नमस्कार मित्रहो !
फूबाईफूचा फिनाले झाला जो तुम्ही २६ डिसेंबरला पाहू शकाल. यानंतर पुढे काय ? हा प्रश्न अनेकांनी विचारला. मीही काही गोष्टीत गुंतलो असताना दोन दिवसापुर्वी फूबाईफूचे ऑनलाईन डायरेक्टर श्री श्रीप्रसाद क्षीरसागर याचा फोन आला. दुसर्या दिवशी रितसर पवईत भेट झाली. गंमत म्हणजे यापुर्वी त्यांना मी फक्त कंट्रोल रुममध्ये पाहील होतं. एवढ्या दिवसात आम्ही कधी एका वाक्याचाही संवाद साधला नव्हता. त्यांनी मला ' श्रीप्रसाद क्षीरसागर' अशी फोनवर ओळख दिली तेव्हा " कोण ? " हा प्रश्नही मी बावळटपणे विचारलो. असो. काल मी विख्यात कलादिग्दर्शक श्री. नितीन चंद्रकांत देसाई यांच्यासमोर त्यांच्या पवई येथील ऑफिसमधील कॉन्फरेंस रुममध्ये त्यांच्या टिमबरोबर चर्चेला बसलो होतो.
आता नमनानंतर मुद्द्यावर येतो. " आयकॉनिक चंद्रकात प्रोडक्शन प्रायव्हेट लिमिटेड " ह्या आपल्या कंपनीद्वारे श्री. नितीन चंद्रकात देसाई निघाले आहेत अटकेपार झेंडे फडकवणार्या मराठी कलाकाराच्या शोधात. "झी मराठी" सोबत हा प्रवास सुरु होतोय "मराठी पाऊल पडते पुढे" या कार्यक्रमांतर्गत. आजवर अनेक क्षेत्रात मराठी ठसा उमटला आहे. तरीही मराठी माणसाच्या नावाने ओरड चालूच असते. त्या सगळ्या कलाकारांना एक व्यासपीठ मिळवून देण्याचा हा त्यांचा प्रयत्न. तुम्ही जर सर्वसामान्यांपेक्षा वेगळं काही करत असाल तर.... प्रेक्षक या भुमिकेला सोडून तुम्हाला रंगमंचावरच्या प्रकाशात तुमची कला सादर करायची असेल तर... श्री. श्रीप्रसाद क्षीरसागर यांच्या भाषेत म्हणायचं तर... "ज्याच्या अंगी नाना कला, त्याने ऑडीशनला चला".
तुम्ही काहीही वेगळं करत असाल... गायन, वादन, नृत्य, अभिनय, शारिरीक कसरती, लोककला, परंपरागत कला, शास्त्रशोध किंवा अजून काही.... आग़ळं वेग़ळं अस काहीही.... त्या प्रत्येक कलाकाराच स्वागत आहे. जर तुम्ही अशा एखाद्या कलाकाराला ओळखत असाल तर त्याच्यापर्यंत हा आमचा निरोप पोहचवा. ऑडीशनसाठी आम्ही तुमच्या शहरात येतोय...
३० जानेवारी नागपूर सुमीत ९८९०७२७२६१
२ जानेवारी औरंगाबाद योगेश ९८७३२०२०३०
४ जानेवारी रत्नागिरी मिलिंद ९८२२५५४७७०
५ जानेवारी कोल्हापूर - " - -" -
६ जानेवारी पुणे वैभव ९८९०७९८९०३
८ जानेवारी मुंबई ०२२ ६१४१५९००
ईमेल - shabashmaharashtra01@gmail.com
तर मित्रानो, पुन्हा एकदा नव्याने सज्ज झालोय तुमच्या मनोरंजनासाठी. रिसर्च आणि लेख्नन या दोन जबाबदार्या घेतल्यात खांद्यावर. आपल्या परिने अज्ञात कलाकारांपर्यंत पोहोचण्यासाठी हा आंतरजालीय खटाटोप. यात तुमच्या सर्वांची साथ लागेल. ती मिळेल हा विश्वास आहेच.
तुमचाच
कौतुक शिरोडकर
"मराठी पाऊल पडती पुढे" इथे तर
"मराठी पाऊल पडती पुढे" इथे तर सगळं नावातच ठेवलय. हा प्रोग्रॅम गाजणार.
कौतुक तुला अन तुमच्या सर्व टिम ला शुभेच्छा.
कौतुक, तुम्हाला शुभेच्छा!
