Submitted by निंबुडा on 4 January, 2011 - 06:16
स्पाँडिलायसिस या आजाराविषयी इथे माहिती द्याल का??
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
स्पाँडिलायसिस या आजाराविषयी इथे माहिती द्याल का??
माझ्या साबांना गेल्या २-३
माझ्या साबांना गेल्या २-३ महिन्यांपासून एकाच हाताला मुंग्या येणे हा प्रकार होत होता. गेल्या महिन्यात अधून मधून चक्कर येणे चालू झाले. (चक्कर येण्याची फ्रीक्वेंसी फार नाही.) हल्ली हल्लीच काही तपासण्या केल्यावर स्पाँडिलायसिस ची सुरुवात आहे असे निदान झाले आहे.
मला या आजारविषयीची खालील प्रश्नांच्या अनुषंगाने माहिती देता का?
१) संभावित कारणे
२) काळजीचे कारण कितपत असते?
३) काय काय उपाययोजना (किंवा खबरदारीचे उपाय) करावी जेणेकरून त्रास वाढणार नाही?
४) एकदा निदान झाले म्हणजे हा आजार जन्मभर पुरतो का?
५) डॉ. नी काही टॅबलेट्स लिहून दिल्यात व सांगितले की आता या टॅबलेट्स कायमच्या घ्यायच्या.
६) इतरही काही उपयुक्त माहिती जी तुम्हाला share करावीशी वाटेल ती!
मलाही तो त्रास आहे. समजलेली
मलाही तो त्रास आहे. समजलेली माहिती:
१. मानेचे व्यायाम करणे अत्यावश्यक आहे.
२. या रोगात अनेक प्रकार होतात. वेदना, चक्कर, मुंग्या वगैरे!
३. मानेवर मसाज घ्यायचा असल्यास अत्यंत परफेक्ट तंत्र माहीत असणे अत्यावश्यक!
४. भार येणार नाही याची काळजी घ्यावी लागते.
धन्यवाद!
-'बेफिकीर'!
निंबुडा सतत एका पोझिशन मध्ये
निंबुडा
सतत एका पोझिशन मध्ये मान राहणे, वजन वाढणे ह्यामुळे स्पाँडीलिसिस होतो.
वेळीच उपाय केल्यावर काळजी नसते. पण ह्याचा त्रास खुप होतो. साधारण २ ते ३ महिने बर व्हायला लागतात.
वजन उचलायचे नाही. डॉ. चा उपचार आणि सल्ला. ते सांगतील ते व्यायाम
काळ्जी घ्यावी लागते परत न उदभवण्यासाठी.
अजुन सविस्तर काही माहीती तुला उद्या मेलने कळवते.
नीलवेद नामक सूत्रधाराकडून
नीलवेद नामक सूत्रधाराकडून आत्ताच समजलेल्या बातमीनुसारः
स्पाँडिलायसिस हा मानेचा वा कंबरेचा ही असू शकतो.
यावर
१) बाईक्/स्कूटर सारख्या वाहनांवर बसणे टाळणे
२) मानेला झटका (जर्क) बसेल अशा सडन मूव्हमेंट्स टाळणे
३) झोपलेल्या स्थितीतून उठताना आधी कुशीवर वळून मग उठणे
४) जमिनीवर बसलेल्या स्थितीतून उठताना आधार घेऊन उठणे
या खबरदार्या घ्याव्यात.
माझ्या साबांना माझ्या सव्वा
माझ्या साबांना माझ्या सव्वा वर्षाच्या मुलाला सतत कडेवर घेण्याची सवय आहे. त्याला भरवताना, घरातल्या घरात फिरवताना किंवा बाहेर फिरायला घेऊन गेल्यास सतत कडेवर उचलूनच घेतात. तर त्यामुळे हाताच्या एका ठराविक शीरेवर सतत प्रेशर येऊन हा त्रास उद्भवू शकतो का?? सुरुवातीला आम्हाला एकाच हाताला मुंग्या येण्याचे हेच कारण वाटले.
