Submitted by MallinathK on 22 December, 2010 - 00:50
डॉ.कैलास यांच्या या उपक्रमात दिलेल्या मिसर्यावरुन सुचलेली गझल. जाणकारांचे मार्गदशन अपेक्षीतच आहे.
उमजले न मला कसा गुंतलो तुझ्यात मी
सावली दिली तुला नि राहिलो उन्हात मी
शोधू नकोस मजला तुझ्या आसवातही
हो, हरवले स्वतःला तुला शोधण्यात मी
निसटुन गेली रात्र तुझ्या आठवांसवे
रमलो होतो तेव्हा कुठे चांदण्यात मी
नको चिंब पाऊस... न हवी सांज मखमली
हलकेच सखे स्पर्श तुझा... अन नभात मी
न भिजल्या क्षणात मी... न ओल्या श्वासात मी
तुझ्या माझ्या नात्याच्या संभ्रमात मी.
-- मल्लिनाथ.
गुलमोहर:
शेअर करा
छान आहे, आवडली. >>>नको चिंब
छान आहे, आवडली.
>>>नको चिंब पाऊस... न हवी सांज मखमली
हलकेच सखे स्पर्श तुझा... अन नभात मी
न भिजल्या क्षणात मी... न ओल्या श्वासात मी
तुझ्या माझ्या नात्याच्या संभ्रमात मी <<< मस्त !
मल्ल्या.. मस्त लिहिलं आहेस
मल्ल्या.. मस्त लिहिलं आहेस रे. गझल आहे कि नाही ते जाणकार सांगतीलच.
आरती, चुक लक्षात आणुन दिल्या
आरती, चुक लक्षात आणुन दिल्या बद्दल धन्यवाद. तो टायपो मिस्टेक होता. बदल केलाय...
(No subject)
स्वतःला ऐवजी स्वतःस चालेल का
स्वतःला ऐवजी स्वतःस चालेल का ?
मस्तच
मस्तच
उमजले न मला कसा गुंतलो
उमजले न मला कसा गुंतलो तुझ्यात मी
सावली दिली तुला नि राहिलो उन्हात मी>>>>>>>>छानच ! आवडली.
छान.
छान.
उमजले न मला कसा गुंतलो
उमजले न मला कसा गुंतलो तुझ्यात मी
सावली दिली तुला नि राहिलो उन्हात मी
उमजले मला न गुंतलो कसा तुझ्यात मी
सावली दिली तुला नि राहिलो उन्हात मी
शोधू नकोस मजला तुझ्या आसवातही
हो, हरवले स्वतःला तुला शोधण्यात मी
शोधलेस का मला तुझ्याच आसवातही
हरवले स्वतःस ,हो,तुलाच शोधण्यात मी
निसटुन गेली रात्र तुझ्या आठवांसवे
रमलो होतो तेव्हा कुठे चांदण्यात मी
रात्र जात राहिली,तुझ्याच आठवांसवे
गुंतलो जरा कुठे तिथेच चांदण्यांत मी
नको चिंब पाऊस... न हवी सांज मखमली
हलकेच सखे स्पर्श तुझा... अन नभात मी
चिंब पावसा नको,हवी न सांज मखमली
स्पर्श जाहला तुझा,नि पोचलो नभात मी
न भिजल्या क्षणात मी... न ओल्या श्वासात मी
तुझ्या माझ्या नात्याच्या संभ्रमात मी.
धुंद श्वास ना जरी,न चिंबल्या क्षणात मी
काय मी तुझा?सदाच याच संभ्रमात मी
मल्लीनाथ.... खूप चांगल्या आशयाची गझल..... ठळक केलेल्या ठिकाणी मी सुधारणा केलेल्या आहेत.....
आपल्याला गझल लिहाविशी वाटणे.. म्हणजेच एक नवा गझलकार तयार होणे होय.... स्वागत
मल्लिनाथ - प्रयत्नासाठी
मल्लिनाथ - प्रयत्नासाठी अभिनंदन व गझललेखनासाठी शुभेच्छा! आपल्याला अक्षरगणवृत्ताप्रमाणे या रचनेतील सर्व ओळी लिहायला हव्यात. कैलासरावांनी दिलेली ओळ ज्या वृत्तात आहे त्या वृत्तात! तसेच, नात्याच्या संभ्रमात आणि 'तुला शोधण्यात स्वतःला हरवणे' या कल्पना चांगल्याही आहेत व आपण योजल्यातही ठीकठाक!
