"मीरा, जग्गुची सीडी टाकतोय.....लाईफ स्टोरीची. येणार बघायला ?"
"अम्म्म्....ओक्के. आयुष बघू देईल का पण ? मध्येमध्ये लुडबुडेल."
" डोण्ट वरी. तो क्लेचा वाघोबा बनवतोय. आमचं डील झालंय.तो आपल्याला सीडी बघू देणार आणि त्यानंतर मग मी त्याला ' फाईंडींग नीमो ' लावून देणार."
"बरं. सुरू कर तू. मी आलेच."
......खरंतर नाही बघायचं मला आज काही. पण रणजित नाराज होईल. किती एक्साईट होतो तो जग्गूच्या गझल ऐकताना. मग त्याचं "वा,वा, क्या बात है" "अरे काय आहे हा माणूस"...वगैरे बडबडणं आणि डोळ्यांतून मोगर्याचा सडा. हे सगळं वाटून घ्यायला मी असेल की आनंद द्विगुणित.
पण मला काय झालंय आज ? कसली अस्वस्थता आली आहे ? उगीचच ?
" टेकू या पाचेक मिनिटं पायरीवर. मोकळ्या हवेत बरं वाटेल कदाचित."
कसले तरंग उठताहेत मनात? नुसतीच डुचमळ. स्पष्ट काहीच नाही. अनेक चेहरे, अनेक ठिकाणं...तीही अस्पष्ट. पझलच्या तुकड्यांसारखी विखुरलेली.
"जोडा मीराबाई, जोडा ते तुकडे.चित्र हाती आल्याशिवाय, तगमगीचं कारण सापडल्याशिवाय तुमची खैर नाही. नाहीतर आख्खा दिवस असाच जाईल....अशांत."
सकाळी जाग आली तेव्हापासूनच खरंतर हुरहुरतंय.
स्वप्न पडलं असेल कदाचित. शीलामामी आणि मी. जणु काही आत्ता घडतंय सगळं. ते उंब्र्याचं घर सुद्धा जसंनतसं डोळ्यासमोर. शीलामामीचं टिपिकल बोलणं,हावभाव.
ती कदाचित कोणालाच आवडत नव्हती..... .....may be because of her laziness, may be because of her past history of TB...or may be because her destiny made her to stay alone.
आणि दुर्दैवी,एकट्या माणसांमध्ये सगळ्यांना आवडणारं कुठे काही असतं ?
माझ्या बालवयाला मात्र ही असली डिस्क्रिमिनेशन्स कळायची नाहीत. मुळातच मी ' इमोशनल फुल '!
मला त्या उंब्र्याच्या घरातली सुट्टी म्हणजे एखाद्या हिल स्टेशनवर घालवलेल्या सुट्टीसारखी वाटायची.
मोस्ट लक्झुरिअस डेस्टिनेशन फॉर व्हेकेशन! ( सकाळचे सगळे सोपस्कार मोकळ्या मैदानात उरकायला लागायचे तरीही! )
२-३ दिवस जोडून सुट्टी आली तरी माझी गडबड असायची तिकडे जायला.रोहनला मात्र तिकडे यायला कधीच आवडलं नाही.नाईलाजाने आलाच कधी तरी 'बबुशाच्या' दुकानातले बटर आणि ' बिट्टाच्या ' दुकानातली चिक्की खाण्यापुरताच त्याचा आनंद !
मला मात्र तिथल्या सगळ्याच गोष्टींचं वेड होतं......गावातलं मातीचं घर, त्याच्या मागचं मोठ्ठं उंबराचं आणि त्यालाच चिकटून मोगर्याचं झाड, माझी तेव्हाची मैत्रिण-बारकाबाई, रानातलं घर, विहीर, चुलीवरच्या भाकरी, चंद्रिका गाय, चरवीभरून काढलेलं फेसाळलेलं दूध, एकावर एक रचून ठेवलेली धान्याची पोती.
तो शटरचं झाकण असलेला ब्लॅक अॅण्ड व्हाईट टीव्ही, त्याच्यावर विनाव्यत्यय एन्जॉय केलेल्या क्रिकेटच्या मॅचेस, बोचर्या थंडीत आज्जीची गोधडी घेऊन उशिरापर्यंत लोळत रहाणं....!
१० वीच्या प्रिलिमनंतर तिथेच बसून सोडवलेल्या सराव प्रश्नपत्रिका ( अखंड चालू असलेल्या विविधभारतीसोबत! )
........पाऊस कोसळतोय समोर ! पाच मिनिटांसाठी टेकले ती इथेच रमले. ओडोमॉस लावायला हवंय. नाहीतर डासांची चंगळ आणि माझी चाळणी.
समोर १०-१२ केळीची झाडं,तितकीच नारळाची आणि त्यांना गदगदून हलवणारा मुसळधार पाऊस. ह्या नवख्या देशात आल्यापासून पहिल्यांदाच मी पाऊस अनुभवतेय.
