नमस्कार मित्रहो !
फूबाईफूचा फिनाले झाला जो तुम्ही २६ डिसेंबरला पाहू शकाल. यानंतर पुढे काय ? हा प्रश्न अनेकांनी विचारला. मीही काही गोष्टीत गुंतलो असताना दोन दिवसापुर्वी फूबाईफूचे ऑनलाईन डायरेक्टर श्री श्रीप्रसाद क्षीरसागर याचा फोन आला. दुसर्या दिवशी रितसर पवईत भेट झाली. गंमत म्हणजे यापुर्वी त्यांना मी फक्त कंट्रोल रुममध्ये पाहील होतं. एवढ्या दिवसात आम्ही कधी एका वाक्याचाही संवाद साधला नव्हता. त्यांनी मला ' श्रीप्रसाद क्षीरसागर' अशी फोनवर ओळख दिली तेव्हा " कोण ? " हा प्रश्नही मी बावळटपणे विचारलो. असो. काल मी विख्यात कलादिग्दर्शक श्री. नितीन चंद्रकांत देसाई यांच्यासमोर त्यांच्या पवई येथील ऑफिसमधील कॉन्फरेंस रुममध्ये त्यांच्या टिमबरोबर चर्चेला बसलो होतो.
आता नमनानंतर मुद्द्यावर येतो. " आयकॉनिक चंद्रकात प्रोडक्शन प्रायव्हेट लिमिटेड " ह्या आपल्या कंपनीद्वारे श्री. नितीन चंद्रकात देसाई निघाले आहेत अटकेपार झेंडे फडकवणार्या मराठी कलाकाराच्या शोधात. "झी मराठी" सोबत हा प्रवास सुरु होतोय "मराठी पाऊल पडते पुढे" या कार्यक्रमांतर्गत. आजवर अनेक क्षेत्रात मराठी ठसा उमटला आहे. तरीही मराठी माणसाच्या नावाने ओरड चालूच असते. त्या सगळ्या कलाकारांना एक व्यासपीठ मिळवून देण्याचा हा त्यांचा प्रयत्न. तुम्ही जर सर्वसामान्यांपेक्षा वेगळं काही करत असाल तर.... प्रेक्षक या भुमिकेला सोडून तुम्हाला रंगमंचावरच्या प्रकाशात तुमची कला सादर करायची असेल तर... श्री. श्रीप्रसाद क्षीरसागर यांच्या भाषेत म्हणायचं तर... "ज्याच्या अंगी नाना कला, त्याने ऑडीशनला चला".
तुम्ही काहीही वेगळं करत असाल... गायन, वादन, नृत्य, अभिनय, शारिरीक कसरती, लोककला, परंपरागत कला, शास्त्रशोध किंवा अजून काही.... आग़ळं वेग़ळं अस काहीही.... त्या प्रत्येक कलाकाराच स्वागत आहे. जर तुम्ही अशा एखाद्या कलाकाराला ओळखत असाल तर त्याच्यापर्यंत हा आमचा निरोप पोहचवा. ऑडीशनसाठी आम्ही तुमच्या शहरात येतोय...
३० जानेवारी नागपूर सुमीत ९८९०७२७२६१
२ जानेवारी औरंगाबाद योगेश ९८७३२०२०३०
४ जानेवारी रत्नागिरी मिलिंद ९८२२५५४७७०
५ जानेवारी कोल्हापूर - " - -" -
६ जानेवारी पुणे वैभव ९८९०७९८९०३
८ जानेवारी मुंबई ०२२ ६१४१५९००
ईमेल - shabashmaharashtra01@gmail.com
तर मित्रानो, पुन्हा एकदा नव्याने सज्ज झालोय तुमच्या मनोरंजनासाठी. रिसर्च आणि लेख्नन या दोन जबाबदार्या घेतल्यात खांद्यावर. आपल्या परिने अज्ञात कलाकारांपर्यंत पोहोचण्यासाठी हा आंतरजालीय खटाटोप. यात तुमच्या सर्वांची साथ लागेल. ती मिळेल हा विश्वास आहेच.
तुमचाच
कौतुक शिरोडकर
यो..नक्की ट्राय कर
यो..नक्की ट्राय कर
कौतुक...खुप खुप अभिनंदन आणि शुभेच्छा!!
मनापासून अभिनंदन आणि खुप खुप
मनापासून अभिनंदन आणि खुप खुप शुभेच्छा!
कौतुक...खुप खुप अभिनंदन आणि
कौतुक...खुप खुप अभिनंदन आणि शुभेच्छा!!
कौतुक्,सहीच रे. तुझे हार्दिक
कौतुक्,सहीच रे. तुझे हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.
अरे वा कौतुकच म्हणायचे!
अरे वा कौतुकच म्हणायचे! छानच.. मराठीतील हा कार्यक्रम खासच होईल वाटत. अनोखा आहे मराठीसाठी. हिंदी चॅनेलवर अशे कार्यक्रम होताहेत.