अवांतर - हे प्रतिसादकांसाठी आहे. मला असे म्हणण्याचा अधिकार नाही तरीही विनंती करत आहे. सर्वांच्या भावनांचा आदर आहेच. पण जी रचना शुद्ध गझल नाही तिला दाद देण्यापुर्वी निदान त्याबाबत काही ना काही मत तरी मांडायला हवे असे वाटते. म्हणजे, ही शुद्ध नाही, शुद्ध आहे, मला माहीत नाही, आशय आवडला पण तंत्राबाबत कल्पना नाही असे काहीतरी!
(हे म्हणताना मल्लिनाथ यांना नाउमेद करायचा हेतू किंवा अधिकार मुळीच नाही तसेच गझल हा काव्यप्रकार जणू आपलेच कुरण आहे असा पोकळ गर्वही नाही. पण तिकडे विजय पाटलांनी अत्यंत फ्रेश आशय असलेली गझल, तीही शुद्ध, प्रकाशित केली, ती धुळ खात पडलेली आहे किंवा तिचा दर्जाच समजत नाही आहे आणि एकीकडे मित्र मित्रांना दाद देत सुटले आहेत असे वाटते.)
-'बेफिकीर'!
वा कैलासराव, मी प्रतिसाद देत
वा कैलासराव,
मी प्रतिसाद देत असतानाच आपला प्रतिसाद आलाही! चांगलेच बदल सुचवलेत.
आपलेही अभिनंदन!
-'बेफिकीर'!
मल्लिनाथ - बघ, तुमच्याच कल्पना, तुमचेच शब्द आणि चामर वृत्तात चपखल! मजा आली की नाही? अर्थात, आशयाचे श्रेय आपलेच आहे.
मल्लिनाथ, वर चुकून 'बघा' ऐवजी
मल्लिनाथ, वर चुकून 'बघा' ऐवजी 'बघ' झाले आहे. क्षमस्व!
डॉ ज्ञानेश पाटील यांची 'भेट
डॉ ज्ञानेश पाटील यांची 'भेट चोरटी' किंवा 'पुनर्भेट' (या दोन स्वतंत्र गझला असाव्यात) या गझला एकदा तपासाव्यात!
वाचायलाही मजा येते त्या गझला!
त्यातलाच एक शेर !
ठेवणीतला नको करूस दागिना मला
वापरातला तुझा रुमाल होत जाउदे
या वृत्तामुळे आठवले इतकेच!
-'बेफिकीर'!
पोस्टलेली रचना गझल नव्हती
पोस्टलेली रचना गझल नव्हती म्हणून प्रतिसाद दिला नव्हता परंतु, डॉक्टरांनी केलेले बदल वाचल्यानंतर रहावले नाही...केवळ अफलातून डॉक्टर.
मल्लिनाथ ह्यांना गझलेच्या प्रांतात लेखन करावेसे वाटले ह्याबद्दल त्यांचेही अभिनंदन!!
>>>एकीकडे मित्र मित्रांना दाद
>>>एकीकडे मित्र मित्रांना दाद देत सुटले आहेत असे वाटते<<< सॉरी टू डिफर...
आम्हाला गझलेच्या गणिता विषयी नाही कळत पण त्यातला भाव पोचला म्हणून पावती... अन तुम्ही म्हणता त्या गझलेला मी अजून पाहिले नाही त्यामुळे ती भावली की नाही ते सांगणे कठीण ! त्याची लि़क द्या, देते पावती . सरसकट विधानाबद्दल हा आक्षेप नोंदवला आहे. भाव महत्वाचा चौकट नंतर ... चुभुद्याघ्या.....
http://www.maayboli.com/node/
http://www.maayboli.com/node/22080
आरती, ही घे लिंक...
छान शेर सगळे. डॉक्टर...काय
छान शेर सगळे.
डॉक्टर...काय मस्त बदल केलेत तुम्ही...आय मीन जेवणाची चव छानच असते,पण ते सजवुन आणल्यावर आणखी छान वाटते असं वाटलं वाचुन
मल्ल्या...डॉकनी केलेल्या बदलांचा नक्की विचार कर. आणखी अभ्यास केलास तर तू खुप छान गझल लिहु शकशील...शाळेत जाउन ये ( गझल कार्यशाळेबद्दल म्हणतीये, तू लहानपणी सुद्धा शाळेत गेला नाहीयेस हे माहित आहे मला :फिदी:)
अवल, तुमच्या मताचा आदर आहेच,
अवल,
तुमच्या मताचा आदर आहेच, भाव पोचला म्हणून आपण दाद दिलीत! पाटील यांची गझल पाहिली नाहीत म्हणून त्यावर काही म्हणाला नाहीत. पण शेवटी गझलेला दाद देताना त्या गोष्टीची, गणिताची, काळजी जर आपल्यासारख्या जाणकारांनीच घेतली नाही तर कोण घेणार?
