायचं त्यामुळे पिल्लासाठी खूप केलं जायचं, अगदी मनापासून.
पण या सगळ्यात ती पार पार दमून जायची. पिल्लूसाठी करायच्या गोष्टी स्वखुशीने करत असली तरी बाकी घरच्या जबाबदार्या होत्याच की. इतर कामे, पाहुणे, समारंभ, शिवाय कोणी आले तर त्यांना इकडे तिकडे फिरवणे, असे काय काय असायचेच. पार मेटाकुटीला यायचा तिचा जीव. जरा सुट्टी आली की दोघांच्या आईबाबांच्या घरी जाण्या-येण्यात पिल्लूची तब्येत बिघडायची, मग आल्यावर परत १-२ दिवस सुट्टी. मधे-अधे पण पिल्लाचं आजारपण म्हणलं की हिची सुट्टी ठरलेली. ऑफीसातून कायम लोकांच्या नजरा चुकवत ६ च्या ठोक्याला घरी. ऑफीसात जास्त जबाबदारी घेता येत नाही म्हणून कायम ओशाळवाणे.
असे करता करता एक दिवस नोकरी दिली सोडून.
पण आता ती पिल्लूंसाठी ( हो, आता तिच्याकडे चिवचिवायला २-२ पिल्लं आहेत ) तेवढं सगळं करते का , जे तिला नोकरी करत असताना करावंसं वाटत होतं ? निदान तेवढं तरी करते का , जे ती अपराधी भावनेतून करत होती ? ...... नाही.
का होतं असं ? का नाही ती आधीइतकी स्वतःची शक्ती वापरत ? का नाही तितकं स्वतःला झोकून देत ? तिचं मन तिला खातंय का नोकरी करत नाही म्हणून ? की आता परत कधी नोकरी करता येईल का याची भिती आहे ? का नाही संपूर्ण प्रयत्न करत मुलींसाठी ?
की आता तिच्यातली आगच विझली आहे ? नोकरी करताना 'नोकरी करुनही मी हे सगळं करु शकते' हे स्वतःला दाखवायची जिद्दच आता लोपली आहे ? 'आता घरी आहे तर करणारच' अश्या इतरांच्या मानसिकतेमुळे करण्याचा उत्साहच हरवून बसलीये ? ती स्वतःला घाबरतेय की इतरांना ?
म्हणून कधीकधी वाटतं, व्हावं हिरकणीच आणि पेलावं सगळं.
छान लिहिलय
छान लिहिलय
कुठंतरी आत आत कालवलं! कसं हे
कुठंतरी आत आत कालवलं! कसं हे सगळं करता तुम्ही आया? हॅट्स ऑफ टू यू अॅण्ड टू मदर्स लाईक यू.
मवा- छान लिहीलं आहेस.
मवा- छान लिहीलं आहेस.
नोरा आवडलं... मवा मनापासुन
नोरा आवडलं...
मवा मनापासुन पटलं ..
धन्यवाद. मित्र
धन्यवाद. मित्र मैत्रिणींनो.
मवा: तू लिहिलं आहेस ते पटलच.तू मांडलेला विचार एक स्वतंत्र विषय होऊ शकतो. मला फक्त आई म्हणून जाणवलं होतं कि ही घालमेल फक्त मूळ बिन्दू आहे,ज्यावर मला क्लिक झालं आणी नेमकं तेच हायलाईट करत कथा लिहिली.
नोरा, अगं तुझ्या कथेविषयी मला
नोरा, अगं तुझ्या कथेविषयी मला काहीच नाही म्हणायचं गं. ती 'तुझी' कथा आहे. तुझी म्हणजे, तुला जाणवलेली.
मी फक्त त्याचा पुढचा भाग लिहीलाय, अनेक शक्यतांपैकी एक.
इतरांचे कथेचे उत्तरार्ध नक्कीच वेगळे असतील. प्रत्येकाच्या स्वभावानुसार अन परिस्थिती नुसार ते बदलणार. म्हणजे सगळे चांगले (?) असूनही केवळ 'आपण आर्थिक द्रूष्ट्या स्वतंत्र नाही' ही जाणीव एखादीच्या मनाला पोखरत असेल, तर दुसरीचा 'मुले शाळेत गेल्यावर आपले काय' हा विचार. किंवा एखादीला त्या दगदगीच्या जंजाळातून सुटका झाल्याचा आनंद. असे अनेक पैलू आहेत पूर्वार्ध अन उत्तारार्धालाही.
मी इथे ते लिहीलं कारण एक बाजू कळली की वाचणारा माणूस कधीकधी भावनिक होऊन सारासार विचार करायची संधी सोडतो, म्हणून फक्त दुसरी बाजू दाखवण्याचा प्रयत्न.
असो, तुझ्या कथेवर इतके लिहीले ते कदाचित चुकले असू शकेल, स्वतंत्ररित्या मांडू शकले असते हा विषय, पण एकदम मनात आले अन् लिहीले.
मवा: <<मी फक्त त्याचा पुढचा
मवा: <<मी फक्त त्याचा पुढचा भाग लिहीलाय, अनेक शक्यतांपैकी एक.
इतरांचे कथेचे उत्तरार्ध नक्कीच वेगळे असतील. प्रत्येकाच्या स्वभावानुसार अन परिस्थिती नुसार ते बदलणार. म्हणजे सगळे चांगले (?) असूनही केवळ 'आपण आर्थिक द्रूष्ट्या स्वतंत्र नाही' ही जाणीव एखादीच्या मनाला पोखरत असेल, तर दुसरीचा 'मुले शाळेत गेल्यावर आपले काय' हा विचार. किंवा एखादीला त्या दगदगीच्या जंजाळातून सुटका झाल्याचा आनंद. असे अनेक पैलू आहेत पूर्वार्ध अन उत्तारार्धालाही.
