चिकन लेग पिस गरजे नुसार लागतील तेवढे.
मॅरीनेड करण्या साठी :
घट्ट दही (अंदाजे दोन लेग पिस साठी १ चमचा)
लिंबु रस
आल, लसुण, पुदीना पेस्ट
मिठ
लाल तिखट
गरम मसाला
रंग हवा असल्यास तंदुर कलर किंवा कश्मिरी मिरची पावडर.
तळण्यासाठी
बटर किंवा तेल
सजावटीसाठी
कांद्याच्या रिंग, कोथिंबीर, लिंबाच्या फोडी.
चिकन लेग पिस ला दोन्ही बाजुनी सुरीने तिन चार तिरक्या चिरा पाडा. मॅरीनेड करण्याचे साहित्य चिकनला लावा व तिन ते चार तास मुरत ठेवा (फ्रिजमध्ये सकाळी ठेउन संध्याकाळी केले तरी चालेल). मुरल्यावर तेल लावलेल्या काचेच्या ट्रे मध्ये किंवा मायक्रोवेव्ह नॉनस्टीक तव्या मध्ये पिसेस ठेवा. वरुन पातळ केलेले बटर सोडा. ट्रे हाय रॅकवर ठेवा.
कॉम्बीनेशन (मायक्रोवेव्ह पॉवर ५०% + कन्व्हेक्शन २१० डिग्री) वर ८-१० मिनिटे चिकन ब्राउन होईपर्यंत ठेवा. ट्रे बाहेर काढा. सुरीने टोचुन पाहा. शिजलेले असेलच मग पिसेस उलटे करुन दुसर्या ट्रे मध्ये ठेवा कारण चिकनचे पाणी ट्रेमध्ये साठलेले असते. जर दुसरा ट्रे नसेल तर ते पाणी काढुन टाका. पिसेस उलटे करुन वरुन परत बटर सोडा. पॅन हाय रॅक वर ठेवा व ६-७ मिनीटे वरुन ब्राउन होईपर्यंत ग्रिल करा. झाली तयार तंदुरी. जर पेशन्स असतील तर आता पिसेस डिश मध्ये काढा. वरुन कोथिंबीर घाला, कांद्याच्या रिंग्ज व लिंबाच्या फोडी बरोबर सर्व्ह करा.
वरिल रेसिपी मायक्रोवेव्ह मधिल आहे. जर मावे नसेल तुम्ही निखार्यावर किंवा तव्यात तेल टाकुन फ्राय करु शकतात.
मॅरीनेड करताना कसुरी मेथिही टाकता येते.
जागुले, माझ्या पद्धतीनेही
जागुले, माझ्या पद्धतीनेही करुन बघ ना
जागु मस्तच , आश्विनी
जागु मस्तच , आश्विनी
जागुडी आज तन्दुर चिकनचा बेत!
जागुडी आज तन्दुर चिकनचा बेत! जेवायला ये !
थंड कशी झाली तंदुर ? माझी
थंड कशी झाली तंदुर ? माझी आठवण काढलीस का ? फोटो टाक.
अग तुझ्या घरच्यांनी तुझी ही पोस्ट बघितली तर ?
नुतन धन्स.
अश्विनी
फोटो मस्त वाटताहेत अगदी.
फोटो मस्त वाटताहेत अगदी. निखार्यावर किती वेळ लागले साधारण ?
दतेम म्हणजे काय प्रकार ?
दतेम - नाशिकचा प्रसिद्ध दगडू
दतेम - नाशिकचा प्रसिद्ध दगडू तेली मसाला
देशी, निखार्यावर २०-३०
देशी, निखार्यावर २०-३० मिनीटे लागतील.
रुनी
जागु, हायला अगं कसला बीबी
जागु,

हायला अगं कसला बीबी आहे.. मस्त एकदम..
वाचुन तोंपासु झालं एकदम.... चिकन च्या ऐवजी मी बटाटे बिटाटे ईमॅजिन केले
दक्षे वांगी आणि भेंडी पण करु
दक्षे वांगी आणि भेंडी पण करु शकतेस.
जागु, एकदम यम आहेत फोटोज.
जागु, एकदम यम आहेत फोटोज. ग्रीलसाठी काय सेटिंग करु? मला कॉम्बिनेशन पेक्षा ते जास्त आवडेल. थॅन्क्स.
स्वगत : ह्म्म्म्म... नुस्ते
स्वगत : ह्म्म्म्म... नुस्ते बघुन काय उपयोग??? आत्ता लगेच खायला मिळ्णार आहे का... उगाच खयाली पुलाव.. आपले चिकन...
काल फायनली घरी केलंच तंदुरी
काल फायनली घरी केलंच तंदुरी चिकन... एकदम झक्कास झालं होतं... तंगड्यांचे तंदुरी आणि उरलेल्याचा चिकन मसाला.... यम्मी... केल्यानंतर खायची घाई असल्यामुळे फोटो काढलेच नाहीत.. त्यामुळे टाकणार नाही...
(मॅरीनेशन करताना त्यात हळद पण घातली होती)
(No subject)
जागु..
जागु.. स्लर्प!!!!!!!!!!!
अश्विनी के
हिमस्कुल तुम्ही धागा वरती
हिमस्कुल तुम्ही धागा वरती आणलात आणि आता मलाही कराविशी वाटते. बुधवारी अनायसे पुतण्याचा वाढदिवस आहे. त्याच निमित्त घेऊन करता येइल
आता मला बिरयाणीही आठवली काही खरे नाही. मागे केलेली गटारीच्या दिवशी फोटो काढले आहेत. आता इथे रेसिपी टाकुन समाधान मानेन.
चिउ धन्स.
वर्षू तो अश्विनी स्पेशल प्रतिसाद आहे.
Pages