चिकन लेग पिस गरजे नुसार लागतील तेवढे.
मॅरीनेड करण्या साठी :
घट्ट दही (अंदाजे दोन लेग पिस साठी १ चमचा)
लिंबु रस
आल, लसुण, पुदीना पेस्ट
मिठ
लाल तिखट
गरम मसाला
रंग हवा असल्यास तंदुर कलर किंवा कश्मिरी मिरची पावडर.
तळण्यासाठी
बटर किंवा तेल
सजावटीसाठी
कांद्याच्या रिंग, कोथिंबीर, लिंबाच्या फोडी.
चिकन लेग पिस ला दोन्ही बाजुनी सुरीने तिन चार तिरक्या चिरा पाडा. मॅरीनेड करण्याचे साहित्य चिकनला लावा व तिन ते चार तास मुरत ठेवा (फ्रिजमध्ये सकाळी ठेउन संध्याकाळी केले तरी चालेल). मुरल्यावर तेल लावलेल्या काचेच्या ट्रे मध्ये किंवा मायक्रोवेव्ह नॉनस्टीक तव्या मध्ये पिसेस ठेवा. वरुन पातळ केलेले बटर सोडा. ट्रे हाय रॅकवर ठेवा.
कॉम्बीनेशन (मायक्रोवेव्ह पॉवर ५०% + कन्व्हेक्शन २१० डिग्री) वर ८-१० मिनिटे चिकन ब्राउन होईपर्यंत ठेवा. ट्रे बाहेर काढा. सुरीने टोचुन पाहा. शिजलेले असेलच मग पिसेस उलटे करुन दुसर्या ट्रे मध्ये ठेवा कारण चिकनचे पाणी ट्रेमध्ये साठलेले असते. जर दुसरा ट्रे नसेल तर ते पाणी काढुन टाका. पिसेस उलटे करुन वरुन परत बटर सोडा. पॅन हाय रॅक वर ठेवा व ६-७ मिनीटे वरुन ब्राउन होईपर्यंत ग्रिल करा. झाली तयार तंदुरी. जर पेशन्स असतील तर आता पिसेस डिश मध्ये काढा. वरुन कोथिंबीर घाला, कांद्याच्या रिंग्ज व लिंबाच्या फोडी बरोबर सर्व्ह करा.
वरिल रेसिपी मायक्रोवेव्ह मधिल आहे. जर मावे नसेल तुम्ही निखार्यावर किंवा तव्यात तेल टाकुन फ्राय करु शकतात.
मॅरीनेड करताना कसुरी मेथिही टाकता येते.
बर्याच जणांचा मार्गशिर्ष
बर्याच जणांचा मार्गशिर्ष महिना सुटला असणार म्हणून दाबुन ठेवलेली रेसिपी आज वर आणत आहे.
चिकन लेग पिसला अश्या प्रकारे चिरा द्या. (शाकाहारींना हे पाहावणार नाही म्हणून त्यांनी पुढील चित्रे पहावित)
मॅरीनेड करण्याचे सामान एकत्र घ्यावे
अशा प्रकारे चांगले चोळून मुरत ठेवलेले पिस.
तंदुर करण्यासाठी पॅन मध्ये ठेवलेले पिस
कॉम्बिनेशन मध्ये भाजलेले लेग पिस (थांबा अजुन वेळ आहे)
ग्रिल करुन तयार झालेले लेग पिस (आता तुटून पडू शकता जर डेकोरेशन नसेल करायचे तर)
हवे तसे डेकोरेशन करा.
जवळून पाहा फडशाच पाडावासा वाटतो की नाही ?
मी पहीला ! मी पहीला ! आजचा
मी पहीला ! मी पहीला !
आजचा बुधवार तंदुर देवाच्या दर्शनाने सार्थकी लागला. जागू बरं झालं हि रेसीपी टाकलीस.
मस्त मस्त ! मोठ्ठा प्रश्न सुटला.
जवळून पाहा फडशाच पाडावासा
जवळून पाहा फडशाच पाडावासा वाटतो की नाही ?>> कमीतकमी २५ दिर्हाम्स मोजावे लागतिल आता.
जागू, रेसिपी भारी आहे पण मला
जागू, रेसिपी भारी आहे पण मला नाही गो चालणार
वॉव! जबरी! जियो! पुण्यात
वॉव! जबरी! जियो!
पुण्यात भावाकडे गेलं की तंदुरी हमखास होतेच होते.. टेरेसवर बार्बेक्यु स्टँडवर निखार्यांवर भाजल्यावर ऑस्स्स्स्म लागतं..हाsssssय!
मस्त!
मस्त!
जागु, किती ग अत्याच्यार करणार
जागु, किती ग अत्याच्यार करणार आहेस..... दुपारी ऑफिसमधे बसुन हे फक्त पहाताना किती त्रास होतो....
रच्याकने, एकदम तोंपासु कृती आणि प्रचि आहेत.... नक्की करुन बघणार....
लै भारी.. ३१ला हा मेनु होता
लै भारी.. ३१ला हा मेनु होता माझ्याकडे.....
उम्म्म! टेम्प्टींग!! बघितलं
उम्म्म! टेम्प्टींग!! बघितलं पाहिजे करुन!!