नीलवेद च्या माहितीनुसार इनिशिअली काळजी घेतल्यास त्रास आटोक्यात राहू शकतो. पण या आजारामुळे मणक्याच्या सांध्यांमधली गॅप वाढते ती परत कमी होत नसल्याने हा आजार पूर्णपणे नाहीसा होत नाही. उलट पुरेशी काळजी न घेतल्यास पुढे मानेला पट्टा आणि त्याहीपुढे ट्रॅक्शन वगैरे उपाययोजना कराव्या लागतात.
हा त्रास अनुवंशिक असतो का??
निंबुडा, अगं हा अनुवांशिक
निंबुडा, अगं हा अनुवांशिक नाही... व्यायामाचा अभाव, तासनतास एकाच पोझिशनमध्ये राहणे, वजन, सतत उभे राहणे, योग्य चप्पल न वापरणे यामुळे तो होऊ शकतो... ही थोडीच कारणं आहेत... स्पॉन्डिलिसिस म्हंजे मणक्याच्या हाडांमधे गॅप होऊन शीर त्यात अडकणे... कधी कधी वजन जास्त असेल तर शीर दबली जाऊन चालणं मुश्किल होतं.
सर्वात पहिला आणि तातडीचा उपाय म्हंजे त्यांना चांगल्या ट्रेनरच्या हाताखाली योगासनं शिकायला सांग... किंवा अनेक हॉस्पिटल्समध्ये फिजिओ थेरपी उपलब्ध आहे... ती मस्ट आहे. व्यायाम हा हवाच.
त्याचबरोबर आयुर्वेदातही त्यावर चांगले उपचार आहेत... पंचकर्म केल्याने फरक पडू शकतो... पण योग्य डॉक्टरकडे जाणे. नाहीतर आयुर्वेदाच्या नावाखाली फसवणूकही होते. तू ठाण्याच्या आसपास राहतेस का? तुला हवं असेल तर मी काही चांगले डॉक्टर तुला सुचवू शकते... वजन कमी करणंही आवश्यक...
वजन कमी करणंही आवश्यक... >>>
वजन कमी करणंही आवश्यक... >>> वजनाचा काही प्रॉब्लेम नाहीये. बारीकच आहेत त्या.
पंचकर्म केल्याने फरक पडू शकतो... पण योग्य डॉक्टरकडे जाणे. नाहीतर आयुर्वेदाच्या नावाखाली फसवणूकही होते. तू ठाण्याच्या आसपास राहतेस का? तुला हवं असेल तर मी काही चांगले डॉक्टर तुला सुचवू शकते. >>> प्लीज सुचव गं.
मोठी ऑपरेशन्स करणार्या
मोठी ऑपरेशन्स करणार्या सर्जन्सना हा आजार प्रोफेशनल हॅजार्डस या स्वरूपात होऊ शकतो...
वजनाचा काही प्रॉब्लेम नाहीये.
वजनाचा काही प्रॉब्लेम नाहीये. बारीकच आहेत त्या.
>>> अॅनिमिक आहेत का? त्यामुळेही होऊ शकतो... तू ठाण्यात किंवा त्याच्या जवळपास राहतेस का?
अॅनिमिक आहेत का? त्यामुळेही
अॅनिमिक आहेत का? त्यामुळेही होऊ शकतो...>>> नाही. अॅनिमिकही नाहीत. तश्या त्यांच्या तब्येतीच्या तक्रारी फारशा नाहीत. टच वुड. फक्त हल्लीच कॉलेस्टरॉलवर नियंत्रण ठेवा असा सल्ला डॉ. कडून मिळालाय.
तू ठाण्यात किंवा त्याच्या जवळपास राहतेस का? >>> हो अगं. मी कल्याणमध्ये राहते. मला ठाण्याच्या आसपासच्या चांगल्या आयुर्वेदिक डॉ. चे पत्ते/ नंबर्स इ. दे. कल्याणमधले असतील तर फारच बरे.