...छोट्याशा उंबर्यापासून ते सातासमुद्रापल्याडचा हा देश. किती वेगवेगळी ठिकाणं, माणसं, सुख-दु:खं, बदलणारा स्वभाव...आजूबाजूच्या लोकांचा आणि स्वतःचाही. काय काय अनुभवलं एवढ्या दिवसांत !
चारच दिवसांपूर्वी तिशी ओलांडली. चौथं दशक चालू. बाकी एवढ्या गोष्टी बदलल्या तरी आज सकाळी हुरहुर घेऊन जागी होणारी मीरा....' माझ्यातली मी ' बदललीच नाहीये बहुतेक.
हिरव्या झाडींवर कोसळणारा पाऊस बघून तेव्हाही तसंच वाटायचं आणि आजही तसंच वाटतंय. ' तसंच ' म्हणजे नेमकं कसं...हे मात्र अजूनही शब्दांत पकडता येत नाही !
रणजितपुढे मी अशी बडबड करायला लागले ना की " काय चंपक आहे माझी बायको" असे भाव स्पष्ट दिसतात त्याच्या डोळ्यांत.
...आणि कोसळणारा पाऊस बघताना तो इतका कोरडा आणि अलिप्त कसा राहू शकतो हा प्रश्न असतो माझ्या मनात !
कुठून कुठे भरकटतीये मी. पण असंच होतं पाऊस बघताना. नेहमीच. हेच मनाचं भरकटणं, अशांत मनाची तगमगही अशीच आणि दोन्ही हातांत घट्ट पकडून ठेवावी अशी निसटत्या तृप्तीची जाणीवही अशीच ! .....ह्यालाच 'नॉर्मल' माणसं 'वेड' किंवा 'खुळ' म्हणत असावीत बहुधा !
.....पीजीच्या धकाधकीत आणि बाकीच्या प्रॅक्टिकल गोष्टींशी मी झुंजत असतानाच शीलामामी गेली. पाठोपाठ आज्जीही गेली.
"चुळदुम चुळदुम भोर्या गाई
भल्या बहादराची घरात आई"
दरवर्षी ऐकूनही नवी वाटणारी गोष्ट सांगणारी आज्जी गेली.
२ वर्षांपूर्वी.....२ की ३.....की गेल्याच वर्षी ?
तेसुद्धा नीटसं आठवत नाहीये. ' माझ्यातली मी ' सुद्धा त्या कालात संपलेलीच होते.मला वाटलं होतं, कायमचीच संपली असेल. पण आज अचानक आपलं अस्तित्व दाखवतेय.
अजून लख्ख आठवतात ते प्रसंग. आज्जीच्या गळ्यांत हात टाकून मी म्हणायचे, " मी मुळी लग्नच करणार नाहीये. इथेच एक मोठ्ठं, छानसं घर बांधणार. तुला आणि मामीला खूप खूप मजेत ठेवणारे मी."
कधीकधी वाटतं.....माझ्या ह्या असल्या वाक्यांमध्ये अजूनही त्या दोघींच्या आशा गुंतल्या असतील का? आत्मा चिरंजीव असतो म्हणे. अजूनही त्या दोघींचे आत्मे हे प्रश्न विचारत असतील का....
कुठे गेली आहेस तू ? कुठे गेले तुझे वायदे ?
काहीच करता येणार नाही ना आता? मी आता तिथं कितीही आलिशान घर बांधलं तरी त्यांच्या चेहर्यावरचं समाधानाचं हसू दिसू शकणारच नाही ना !
" जाहल्या काही चुका अन् सूर काही राहिले".....
अशावेळी खरंच वाटतं, माझ्यातली मी गायब असलेलीच बरं असतं. संवेदनाशून्य मनाला असले प्रश्न पडत नाहीत आणि असली तगमगही होत नाही !
फट्ट्......मी दचकून बाजूला बघितलं. आयुषने एक डास मारला होता. आणि ती जाळीची बॅट घेऊन आता तो दुसर्या डासामागे पळत होता.
"आयुष, राजा काय चाललंय? का एवढा पळतोयस त्यांच्या मागे?"
दुसर्या डासालाही अचूक नेमबाजीने लोळवल्यावर आयुष माझ्याकडे आला. गळ्यात हात टाकून त्याच्या नेहमीच्या निरागस चेहर्याने म्हणाला,
" अगं, ते डास तुला चावले असते ना. अशी का बसलीस पण तू? हं.....बरोब्बर. पाऊस बघायला ना? मी ना मोठ्ठा झाल्यावर तुझ्यासाठी एक मोठ्ठं काचेचं घर बांधणारे. डोमसारखं. त्यात डास कुठून घुसणार ? मग तू त्यात बसून आर्रामात पाऊस बघू शकशील. तुला खूप खूप मजेत ठेवणारे मी....."
खळ्ळकन एक थेंब डोळ्यांतून गालांवर ओघळला. आयुषला छातीशी कवटाळलं. मनात म्हटलं, राजा,सांभाळून वचनं दे रे. पुरी नाही करता आली की फार तुटेल तुलाच मोठेपणी. मी ही दिली होती अशीच काही वचनं....
