तूर्वांगं (तूर वांगं)

Submitted by डॅफोडिल्स on 10 January, 2011 - 07:29
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

मध्यम आकाराची वांगी ६,
तूरीचे दाणे १ मोठ्ठी वाटीभरून (तूरीच्या हिरव्यागार टपोरे दाणे असलेल्या शेंगांचे दाणे भरपूर निघतात आणि चविष्ठही असतात.
कांदे २,
एक छोटास्सा टोमॅटो,
सुके खोबरे (पाव वाटीचा तुकडा किंवा अंदाजे पसाभर आकाराचा तुकडा)
तिळ २ चमचे,
धणेपूड, जिरेपूड प्रत्येकी एक छोटा चमचा,
१ चमचा कांदा लसूण मसाला,
१ चमचा गोडा(काळा) मसाला,
(मी कोल्हापूरातून येताना अभिरुचीचे आणले आहेत हे मसाले.. एकदम मस्त आहेत)
अर्धा चमचा लाल मिर्ची पावडर(किंवा कमी जास्त आवडीप्रमाणे)
आलं लसूण पेस्ट १ छोटा चमचा,
चविप्रमाणे मिठ,
हळद चिमुट्भर, फोडणीचे साहित्य -जिरं, मोहरी, हिंग

क्रमवार पाककृती: 

सुकं खोबरं आणि तिळ खमंग भाजून घ्यावेत.
कांदा, टोमॅटो बारिक चिरून घ्यावेत.
वांगी स्वच्छ धुउन, देठ कापून देठाच्या बाजुने चिरा(प्लस साईन) देउन चिमुट्भर मिठ घातलेल्या पाण्यात ठेवावित.
वाटण : भाजलेले तिळ, खोबरे, बारिक चिरलेला थोडा कांदा आणि टोमॅटो एकत्र वाटून घ्यावेत. वाटताना वेगळे पाणि घालायचि गरज पडत नाही. कांदा आणि टोमॅटोमुळे.

कढईत तेल तापवून जिरं, मोहरी हिंग घालून खमंग फोडणी करावी.
मग त्यात बारिक चिरलेला कांदा टकून चिमुट्भर हळद घालून कांदा गुलाबीसर परतून घ्यावा.
मग त्यात आलंलसूण पेस्ट आणि तुरीचे दाणे टाकून दोन मिनिटे परतावे एक वाफ काढावी.
आता सगळे मसाले तिखट, कांदा लसुण मसाला, गोडा मसाला वगैरे घालून नंतर वाटण घालून दाणे साधारण शिजू लागले आणि वाटणाला किंवा ग्रेव्हीला तेल सुटू लागले की वांगी घालावी. मग थोडे परतून जेवढे पातळ हवे त्याप्रमाणे पाणि आणि चविप्रमाणे मिठ घालून भाजी शिजु द्यावी.
भाजी तयार झाल्यावर थोडीशी बारिक चिरलेली कोथींबिर वरून भुरभुरावी. आणि गरमागरम फुलके, भाकरी सोबत किंवा नुसत्या भातासोबतही छान लागते.

turvang.jpg

वाढणी/प्रमाण: 
३-४ जणांसाठी
अधिक टिपा: 

कांदा-टोमटो वाटणात वाटल्याने ग्रेव्हीला दाटसर पणा चांगला येतो आणि रंगही छान येतो.
शक्यतो कोथिंबिर वाटणात घालू नये. त्यामुळे काळसर रंग येतो.
गोडा मसाला काळा असतो.. म्हणून मी त्याच्या बरोबरीने कांदा लसूण मसाला वापरते.
गोडा मसाला नसेल तर गरम मसाला घालुनही चव चांगली झणझणित होते.
सुक्या खोबर्‍या ऐवजी ओले खोबरेही वापरु शकता.

माहितीचा स्रोत: 
माझे सत्यासाठी प्रयोग :डोमा:
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

काय दिसतेय एकदम.. लालभडक जीवघेणे. कोणीतरी मस्त भाकरी द्या रे सोबत.... :लाळ गाळणारी भावली:

ओऽह तुर्वांग बद्दल माझी ट्युब आत्ता पेटली. ते तूर आणि वांगं असे आहे तर. मला हे खरच असे पदार्थाचे नाव असते असे वाटले होते (गौरांग, देवांग सारखे तुर्वांग) Proud
डॅफो कृती मस्त आहे पण इथे तूरीच्या ओल्या शेंगा मिळत नाहीत त्यामुळे करता येणार नाही.

लय भारी संपदा! मास्तरांनी काढलेला फोटो अफाटच असणार!!
रूनी - तुर्वांग - Proud -- महान Wink

इथे फ्रोझन सेक्शनमधे लिलवा तूर नावाने तूरीचे पाकीट मिळते आजच आणलेय Happy

सर्वांना पुन्ह्यांदा धन्स Happy
रुनी Rofl गौरांग....... मला ना................ नविन रेसिपी सुचलीये........ आणि त्याचं नाव गौरांग....... गवार वागं Proud
मला वाटलं होतं की तूर्वांगं लोकांना चायनिज वाटू शकेल पण... गौरांग Lol

Back to top