सध्या सोनावणे म्हणून ऑर्थोपेडीक सर्जन आहेत. त्यांच्याकडे जायला फॅमिली डॉ. नी सुचविले आहे. त्यांची लाईन ऑफ ट्रीटमेंट काय आहे ते साबा त्यांच्याकडे जाऊन आल्या की इथे पोस्टेन.
ओक्के... तुझ्या मेलवर डॉ. उदय
ओक्के... तुझ्या मेलवर डॉ. उदय कुलकर्णी यांचा नंबर देतेय.. ते ठाण्यात असतात... ते तुला कदाचित कल्याणच्या एखाद्या डॉक्टरबद्दलही सांगू शकतील... पण हे चांगले डॉक्टर आहेत...
माझ्या एका मैत्रिणीचा नवराही चांगला आयुर्वेदिक डॉक्टर आहे... पण तिचा फोन लागत नाहीये...
बाकी तू डॉ. मिहिर बापट किंवा डॉ. सचिन जाधव यांच्याकडेही जाऊ शकतेस तसंच काही वाटलं तर... डॉ. मिहिर हा डॉ. रवी बापट यांचा मुलगा आहे...
डॉ. मिहिर बापट किंवा डॉ. सचिन
डॉ. मिहिर बापट किंवा डॉ. सचिन जाधव हे ठाण्यातले डॉ. आहेत का??
नाही गं... डॉ. मिहिर मुंबईत
नाही गं... डॉ. मिहिर मुंबईत नेमके कुठे आहेत हे मला माहीत नाही.. पण ते एक उत्तम ऑर्थोपेडिक सर्जन आहेत... डॉ. सचिन सध्या नवी मुंबईत आहेत... मला रूमाटाईड आर्थरायटिस डिटेक्ट झाला तेव्हा डॉ सचिननेच सुरूवातीची ट्रीटमेंट केली होती... तेव्हा तो जे जे मध्ये होता...
निंबुडा वेळीच खबरदारी घे.
निंबुडा वेळीच खबरदारी घे. माझ्या आईला १५ वर्षांपूर्वी हया रोगाचे निदान झाले पण तात्पुरते बरे वाटते आता बर्च झाले आहे या निष्काळजीपणामुळे तिचा शेवटचा मणका आता पार बाहेर आला अहे. बरं वयही जास्त असल्याने ऑपरेशन शक्य नाही. सुदैवाने पुण्यातील ख्यातनाम फिजिओथेरपिस्ट डॉ. शारंगपाणी यांच्या सल्ल्याने आता बरंच बरं आहे पं तिला जास्त चालायचे नाही, खाली वाकायचे नाही, लाटायचे नाही, जास्त वेळ परतायचे नाही, पाखडायचे नाही इ.इ. खूप बंधनं आहेत. पार वैतागली आहे ती याला....
ठाण्यात डॉ स्नेहल देशपांडे म्हणूनही एक फिजिओथेरपिस्ट आहेत. त्या महाराष्ट्र फिजिओथेरपी संघाच्या प्रमुख होत्या असं ऐकीवात आहे. बर्याच जणांना त्यांचा गूण आला आहे.
मला त्यांचा नंबर मिळाला की कळवते पण तत्पूर्वी तूही बघ कुठे आहे त्यांचे क्लिनिक ठाण्यात. बर्रेच आधी अपॉइंटमेंट घ्यावी लागते असे ऐकले आहे.
या प्रॉब्लेमसाठी
या प्रॉब्लेमसाठी अॅक्युपंक्चरचा खूपच फायदा होतो. काही दिवस उपचार घेऊन पहा. ही बाह्य उपाययोजना असल्याने यात औषधे, पथ्य असे काहिही नसते.
स्पाँडिलायसिस वेगवेगळ्या
स्पाँडिलायसिस वेगवेगळ्या प्रकारचा असतो. त्याची कारणे पण वेगवेगळी असतात. तेव्हा ऑर्थोपेडिक सर्जनला दाखवणेच योग्य. हा आजार (डिसीज) असेल किंवा डिसॉर्डरही (शरीराची झीज्...इ.) सांगोवांगीच्या उपायांपेक्षा तज्ञांचा सल्ला घेणेच योग्य.
