मासे १९) खुबे

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 11 January, 2011 - 02:13
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

खुबे
२ कांदे चिरुन
लसुण सात-आठ पाकळ्या ठेचुन
हिंग, हळद
मसाला १ ते दोन चमचे
अर्धा चमचा गरम मसाला
१ टोमॅटो चिरुन
थोडी कोथिंबीर
मिठ
तेल

क्रमवार पाककृती: 

चिखलात सापडल्यामुळे ह्याच्या कडांमध्ये थोडी माती असते म्हणून खुबे ६-७ पाण्यांतुन स्वच्छ धुवुन घ्यावेत व त्याच्या लेवलच्या थोड कमीच पाणी घेउन ते उकडून घ्यावेत. पाणी एवढ्यासाठी कमी टाकतात की उकळल्यावर भाताप्रमाणे ह्याचा फेस वरती येतो व पाणी जास्त झाले तर भांड्यातुन खाली जातो. आणि आपल्याला ओटा पुसण्याचे अजुन कष्ट ताबोडतोब करावे लागतात. खुबे उकडले की काही खुब्यांची तोंडे आपोआप उघडतात. हा गर असाचही खाता येतो. (लहानपणीचे स्वानुभव, अजुनही मी लहानच आहे. बर्‍याचदा उकडलेले तोंडात टाकते) आता उकडलेल्या खुब्यांमधिल पाणि काढुन टाकायचे व थोड्या वेळाने खुब्याचा गर काढुन घ्यायचा. जे मिटलेले असतात त्यांना दोन बोटांनी बाजुला सारुन त्यातील गर काढता येतो. थोडे कडकच असतात शिंपले. पण जे जोर लावुनही निघत नसतील असे खुबे खोलण्याचा प्रयत्न सोडून द्यायचा (नाहीतर उगाच वरवंट्याने फोडाल)कारण त्यात माती भरलेली असते. जर खुबे मोठे असतील तर ते विळीवर चिरुन घ्यावेत. कधी कधी ह्या खुब्यांमध्ये चिंबोर्‍याच पिल्लुही असत त्याच्या सोबतीला ते असेल तर काढुन टाकायच.

आता भांड्यात तेलावर लसुण फोडणीला घालायचा व त्यावर कांदा घालुन चांगला बदामी रंग येउ द्यायचा. मग त्यावर हिंग, हळद, मसाला घातुन थोड परतवुन टोमॅटो घालायचा. टोमॅटो परतवुन खेब्यांचे गर, गरम मसाला, मिठ, कोथिंबीर घालुन परतायचे. झाकण ठेउन टोमॅटो थोडा शिजु द्यायचा (खुबे आधी उकडतो तेंव्हाच शिजलेले असतात). मग परत एकदा परतुन गॅस बंद करायचा. अजुन तिखट हवे असल्यास टोमॅटो घालताना मिरची मोडून घालायची. वासही चांगला येतो. लहान मुलांना तर हे खुपच आवडतात.

वाढणी/प्रमाण: 
अपुरेच पडतात.
अधिक टिपा: 

खुबे हे खाडीच्या दलदलीत (चिखलात) सापडतात. खुबे पकडण्यासाठी खुबे पकडणारी माणस लाकडी फळी घेउन चिखलात उतरतात. फळीवर गुडगे ठेउन फळीचा आधार घेउन हे खुबे गोळा केले जातात. ह्या खुब्यांची शिंपली सारखी पांढरी शिंपली आपल्याला समुद्र किनारी सापडतात. कदाचीत ते समुद्रातील खुबे असतील. त्याच्या बाहुल्या, तोरणे बाजारात मिळतात. दलदलीच्या ह्या टाकलेल्या शिंपल्यांना आम्ही लहानपणी भातुकलीच्या खेळात चुल करण्यासाठी घ्यायचो. तसेच भांड म्हणूनही खेळ करायचो. तिन शिंपल्या तिन टोकांना एकत्र लावुन ह्याची चुल करायची व वरती एक शिंपलि भांड म्हणून ठेवायची.

खुब्यांमध्ये कॅल्शियम भरपुर असते. तसेच हे पचायलाही थोडे जडच असतात. खुब्यांचे कालवणही करतात. त्यात आलकोलही घालतात. पण सुकेच जास्त चांगले लागतात.

माहितीचा स्रोत: 
आजी
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हे आहेत खुबे. वरुन दिसायला काळे, चिखल भरलेले असले तरी आतील गोळा स्वच्छ व चविष्ट असतो.
khube.JPG

खुब्यांच्या लेवलच्या थोडे कमी पाणी ठेवलेले. नाहितर महापुर येतो उकळीचा.
khube1.JPG

उकडताना असा फेस वरती येतो.
khube2.JPG

तोंड उघडलेले खुबे (ह्यांच्या जागी मोती असते तर?)
khube3.JPG

असे कष्ट करुन काढलेले खुबे. (पण ह्याला खुबड्यांइतके कष्ट नक्कीच लागत नाहीत).
khube4.JPG

थांबा शिजतय अजुन.
khube5.JPG

हा शिजले आता.
khube6.JPG

मस्त गं.... तोंपासु एकदम..
खुब्यातले मांस तिस-यापेक्षा मोठे दिसतेय. तिस-यातले मांस काढुन शिजवावे लागत नाही.
असे उकडल्याने चव निघुन नाही ना जात?