(रच्याकने, जागुडे तुझा नवरा ओव्हरवेट असेल ना गं? :P)
त्या चातकाला कुणीतरी लाळेर
त्या चातकाला कुणीतरी लाळेर बांधा रे
सुकी आज तुला तंदुर देवीने
सुकी आज तुला तंदुर देवीने आशिर्वाद दिलाय जा. पहिला मान तुझा. तुला आज तंदुरी खायला मिळेल. घरी जा आणि सामान घेउन तंदुरी बनव.
शुभांगी तुझ्यासाठी उद्या टाकते काहीतरी.
चिंगे हाय.......
शैलजा धन्स.
जागू
जागू
सखि नक्की करुन बचणार.... की
सखि नक्की करुन बचणार.... की बघुन वाचलीस ?
साधना सकाळच्या मेसेजवर मी उड्या मारल्या.
आर्या हो ग. मी सुद्धा. माझा नवरा हे अस केलेल मी खाउ घातल्यावर इतर दिवशी ओट्स खातो नाश्त्याला. मला मात्र ते गिळले जात नाही. तेंव्हा माझ्यामुळे नवर्याला खाण्याच्या बाबतीत किती सहन कराव लागत ह्याची मला जाणीव होते.
शुभांगी ते लाळेर नाही ग प्लास्टीकची पिशवीच लागेल.
माझ्या मनातले कसे कळले....मी
माझ्या मनातले कसे कळले....मी आजच असा विचार करत होतो.
जागुटले, रेसिपी मी नक्की
जागुटले, रेसिपी मी नक्की ट्राय केली असती नवरा-लेकींसाठी पण मी खाणार नाही आणि एवढ चमचमीत त्यांनी खाव आणि मी तोंड बघत बसाव हे कस बर चालेल
जागु, बघीतलस ना हे अस काहि
जागु, बघीतलस ना हे अस काहि बघुन किती टायपो होतात ते....
जागु, काहीतरी दया माया आहे का
जागु, काहीतरी दया माया आहे का नाही तुला?
कीबोर्ड भिजता भिजता वाचला.
सखी आशुतोष
सखी आशुतोष
इतक्यात खायला मिळणार नाहीये
इतक्यात खायला मिळणार नाहीये हे माहीत असुनही फोटो बघायला तिसरी चक्कर मारतेय इथे.
जागु
वॉव ....
वॉव ....
जागुताई वॉव, ३१लाच खाल्ले घरी
जागुताई वॉव, ३१लाच खाल्ले घरी करुन.. तरिही तोंपासु..
इतक्यात खायला मिळणार नाहीये
इतक्यात खायला मिळणार नाहीये हे माहीत असुनही फोटो बघायला तिसरी चक्कर मारतेय इथे >>>
जागू, मस्तच (असं करतात होय तंदुरी... :फिदी:)
चिंगे वार्या करत राहा खायला
चिंगे वार्या करत राहा खायला मिळे पर्यंत.
मामी, रुपाली, धन्स.
असं करतात होय तंदुरी...
हसु नको जास्त गपचुप खा नाहीतर मिळणार नाही काहीच.
जागु, तुझ्याकडे बिन बुलाया
जागु, तुझ्याकडे बिन बुलाया मेहमान बनुन यावंच लागेल!! अगदी तोपासु!
जागू , आहाहा ! मस्त ! पोट, मन
जागू , आहाहा ! मस्त ! पोट, मन भरलं बघ
शुभांगी अगं जागूने सांगितलेल्या रेसिपीत फक्त चिकन ऐवजी उकडलेला फ्लॉवर्/बटाटा/ कच्चा कांदा/टॉमेटो/सिमला मिरची घेतलस की मस्त व्हेज तंदूरी तयार! हाकानाका
मी तंदूरी करताना १६ गोष्टी घालते.
हळद, तिखट, मीठ,लवंग,दालचिनी (ही थोडी जास्तच),मिरे,धणे,बडीशेप,शहाजीरे,आलं,लसूण(भरपूर), मिरच्या,दही,लाल रंग,खसखस - हे सगळे वाटून घेणे मग त्यात ओवा टाकून यामसाल्यात चिकन मॅरिनेट करते. एकदम झणझणीत
मी हे करताना पायासकटची कोंबडी
मी हे करताना पायासकटची कोंबडी दुरुनच बघते आणि शूऽक शूऽक शूऽक करुन तिला पळवून लावते. मग बाकीचे साहित्य बाटलीत/मिसळणाच्या डब्यात /वाडग्यात परत भरुन ठेवते.
अश्विनी
अश्विनी
योगायोगाने कालच केलं होतं
योगायोगाने कालच केलं होतं तंदूरी चिकन. ह्यावेळी जरा चेंज म्हणून दतेम घातला थोडा. चांगली चव आली होती. फोटो छान आहेत जागू. चव पण छानच असेल. शंकाच नाही.
मस्तं एकदम... वाह..
मस्तं एकदम... वाह..
भ्रमर नक्कीच. अश्विनी मला
भ्रमर नक्कीच.
अश्विनी मला वाटल तु हे पाहुन इथे प्रतिक्रियाही देणार नाहीस. पण पाहील्याबद्दल धन्स.
अवल तुझ्या पद्धतीनेही आता करुन पाहीन.
प्रेडी दतम म्हणजे काय ?
अमि धन्स.
Pages