स्वरचित्र
स्वरचित्र - पुणे आकाशवाणी केंद्रावर दर रविवारी सादर होणारा एक विशेष कार्यक्रम.
मधली काही वर्षे हा कार्यक्रम काही कारणास्तव प्रसारीतच होत नव्हता... गेल्या चार महिन्यांपासून नविन स्टेशन डायरेक्टर आले आणि त्यांनी हा कार्यक्रम परत चालू केला...
महिन्याच्या दर रविवारी सकाळी बरोबर ८ वाजून ४० मिनिटांनी एक विशेष गीत पुणे आकाशवाणीच्या ७९२ किलोहर्ट्झ ह्या वारंवारितेवर म्हणजेच पुण्याच्या AM वाहिनीवर प्रसारीत केले जाते. ह्या गीताचे वैशिष्ट म्हणजे हे पूर्ण महिन्यासाठीचे विशेष गीत असते..
यंदा दिवाळी निमित्ताने दिवाळी स्पेशल स्वरचित्र सादर केले गेले... त्याचे शब्द होते कवयित्री. सौ निर्मला देशपांडे ह्यांचे तर गायले होते पुण्यातील सध्याची आघाडीची गायिका सायली पानसे हीने. आणि अर्थातच संगीत होते मायबोलीवर चित्रकला, रांगोळी, नखचित्र ह्या वेगवेगळ्या कला सादर करणार्या मनाकु१९३०(म. ना. कुलकर्णी) म्हणजेच माझ्या आजोबांचे...
आजोबांचे आकाशवाणीशी नाते ते जेव्हा पुण्यात पहिल्यांदा आले तेव्हापासूनचे... त्यांनी पहिले स्वरचित्र केले होते ते "मनातल्या त्या भावकळीची आज उमलली दले, क्षणांची अवचित झाली फुले" हे.. हे गीत होते कवयित्री वंदना विटणकर ह्यांचे.. तेव्हापासून आज पर्यंत त्यांनी साधारण १० तरी स्वरचित्र केली.. दर महिन्याला एकच संगीतकार असे असल्याने एकूण स्वरचित्रांचीच संख्या कमी आहे त्यामुळे प्रत्येक संगीतकाराच्या नावावर फारच थोडी स्वरचित्र असतात. आजोबांचे ह्या आधीचे स्वरचित्र झाले होते १२ वर्षांपूर्वी. त्याचे बोल होते "बनात आली बहार पिवळी उगाच हरिणी बावरली, उत्सव येता नवनवतीचा नव्हाळ काया कस्तुरली"
दिशांदिशांना उजळीत आली आली सोनपावली
आली शुभदा दीपावली आली शुभदा दीपावली
घनतिमीराला दूर सारुनी
अमृत शिंपीत कणाकणातूनी
चराचराला हर्षित करण्या शुभंकराही आली..
आली शुभदा दिवापली
वस्त्र मनोरम ते जरतारी
दीप सुखाचा धरुनिया करी
आनंदकंदा मधुर भाषिणी सोन पावली आली
आली शुभदा दिवापली
सदनांमधूनी प्रासादांतूनी
कष्टकर्यांच्या झोपडीतूनी
प्रकाश ज्योती फुलवीत आली सौख्यदायिनी आली
आली शुभदा दीपावली.
सारी बंधने टाकू तोडून
स्वागत करुया एकच होऊन
अज्ञानाचा नाश कराया ज्ञानदीप उजळीत आली
आली शुभदा दीपावली
साथसंगत -
संवादिनी - प्रसन्न बाम, बासरी - सुनील अवचट, व्हायोलिन - सौ. अंजली शिंगडे राव, तालवाद्य - पराग जोशी, तबला - माधव मोडक, की-बोर्ड - दर्शन जोग, सहगायक - चैतन्य जोगाईकर, सुरंजन खंडाळकर, पल्लवी सातव
ज्यांना हे गाणे ऐकायचे आहे त्यांनी संपर्कातून मला मेल करा... त्यांना पाठवण्यात येईल.
हेच गाणे तुम्हाला ह्या लिंकवर पण ऐकता येईल..
.
.
क्या बात है हिम्या, गाणं मला
क्या बात है हिम्या, गाणं मला मेल कर प्लीज.
आजोबांच आणि तुम्हा सगळ्यांच मनःपूर्वक अभिनंदन
सह्ही हिम्स मी संपर्कातुन
सह्ही हिम्स
मी संपर्कातुन ईमेल केलाय
वा छानच ! अभिनंदन रे , तुम्हा
वा छानच ! अभिनंदन रे , तुम्हा सगळ्यांचे अन खास आजोबांचे पुण्यातच असतात ना आजोबा ?
हिम्स सहीच , कित्येक दिवसात
हिम्स सहीच , कित्येक दिवसात आकाशवाणी ऐकणंच बंद झालंय. सध्या भारतात आहे तरी कामातून वेळ मिळत नाही अन संध्याकाळी घरी गेल्यावर झोपेची वाणी ऐकावी लागते.
संपर्कातून मेल करतो पाठवून दे हे गाणं. आजोबांच अभिनंदन.
हिम्याचे आजोबा रॉक्स ! खरंच.
हिम्याचे आजोबा रॉक्स ! खरंच.
धन्यवाद मंडळी... ज्यांना हवे
धन्यवाद मंडळी...
ज्यांना हवे आहे त्यांना गाणे मेल केले आहे..
हिम्या गाणं मिळालं...ऐकल
हिम्या गाणं मिळालं...ऐकल भारीये एकदम. पोरांना पण ऐकवल आणि त्यांनापण आवडलय कळव रे आजोबांना
हिम्स, कृपया मलाही पाठव.
हिम्स, कृपया मलाही पाठव.