पिढी बदलली, शब्द बदलले.....पण वचनं तीच. अर्थ तोच. चक्र अविरत फिरतंय.
आपणही फिरत रहायला हवं ह्या चक्रासोबत. आलेले सुखाचे क्षण भोगायचे. आणि हे असले अस्वस्थतेचे क्षण.....तेही भोगायचे. वादळाला हव्वी तितकी मोडतोड करू द्यायची मनात. नंतर वादळाने विखुरलेले सगळे तुकडे शांतपणे गोळा करायचे आणि मनातला आरसेमहाल पुन्हा सजवायचा !
.......तगमग शांत झाली होती.
पाऊसही कोसळायचा थांबला होता. समोरची केळ पावसात न्हाल्याने आणखीनच तजेलदार दिसायला लागली.
खोलीतून 'जग्गूचा' आवाज येत होता....." हाथ छूटें भी तो रिश्ते नहीं छोडा करते
वक्त की शाख से लम्हें नहीं तोडा करते....."
<<आलेले सुखाचे क्षण भोगायचे.
<<आलेले सुखाचे क्षण भोगायचे. आणि हे असले अस्वस्थतेचे क्षण.....तेही भोगायचे. वादळाला हव्वी तितकी मोडतोड करू द्यायची मनात. नंतर वादळाने विखुरलेले सगळे तुकडे शांतपणे गोळा करायचे आणि मनातला आरसेमहाल पुन्हा सजवायचा !>>
वा क्या बात है!
सुरेख! वाचताना डोळे भरुन आले
सुरेख! वाचताना डोळे भरुन आले![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
हल्ली हे असे काही वाचायची मी
हल्ली हे असे काही वाचायची मी जाणीव पूर्वक टाळतो...
छान लिहिले आहेस...![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सुजा, कविता, रोहन धन्स. रोहन,
सुजा, कविता, रोहन धन्स.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
रोहन, एक फुकटचा सल्ला. असलं काही वाचायचं ( अर्थात तुला आवडत असेल तर) टाळू नकोस. " दाबलं की उफाळतं".
हळव्या भावनांचा निचरा होऊ दिला की आपण तंदुरूस्त रहातो. फिजिकली आणि मेंटली.
कधी कधी रोखून सुद्धा धरावे..
कधी कधी रोखून सुद्धा धरावे..
उफाळू द्यावे... ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
छान लिहीलंय..
छान लिहीलंय..
खूप सुंदर लिहिलं आहेस रुणू
खूप सुंदर लिहिलं आहेस रुणू![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सहीच............ निशब्द.
सहीच............
निशब्द.
ओक्के भटक्या, हे सुद्धा
ओक्के भटक्या, हे सुद्धा मान्य.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
संघमित्रा, अश्विनी, तृष्णा खूप धन्यवाद.
चुकून पोस्ट पडली. डिलीट केली
चुकून पोस्ट पडली. डिलीट केली आहे.
सर्वर गडबडलंय.
सर्वर गडबडलंय.:अओ:
अगदी अंतर्मुख
अगदी अंतर्मुख झालेय....निशब्द!!
खुपच सुरेख लिहीलंय![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सुरेख लेख, आवडला.
सुरेख लेख, आवडला.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
खरच प्रत्येकाच्या आयुष्यात
खरच प्रत्येकाच्या आयुष्यात येतात थोड्याफार फरकाने हे क्षण
पण प्रत्येकाला ते असे मांडता येत नाही...>>> अनुमोदन वर्ष... खुपच अप्रतिम लिहिलय.. शब्द नं शब्द मनात ठसला:)
सुमेनिष, arj, रूपाली...धन्स
सुमेनिष, arj, रूपाली...धन्स सगळ्यांना.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
रुणुझुणू, खुप सुंदर! सुरेख
रुणुझुणू, खुप सुंदर! सुरेख उतरलयं.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
खळ्ऴकन पाणी आले...!!
खळ्ऴकन पाणी आले...!! अप्रतिम!
शब्दच नाहीत... खुप सुंदर
शब्दच नाहीत... खुप सुंदर लिहलेयस
" हाथ छूटें भी तो रिश्ते नहीं
" हाथ छूटें भी तो रिश्ते नहीं छोडा करते
वक्त की शाख से लम्हें नहीं तोडा करते.....">>>>>>> सुंदर...सो टचिंग!
रुणु, खुपच ट्चिंग आहे ग!
रुणु,
खुपच ट्चिंग आहे ग! मस्तच. अगदि अस वाटत पण नक्की काय ते कधिच सांगता येत नाही.
खुपच सुंदर.
रुणू..स्पीचलेस!!! इतक्या
रुणू..स्पीचलेस!!!
इतक्या खोलवरातल्या भावनांना शब्दबद्ध करून नि:शब्द करून टाकलंस गं!!
@रुणुझुणू जगजीतच्या गझल
@रुणुझुणू
जगजीतच्या गझल ए॓कतांना पाऊस हवाच...बाहेर अन मनातही...!!!
खुप काही जागवून गेलात.
Pages