वरच्या पोस्ट न वाचताच
वरच्या पोस्ट न वाचताच प्रतिसाद देते आहे. माझ्या बहिणीला स्पाँडिलायसिसचा भयंकर त्रास होता. पण अॅक्युप्रेशरचे उपचार, नियमीत व्यायाम, पुरेसा आराम आणि वजनावर नियंत्रण हे सगळे केल्याने आता अजिबात त्रास नाही. माझ्या मावशीला एक पाऊल चालणे मुश्किल झाले होते पण तिला सुद्धा ह्याच उपायांनी फरक पडला.
निंबुडा, तिने ज्यांच्याकडे ट्रीटमेंट घेतली त्यांचा नंबर देऊ शकेन तुला हवा असेल तर.
प्रतिसाद दिलेल्या सर्वांना
प्रतिसाद दिलेल्या सर्वांना धन्स
काल माबोवर यायला जमले आही. त्यामुळे बरेचसे प्रतिसाद आज वाचते आहे.
ठमे, तुझा मेल मिळालाय गं.
सध्या साबा कल्याणमधल्या एका ऑर्थोपेडीक डॉ. ला दाखवून त्यांनी सजेस्ट केलेल्या ठिकाणी ट्रॅक्शनसाठी जात आहेत. बघू कसा गुण येतो ते. बाकी वरच्या प्रतिसादांचा सारांश त्यांना आज सांगेन.
पाठीत/कंबरेत उसण भरण्याचा आणि स्पाँडीलायसिस का संबंध आहे का??
पाठीत/कंबरेत उसण भरण्याचा आणि
पाठीत/कंबरेत उसण भरण्याचा आणि स्पाँडीलायसिस का संबंध आहे का??
>>> नाही... पाठीत उसण तुम्ही चुकीच्या पद्धतीने झोपल्याने, चालल्याने, जड काही उचलल्याने वगैरे भरू शकते... ती तात्पुरती असते
वरचेवर भरणारी उसण हे
वरचेवर भरणारी उसण हे स्पाँडीलायसिसचे प्राथमीक लक्षण असू शकते.
निंबुडा, डोंबिवलीत डॉ. गोखले
निंबुडा, डोंबिवलीत डॉ. गोखले म्हणुन ऑर्थओपेडिक आहेत. माझ्या वडिलांचे स्लीपडिस्कचे ऑपरेशन त्यांनीच केले. खुप चांगले आहेत. कस्तुरी प्लाझा मधे त्यांचे हॉस्पीटल आहे.
स्पाईन इंजेक्शन हा पण उपाय
स्पाईन इंजेक्शन हा पण उपाय आहे.
माझ्या मामीने घेतले आहे तिला खुप उपयोग झाला.
सर्वाय्कल व लम्बर असे दोन
सर्वाय्कल व लम्बर असे दोन प्रकार आहेत.
अॅलोपथी मध्ये गोळ्या व व्यायाम व शेवटी ऑपरेशन हे प्रकार आहेत.
सुरुवातीलाच लक्ष दिल्यास कन्ट्रोल होतो.आयुर्वेदात हमखास उपाय आहेत असे म्हणतात्.त्यात पन्चकर्म महत्वाचे आहे.
मला सर्वायकल चा त्रास आहे.सकाळी ९ ते दुपारी २ पर्यन्त डाव्या हाताला,पायाला व चेहेर्यावर मुन्ग्या येतात पण इतर कुठलाही त्रास -जसे loss of strength,loss of sensation,disorientation etc नाही.
मूळ-डॉक्टर चा कल सर्जरी टाळण्याकडे असला पाहिजे.
मी डॉ सारन्गपाणी याना ही दाखवीले आहे.त्यान्च्या व्यायामानी फरक पडला आहे.सातत्याने करणे आवश्यक आहे.ते खूप त्रोटक हि बोलतात.त्यामुळे frustrating होते.त्यात मी परगावचा!!
