"क्या नाम ऐ तेला?"

Submitted by एम.कर्णिक on 3 January, 2011 - 12:57

रोज संध्याकाळी प्रॅममधून बंटीबाबांची एक रपेट कॉलनीतल्या क्रिकेट ग्राउंडवरून असते. छोट्या छोट्या मुलांना घेऊन कितीतरी आईवडील तिथे आलेले असतात. दोन तीन रशियन फॅमिलीज देखील असतात त्यांच्यात. बंटीच्या प्रॅमच्या वाटेवरच बाकांवर आईवडील असतात बसलेले आणि त्यांची गोंडस मुलं मजेत आवतीभवती बागडत असतात. बंटीबाबा नेहमी प्रॅममधे बसल्याबसल्या मान वळवून वळवून, कुतुहलाने, काही तरी प्रश्न पडल्यासारखं त्यांच्याकडे बघतात.

बाबा, तुम्मी बनुताईला शांगा काऽय तली
भूऽऽल नाई नेत मला आल्यावल घली
तुम्मी आनि आबा कशे नेता लगेच उचलुन
तिलाच फक्त लावायलाऽ लागते लालीगोली

नेते जेव्वा, तेव्वा नेते एकाच थिकानी
जिते अश्तात खेलत तिच्या खाश मैतलनी

क्लिकेत ग्लाऊंदवऽल भेत्तात मैतल्नी तिच्या
"कित्त्त्त्ती क्यूऽऽत" मनत माजा घेतात गाल्गुच्चा

कशं शांगू त्याना, बाबा, दुक्तो माजा गाल
पप्पी त्या घेतात तेव्वा होतो लालीलाल

आनि वल शांग्तात आप्ली पप्पी घे मनून !
लाज वात्ते ना ओ मला, हश्तात शग्ले बगून

बाबा, एक मुल्गी येते, हम्प्ती दम्प्ती दब्बु
दोले निले निले आनि गाल गुब्बु गुब्बु

गोली गोली पान आनि केश शोनेली
शग्ले मन्तात की ती आए लशियामदली

बाबा शांगा, नाव कशं विचालू तिला?
"वॉत्च्योल नेम?" मनू का? की "क्या नामऐ तेला?"

गुलमोहर: 

माझ्या लेकीला ऐकवलीतल बोलेल येड्याचे बाबा .. किती बोबला बोल्तो.

मस्त कविता. मुकुंद. अगदी वर्षानं तुझी कविता वाचली असेल.

गोड, अप्रतिम, क्यूट, सर्व विशेषणांच्या पलिकडील रचना.
या व अशा अनेक रचनांकरता मनःपूर्वक धन्यवाद

कर्णिक, आपण लिहलेल्या बालकवीता मी दरवेळी आवर्जुन वाचतो.
कुठेतरी हरवलेलं बालपण, निरागसता पुन्हा मिळाल्याचं क्षणिक का होईना समाधान लाभतं.
ही कविता पोस्ट केल्यापासून बर्‍याचदा वाचलिये.. अभिप्रायही दिलाय.
आत्ता पुन्हा राहवत नाही म्हणून हा अभिप्राय.
बनुताई अन् बंटीबाबा असंच आमचं हरवलेलं बालपण शोधून देत राहो ही प्रामाणिक इच्छा! Happy
आभार!

Pages