मगाशीच एक कविता वाचताना मला अगदी स्फुरण चढले होते. 'पूर्णपणे गद्य आहे' असे लिहिण्याचे! पण वादसम्राट आधीच आहे मी! त्यात आणखीन एक मानाचा तुरा नको म्हणून शहाणपणा केला एवढेच! त्या 'कवितेवर' मात्र प्रतिसादक तुटून पडलेले दिसले, स्तुती करण्यासाठी!
असो! मला काय त्याचे?
-'बेफिकीर'!
मल्ली आवडली रे
मल्ली आवडली रे
मल्ल्या, मस्तच रे ! गझलेतलं
मल्ल्या, मस्तच रे !
गझलेतलं आपल्यालाही फारसं काही कळत नाही. पण भापो
मल्ली ! You too ? पण छान आहे
मल्ली ! You too ?
पण छान आहे ! विश्ल्याने सांगीतल्या प्रमाणे भापो !
सर्वांचे आभार ! विषेश करुन
सर्वांचे आभार !
विषेश करुन डॉ.
मल्ल्या छान मांडल्यात
मल्ल्या छान मांडल्यात भावना.
बाकी जाणकारांच्या सुचनांचा नक्कीच विचार कर.
अत्यंत फ्रेश आशय असलेली गझल,
अत्यंत फ्रेश आशय असलेली गझल, तीही शुद्ध, प्रकाशित केली, ती धुळ खात पडलेली आहे >>> मातब्बरांचा जाहिरात करण्याचा मार्ग आवडला. पण पॅराशूटच्या जाहिरातीतले शब्द ढापलेले दिसतायत.
मल्ली,
तुझा प्रयत्न चांगला आहे. डॉक्टर हा निस्वार्थपणे मार्गदर्शन करणारा माणूस आहे. त्यांच्याकडून शिकायला मिळेल तेवढे नक्की शिकुन घे. त्यानी केलेल्या बदलाने तुला अपेक्षीत आशय साध्य होत नसेल तर ही रचना कविता विभागात हलव. गझलच लिहायला हवी असे नाही. बाकी मला समजलेले व्याकरण मी तुला फोनवर सांगेन. तू चांगली गझल लिहू शकशील. शुभेच्छा!!!
मल्लीनाथ, आपल्या भावना
मल्लीनाथ,
आपल्या भावना दुखावल्या गेलेल्या असाव्यात असे काही प्रतिसादांवरून वाटत आहे. मी क्षमा चाहतो.
-'बेफिकीर'!
हबा, गझल मात्रावृत्तात असु
हबा, गझल मात्रावृत्तात असु शकत नाहीका ? कि अक्षरवृत्तात लिहीने बंधनकारक आहे ? मी वाचलेले आठवते की गझल मात्रावृत्त्तात असु शकते.
मात्रावृत्तात सुद्धा गझल
मात्रावृत्तात सुद्धा गझल लिहीता येते.... पण ती लयीत असावी.... लयीत बोलता यावी असा प्रघात आहे.
मी दिलेल्या ओळीत २३ मात्रा आहेत.... आणि,
निसटुन गेली रात्र तुझ्या आठवांसवे
रमलो होतो तेव्हा कुठे चांदण्यात मी
या शेरात पहिल्या ओळीत २२ मात्रा आहेत...
नको चिंब पाऊस... न हवी सांज मखमली
हलकेच सखे स्पर्श तुझा... अन नभात मी
या शेरात दुसर्या ओळीत २२ मात्रा आहेत.....
तसेच लय ही बिघडते आहे.... यास्तव बदल अपेक्षित आहेत..
हे बदल तुला करणे कठीण नाही....
मल्ली छान लिहिलीयस विकु ला
मल्ली छान लिहिलीयस
विकु ला मोदक
त्र दिर्घ कि र्हस्व ? अन स्प
त्र दिर्घ कि र्हस्व ?
अन स्प वर र्श चा आघात म्हणुन त्याला दिर्घ गणले.
निसटुन गेली रात्र तुझ्या
निसटुन गेली रात्र तुझ्या आठवांसवे
१+१+१+१ +२+२+२ +१+१+२+२+१+२+१+२ = २२
हलकेच सखे स्पर्श तुझा... अन नभात मी
१ +१+२+१+१+२+२+१+१+२+१+१+१+२+१+२= २२
Pages