माझा MRI झाला आहे व त्यात स्पयनल कॉर्ड व कॅनॉल मध्ये गॅप कमी आहे असे एका स्पयनल तज्ञाचे म्हणणे आहे तर बाकी दोन ऑर्थोपेडिशियन म्हणतात हे साठीच्या आस पास कॉमन आहे व गोळ्या अन व्यायामाने कमी होईल.
सारान्श
व्यायाम ,व अॅल्लोपाथी काही दिवस सुरुवातीस -बरोबरच आयुर्वेद व नन्तर आयुर्वेद डॉ च्या सल्य्याने अॅलोपथी सोडणे अशी लाईन ऑफ अॅक्शन आहे. आता सुधारणा आहे,
हाय लोक्स! माझ्या मानेच्या x
हाय लोक्स!
माझ्या मानेच्या x ray मधे सर्वाय्कल स्पोन्डेलायसिस ची सुरुवात असे आले आहे ,माझ्या हाताला सतत मुन्ग्या वैगरे येतात , खांदा दुखतो! विरार पासुन जवळ असे डॉ. कुणी सुचवेल का? शक्यतो आयुवेदीक उपचार बरे असे वाट्ते , काय करावे?
आयुर्वेदिक उपचार हा उपयोगी
आयुर्वेदिक उपचार हा उपयोगी ठरतो.परंतु तत्पूर्वी एक्स रे,एम आर आय इ जाचण्या अलोपॅथिक डॉ च्या सल्ल्याने करून घ्या.आयुर्वेदाने २ ते ३ महिन्यात उत्तम रिलीफ मिळतो.त्याबरोबर व्यायाम ही चालू ठेवा.व्यायाम योग शिक्षक अथवा फिजियो थेरपी वाले सांगतील्.सातत्याने करा म्हणजे पुढे त्रास होणार नाही.
मी स्वानुभवावरून बोलतोय्.मला हा त्रास आहे पण पूर्णतः कंट्रोल मध्ये आहे.
बरोबरच पुण्याच्या डॉ शारंगपाणी यांस दाखवा.ते अतिशय योग्य व्यायाम सुचवतील्.थोडे महाग आहेत्(रु.८००):(
बाय द वे,नाव पण
बाय द वे,नाव पण बदला.--थंड---
या त्रासास थंडी सोसत नाही.
LOL
रागवु नका-गम्मत केली
बरोबरच पुण्याच्या डॉ
बरोबरच पुण्याच्या डॉ शारंगपाणी यांस दाखवा>>>>>>>>>>>>>> मग तर मला ते जास्तच महागात पडेल हो!
कबीर बाग मठ संस्था ही
कबीर बाग मठ संस्था ही नारायणपेठेत असून अश्या प्रकारच्या सर्व व्याधींवर योगोपचाराने उपाय केले जातात. अय्यंगार योगाचा यात अवलंब केला जातो. मला स्वतःला १० दिवसांच्या उपचाराने नव्वद टक्के तरी फ़रक पडला. त्यांनी शिकवलेले व्यायाम रोज करण्यास सांगितले आहे.
http://www.kabirbaug.com/home.htm
केबल टीवीवर टेली शॉपिन्ग
केबल टीवीवर टेली शॉपिन्ग किन्वा तत्सम प्रकारात सकाळी संधी सुधा नावाच्या औषधाची जाहिरात येते. बरोबर पेशंट्चे मनोगतही आहे. कोणाला हवे असल्यास घेता येइल. अर्थात मला अनुभव नाही व त्याच्या किंमतीची माहिती नाही.
बापरे..... मला गेले काही दिवस
बापरे.....
मला गेले काही दिवस ( २ महिने) रोज एकच हात दुखतो. साधारण कोपराच्या जाँईंट मधे.आणि काही वेळा हाताला मुंग्या पण येतात ( बोटांना).
माझी लेक झोपताना माझ्या हातावर डो़के ठेवते, आणि तिला सतत उचलुन घेतले जाते. ( वय ३ वर्शे)
त्या मुळे मी आधी लक्ष नाही दिले,
मला पण काही टेस्ट्स करायची गरज आहे का?
Pages