मध्यम आकाराची वांगी ६,
तूरीचे दाणे १ मोठ्ठी वाटीभरून (तूरीच्या हिरव्यागार टपोरे दाणे असलेल्या शेंगांचे दाणे भरपूर निघतात आणि चविष्ठही असतात.
कांदे २,
एक छोटास्सा टोमॅटो,
सुके खोबरे (पाव वाटीचा तुकडा किंवा अंदाजे पसाभर आकाराचा तुकडा)
तिळ २ चमचे,
धणेपूड, जिरेपूड प्रत्येकी एक छोटा चमचा,
१ चमचा कांदा लसूण मसाला,
१ चमचा गोडा(काळा) मसाला,
(मी कोल्हापूरातून येताना अभिरुचीचे आणले आहेत हे मसाले.. एकदम मस्त आहेत)
अर्धा चमचा लाल मिर्ची पावडर(किंवा कमी जास्त आवडीप्रमाणे)
आलं लसूण पेस्ट १ छोटा चमचा,
चविप्रमाणे मिठ,
हळद चिमुट्भर, फोडणीचे साहित्य -जिरं, मोहरी, हिंग
सुकं खोबरं आणि तिळ खमंग भाजून घ्यावेत.
कांदा, टोमॅटो बारिक चिरून घ्यावेत.
वांगी स्वच्छ धुउन, देठ कापून देठाच्या बाजुने चिरा(प्लस साईन) देउन चिमुट्भर मिठ घातलेल्या पाण्यात ठेवावित.
वाटण : भाजलेले तिळ, खोबरे, बारिक चिरलेला थोडा कांदा आणि टोमॅटो एकत्र वाटून घ्यावेत. वाटताना वेगळे पाणि घालायचि गरज पडत नाही. कांदा आणि टोमॅटोमुळे.
कढईत तेल तापवून जिरं, मोहरी हिंग घालून खमंग फोडणी करावी.
मग त्यात बारिक चिरलेला कांदा टकून चिमुट्भर हळद घालून कांदा गुलाबीसर परतून घ्यावा.
मग त्यात आलंलसूण पेस्ट आणि तुरीचे दाणे टाकून दोन मिनिटे परतावे एक वाफ काढावी.
आता सगळे मसाले तिखट, कांदा लसुण मसाला, गोडा मसाला वगैरे घालून नंतर वाटण घालून दाणे साधारण शिजू लागले आणि वाटणाला किंवा ग्रेव्हीला तेल सुटू लागले की वांगी घालावी. मग थोडे परतून जेवढे पातळ हवे त्याप्रमाणे पाणि आणि चविप्रमाणे मिठ घालून भाजी शिजु द्यावी.
भाजी तयार झाल्यावर थोडीशी बारिक चिरलेली कोथींबिर वरून भुरभुरावी. आणि गरमागरम फुलके, भाकरी सोबत किंवा नुसत्या भातासोबतही छान लागते.
कांदा-टोमटो वाटणात वाटल्याने ग्रेव्हीला दाटसर पणा चांगला येतो आणि रंगही छान येतो.
शक्यतो कोथिंबिर वाटणात घालू नये. त्यामुळे काळसर रंग येतो.
गोडा मसाला काळा असतो.. म्हणून मी त्याच्या बरोबरीने कांदा लसूण मसाला वापरते.
गोडा मसाला नसेल तर गरम मसाला घालुनही चव चांगली झणझणित होते.
सुक्या खोबर्या ऐवजी ओले खोबरेही वापरु शकता.
मस्त! धन्यवाद!
मस्त! धन्यवाद!
धन्स काय रे ? तुला विपुत लिंक
धन्स काय रे ? तुला विपुत लिंक टाकायला गेले त्याआधीच तु इथे पोहोचलास
मस्त, इथे तुरीच्या शेंगा
मस्त, इथे तुरीच्या शेंगा मिळायची शक्यता कमी आहे...शोधाव लागेल.
काय दिसतेय एकदम.. लालभडक
काय दिसतेय एकदम.. लालभडक जीवघेणे. कोणीतरी मस्त भाकरी द्या रे सोबत.... :लाळ गाळणारी भावली:
छान दिसतंय गं डॅफो.
छान दिसतंय गं डॅफो.
मीच देते साधना यावं की वो
मीच देते साधना यावं की वो हिकडं आमच्याकडं अक्कीरोटी खायला.
छान रेसिपि!!
छान रेसिपि!!
डॅफो, मस्त रेसिपी शेअर
डॅफो, मस्त रेसिपी शेअर केल्याबद्दल धन्यवाद!
सहीच दिसतेय डॅफो कोणीतरी
सहीच दिसतेय डॅफो
कोणीतरी मस्त भाकरी द्या रे सोबत<<<<<<<<<<< रोट पण चालेल मला
मि कालच केले होते. काय मस्त
मि कालच केले होते. काय मस्त झाले होते, नवरा व मुली एकदम खुश झाले. धन्स
तुर्वांग्याचं दुसरं व्हर्जनही
तुर्वांग्याचं दुसरं व्हर्जनही सह्ही आहे!
हे हे शेफ एक्सपर्ट होऊ
हे हे शेफ एक्सपर्ट होऊ लागलेत सही दिसतय एकदम
अॅन्ड फोटोशेफ ऑफ द मंथ
अॅन्ड फोटोशेफ ऑफ द मंथ अवॉर्ड गोज टू ... बित्तुबंगा.
ओऽह तुर्वांग बद्दल माझी ट्युब
ओऽह तुर्वांग बद्दल माझी ट्युब आत्ता पेटली. ते तूर आणि वांगं असे आहे तर. मला हे खरच असे पदार्थाचे नाव असते असे वाटले होते (गौरांग, देवांग सारखे तुर्वांग)
डॅफो कृती मस्त आहे पण इथे तूरीच्या ओल्या शेंगा मिळत नाहीत त्यामुळे करता येणार नाही.
इथे मिळणार नाहीत ह्या शेंगा
इथे मिळणार नाहीत ह्या शेंगा त्यामुळे फोटोवरच समाधान मानावं लागेल.
डॅफो, बित्तु, दोघांचेही फोटो जबरी.
मी तुरीच्या दाण्यांऐवजी मटार
मी तुरीच्या दाण्यांऐवजी मटार घालून बघीन छान दिसतोय रस्सा.
मस्त रेसिपी, वांगी सुबक
मस्त रेसिपी, वांगी सुबक दिसताहेत.
रुनी आणि सायो, तुरीचे दाणे
रुनी आणि सायो, तुरीचे दाणे इंडियन ग्रो. च्या फ्रोझन सेक्शनमध्ये मिळतात बहुतेक.
लय भारी संपदा! मास्तरांनी
लय भारी संपदा! मास्तरांनी काढलेला फोटो अफाटच असणार!!
रूनी - तुर्वांग - -- महान
इथे फ्रोझन सेक्शनमधे लिलवा तूर नावाने तूरीचे पाकीट मिळते आजच आणलेय
सर्वांना पुन्ह्यांदा धन्स
सर्वांना पुन्ह्यांदा धन्स
रुनी गौरांग....... मला ना................ नविन रेसिपी सुचलीये........ आणि त्याचं नाव गौरांग....... गवार वागं
मला वाटलं होतं की तूर्वांगं लोकांना चायनिज वाटू शकेल पण... गौरांग
मस्त फोटो!! (गौरांग, देवांग
मस्त फोटो!!
(गौरांग, देवांग सारखे तुर्वांग>>> रुनी
व्वा मस्त दमदार रेसीपी !
व्वा मस्त दमदार रेसीपी ! तोंपासु !