पक्षी (लेकीने काढलेला)

Submitted by अनुश्री. on 7 January, 2011 - 12:38

काल माझी मुलगी मिहिका (वय ५)डिसनी चा अप पिक्चर बघत होती (disney up) त्यात असलेला पक्षी आणि त्याची पिले तिने बघितली. लगेच पिक्चर संपल्यावर आई मी तुझ्यासाठी गंमत काढते म्हणुन त्यातला पक्षी आणी त्याचे पिलु काढले आहे.
दिवसातले २ तास तरी ती रोज चित्रे काढत असते. तिला खुप आवड आहे चित्रकलेची.

IMG_20110106_172456_2.jpg

गुलमोहर: 

छान आहे.
पिल्लू अंड्यातून नुकतंच बाहेर आलंय वाटतं. Happy
आई आणि पिल्लाचे रंग अगदी सारखे आहेत. दुरंगी चोचसुद्धा.

धन्यवाद सगळयांना...
मिहिका शाळेतुन आल्यावर तिला प्रतिक्रिया वाचुन दाखवेन. उड्याच मारेल ती.:)

दिनेशदा मी तिची आणखी काही चित्रे टाकेन इथे. ती सध्या चित्रकलेच्या क्लास ला जाते तिथे ती १ तास १का चित्रा साठी देते तिची ती चित्र बघुन मला वाटतच नाही की हि एवढी सुंदर चित्रे काढेल.
हे वरच चित्र तिने घड्याळ लाउन १० मिनीटात काढल आहे (रंगवुन पुर्ण)
तिची क्लास मधली चित्र इथे नक्की टाकेन.

मस्तच काढलय हं! आणि कोरा कागदच पाहिजे असा हट्ट पण नाहीये, मस्त पटापट मिळेल त्या कागदावर काढून मोकळी. शाब्बास.

खूप छान.
पक्षाचे रंग पण खूप छान आणि ब्राईट आहेत.
सध्या आमच्या कडे 'अप' सारखा सुरु असतो, मुलाला बघायला खूप आवडतो आजोबा, दादा, बर्ड, उडणारे घर आणि डॉगी चा मुव्ही. असाच छान रंगीत आहे त्यातला पक्षी.
शाबास मिहिका.

तुझ्या पिल्लूचं कौतुक वाटलं..कित्ती कित्ती गोड चित्र !! इमॅजिनेशन तर अप्रतिम आहे Happy

Pages