शुभेच्छा.. पुढील वाटचालीसाठी
यो, नक्कीच रे.... मराठी
यो, नक्कीच रे....
मराठी पाऊल........च्या व्यासपिठावर तुझी अप्सरा थिरकताना आणि तिच्या तालावर पब्लिक येडं होताना बघायला जाम मजा येइल
कौतुक.. तुझे खूपच कौतुक...
कौतुक.. तुझे खूपच कौतुक... अभिनंदन...
वा कौतुक छान प्रगती
वा कौतुक छान प्रगती आहे.
पुढीला वाटचाली साठी शुभेच्छा.
सुधीर
अभिनंदन आणि पुढिल वाटचालीसाठी
अभिनंदन आणि पुढिल वाटचालीसाठी शुभेच्छा!
कौतुक अभिनंदन आणि मनापसून
कौतुक अभिनंदन आणि मनापसून शुभेच्छा!
यो होऊन जाऊदे. ऑडिशन ला "मला येऊ द्या ना आत, एवढा नाचलो कि आता " सादर कर.
अभिनंदन कौतुक आणि खुप खुप
अभिनंदन कौतुक आणि खुप खुप शुभेच्छा....
मैत्रेयी भागवत
कौतुक, कौतुक, अभिनंदन आणि
कौतुक,
कौतुक, अभिनंदन आणि शुभेच्छा
मी तुमचे हे इन्विटेशन तुमच्या नावासकट मेल मधून ओळखीच्या मराठी लोकांना फॉर्वर्ड केलंय. त्यायोगे वेगाने प्रचार होईल असे वाटते.
अभिनंदन आणि भरभरून शुभेच्छा
अभिनंदन आणि भरभरून शुभेच्छा !!
बाय द वे, याचा पहिला एपिसोड
बाय द वे, याचा पहिला एपिसोड टिव्हीवर कधी येतोय?
ग्रेट. लेका, पुण्यात येऊन
ग्रेट. लेका, पुण्यात येऊन फोनही केला नाहीस?
हार्दीक अभिनंदन आणि अनेक
हार्दीक अभिनंदन आणि अनेक शुभेच्छा!!
यो,
कौतुक तुला अन तुमच्या सर्व
कौतुक तुला अन तुमच्या सर्व टिम ला शुभेच्छा.
कौतुक अभिनंदन.. अच्छा हे
कौतुक अभिनंदन.. अच्छा हे करण्यात बिझला आहेस तर.. मध्यंतरी नेटवर जायला वेळ मिळाला नवता.. अब समझा!!! शुभेच्छा!! शुभेच्छा!!!
मनापासुन कौतुक, आणि शुभेच्छा
मनापासुन कौतुक, आणि शुभेच्छा या वाटचालीसाठी................
अभिनंदन आणि शुभेच्छा
अभिनंदन आणि शुभेच्छा
कौतुकजी, तुमचं खुप खुप कौतुक
कौतुकजी, तुमचं खुप खुप कौतुक आणि अभिनंदन!! पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा!!
कौतुक.... तुम्हा सर्वांच्या
कौतुक.... तुम्हा सर्वांच्या पडणार्या प्रत्येक पावलासाठी अनेकानेक शुभेच्छा....
अभिनंदन कौतुक! आगे बढो!!
अभिनंदन कौतुक! आगे बढो!!
कौतुक.... तुम्हाला शुभेच्छा.
कौतुक.... तुम्हाला शुभेच्छा. आणि हो हा कार्यक्रम १दम बहारदार चालु आहे. विशेष म्हणजे अगदी घरातील सर्व १त्र बसुन पाहतात व त्या कलाकारांचे कौतुक करतात. असे कार्यक्रम मिळणे हल्ली जरा अवघड झालेय ना, म्हणुन या कार्यक्रमाचे विशेष कौतुक. सर्व टीमला शुभेच्छा द्या.
अभिनंदन कौतुक!!! या
अभिनंदन कौतुक!!!
या कार्यक्रामाच्या शीर्षकांत 'लेखन - कौतुक शिरोडकर' हे नाव वाचल्यावर अभिमान वाटतो.
कार्यक्रम अगदी छान चालला आहे.
कौतुक अभिनंदन! कालचा सोहमचा
कौतुक अभिनंदन!
कालचा सोहमचा (वय पावणेतिन वर्ष) परफॉरमन्स तर सहीच
अभिनन्दन आणि खूप खूप
अभिनन्दन आणि खूप खूप शुभेछ्या.
कौतुक तुमचे अभिनंदन आणी
कौतुक तुमचे अभिनंदन आणी तुम्हाला खुप सार्या शुभेच्छा.
कौतुक, अभिनंदन आणि शुभेच्छा
कौतुक, अभिनंदन आणि शुभेच्छा
अभिनंदन कौतुक! आता फु बाई फु
अभिनंदन कौतुक!
आता फु बाई फु सारखे यातल्या तुझ्या अनुभवांवर सविस्तर लिही
Pages