मी इथे ते लिहीलं कारण एक बाजू कळली की वाचणारा माणूस कधीकधी भावनिक होऊन सारासार विचार करायची संधी सोडतो, म्हणून फक्त दुसरी बाजू दाखवण्याचा प्रयत्न.>>
अगं,मला पण असच, हेच वाटलेलं तुझं आधीच पोस्ट वाचून. तू ते नेमक्या शब्दात इतकं नेमकं लिहिलस.त्यासाठी खरेच बरे वाटले ,"अगदि अगदी" वाटले.
<<असो, तुझ्या कथेवर इतके लिहीले ते कदाचित चुकले असू शकेल, स्वतंत्ररित्या मांडू शकले असते हा विषय, पण एकदम मनात आले अन् लिहीले.>> बद्दल मात्र मला सान्गायचेय की नाही ग ,इथे लिहिलेस ते मला खूप आवडले.माझ्या वर्च्या पोस्ट्मध्ये मला काय म्हणायचय ते मला नीट लिहिता आले नाही. आणी कदाचित ते थोडे ए़कांगी झाले बहुतेक. सॉरी ह. गैरसमज नसावा.
असे करता करता एक दिवस नोकरी
असे करता करता एक दिवस नोकरी दिली सोडून.
पण आता ती पिल्लूंसाठी ( हो, आता तिच्याकडे चिवचिवायला २-२ पिल्लं आहेत ) तेवढं सगळं करते का , जे तिला नोकरी करत असताना करावंसं वाटत होतं ? निदान तेवढं तरी करते का , जे ती अपराधी भावनेतून करत होती ? ...... नाही.
का होतं असं ? का नाही ती आधीइतकी स्वतःची शक्ती वापरत ? का नाही तितकं स्वतःला झोकून देत ? तिचं मन तिला खातंय का नोकरी करत नाही म्हणून ? की आता परत कधी नोकरी करता येईल का याची भिती आहे ? का नाही संपूर्ण प्रयत्न करत मुलींसाठी ?
की आता तिच्यातली आगच विझली आहे ? नोकरी करताना 'नोकरी करुनही मी हे सगळं करु शकते' हे स्वतःला दाखवायची जिद्दच आता लोपली आहे ? 'आता घरी आहे तर करणारच' अश्या इतरांच्या मानसिकतेमुळे करण्याचा उत्साहच हरवून बसलीये ? ती स्वतःला घाबरतेय की इतरांना ?
म्हणून कधीकधी वाटतं, व्हावं हिरकणीच आणि पेलावं सगळं.>>>>
माव..अगदी आगी माझ्या मनातलं लिहिलंस.. मी अजून नोकरी सोडली नाहीये कारण ह्या दोन्ही बाजू मला माहितेय आणि बघितल्या आहेत .. त्या अपराधी भावनेमुळे डोळ्यात तेल घालून मुलांना वाढवतो असं वाटतं.. पण जीव तेवढाच मेटाकुटीला येतो....रोज रात्री झोपताना विचार येतो मात्र सोडावी म्हणून !!
.. पण मला वाटतं त्याच्या हि पुढची एक बाजू असू शकते.. अर्थात तू म्हणतेस तसं ती आग काही जणींनी तशीच ठेवली आहे आणि मिळालेल्या वेळेचा अजून चांगला उपयोग करून एक मध्य काढला आहे.. घरी एखादा व्ययसाय किवा आवडेल ते करण्यात.. आणि मुलं मोठे झाल्यावर परत काम सुरु करण्यात ..मला स्वतःला तरी चाळीशीत गेल्यावर जी रिकामेपणा ची किवा माझी कोणाला गरज नाही ह्या भावनेशी खेळायची इच्छा नाहीये ..!!!
नोरा लेख छान झाला आहे
..
..
नोरा खुपच छान लिहल आहेस.
नोरा खुपच छान लिहल आहेस. आताच्या परिस्थितीला साजेसा ...:स्मित:
<<काही बुरुज परिस्थितीनं बांधलेले.... काही आपणच. तरीही उतरायला प्रत्येक लागतोच....>> खरय
मवा आणि प्रित अगदी अगदी माझ्या मनातलच लिहल आहे ...
मी पण कित्येकवेळा नोकरी सोडायचा विचार करते, पण पुढचा विचार करते तेव्हा मनच होत नाही नोकरी सोडण्याचा. ( अर्थात माझी जॉईंट फॅमिली आहे म्हणून )
आणि माझाही जॉब काही भरपुर वेळेचा नाही आहे, घरी असे पर्यंत सगळा वेळ ( घरातली कामे आवरत आवरत ) त्याच्यासाठीच असतो. पण मनापासून खरच वाटत , व्हावं हिरकणीच आणि पेलावं सगळं.
खुप खुप भिडलं ... अगदि मनातला
खुप खुप भिडलं ... अगदि मनातला उतरवुन लिहिलये.. नोरा सगळ्या हिरकण्यांच्या मनामध्ये हेच असतं... रोज रोज तेच तेच, कधी पिल्लूला पिकअप करुन घरी जातो असा होत.. मन नुसतं खात असतं स्वताला, की का आणि कशासाठि हि पिल्लूला शिक्षा.. पण शेवटी हारून एकच उत्तर.. पिल्लूसाठिचं... :(:(
मवा, माझं हि अगदि अगदि असच असतं.. सेम टु सेम....