निकिता तिसर्‍यांच्या शिंपल्या वरुन पुर्ण गुळगुळीत असतात. खुब्यांना चिरांची डिझाईन असते.
तसेच तिसर्‍यांचा गर पांढरा काळा असतो तर खुब्यांचा गर काळा आणि ऑरेंज असतो.

तोंपासु दिस्तेय! Happy
(मी नॉनव्हेज सोडुन दिलय पण या जागुमुळे लवकरच सुरु करावं लागेल असं दिस्तय!! Angry )

तुझे मासेपुराण वाचले की मला नेहमी बाजारात जाऊन मासे घ्यायची सुरसुरी येते आणि घरी जाईपर्यंत जिरते Sad खुबे खायची अगदी मनापासुन इच्छा होत आहे. जावे काय आज संध्याकाळी बाजारात???

अरे वा डॉ. मस्तच अनुभव. मला खुप इच्छा आहे जाळ टाकुन मासे पकडायची खुब्यांची चिखलामुळे अजुन झाली नाही. एकदा तरी जाईनच पकडायला.
आर्या मार्गशिर्ष धरला होतास अस समज आणि सुटला समजुन सुरुवात कर. मी अजुन भरपुर छळणार आहे तुला.

आज मंगळवार पण बघुन भुक लागली आणि एक पाप झाले

काही पाप झाले नाही. मासा हा देवाचा प्रथमावतार आहे.. निर्धास्तपणे कधीही त्याचे चिंतन करा आणि पोटात उदार आश्रय द्या.

साधना त्या निळ्या बाहुल्याची तु आज जिरव आणि आणच आज खुबे.
अवल धन्स.
मनस्विनी मी पण वरती लेखनात आधी लहानपणी टाकल आणी मग कंसात अजुनही तेच करत असल्याच नमुद केलय. नेहमी खरे बोलावे आपण अगदी पाळतोय.

आणतेच गं .. पोटात आगडोंब उसळलाय.. आता त्याच्यावर पालेभाजी टाकुन शमवते Sad संध्याकाळी मात्र खुबे मस्ट....
मनु तु पण ये खायला....

आज तलफ आलीये... आज काय खरे नाय खुब्यांचे.. (बाजारात मिळूदेरे देवा.. बेलापुरच्या मार्केटात कधीमधी पाहिलेत यांना).. भ्रमरा, तुला फोनवरुन वर्चुअल खायला घालु काय?? गोरेगाव वरुन बेलापुर लांब पडेल रे तुला....

बॅड लक. मार्केटात खुबे नव्हते. म्हणुन मग रावस आणले आणि तलफ भागवली. पण खुब्याना सोडणार नाही असे. आज नही तो कल सही....

साधना, तु वाशीत रहातेस मग सेक्टर २ ला मस्त बाजार असतो ,तिथे हे सर्व मिळते(इति आईची एक मैत्रीण).

जागू, पाणी सुटले.

आम्ही खुबे अश्या रेसीपीने सुद्धा बनवतो,
http://www.maayboli.com/node/6579

अगं मी बेलापुरला राहते. काल बेलापुर गावातल्या बाजारात गेले. खुबे कुठेच नव्हते. शेवटी एका कोळणीला विचारल्यावर ती फिस्सदिशी हसली आणि म्हणाली, आता खुबे कुठले?? (मी म्हटले, अरे देवा, खुब्यांचाही सिजन असतो की काय???मग जागुला कुठे सापडले?????).. मग म्हणाली, आम्ही खुबे आणतो तेव्हा तुम्ही लोक येत नाहीत. खुबे असे रोजरोज येत नाहीत, अचानक सापडतात. म्हटले, बाई मला उद्या देशील का संध्याकाळी, तर म्हणाली सकाळी या ११ वाजता. आता ११ वाजता मी असते ऑफिसात आणि माझ्या घरच्या मंडळींना मासेबाजारातला वासही सहन होत नाही. मग कसे करावे?? रविवारीच धडक मोर्चा न्याव्या हे बरे. दिवाळे गावातल्या मार्केटात जाईन आता. तिथले मार्केट मोठे आहे. तिथे खुबे पाहिलेत मी ब-याचे वेळेला.

मनस्विनी अग तु जी लिंक दिली आहेस त्याला आम्ही शिवल्या किंवा तिसर्‍या म्हणतो. त्याचिही रेसिपी मी दिली आहे त्याची ही लिंक
http://www.maayboli.com/node/17476

सुमे अग तुझ केळवण खुब्यांनीच करेन कधी येतेस ? ताई कडे येशिल तेंव्हा ये. ताई कडे सकाळी जेव माझ्याकडे संध्याकाळी. दोन्ही वेळेला माझ्याकडे राहीलीस तरी चालेल.

साधना सिझन वगैरे नसतो ग. पण कदाचित ओहोटीच्या वेळेत काढत असतील. तरीपण मी बाजारात गेले की कोळणींना विचारेन आणि सांगेन इथे.

Pages