कौतुक, तुम्हाला शुभेच्छा!
तुला खूप खूप शुभेच्छा! यात
तुला खूप खूप शुभेच्छा!
यात भरघोस यश मिळू दे आणि तू नेहमी पुढे जावस ही सदिच्छा!
कौतुका...... हा कार्यक्रमही
कौतुका...... हा कार्यक्रमही भन्नाट गाजू दे... आणि यातल्या कौतुक शिरोडकरशी मी बोललो आहे हे मी माझ्या मुलांना अभिमानाने वगैरे सांगायची संधी मिळू दे.
अभिनंदन कौतुकदा, तुम्हाला
अभिनंदन कौतुकदा,
तुम्हाला अनेकनेक शुभेच्छा!!!
अभिनंदन आणि शुभेच्छा
अभिनंदन आणि शुभेच्छा
हर हर
हर हर महादेव.............................!
अभिनंदन कौतुक...
अभिनंदन कौतुक...
अरे वा! अभिनंदन आणि शुभेच्छा
अरे वा! अभिनंदन आणि शुभेच्छा
अरे वा अभिनंदन कौतुक...पुढील
अरे वा अभिनंदन कौतुक...पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा.
अरे व्वा.. माझी अप्सरा ट्राय
अरे व्वा.. माझी अप्सरा ट्राय करायला हवी इथं...
कौतुका.. अभिनंदन नि पुढील वाटचलीसाठी भरघोस शुभेच्छा रे...
क्या बात है. अरे इथे पण घेवुन
क्या बात है. अरे इथे पण घेवुन या रे..
अभिनंदन आणि शुभेच्छा!
अभिनंदन आणि शुभेच्छा!
अभिनंदन आणि पुढिल वाटचालीसाठी
अभिनंदन आणि पुढिल वाटचालीसाठी शुभेच्छा!
अभिनंदन आणि शुभेच्छा!
अभिनंदन आणि शुभेच्छा!
अभिनंदन. तुमचेही पाऊल असेच
अभिनंदन. तुमचेही पाऊल असेच पुढे पुढे पडू देत.
कौतुक, तुम्हाला शुभेच्छा!
कौतुक, तुम्हाला शुभेच्छा!
अभिनंदन कौतुक आणि खुप खुप
अभिनंदन कौतुक आणि खुप खुप शुभेच्छा.
अरे व्वा ! अभिनंदन आणि खूप
अरे व्वा ! अभिनंदन आणि खूप सार्या शुभेच्छा !
कौतुक, तुम्हाला खुप खुप
कौतुक, तुम्हाला खुप खुप शुभेच्छा आणि अभिनंदन!
कौतुक, अभिनंदन आणि शुभेच्छा!
कौतुक, अभिनंदन आणि शुभेच्छा!
अभिनन्दन!!!!!!!!!
अभिनन्दन!!!!!!!!!
कौतुक , अभिनंदन आणि शुभेच्छा
कौतुक , अभिनंदन आणि शुभेच्छा !
मराठी पाऊल पडते पुढे ह्या कार्यक्रमाचे स्वरुप इंडिया/ युस्/ युके गॉट टॅलेंट सारखे आहे का?
कौतुक, मनापासून अभिनंदन आणि
कौतुक, मनापासून अभिनंदन आणि अनेकानेक शुभेच्छा.
अतिशय यशस्वी होवो ही घोडदौड.... नवनवीन कलाकारांना रंगमंच मिळुदे.. श्रीहस्तं तुम्हा सगळ्यांच्या पाठीशी असूदे.... मोठ्ठं काम आहे.
कौतुक, मनापासून कौतुकआणि
कौतुक, मनापासून कौतुकआणि शुभेच्छा
कौतुक तुझं आणि तुझ्या टीमच
कौतुक तुझं आणि तुझ्या टीमच अभिनंदन आणि शुभेच्छा !
अरे वा अभिनंदन कौतुक...पुढील
अरे वा अभिनंदन कौतुक...पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!!
@ यो.. तुझी अप्सरा खरच मस्त होती.. नक्की ट्राय कर.
अरे व्वा.. माझी अप्सरा ट्राय
अरे व्वा.. माझी अप्सरा ट्राय करायला हवी इथं... >>>
मनापासून शुभेच्छा
मनापासून शुभेच्छा !!!!!!!!!!!!
अभिनंदन आणि पुढिल वाटचालीसाठी
अभिनंदन आणि पुढिल वाटचालीसाठी शुभेच्छा!
Pages